सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

उगाच चॅप्टरगिरी

 ल्युट प्रत्यय

इ धातू जाणे,अभ्यास करणे, स्मरण करणे. 

त्याला ल्युट प्रत्यय लागला की त्याचे रूप बदलते. ल आणि ट चा लोप होऊन फक्त य शिल्लक राहतो. य चा अन होतो. क्रियापदाचा अर्थ व्यक्त करण्यासाठी, तयार झालेला हा शब्द कर्म रूपात वापरता येते. जसे रक्षणम्, शयनम्, गमनम्, भरणम् वगैरे.

इ धातू चे ल्युट प्रत्यय लागून रूप तयार होते अयनं.

अधि +अ +अयनं =अध्ययनं

येथे

अधि आणि अ हे दोन उपसर्ग लावले आहेत.

अधि चा अर्थ विशेष. जसे अधिकारी, अधिकृत

अ या उपसर्गांचा अर्थ नकारात्मक असतो जसे

सत्य असत्य

नीति अनीति

अशाच पद्धतीने आ उपसर्ग लावला असता वेगळा शब्द तयार होतो.

अधि+आ+अय =अध्याय

आ ह्या उपसर्गाचा अर्थ पासून, पर्यंत, (आजन्म), उलट (आगमन), पलिकडे (आमरण)

आता अध्ययन ह्या शब्दाचा अर्थ समजून घेणे सोपे जाईल.

अधि+य+अयन (इ धातू)

विशेष अभ्यास करणे (फक्त गुण मिळवण्यासाठी नाही तर ज्ञान मिळवण्यासाठी.

अध्याय म्हणजे जे काही ज्ञान आहे ते एकत्रित करून ठेवणे.

अधि+आ+अय

आ उपसर्गांचा पुन्हा एकदा अर्थ पहा..

ज्ञानाची सर्वोच्च पातळी गाठून एकत्रित केलेला तो अध्याय.

इंग्रजीत अध्याय ह्या शब्दाचे भाषांतर Canto किंवा Chapter असे केले जाते. खरेच ह्या दोन्ही शब्दांचा अध्याय असा अर्थ होऊ शकतो का? (उगाच काहीतरी चॅप्टरगिरी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा