शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

मुण्डकोपनिषद् 1.2.1-1.2.13

 मुण्डकोपनिषद् प्रथम मुण्डक द्वितीय खण्ड्

तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा संततानि। तन्यचरथ नियतं सत्यकामा एष वः पन्थाः सुकृतस्य लोके ॥ मुण्डकोपनिषद् 1.2.1।। 

कवयः मन्त्रेषु  कर्माणि यानि अपश्यन् तत् एतत् सत्यम्। त्रेतायम् तानि बहुधा सन्ततानि। सत्यकामाः नियतम् तानि आचारथ। सुकृतस्य लोके वः एषः पन्थाः ॥


कवयः द्रष्टे कवि पु. प्र. ब. व. 

मन्त्रेषु मन्त्रांमधे मन्त्र पु. स. ब. व. 

कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व. 

यानि जी यद् नपु. द्वि. ब. व. 

अपश्यन् पाहिली दृश् धातू कर्तरि लडः लकार प्र. पु. ब. व. 

तत् ते तद् नपु. प्र. ए. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. द्वि. ए. व. 

त्रेतायाम् त्रेतायुगात त्रेता स्त्री. स. ए. व. 

तानि ती तद् नपु. द्वि. ब. व. 

बहुधा विविध प्रकारे अव्यय 

सन्ततानि सतत सन्तत नपु. द्वि. ब. व. 

सत्यकामाः सत्याची इच्छा करणारे सत्यकाम पु. प्र. ब. व. 

नियतम् नेहमी नियत पु. द्वि. ए. व. 

तानि ती तद् नपु. द्वि. ब. व. 

आचरथ आचरण करावे आड्ः +चर् धातू कर्तरि लट लकार म. पु. ब. व. 

सुकृतस्य शुभ कर्माचे सुकृत पु. ष. ए. व. 

लोके जगात लोक नपु. स. ए. व. 

वः तुमचा युष्मद् ष. ब. व. 

एषः हा एतद् पु. प्र. ए. व. 

पन्थाः पन्थ पु. प्र. ब. व.

मुण्डकोपनिषदाच्या प्रथम मुण्डकातील प्रथम खण्डात आपण परा आणि अपरा विद्या यामधील फरक जाणून घेतला. आता प्रथम मुण्डकातील द्वितीय खण्डात ऋग्वेदातील मंत्र आणि त्या अनुषंगाने केली जाणारी कर्मे ह्यांचे विवेचन वाचायला मिळणार आहे. पुस्तक लिहिताना आपण जसे सुरवातीला विषयाची तोंड ओळख करून देतो आणि त्यानंतर एक एक मुद्द्यावर चर्चा करतो तशीच साधारण रचना येथे दिसून येत आहे. ह्या खण्डात विविध कर्मकांडांवर चर्चा केली आहे. ते वाचून मनात संभ्रम निर्माण होतो की ह्या उपनिषदात कर्मकांडांवर इतका भर कशासाठी दिला आहे? अर्थात त्याचे उत्तर दुसर्‍या मुण्डकात आपोआपच मिळते. 

त्रेतायां ह्या शब्दाचा अर्थ नेमका कसा घ्यावा, केवळ त्रेता युगाचा उल्लेख महर्षींना करावयाचा आहे का ते तपासून पहावे लागेल. कारण त्रेता म्हणजे तीन गोष्टींचा संग्रह. म्हणजे येथे तीनही वेदांचा उल्लेख केला आहे का?

सुभाषितानुसार

त्रेतायां मंत्र-श्क्तिश्च, ज्ञानशक्तिः कृते-युगे द्वापरे युद्ध-शक्तिश्च, संघशक्ति कलौ युगे।।

सत्ययुगात ज्ञान शक्ति, त्रेता युगात मन्त्र शक्ति तर द्वापर युगात युद्ध शक्ति चे प्रस्थ होते मात्र कलियुगात संघटनात्मक शक्ति हीच प्रधान आहे.  

मंत्र म्हणजे उपदेश. त्यानंतर सन्तत आणि नियत असे दोन शब्द वापरले आहेत. म्हणजेच जे उपदेश दिले आहेत, त्या प्रमाणे ते नेहमी आणि नियमपूर्वक पाळायचे आहेत.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

मंत्रामधे जी विविध प्रकारची कर्मे महर्षींना आढळली, जी त्रेतायुगात आचरली जात होती. सत्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी ती नियमित आणि नियमपूर्वक आचरणात आणावी. या जगात चांगल्या कर्मांची फळे प्राप्त करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.

यदा लेलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने।

तदज्यभागवंतरेणाहुतीः प्रतिपदायेत्॥ 1.2.2।।

यदा समिद्धे हव्यवाहने हि अर्चिः लेलायते तदा अज्यभागौ अंतरेण आहुतीः प्रतिपादयेत् ॥


यदा जेव्हा अव्यय 

समिद्धे प्रज्वलित झालेल्या समिद्धः पु. स. ए. व. सम्+इन्ध् धातू प्रज्वलित होणे क्तः प्रत्यय 

हव्यवाहने यज्ञाग्निमधे हवि+वाहन नपु. द्वि. द्वि. व.

हविस् हु धातू यत् प्रत्यय हव्य, हव्यस्य वाहनं हव्यवाहनम् 

हि अर्चिः ज्वाळा अर्चिस् नपु. द्वि. ए. व. 

लेलायते पुन्हा पुन्हा उसळणाऱ्या लेलीय प्र. ए. व. 

लल् धातू लट् लकार प्र. पु. ए. व. 

किंवा ली (श्र्लेषणे) +यड्ः प्रत्यय =लेलीय 

तदा तेव्हा अव्यय 

अज्यभागौ तूप सोडण्याची जागा 

आ-अञ्ज्-क्यप् प्रत्यय तूप 

भागौ भाग पु. प्र. द्वि. व. 

अंतरेण दोन भागांत अंतर नपु. तृ. ए. व. 

आहुतीः आहुति स्त्री. प्र. ब. व. 

आङ् + हु धातू + क्तिन् प्रत्यय 

प्रतिपादयेत् अर्पण करावे प्रति+पद् धातू मिळणे + णिच् दिवादिः कर्तरि विधिलिङ् लकार प्र. पु. ए. व. 

आधीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कर्मकांडासंबंधि आपण आता वाचणार आहोत. कर्मकांडामधे सर्वात महत्त्वाचा तो यज्ञ.

यज्' या धातूपासून निर्माण झालेला हा शब्द. याचा अर्थ 'देवादिकांचा आदर , संगतीकरण, आणि दान' असा होतो. आपणापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांची पूजा करणे म्हणजे यज्ञ. आपल्या मनात मैत्रीची भावना ठेवून सर्वांशी एका विचाराने जगताना प्रगती करण्याची कला म्हणजे संगतीकरण. आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तींना ज्ञान, बल आणि धन ह्या स्वरुपात मार्गदर्शन करणे म्हणजे दान होय. या संपूर्ण क्रियेला यज्ञ अस म्हणतात.

अग्नीचे आपल्या आयुष्यातील महत्त्व वेगळे सांगायला नको. मात्र ह्या अग्नीचे आणि यज्ञीय अग्नीचे पावित्र्य वेगळे असावे असे मत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी नोंदविले आहे. ( भारतीय संस्कृती कोश, खंड सातवा, पृष्ठ क्र. 600)

यज्ञ हा शब्द ऋग्वेदात अनेकदा वाचायला मिळतो, त्याचा अर्थ बहुतेक वेळा श्रेष्ठ कर्म असाच घेतला गेला आहे. संहितांचे जे ब्राह्मण्य ग्रंथ आहेत त्यामध्ये आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांसाठी यज्ञ करण्यास सांगितले आहेत. ब्राह्मण्य ग्रंथांचा समावेश श्रुतींमध्ये होतो म्हणून ब्राह्मण्य ग्रंथात सांगितलेल्या यज्ञाला 'श्रौतयज्ञ' असे म्हणले जाते.

गृहस्थाने पाच यज्ञ करावेत असे म्हटले आहे. 

देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ. 

ह्या यज्ञांमुळे देव, पिता, पशू, मनुष्य, समाज व गुरू या पाचही ऋणातून मुक्त होता येते असे म्हणतात. यज्ञ प्रक्रियेत समिधांची आहुती देण्याची पद्धत आहे. त्याच बरोबर 'इदम् न मम् ' असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रथम मुण्डकातील प्रथम खण्डातील 7 व्या मंत्रात ब्रह्मदेवाने पृथ्वीमधून ओषधि वनस्पती निर्माण केल्या असे वाचले होते. त्याच वनस्पतींपैकी काही समिधा म्हणून आहुती द्यायच्या आणि हे सर्व माझे नाही असे म्हणायचे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

अग्नी प्रज्वलित केल्यानंतर जेव्हा ज्वाला भडकल्यानंतर जेथे तूप सोडले जाते त्याठिकाणी आहुतींना अर्पण करावे.

यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासं अचातुर्मास्यमनाग्रयणमतिथिवर्जितं च। अहुतमवैश्वदेवमविधिना हुतं आसप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति ॥ 1.2.3।।

यस्य अग्निहोत्रम् अदर्शम् अपौर्णमासम् अचातुर्मास्यम् अनाग्रयणम् अतिथिवर्जितम् अहुतम् अवैश्वदेवम् अविधिना हुतम् च तस्य आसप्तमान् लोकान् हिनस्ति ॥


यस्य ज्याचे यद् पु. ष. ए. व. 

अग्निहोत्रम् अग्निहोत्र नपु. द्वि. ए. व. 

अदर्शम्  दर्श अमावस्या यज्ञ कर्म शिवाय 

अ +दर्शम् दर्श नपु. द्वि. ए. व. 

अपौर्णमासम् पौर्णिमा यज्ञ कर्म शिवाय अ+पौर्णमास नपु. द्वि. ए. व. 

अचातुर्मास्यम् चातुर्मास यज्ञ कर्म शिवाय

अ+चातुर्मास्य

 नपु. द्वि. ए. व. 

अनाग्रयणम् नव धान्य यज्ञकर्म शिवाय अन्+आग्रयणम्

नपु. द्वि. ए. व. 

अग्रे अयनं 

अतिथिवर्जितम् अतिथि शिवाय  

अतिथिवर्जित नपु. द्वि. ए. व.   व्रज् धातू सोडणे 

अहुतम् अयोग्य आहुती अ+हुत नपु. द्वि. ए. व. 

हु धातू भक्षण करणे 

अवैश्वदेवम् विश्वदेव कर्म रहित 

अ+वैश्वदेव नपु. द्वि. ए. व. 

अविधिना नियमबाह्य अ+विधि पु. तृ. ए. व. 

हुतम् हवन हुत नपु. द्वि. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

तस्य त्याचे तद् पु. ष. ए. व. 

आसप्तमान् सातपर्यंत आ+सप्तम पु. द्वि. ब. व. 

लोकान् पिढ्या लोक पु. द्वि. ब. व. 

हिनस्ति नष्ट होतात हिंस् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

प्रथम मुण्डकातील द्वितीय खण्डातील पहिल्या मंत्रात नियमित आणि नियमपूर्वक कर्मकांडे करण्यास सांगितले होते. तसे न केल्यास त्याचे परिणाम काय होतील त्याचे वर्णन ह्या मंत्रात केले आहे. ते वाचण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जसे न्यायसंस्था आणि निरनिराळे कायदे ही ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली देणगी. त्यापूर्वी धर्म म्हणजे आपली कर्तव्ये होती. आपण आपली कर्तव्ये नीट पार पाडावी त्यासाठी धार्मिक गोष्टींचा वापर लोकांवर वचक ठेवण्यासाठी करत असावे. जेव्हा परा आणि अपरा विद्यांचा स्पष्ट उल्लेख केला जातो तेव्हा अपरा विद्या म्हणजेच कनिष्ठ विद्या ह्या सामान्य माणसांसाठी असाव्यात असे मनात ठेवून हे मंत्र वाचले तर ते फारसे वावगे वाटत नाहीत.

ह्या मंत्रात अग्निहोत्र असा उल्लेख आहे. अग्निहोत्र आणि यज्ञ ह्यात नेमका फरक काय? तर काहीच नाही. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दैनंदिन केला जाणारा यज्ञ म्हणजे अग्निहोत्र. आयुर्वेदात ह्याचे फायदे सांगितले आहेत.

दर्श अमावस्या हि पितृपक्षातील पितरांप्रती समर्पित आहे.

पौर्णिमा आणि चातुर्मास ह्या बद्दल आपण जाणतोच. बहुत करून पवित्र लोकांच्या जयंती पौर्णिमेला असतात. आणि चातुर्मासातील दिवस आपण पवित्र मानतो. 

आपल्याकडे नवीन धान्य तयार झाले की त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आग्रयण यज्ञ करण्याची पद्धत आहे. 

अत् धातू फिरत राहणे+ इथिन्=अतिथि 

अ+तिथि,ह्यामधील तिथि हा शब्द आपल्याला माहीत आहे. तिथिशिवाय म्हणजे अचानक येणारा तो अतिथि.

विश्वदेव म्हणजे देवांचा एक समूह. धर्मदेवांनी दक्षाच्या 10 मुलींशी विवाह केले त्यापैकी एकीचे नाव विश्वा, तिच्या पुत्राचे नाव विश्वदेव. ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख सापडतो. 

भविष्य पुराणात दहा विश्वेदेवांचे उल्लेख आहेत. 

कृततुर्दक्षो वसुः सत्यः कालकामो धृतिः कुरुः। शङ्कुमात्रो वामनश्च विश्वेदेवा दश स्मृतः। ।।  भविष्य पुराण. 1.125.12 

क्रतु, दक्ष, वसु, सत्य, काला, काम, धृति, कुरु, शंकुमात्रा, वामन हे दहा विश्वेदेव आहेत.

सर्वात पहिल्या मंत्राप्रमाणे (1.1.1)विश्वकर्ता हा ब्रह्मदेव आहे.

ह्या मंत्रातील आ+सप्तम ह्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.

'आ'उपसर्गाचा अर्थ पर्यंत असा होतो.

त्यापुढे लोकान् हा शब्द वापरला आहे.

आपल्या धार्मिक समजूत प्रमाणे सात लोक आहेत. भूलोक (पृथ्वी और आकाश), भुवर्लोक , स्वर्गलोक , महर्लोक , जनार्लोक , तपलोक आणि सत्यलोक.

आधी चर्चा केल्यानुसार जर कोणी नियमबाह्य (अविधि) वागत असेल (ह्या मंत्रात नियमबाह्य यज्ञ करत असेल) तर हे सात लोक त्याला प्राप्त होणार नाहीत.

आसप्तम ह्याचा दुसरा अर्थ आधीच्या सात पिढ्या असाही काही ठिकाणी लिहिला आहे.

ह्या मंत्राचा सारासार विचार करता गुरू आपल्या शिष्याना काय सांगू इच्छितात. तर अंगी शिस्त बाळगून, नियमबाह्य कामे टाळून दानधर्म आणि दयावृत्ती असू द्यावी. ह्या सर्वाद्वारे आत्म उन्नती साधावी.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

ज्याचे अग्निहोत्र दर्शकर्मविरहीत आहे तसेच पौर्णिमा व चातुर्मास यज्ञ विरहित आहे. (ज्याचे अग्निहोत्र) कापणीला आलेल्या नवीन धान्य अर्पण करण्याचा यज्ञ, अतिथिपूजनवर्जित, योग्य प्रकारे आहुती न दिलेले, वैश्वदेव पूजन वर्जित किंवा नियमबाह्य यज्ञ असे असेल तर त्याचे सात पिढ्यातील लोक नष्ट होतात.


काली काली कराली च मनोजवा च सुलोहिता या च सुधूम्रवर्णा।

स्फुलिङ्गिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः ॥1.2.4।।

काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा स्फुलिङ्गिनी विश्वरुची देवी च इति लेलायमानाः सप्त जिह्वाः ॥


काली काळी काली स्त्री. प्र. ए. व. 

कराली अती उग्र कराली स्त्री. प्र. ए. व.

कराल + ङीष् प्रत्यय 

मनोजवा मनासारखे जोरात धावणे, चंचल मनोजवा स्त्री. प्र. ए. व. 

जु सौत्रो धातू धावणे

 + अच् टाप् 

मन इव जवो यस्याः 

सुलोहिता लाल रंगाची सुलोहिता स्त्री. प्र. ए. व. 

लोहित + स्त्रियां टाप्

लोहित=रुह + इतन् प्रत्यय 

सुधूम्रवर्णा धूरकट सुधूम्रवर्णा

स्त्री. प्र. ए. व. 

सु+धूम्र + टाप् प्रत्यय 

स्फुलिङ्गिनी ठिणगी स्फुलिङ्गिनी स्त्री. प्र. ए. व. 

स्फुल + इङ्गच् प्रत्यय 

विश्वरूची बहुरंगी विश्वरूची स्त्री. प्र. ए. व. 

देवी देवी स्त्री. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

इति अव्यय 

लेलायमानाः फडफडणार्‍या लेलायमाना स्त्री. प्र. ब. व. 

सप्त सात सप्तन् त्रिणी लिंगानि द्वि . ब. व. 

जिह्वाः जिभा जिह्वा स्त्री. द्वि . ब. व. 

आपल्याला अग्नी कोणकोणत्या रूपात दिसतो त्याचे वर्णन ह्या मंत्रात केले आहे. शास्त्रीय दृष्ट्या निळ्या रंगाची ज्योत सर्वात चांगली मानली जाते. पिवळ्या रंगाच्या ज्योतीमुळे भांड्यांवर काजळी चढते. मिणमिणती ज्योत आपल्याला माहीत आहे. धुमसत्या अग्नीचा फक्त धूर दिसून येतो. ह्या मंत्रात अग्नीच्या 7 जीभा आहेत असे म्हटले आहे. बायबल मध्ये तर जीभेलाच अग्नी म्हटले आहे (जेम्स 3.5.6)

अग्नीतत्व हा वेगळाच समजून घेण्याचा विषय आहे.

आपल्या पचनशक्तीला जठराग्नी म्हणतात.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की 

ज्वालांच्या सात फडफडणार्‍या जीभा, काळी, अक्राळविक्राळ, मनासारखी चंचल, लाल रंगाची, धूरकट वर्णाची, ठिणगीस्वरूपात आणि बहुरंगी देवी आहेत.

एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथाकालं चाहुतयो ह्याददायन्‌। तं नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः ॥ 1.2.5।।

यः भ्राजमानेषु एतेषु यथाकालम् आहुतयः आददायन् चरते तम् एताः सूर्यस्य रश्मयः यत्र एकः देवानाम् पतिः अधिवासः नयन्ति हि ।।


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

भ्राजमानेषु प्रदीप्त ज्वाळांमधे 

भ्राज् धातू चमकणे शानच् प्रत्यय पु. स. ब. व. 

एतेषु यामध्ये एतद् पु. स. ब. व. 

यथाकालम् योग्य वेळी यथाकाल पु. द्वि. ए. व. 

आहुतयः आहुति स्त्री. प्र. ब. व. 

आददायन् देतो 

चरते आचरतो चर् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व. 

एताः या एतद् स्त्री. द्वि. ब. व. 

सूर्यस्य सूर्याची सूर्य पु. ष. ए. व. 

रश्मयः किरणे रश्मि स्त्री. प्र. ब. व. 

यत्र जेथे अव्यय 

एकः एक पु. प्र. ए. व. 

देवानाम् देवांचा देव पु. ष. ब. व. 

पतिः अधिपती पति पु. प्र. ए. व. 

अधिवासः निवास अधिवास पु. प्र. ए. व. 

नयन्ति घेऊन जातात नी धातू प्राप्त होणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

3र्या मंत्रात नियमपूर्वक यज्ञ न केल्याचे दुष्परिणाम सांगितले होते आता ह्या मंत्रात विधिवत यज्ञ केला असता त्यापुढे काय घडते ते सांगितले आहे.

दिव् धातूपासून तयार झालेला शब्द देव म्हणजे प्रकाश देणारा, मार्ग दाखवणारा. देवांचा अधिपति म्हणजे इन्द्रदेवाचा येथे उल्लेख केला आहे. पर्जन्यदेवता असणाऱा इन्द्रदेव ही पोषण देवता आहे. ‘उदरभरण नोहे  जाणिजे यज्ञ कर्म.’याची सुरुवात पर्जन्यदेवतेपासूनच होते.

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

जो योग्य वेळी प्रदीप्त अशा ज्वाळांमधे अग्निहोत्र करून आहुती देतो त्याला त्या ज्वाळा, सूर्य किरणांप्रमाणे जेथे देवांच्या स्वामी च्या एक निवास स्थल (आहे तेथे) पोहोचवतात.

एह्येहिति तमहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति। प्रियं वाचमभिवदन्त्योऽर्चयन्त्य एष वः पुण्यः सुक्रोतो ब्रह्मलोकः ॥ 1.2.6 ॥

सुवर्चसः आहुतयः एहि एहि एषः वः सुकृतः पुण्यः ब्रह्मलोकः इति प्रियाम् वाचम् अभिवदन्त्यः अर्च्ययन्त्यः च तं यजमानं सूर्यस्य रश्मिभिः वहन्ति ॥


सुवर्चसः दैदीप्यमान सुवर्चस् पु. ष. ए. व. 

आहुतयः आहुत्या आहुति स्त्री. प्र. ब. व. 

एहि एहि इकडे या आङ् + इ धातू जाणे कर्तरि लोट् लकार परस्मैपद म. पु. ए. व. 

एषः हा एतद् पु. प्र. ए. व. 

वः तुमच्या युष्मद् ष. ब. व. 

सुकृतः सत्कर्माने सुकृत पु. प्र. ए. व. 

पुण्यः पुण्य पु. प्र. ए. व. 

ब्रह्मलोकः ब्रह्मलोक पु. प्र. ए. व. 

इति अव्यय 

प्रियाम् मधूर प्रिया स्त्री. द्वि. ए. व. 

वाचम् वाणी वाच् स्त्री. द्वि. ए. व. 

अभिवदन्त्यः उच्चारणार्‍या अभि + वद् + शतृँ  प्रत्यय स्त्री. प्र. ब. व.

अर्च्ययन्त्यः स्तुती करणार्‍या अ+चर् धातू शतृ प्रत्यय स्त्री. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व. 

यजमानम् यजमान पु. द्वि. ए. व. 

सूर्यस्य सूर्याच्या सूर्य पु. ष. ए. व. 

रश्मिभिः किरणांद्वारे रश्मि स्त्री. तृ. ब. व. 

वहन्ति नेतात वह् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

आधीच्या मंत्रात आपण योग्य पद्धतीने यज्ञ केल्यास आपल्या आहुती यजमानास इन्द्रदेवापर्यंत पोहोचवतात असे वाचले. पण हे कसे घडते त्याचे वर्णन ह्या श्लोकात काव्यात्मक रूपात केले आहे. जो मनापासून, चांगल्या भावनेने काम करतो त्याला सर्वांचेच सहकार्य मिळते. ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

प्रकाशमान अशा आहुती  'इकडे या '  'इकडे या ' असा सुमधुर वाणीने स्तुती करून ब्रह्मलोकः म्हणजे तुमच्या सत्कर्माचे फळ आहे आणि त्याकडे जाण्याचा हा सुनियोजित मार्ग आहे असे सांगून यजमानांना सूर्याच्या किरणांद्वारे तिकडे घेऊन जातात.

प्लवा ह्येते अदृधा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म। एतच्छ्रेयो येऽभिनन्दन्ति मूढा जरामृत्युं ते पुनरेवापि यान्ति ॥ 1.2.7 ॥

एते हि अष्टादश यज्ञरूपाः प्लवाः अदृढाः येषु अवरम् कर्म उक्तम्। ये मूढ़ाः एतत् श्रेयः इति अभिनन्दन्ति ते पुनः अपि जरामृत्युं यान्ति एव ॥


एते या एतद् पु. प्र. ब. व. 

हि खरोखर अव्यय 

अष्टादश अठरा 

यज्ञरूपाः यज्ञरूपी यज्ञरूप पु. प्र. ब. व. 

प्लवाः नौका प्लव पु. प्र. ब. व. 

प्लु धातू जाणे 

अदृढाः बेभरवशाच्या अदृढ पु. प्र. ब. व. 

येषु ज्यांच्या मध्ये यद् पु. स. ब. व. 

अवरम् निकृष्ट अवर पु. द्वि. ए. व. 

वृ धातू पसंत करणे 

कर्म कर्मन् नपु प्र. ए. व. 

उक्तम् सांगितले आहे उक्त नपु. प्र. ए. व. 

ये जे मूर्ख यद् पु. प्र. ब. व. 

मूढ़ाः मूढ पु. प्र. ब. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

श्रेयः श्रेयस्कर श्रेय पु. प्र. ए. व. 

इति असे अव्यय 

अभिनन्दन्ति प्रशंसा करतात अभि+नन्द् धातू वृद्धि होणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

पुनः पुन्हा अव्यय 

अपि सुद्धा अव्यय 

जरामृत्युं वृद्धत्व आणि मृत्यू 

यान्ति प्राप्त होतात 

एव पुन्हा अव्यय

आता हळूहळू उपनिषदातील मुख्य गाभा म्हणजे परा विद्येची ओळख करून देण्याची सुरुवात ह्या मंत्रापासून होते आहे असे वाटते.

यज्ञकर्म करण्यासाठी 16 ऋत्विज् आणि यजमान व त्यांच्या पत्नी अशा 18 जणांची उपस्थिती अपेक्षित असते. 16 ऋत्विज् पैकी 4 जण प्रमुख 

होतृ, अध्वर्यु,उद्भाता आणि ब्रह्मा. ह्यांना जोड देणारे 12 जण पुढीलप्रमाणे मैत्रावरुण, प्रतिप्रस्थाता, ब्राह्मणच्छंसी, प्रस्तोता, अच्छावाक्, नेष्टा, आग्नीध्र, प्रतिहर्त्ता, ग्रवस्तुत्, उन्नेता, पोता और सुब्रह्मण्य.

ऋग्वेदात ऋत्विजांसंबंधी मंत्र सापडतो. 

तवग्ने होत्रं तव पोत्रमृत्वियं तव नेष्ट्रं त्वमग्निदृतायतः। तव प्रशास्त्रं त्वमध्वरीयसि ब्रह्मा चासि गृहपतिश्च नो दमे ॥ऋग्वेद 2.1.2॥

मनुस्मृति 2.143 मध्ये ऋत्विज् संबंधी श्लोक दिसून येतो.

अग्निधेयं पकायज्ञनाग्निष्टोमादिकं माखन | यः करोति वृतो यस्य स तस्यर्त्विगिहोच्यते ||मनुस्मृति।। 2. 143 ||

यज्ञकर्म ह्या शब्दाचा विस्तृत अर्थ आपण श्रीमद्भगवद्गीता वाचताना समजून घेतला आहे तसेच कर्मयोग सुद्धा समजून घेतला आहे. आपल्या आयुष्याचा हेतू आपल्याला उमगायला हवा. यज्ञ म्हणजे विशिष्ट हेतूने केलेला प्रकल्प. आपल्या स्वार्थासाठी केलेला यज्ञ निकृष्ट आणि त्याची कर्मफळे सुद्धा. कर्मयोगी आपल्या कर्माकडे परमेश्वराचे कर्म असे मानतो आणि निष्काम भावाने कर्म करतो. आपला समाजात कर्मकांडांना अवास्तव महत्त्व दिले गेले आहे. ह्या श्रुतीच्या निमित्ताने आपल्या विचारांना चालना मिळत आहे. 

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

ज्यामध्ये निकृष्ट कर्म सांगितले आहे, जे अठरा जणांच्या सहभागाने केले जाते असे यज्ञ म्हणजे अस्थिर नौका आहेत. पण हेच यज्ञ श्रेयस्कर अशी भलावण जे मूर्ख करतात ते पुन्हा पुन्हा वृद्धत्व आणि आणि मृत्यू ला सामोरे जातात.

अविद्ययामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः।जङ्घन्यमानाः परियन्ति मूढ़ा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥1.2.8।।

अविद्ययाम् अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः जड्ःघन्यमानाः मूढ़ाः अंधेन एव नीयमानाः अंधाः यथा परियन्ति ॥


अविद्ययाम् अंतरे वर्तमानाः कायम अविज्ञेत राहणारे

अविद्ययाम्  अविद्या स्त्री. स. ए. व. 

अंतरे  अव्यय (अन्तर+इ धातू जाणे, अंतर ठेवून असणे +विच् प्रत्यय कृदन्त नपु.स. ए. व.) 

वर्तमानाः वर्तमान पु. प्र. ब. व. 

स्वयं स्वतः सु+अय नपु. प्र. ए. व. 

धीराः बुद्धिमान धीर पु. प्र. ब. व. 

पंडितम् पंडित पु. द्वि. ए. व. 

मन्यमानाः मानणारे मन्यमान पु. प्र. ब. व. 

मान् धातू ज्ञान प्राप्तीची इच्छा करणे 

जड्ःघन्यमानाः पीडित होत राहतात 

जड्ःघन्यमान पु. प्र. ब. व. 

हन् धातू मारणे यड्ःन्त प्रत्यय जड्ःघन्यते शानच् रूप

मूढ़ाः मूर्ख मूढ पु. प्र. ब. व. 

अंधेन अंधांकडून अंध पु. तृ. ए. व. 

एव सुद्धा अव्यय 

नीयमानाः नेल्या जाणाऱ्या नीयमान नी धातू नेणे  कर्मणि शानच्

अंधाः अंधांसारखे अंध पु. प्र. ब. व. 

यथा जसे अव्यय 

परियन्ति भ्रमण करतात परि+इ धातू जाणे कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व.

आधीच्या मंत्रात पुनः म्हणजे वारंवार असा शब्द वापरला होता आता ह्या श्लोकात धातू ची यड्ःन्त रूपे वापरली आहेत.

श्रुती मधील एकेक मंत्र आपल्याला जीवनकोशल्ये शिकवतात. ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहेच पण ते सतत मिळवत राहिले पाहिजे. आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही कारण सतत निरनिराळे पैलू आपल्यासमोर उलगडत राहतात. फक्त ते समजून घेण्याची आपली तयारी हवी त्यासाठी आपली दृष्टी चौफेर असावी हे समजावून सांगताना अंध व्यक्तीचे उदाहरण दिले आहे. जी व्यक्ती अंध आहे ती दुसर्‍यांना मार्ग दाखवू शकत नाही. आधीच्या मंत्राचा संदर्भ घेऊन ला मंत्र वाचला तर मोक्ष मिळवण्याचा मार्ग ज्ञानप्राप्ती आहे असे लक्षात येते. त्याही पुढे जाऊन निरर्थक कर्मकांडे करण्यात वेळ न घालवता परा विद्या प्राप्त करण्यासाठी प्रयास करायला हवे. आणखी पुढे जाऊन विचार केला तर माणसाने आपली कुवत ओळखून दुसर्‍याला उपदेश द्यायला हवा असे सुद्धा येथे म्हटले आहे. ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

जे लोक अज्ञानी असून स्वतःला बुद्धिमान पंडित समजतात ते खरे तर मूर्ख असतात आणि अंध व्यक्तीप्रमाणे चाचपडत जाणाऱ्या व्यक्तीसारखे मार्गक्रमण करतात.

अविद्यायां बहुधा वर्तमान वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः। यत्कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तेनातुराः क्षीणलोकश्च्यवन्ते ॥1.2.9।।

अविद्यायाम् बहुधा वर्तमानाः बालाः वयम् कृतार्थाः इति अभिमन्यन्ति। यत् कर्मिणः रागात् न प्रवेदयन्ति तेन क्षीणलोकाः आतुराः च्यवन्ते॥


अविद्यायाम् अविद्येत अविद्या स्त्री. स. ए. व. 

बहुधा बहुतांश अव्यय बहु+धा 

वर्तमानाः असणारे वर्तमान पु. प्र. ब. व. 

बालाः बालबुद्धिचे बाल पु. प्र. ब. व.  

वयम् आम्ही अस्मद् प्र. ब. व. 

कृतार्थाः धन्य कृतार्थ पु. प्र. ब. व. 

इति असे अव्यय 

अभिमन्यन्ति विचार करतात अभि+मन् धातू अवबोधणे 

यत् जे यद् नपु प्र. ए. व. 

कर्मिणः कर्माचे अनुयायी कर्मिन् पु. प्र. ब. व. 

रागात् आसक्तीने राग पु. पं. ए. व. 

रञ्ज् धातू रंगणे घञ् प्रत्यय 

न अव्यय 

प्रवेदयन्ति जाणत नाहीत प्र+वेद् धातू णिच् कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व. 

तेन त्यांच्या कडून तद् पु. तृ. ए. व. 

क्षीणलोकाः (कर्म फले) क्षीण झाल्यावर 

क्षीणलोक पु. प्र. ब. व. 

क्षि धातू + क्तः प्रत्यय 

आतुराः (दुःखाने) आतुर आतुर पु. प्र. ब. व.

आङ् + तुर धातू  शीघ्रता करणे+ क प्रत्यय 

च्यवन्ते च्युत होतात च्यु धातु जाणे कर्तरि लट् लकार आत्मनेपद प्र. पु. ब. व.

हा मंत्र वाचला की त्या काळातील विशेषणे वापरण्याची पद्धत आणि आताची पद्धत फारशी वेगळी नसावी असे वाटते. जसे ह्या मंत्रात बाल हा शब्द बालबुद्धी म्हणजे अज्ञानी असा वापरला आहे. येथे वयाचा संबंध नाही. ज्ञानेश्वरांनी तर 15 व्या वर्षीच आत्मानुभव लिहिला. रञ्ज् धातू पासून तयार झालेला शब्द राग म्हणजे आसक्ती दर्शवतो. म्हणजे आधीच बालबुद्धी आणि त्याबरोबर विषयआसक्ती सुद्धा. आधीच्या मंत्रांचा अर्थ लक्षात ठेवून ह्या मंत्राचा अर्थ लावायला हवा. कारण आधीच्या मंत्रात अपरा विद्या चा अर्थ सांगून कर्मकांडांवर टीका केली आहे. तसेच कर्मकांडांवर सीमित राहून पुढील प्रगतीचा मार्ग बंद केल्यास दुःखदायक परीणाम होतील असे ह्या मंत्रात स्पष्ट म्हटले आहे. 7व्या मंत्रात असे म्हटले होते की कर्मकांडाची भलावण करणारे पुन्हा पुन्हा जीवनमरणाच्या फेर्‍यात अडकतात. ह्या मंत्रात असे लोक पदच्युत होतात असे म्हटले आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

नाना प्रकारांच्या अविद्येत तच रममाण असलेले बालबुद्धीचे लोक त्यातच धन्यता मानतात. पण आसक्ती युक्त कर्मी हे समजू शकत नाहीत की त्यांच्या पुण्यकर्मांची फळे क्षीण झाली की त्यांचे अधःपतन होते.

इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढ़ाः नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वा लोकं हीनतरं वा विशन्ति ॥ 1.2.10 ॥ 

इष्टापूर्तं वरिष्ठं मन्यमानाः प्रमूढाः अन्यत् श्रेयः  न वेदयन्ते ते सुकृते नाकस्य पृष्ठे अनुभूत्वा इमं लोकं हीनतरं वा विशन्ति ॥


इष्टापूर्तं  श्रौतकर्म आणि स्मार्त कर्म 

इष्टापूर्त नपु. प्र. ए. व. 

यज् धातू + क्त प्रत्यय 

केटी प्रत्यय (इष्ट) 

पॄ धातू पालन करणे + भावे क्तः प्रत्यय

वरिष्ठं सर्वोत्तम वरिष्ठ नपु. प्र. ए. व. वर धातू +इष्ठन्

मन्यमानाः मानणारे मन्यमान पु. प्र. ब. व. 

प्रमूढाः अज्ञ माणसे प्र+मूढ पु. प्र. ब. व. 

अन्यत् दुसरे सर्वनाम अन्+यत् 

श्रेयः श्रेयस्कर श्रेय पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

वेदयन्ते जाणत नाहीत प्र+वेद धातू जाणणे णिच् कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

सुकृते सत्कर्माचे फळ सुकृत पु. स. ए. व. 

नाकस्य पृष्ठे स्वर्गाची पाठ 

नाक पु. ष. ए. व. 

कं - सुख

अकं-दुःख 

न+अकं=नाकं (जेथे दुःख नाही असा, स्वर्ग) 

पृष्ठ पु. स. ए. व. 

अनुभूत्वा अनुभवून अनु+भू धातू असणे +क्त्वा प्रत्यय 

इमं या इदम् पु. द्वि. ए. व. 

लोकं लोकात लोक पु. द्वि. ए. व. 

हीनतरं निम्न हीनतर नपु. प्र. ए. व. 

हीन+तरप् प्रत्यय 

हा धातू त्यागणे +क्तः प्रत्यय 

वा किंवा अव्यय 

विशन्ति प्रवेश करतात विश् धातू प्रवेश करणे कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

ध्यानयोगाचा अभ्यास केला असता परमेश्वराला जोडून घेता येते. कोणतेही कर्मकांड केल्याशिवाय हे शक्य आहे. हे आपण पतंजली योगसूत्राद्वारे जाणतो.

अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजांपैकी शेती करणे, घरे बांधणे हे आपापले करता येते. मात्र पाण्याची सोय सार्वजनिकरीत्या करावी लागते. म्हणूनच तलाव आणि विहीर खोदणे अशा कर्मांना पूर्त कर्म असे म्हणतात तर यज्ञयाग प्रकारच्या कर्मांना इष्ट कर्म असे म्हणतात. अशी कर्मे केली असता स्वर्गप्राप्ती होते पण ती तात्पुरत्या स्वरूपात. मोक्षप्राप्ती हवी असेल तर त्यासंबंधीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. उपनिषदांतील हे मन्तव्य अतिशय महत्त्वाचे. ह्या मध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे की सर्व साधारण जो आपला समज असतो की एकदा मानवी जन्म मिळाला की इतर योनी मध्ये पुनर्जन्म होत नाही, हा समज खोटा ठरविला आहे. दुष्कर्म केल्यास पशूयोनीत पुनर्जन्म होऊ शकतो. 

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

यज्ञ, दान इत्यादी कर्मे सर्वोत्तम मानणारे लोक अज्ञानी असतात. त्यांना आणखी कल्याणकारी मार्ग माहीत नसतात. त्यांच्या सत्कर्मांच्या फळांचे स्वर्गलोकात उपभोग घेतल्यावर ते पुन्हा ह्या लोकांत (मानवी देहात) किंवा आणखी निम्न स्तरांत प्रवेश करतात.

तपःश्रद्धे ये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यां चरन्तः। सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥1.2.11 ॥ 

ये हि शान्ताः विद्वांसः भैक्षचर्यां चरन्तः अरण्ये तपःश्रद्धे उपवसन्ति ते विरजाः सूर्यद्वारेण यत्र सः अमृतः अव्ययात्मा पुरुषः प्रयान्ति ॥


ये जे यद् पु. प्र. ब. व. 

हि खरोखर अव्यय 

शान्ताः संयमाने शान्त पु.. ब. व. 

विद्वांसः विद्वान विद्वस् पु. प्र. ब. व. 

भैक्षचर्यां भिक्षा वृत्ती भैक्षचर्या स्त्री. द्वि. ए. व. 

भैक्ष भिक्षाणां समूह

चरन्तः राहतात चरत् पु. प्र. ब. व. 

अरण्ये वनात अरण्य नपु. स. ए. व. 

तपःश्रद्धे तप आणि श्रद्धा तपःश्रद्धा स्त्री. प्र. द्वि. व. 

उपवसन्ति राहतात उप+वस् धातू कर्तरि लट् लकार प्र. पु. ब. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

विरजाः पवित्र विरजा स्त्री. प्र. ब. व. 

वि+रञ्ज् धातू +णिच्+अच् प्रत्यय 

सूर्यद्वारेण सूर्य मार्गाने सूर्यद्वार नपु. तृ. ए. व. 

यत्र जेथे अव्यय 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

अमृतः अ+मृत् अमृत पु. प्र. ए. व. 

अव्ययात्मा अविनाशी अव्ययात्मन् पु. प्र. ए. व. 

वि+इ धातू जाणे 

पुरुषः पुरूष पु. प्र. ए. व. 

प्रयान्ति जातात प्र+या जाणे धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

आकाश आणि पृथ्वीला रोज जोडणारा दुवा म्हणजे सूर्यकिरणे जी रोज दृश्य स्वरूपात आपल्याला दिसून येतात. तसा पाऊस काही काळापुरताच असतो. स्वर्ग हा आकाशाच्या दिशेला ही आपली ठाम समजूत आहे. तर स्वर्ग प्राप्ती कोणाला होते ते सांगणारा हा मंत्र. येथे भैक्षचर्या म्हणजे भिक्षा मागून जीवन जगण्याचा उल्लेख केला आहे. तसेच अरण्यात तप करण्याचा उल्लेख आहे. थोडक्यात मिताहारी, तप करण्यासाठी एकांतात राहणारा. अरण्यात कोणत्याही सुखसुविधांशिवाय भिक्षा मागून शरीराला कष्ट देऊन तप करण्यात जीवन व्यतीत करता करता मानसिक आणि शारीरिक शुद्धी (आसक्तीविरहीत) झाली की आपोआपच मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

ह्या मंत्रात असे म्हटले आहे की

परन्तु जे विद्वान अरण्यात भिक्षाचर्य अनुसरून तप करून शुद्धी प्राप्त करतात ते सूर्य किरणांच्या मार्गाने मृत्यूरहीत आणि अविनाशी पुरुषांच्या स्थानी पोहोचतात.

परीक्ष्य लोकान्‌ कर्मचितान्‌ ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन। तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्‌ समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्‌ ॥1.2.12।। 

कर्मचितान् लोकान् परीक्ष्य ब्राह्मणः निर्वेदम् आयात्। कृतेन अकृतः न अस्ति तत् - विज्ञानार्थं सः समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं गुरुम् एव अभिगच्छेत् ॥


कर्मचितान् कर्म संचित कर्मन् +चि धातू गोळा करणे क्त प्रत्यय पु द्वि. ब. व.

लोकान् लोकांचे लोक पु. द्वि. ब. व.

परीक्ष्य परीक्षण करून परी+ईक्ष् धातू निरीक्षण करणे ल्यप प्रत्यय

ब्राह्मणः ब्राह्मण पु. प्र. ए. व.

निर्वेदम् नास्तिक, वैराग्य निर्वेद पु. द्वि. ए. व.

निर+विद् धातू जाणणे 

आयात् प्राप्त करून आङ् + या धातू जाणे + क्तः कर्तरि लड्ः लकार प्र. पु. ए. व. 

कृतेन कर्माने कृत नपु. तृ. ए. व.

अकृतः शाश्वत अकृतः अकृत पु. प्र. ए. व.

न अव्यय 

अस्ति आहे अस् धातू असणे अदादि गण कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

तत् ते तद् नपु. प्र. ए. व. 

विज्ञानार्थं ज्ञान मिळवण्यासाठी विज्ञान+अर्थ नपु. द्वि. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

समित्पाणिः हातात समिधा घेऊन 

समित्पाणि पु. प्र. ए. व. 

समित् +पाणि 

समिध् पु/स्त्री. प्रथमा ए.व.

समिधः पाण्योः यस्य सःसमित्पाणि।

श्रोत्रियं शास्त्र पारंगत श्रोत्रिय पु. द्वि. ए. व. 

श्रु धातू ऐकणे तृच्छ् प्रत्यय 

ब्रह्मनिष्ठं ब्रह्मनिष्ठ पु. द्वि. ए. व. 

गुरुम् गुरु पु. द्वि. ए. व. 

एव सुद्धा अव्यय 

अभिगच्छेत् जावे अभि+गम् धातू जाणे कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला. अरण्यात जाऊन आसक्ती विरहित होऊन तप करायचे आहे. मोक्ष मिळण्याची प्रक्रिया ही साधीसुधी नव्हे. त्यासाठी अपरा विद्येच्या पलिकडे जाऊन ज्ञान मिळवायचे आहे. जे अपरा विद्येचे ज्ञात आहेत त्यांचा तपशीलवार अभ्यास करायचा आहे. त्यांच्या कडून केली गेलेली यज्ञकर्मे कामना आणि वासना अशा दोषयुक्त व्यक्तींनी केली होती की ते दोषमुक्त होते? हे सर्व जाणून घेऊन आपला पुढचा मार्ग ठरवायचा आहे. ह्या सर्व प्रक्रियांना परीक्ष्य असे म्हटले आहे. परीक्षा करण्यासाठी अनुभव, अनुमान, उपमा आणि आगम हे निकष लावायचे असा शंकरभाष्यामधे उल्लेख आहे. 10 व्या मंत्रात लोक स्वर्गात आपली कर्मफळे भोगून, इहलोकात परत येतात असे म्हटले आहे. आपल्याला अढळपद मिळवायचे आहे. ब्राह्मण ह्या शब्दाचा व्यापक अर्थ समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानार्थं ह्या शब्दाचा आधार घेता येईल. ब्राह्मण म्हणजे ज्ञान प्राप्ती मुळे प्रगल्भता आणि उन्नत असा व्यक्ती . कर्मकांडे करणारा नव्हे. तो श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्रांत पारंगत आहे. आणि तो आपल्या ज्ञानाचा सर्वार्थाने उन्नतीसाठी वापर करत आहे. तो ब्रह्मनिष्ठ आहे म्हणजे त्याला परमतत्त्वाची स्वानुभूती प्राप्त झाली आहे. म्हणजे फक्त कर्मयोगावर विसावून चालणार नाही त्याबरोबर ज्ञानयोग सुद्धा हवा. त्याचबरोबर कठोर तपश्चर्या सुद्धा करायची आहे. असा मनाचा दृढ निश्चय झाला की हातात समिधा घेऊन गुरुकडे जायचे आहे. समिधा हे गुरूसमोर संपूर्णपणे शरणागती पत्करण्याचे प्रतिक आहे. समिधा म्हणजे निरनिराळ्या वनस्पतींच्या काटक्या ज्या ज्वलनशील आहेत, म्हणजे सर्व नकारात्मक गोष्टीं जळून गेल्या आहेत. अशी अंतर्बाह्य पवित्रता अकृत म्हणजे शाश्वत अशा परमतत्त्वाची अनुभूती घेण्यास सिद्ध होत आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

कर्म संचिताचे प्राप्त झालेले फळ हे शाश्वत नाही हे समजून घेऊन ब्राह्मणाने (साधकाने) वैराग्ययुक्त होऊन, ज्ञान प्राप्ती साठी श्रुतिसंपन्न, ब्रह्मनिष्ठ अशा गुरूकडे हातात समिधा घेऊन जावे.

तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक्‌ प्रशान्तचित्ताय शमान्विताय। येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम्‌ ॥1.2.13।।

सः विद्वान् प्रशान्तचित्ताय शमान्विताय सम्यक् उपसन्नाय तस्मै येन सत्यम् अक्षरम् पुरुषं वेद तां ब्रह्मविद्यां तत्वतः प्रोवाच ॥


सः तो तद् पु. प्र. ए. व. 

विद्वान् विद्वस् पु. प्र. ए. व. 

प्रशान्तचित्ताय चित्त शांत झालेल्या 

प्रशान्तचित्त पु. च. ए. व. 

शमान्विताय मन ताब्यात असलेला असा 

शम+अन्वित पु. च. ए. व. 

अनु+इण् धातू जाणे क्त प्रत्यय 

सम्यक् उचित सम्यक् पु. प्र. ए. व. सं+अञ्च धातू पूजा करणे  क्विन् प्रत्यय 

उपसन्नाय समीप आलेल्या उपसन्न उप+सद् धातू क्त प्रत्यय पु. च. ए. व. 

तस्मै त्याला तद् पु. च. ए. व. 

येन ज्यायोगे यद् पु. तृ. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. द्वि. ए. व. 

अक्षरम् अविनाशी अक्षर नपु. द्वि. ए. व. 

पुरुषम् पुरूष पु. द्वि. ए. व. 

वेद जाणतो विद् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

ताम् ती तद् स्त्री. द्वि. ए. व. 

ब्रह्मविद्याम् ब्रह्मविद्या स्त्री. द्वि. ए. व. 

तत्वतः खरोखर अव्यय 

प्रोवाच सांगावी प्र+ब्रू धातू बोलणे कर्तरि लिट् लकार परस्मैपद प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात परब्रह्माच्या शोधात असलेल्या शिष्याने गुरूकडे समिधा घेऊन जावे हे सांगताना शिष्याची पात्रता काय असावी ते सांगितले होते. साधक स्थिर बुद्धीचा, मन अतिशय निश्चल असून त्याने मनावर पूर्ण ताबा मिळवला आहे. शम म्हणजे आसक्तीविरहीत. शिष्याची ब्रह्मविद्या संपादन करण्याची एवढी तयारी झाली असेल तर गुरु कल्पनातीत ज्ञानी असणारच. ब्रह्मविद्या शिकवणारा गुरू हा साक्षात तेजच. आता ह्या मंत्रात गुरूजनांनी शिष्यांशी कसे वागावे ह्या संबंधी सूचना दिल्या आहेत.

गुकारस्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते । अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते ॥

‘गु’कार म्हणजे अंधकार,  ‘रु’कार म्हणजे प्रकाश जो अंधकार संपवतो (ज्ञान  प्रकाश देऊन ) त्याला गुरु असे म्हणतात.

गुरौ न प्राप्यते यत्तन्नान्यत्रापि हि लभ्यते। गुरुप्रसादात सर्वं तु प्राप्नोत्येव न संशयः।। 

गुरु कडून जे ज्ञान प्राप्त होत नाही, ते इतरही कुठेच मिळत नाही. गुरु ची कृपाच निःसंशय (माणसाला ) वरदान असते.

उपनिषद् ह्या शब्दाचा अर्थच गुरूच्या जवळ जाऊन बसणे. 

ब्रह्मविद्या म्हणजे काय ते संक्षिप्तपणे आपण सर्वात पहिल्या (1.1.1)मंत्रात वाचले.

आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करणारी ती ब्रह्मविद्या. हि विद्या सत्य, अक्षर अशा पुरुषाला जाणून घेतल्याने प्राप्त होणार आहे.

अक्षर ह्या शब्दाचा अर्थ विस्ताराने सांगण्यासाठी शंकरभाष्यामधे तीन शब्द वापरले आहेत.

क्षर धातूपासून तयार झालेला शब्द क्षरण म्हणजे धूप होणे 

क्षण् धातू +क्त प्रत्यय पासून झालेला शब्द म्हणजे क्षत आघात होणे (गुणवत्ता कमी होणे) 

क्षि धातू म्हणजे र्‍हास होणे पासून क्षय 

थोडक्यात जे अक्षर आहे त्याचा र्‍हास होत नाही, त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही किंवा त्याची धूप होत नाही. 

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की 

चित्त शांत असलेल्या, मनावर ताबा मिळवलेल्या  शिष्याला जो ज्ञानी गुरुंच्या जवळ आला आहे, त्याला ज्यायोगे सत्य अक्षर पुरूषाचे ज्ञान होते अशी ब्रह्मविद्या, तत्वतः उचित प्रकारे शिकवावी. 


|| इति मुण्डकोपनिषदि प्रथममुन्दके द्वितीयः खण्डः ||

मुण्डकोपनिषद् मधील प्रथम मुण्डकातील दूसरा भाग  येथे संपन्न झाला.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

श्रीमद्भगवद्गीता 5 वा अध्याय सुधारीत

 ।।  श्री।। 

4थ्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांनी ऊठ आणि युद्ध करण्यास सिद्ध हो असे सांगितले. अर्जुन उठला तर नाही पण त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. 5व्या अध्यायाची सुरवात त्या प्रश्नापासून होत आहे.

कर्म संन्यास योग हे गीतेच्या  पाचव्या अध्यायाचे नाव असून त्यात 29 श्लोक आहेत. ह्यात अर्जुन  श्रीकृष्णाला  कर्मयोग आणि ज्ञान योग ह्या दोन्हीतील फरक विचारत आहे, त्यावर श्रीकृष्णांचे उत्तर आपण ह्या अध्यायात वाचू.

संन्न्यासम् कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि। यच्छ्रेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।5.1।।

अर्जुन उवाच - हे कृष्ण कर्मणाम सन्न्यासम पुनः योगम् ‌ च शंससि ; एतयोः यत् ‍ एकम् ‍ श्रेयः तत् ‍ मे सुनिश्चितम् ‍ ब्रूहि ।


अर्जुन उवाच - 

हे कृष्ण! 

कर्मणाम् कर्मांचा कर्मन् नपु. ष. ब. व. 

सन्न्यासम् त्याग सन्न्यास पु. द्वि. ए. व. 

पुनः अव्यय 

योगम् ‌कर्मयोगाची योग पु. द्वि. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

शंससि प्रशंसा शंस् धातू कर्तरि लट लकार म. पु. ए. व. 

एतयोः ह्या दोन्ही 8एतद् पु. ष. द्वि. व. 

यत् ‍जे यद् नपु. प्र. ए. व. 

एकम् ‍ एक नपु. प्र. ए. व. 

श्रेयः कल्याणकारी श्रेय नपु. प्र. ए. व. 

तत् ते ‍तद् नपु. द्वि. ए. व. 

मे माझ्यासाठी अस्मद् ष. ए. व. 

सुनिश्चितम् खात्रीलायक सुनिश्चित ‍नपु. प्र. ए. व. 

ब्रूहि सांगावे ब्रू धातू कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.

अर्जुनाने एकूण 16 प्रश्न श्रीभगवानकृष्णांना विचारले त्यापैकी हा 5वा प्रश्न. कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्ष दायी आहेत, पण कर्मसंन्यासापेक्षा कर्म योगाची श्रेष्ठता वर्णन केली आहे. कर्मत्याग करणे हे सुद्धा एक कर्मच. 4.33 व्या श्लोकात आपण ज्ञानयोगाबद्दल वाचले. कोणतेही कर्म ज्ञानाशिवाय करणे म्हणजे निव्वळ देखावा. ज्ञानयज्ञ म्हणजे आत्मज्ञान. ज्ञानामुळेच नैष्कर्म्यं येते. विद्या विनयेन शोभते हे आपल्याला माहित आहेच. 4.40 व्या श्लोकात श्रद्धायुक्त राहून कर्म करण्यास सांगितले आहे. श्रत् म्हणजे सत्य तर धा म्हणजे धारण करणे. . सत्याकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धेच्या विरुद्ध शंका आहे. ज्याच्या मनात शंका आहे तो सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धा पक्की असते त्या ठिकाणी संशयाला स्थान नसते. पण श्रद्धायुक्त असण्यासाठी ज्ञान हवेच. 

रामचरितमानसच्या मंगलाचरण बालकांडातील दुसऱ्या श्लोकात असे म्हणतात 

भवानी-शंकरौ वन्दे श्रद्धा-विश्वास रूपिणौ ।

याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा: स्वान्त:स्थमीश्वरम् ।

महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये शिवजी वक्ता असून ते अनुभवी आहेत आणि पार्वती श्रद्धावान आहे; ती श्रोता आहेत. संवाद होण्यासाठी वक्ता अनुभवी असावा आणि श्रोता श्रद्धावान असायला हवा. गुरूवर पूर्ण विश्वास हवा. श्रद्धा गुरू आहे आणि विश्वास शिष्य आहे.

शंकराचार्य म्हणतात -

शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धिवाधारणम्।

सा श्रद्धा श्रद्धा सदाभिर्यया वस्तुपलभ्यते ॥

धर्मग्रंथ आणि गुरू जे उपदेश करतात ते खंबीर निर्णयाने स्वीकारणे, यालाच ऋषीमुनींची श्रद्धा म्हणतात, ज्यातून वास्तवाची जाणीव होते.

ह्या श्लोकात अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांच्या वक्तव्यावर शंका उपस्थित झाली आहे.

अर्जुन ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांना असे विचारत आहे की

हे कृष्ण! आपण कर्मसंन्यास आणि कर्मयोग ह्यांची वाखाणणी केली, ह्या दोन्ही मध्ये माझ्यासाठी नक्की काय श्रेयस्कर ठरेल ते कृपया सांगावे.

श्री भगवानुवाच

सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।

तयोस्तु कर्मसंन्यासत्कर्मयोगो विशिष्यते।।5.2।।

श्रीभगवानुवाच - संन्न्यासः कर्म-योगः च उभौ निःश्रेयसकरौ; तयोः तु कर्म-संन्न्यासात् कर्म-योगः विशिष्यते।


श्रीभगवानुवाच - 

संन्न्यासः सांख्ययोग संन्न्यास पु. प्र. ए. व. 

कर्म-योगः कर्म-योग पु. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

उभौ दोन्हीही उभ पु. प्र. द्वि. व. 

निःश्रेयसकरौ असंदिग्ध कल्याणकारी निःश्रेयसकर पु. प्र. द्वि. व. 

तयोः दोन्हींचे तद् पु. ष. द्वि. व. 

तु परन्तु अव्यय 

कर्म-संन्न्यासात् सांख्ययोगपेक्षा कर्म-संन्न्यास पु. पं. ए. व. 

कर्म-योगः कर्म-योग पु. प्र. ए. व. 

विशिष्यते श्रेष्ठ आहे वि+शाष् धातू भले करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

पहिल्या श्लोकात अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता त्याचे अपेक्षित उत्तर हेच की अज्ञानी पुरूषाने कर्म केव्हा करावे आणि कर्मत्याग केव्हा करावा ह्या संबंधी चे विवेचन. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली ती अविरत बहरत जावी ह्या हेतूनेच. म्हणजे माणसांनी कर्म करणे अपेक्षित आहेच. त्यामुळे सर्वांनाच पडलेला प्रश्न, अशी कोणती युक्ती वापरावी ज्यामुळे कर्म केले असता पाप लागणार नाही आणि कर्म पूर्तता सुद्धा होईल? ह्याचे उत्तर या अध्यायात मिळावे.

काही संदर्भग्रंथात कर्मसंन्यास म्हणजे सांख्य योग असे म्हटले आहे. कारण सांख्य म्हणजे ज्ञान योग. पुरूष आणि प्रकृति ह्यामधील फरक सांगणारा. प्रकृती ची पाच मूलतत्त्वे समजावून सांगणारा योग. मन,अहंकार आणि बुद्धि ह्या सूक्ष्मतत्वांचे वेगळेपण स्पष्ट करून सांगणारा योग. 2र्या अध्यायातील काही श्लोकात आत्म्याची वैशिष्ट्ये सांगताना सांख्ययोगाचे सूतोवाच केले आहेच. 4.41 व्या श्लोकात ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ज्ञान मिळवणे हे सुद्धा कर्मच.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही निःसंशय परम कल्याणकारी आहेत मात्र कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ.

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति। निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते।।5.3।।

महाबाहो! यः न द्वेष्टि, न काङ्क्षति, सः नित्य- संन्न्यासी ज्ञेयः; हि निर्द्वन्द्वः सः सुखम्‌ बन्धात्‌ प्रमुच्यते।


महाबाहो! 

यः जो यद् पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

द्वेष्टि द्वेष करतो द्विष् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

न अव्यय 

काङ्क्षति, इच्छा आकांक्षा ठेवतो काङ्क्ष धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व.

नित्य- संन्न्यासी सर्व काळ संन्यासी 

नित्य- संन्न्यासिन् पु. प्र. ए. व.

ज्ञेयः समजण्यायोग्य ज्ञेय ज्ञा धातू यत् प्रत्यय पु. प्र. ए. व.

हि कारण 

निर्द्वन्द्वः द्वन्द्व रहित निर्द्वन्द्व पु. प्र. ए. व.

सः तो तद् पु. प्र. ए. व.

सुखम्‌ अव्यय 

बन्धात्‌ बन्धनातून बन्ध पु. पं. ए. व. 

प्रमुच्यते मुक्त होतात प्र+मुच् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

दोन प्रकारचे लोक आपल्याला पहायला मिळतात. काही जण स्वेच्छेने संन्यासी होतात, कुठेतरी एकांतात बसून तप करतात. आयुष्यातील सर्व बंधने त्यांनी तोडून टाकलेली असतात. दुसर्‍या प्रकाराचे लोक संसारात राहून फक्त दुसर्‍यांसाठी जगतात. त्यांच्या स्वतःच्या अशा इच्छा आकांक्षा काहीच नसतात. म्हणजे एक प्रकारचे संन्यासीच ते. संन्यासी ह्या शब्दाचा अर्थ येथे सांगितला आहे. तो कर्माचा त्याग नसून आपल्या आवडीनिवडींचा त्याग. समत्व ह्या गुणाचे विस्तृत वर्णन 12 व्या अध्यायात सांगितले आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आचरणात आणावे असा हा श्लोक.अपेक्षाभंगाचे परीणाम टाळण्यासाठी उपयुक्त असा उपदेश. समत्व दृष्टि तेव्हाच आपल्यामध्ये येते जेव्हा आपल्याला यश अपयश यांची अपरिहार्यता समजते. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणतीही इच्छाआकांक्षा ठेवत नाही तो नेहमीच कर्मयोगी संन्यासी होय. असा द्वन्द्व रहीत सहजच बन्धन मुक्त होतो.

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः।

एकमप्यस्थितः सम्यगुभ्योर्विन्दते फलम्।।5.4।।

साङ्ख्य-योगौ पृथक् बालाः प्रवादन्ति न पण्डिताः । एकम् ‍ अपि सम्यक् ‍ आस्थितः उभयोः फलम् ‍ विन्दते ।


साङ्ख्य-योगौ कर्मसंन्यास आणि कर्मयोग 

साङ्ख्य-योग पु. प्र. द्वि. व. 

पृथक् पृथक्करण करणारे अव्यय 

बालाः बालबुद्धि बाल पु. प्र. ब. व. 

प्रवादन्ति म्हणतात प्र +वद् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व. 

न अव्यय 

पण्डिताः ज्ञानी पण्डित पु. प्र. ब. व. 

एकम् ‍ एक नपु. प्र. ए. व. 

अपि सुद्धा अव्यय 

सम्यक् ‍पूर्णतः अव्यय 

आस्थितः स्थित आडः+स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

उभयोः दोन्हीची उभ पु. ष. द्वि. व. 

फलम् ‍फल नपु. द्वि . ए. व. 

विन्दते प्राप्त होते विद् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

भौतिक जगाचे विश्लेषण करून त्याचे मूळ शोधण्याचा अभ्यास म्हणजे सांख्य. दुसर्‍या श्लोकात कर्मसंन्यास ह्या शब्दाचा वापर केला होता त्यालाच आता सांख्ययोग असे संबोधले आहे. कर्मसंन्यास दोन प्रकारचे असतात. आयुष्यात आलेल्या संकटांना तोंड देण्यास असमर्थ ठरल्या ने पलायनवादी मनोवृत्तीने सर्व गोष्टींकडे पाठ फिरवणे म्हणजे कर्मत्याग. यालाच फल्गु वैराग्य असे म्हटले जाते. त्या उलट युक्त वैराग्य म्हणजे सर्व काही समजून उमजून, परमेश्वराला शरण जाऊन, सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणारे कर्मयोगी.

गृहित्वापिन्द्रियैरार्थन्यो न द्वेष्टि न हृष्यति।

विष्णुमायामिदं पश्यन्स वै भागवतोत्तम: ॥ श्रीमदभागवतम् 11.2.48॥

संसारात राहून सुद्धा जो निःस्पृहःतेने ईश्वराची शक्ती ओळखून काम करत राहतो तो परम भक्त असतो.

ज्ञानमार्ग, सर्व त्याग करून ज्ञान आणि कर्ममार्ग, कर्तृत्वभोक्तृत्वाचा त्याग करून केलेले कर्म यांची फले निरनिराळी असे ज्ञानी पुरुष कधीच म्हणत नाहीत.

देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।

तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ज्ञानेश्वरी 30॥

आकाश आणि पोकळी यांच्यामधे ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता असते. 

तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।

जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ज्ञानेश्वरी 31॥

ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जग समजले , ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. 

 योग वशिष्ठ ग्रंथात 'वैराग्य-प्रकरण' मध्ये वैराग्यची लक्षणे विस्ताराने वाचायला मिळतात. भर्तृहरिंचे वैराग्यावर 100 श्लोक वैराग्यशतकम् सर्वांनाच माहीत आहे.

कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही चा हेतू एकच, लक्ष्य एकच.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की

बालबुद्धिचे लोक सांख्य आणि कर्मयोग वेगळे समजतात, ज्ञानी पुरुष नाही. कोणत्याही योग चा पुरस्कार केला असता दोन्हीचे फलीत सारखेच प्राप्त होते.

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्यैरपि गम्यते। एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।।5.5।।

सङ्ख्यैः यत् स्थानम् प्राप्यते , तत् योगैः अपि गम्यते ; यः साङ्ख्यम् ‍योगम् ‍च एकम् ‍पश्यति, स पश्यति।


साङ्ख्यैः ज्ञान योगाने साड्ःख्य नपु. तृ. ए. व. 

यत् जे यद् नपु. द्वि. ए. व. 

स्थानम् परमस्थान स्थान नपु. द्वि. ए. व. 

प्राप्यते प्राप्त होते प्र+आप कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व. 

तत् ते तद् नपु प्र. ए. व. 

योगैः कर्मयोगाने योग पु. तृ. ब. व. 

अपि सुद्धा अव्यय 

गम्यते प्राप्त केले जाते गम् धातू कर्मणि लट लकार प्र. पु. ए. व. 

यः जो यद् पु. प्र. ए. व. 

साङ्ख्यम् सांख्ययोग साङ्ख्य ‍नपु. द्वि. ए. व. 

योगम् ‍कर्मयोग योग पु. द्वि. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

एकम् ‍एक पु. द्वि. ए. व. 

पश्यति पाहतो दृश् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

सः जो तद् पु. प्र. ए. व. 

पश्यति पाहतो दृश् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

ह्या श्लोकात महर्षी व्यासांनी यः पश्यति स पश्यति अशी सुंदर शब्दरचना केली आहे. थोडक्यात डोळसपणे जो पाहतो त्यालाच दिसते.

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः॥ब्रह्मबिन्दुपनिषद्।2।।

आपले मन हेच सर्व माणसांच्या बन्धन किंवा मोक्षाचे प्रमुख कारण आहे.

रोजच्या आयुष्यात एखादी गोष्ट अपायकारक आहे हे माहीत असूनही आपण मोहापायी ती गोष्ट करतो. एखादी गोष्ट पाहून न पाहिल्यासारखे करतो किंवा पाहिलेल्या गोष्टीचा आपल्याला सोयीस्कर असा अर्थ आपण घेतो.

आत्मवत् सर्व-भूतेषु यः पश्यति स पण्डितः ॥ हितोपदेश 1.14 ॥

सर्व सजीवांना आपल्या सारखेच बघतो तोच खरा पण्डित.

अहंकारशून्य निष्काम कर्मे ज्ञानप्राप्तीची अत्युत्तम साधने असतात. असे ज्ञान प्राप्त करून योगी निर्लेप होतात. सांख्य ज्ञान आणि कर्मयोग दोन्हीचा हेतू एकच, आत्मसाक्षात्कार. हे सर्व आपण आधीच्या श्लोकात वाचले आहेच. एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचे पर्याय वेगवेगळे असू शकतात तसेच हे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे सांगत आहेत की

सांख्ययोगी जे तत्व प्राप्त करतात तेच कर्मयोगी सुद्धा करतात. जो सांख्य आणि कर्म योगाचे एकच फलित पाहू शकतो तोच पाहतो.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमोयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति।।5.6।।

हे महाबाहो! अयोगतः तु सन्न्यासः आप्तुम् , दुःखम् योग -युक्तः मुनिः न चिरेण ब्रह्म अधिगच्छति ।


हे महाबाहो! महान बाहू 

अयोगतः कर्म योग शिवाय अ योगतः तासिल 

तु परन्तु अव्यय 

संन्न्यासः संन्न्यास पु. द्वि. ए. व. 

आप्तुम् प्राप्त करून आप् धातू तुमून प्रत्यय 

दुःखम् कठीण दुःख नपु. प्र. ए. व. 

योगयुक्तः कर्मयोगी योगयुक्त पु. प्र. ए. व. 

मुनिः मननशील मुनि पु. प्र. ए. व. 

न चिरेण शीघ्र न +चिर नपु. तृ. ए. व. 

चि धातू जमवत जाणे बाहुलकात् रक् प्रत्यय

चिर म्हणजे वेळ जमवत जाणे 

ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व. 

अधिगच्छति अधि+गम् धातू जाणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

आपले आयुष्यच आपला महान गुरू असतो. फक्त आपली शिकण्याची तयारी हवी. स्वतः शांत राहून, प्रसंगी दोन पावले मागे येऊन आपले काम चोख करणे हे जीवनकौशल्य, यालाच सहनशीलता असेही म्हणता येईल. सहनशीलता वाढवणे म्हणजेच आपला अहंकार दूर करून, दुसर्‍याकडून फार अपेक्षा न ठेवता समोर आलेली परीस्थिती स्वीकारून पुढे जाणे. कर्मयोग सुद्धा फार काही वेगळा नाही.

एखादा संन्यासी अनेक वर्षे एकांतात बसून तप करत असणारा जर माणसांच्या समूहात आला, तर इतरांकडून झालेला अपमान सहन करून आयुष्य निभावू शकेल का? आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले आहे हे संसाररूपी परीक्षा केंद्रातच सिद्ध होईल ना? 

यदि न समुद्धरन्ति यतयो हृदि काम-जाता ।। श्रीमद्भागवतम् 10.87.39।।

जे संन्यासी आपल्या मनातून कामभावना काढून टाकू शकत नाही ते अशुद्ध राहतात. 

कामनत् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र। पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामः ॥मुण्डकोपनिषद् 3.2.2।।

आपल्या कामनांच्या अभिलाषेमुळेच मनुष्य पुनर्जन्म घेतो. 

श्रीमद्भागवतम् 11.18.40 मध्ये भोंदू संन्यासी चे वर्णन केले आहे. जो फक्त बाह्य स्वरूपात संन्यासी वेषात आहे आणि 6 प्रकारच्या मायांवर त्याचा ताबा नाही, त्याला काहीच प्राप्त होत नाही

निष्काम कर्मयोग हा गुण संन्यासी मध्ये कसा दिसून येईल? म्हणजेच कर्मयोग करत असता ज्ञानयोगी होणे जास्त श्रेयस्कर. कर्मयोग करता करता संन्यास, म्हणजेच सर्वत्याग प्रस्थापित होईल. ह्या श्लोकात मुनी असा समर्पक शब्द वापरला आहे. मुनीला ब्रह्म प्राप्त होईल असे म्हटले आहे. मुनी म्हणजे मनन करणारा. ज्याचे राग द्वेष नष्ट झाले आहेत असा.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

परन्तु हे महा-बाहो! कर्म योग शिवाय संन्यास प्राप्त होणे कठिण आहे. मननशील योगी पुरूषाला मात्र ब्रह्मा शीघ्रतेने प्राप्त होतो.

योगयुक्तो पवित्रात्मा विजितात्मा जितेन्द्रियः।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते।।5.7।।

योग-युक्तः, विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा, जित-इन्द्रियः, सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा, कुर्वन्‌ अपि न लिप्यते।


योग-युक्तः कर्म योगी योग-युक्त  पु. प्र. ए. व.

विशुद्ध-आत्मा पवित्र हृदय असलेला विशुद्ध-आत्मन्  पु. प्र. ए. व. 

विजित-आत्मा संयमित मन विजित-आत्मन् पु. प्र. ए. व. जित-इन्द्रियः इन्द्रियांवर विजय मिळविलेला जित-इन्द्रिय पु. प्र. ए. व. सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा,सर्व जीवाच्या आत्मस्वरूप ज्याचा आत्मा सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मन्

 पु. प्र. ए. व.

कुर्वन्‌ कर्म करून कृ धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

अपि सुद्धा अव्यय 

न अव्यय 

लिप्यते लिप् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

कर्मयोगीच्या व्यक्तीमत्वात कर्म करता करता कसा बदल होत जातो आणि तो सर्वोच्च स्थानी कसा पोहोचतो हे सांगणारा हा श्लोक. निष्काम कर्म, पवित्र हृदय, मनावर ताबा, इन्द्रियांचे समर्पण आणि सर्व सजीवांमधे एकाच परमात्म्याचे दर्शन हि सर्व योगीची लक्षणे आहेत. ह्या श्लोकात आत्मा हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला आहे जसे बुद्धि, मन आणि इन्द्रिय.

1. विशुद्धात्माः विशुद्ध बुद्धि युक्त 

2. विजितात्माः  मनावर विजय प्राप्त केलेला 

3. जितेन्द्रियः  इन्द्रियांवर ताबा मिळवला आहे असा.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जो कर्मयोगी, ज्याचे हृदय पवित्र आहे, ज्याने आत्म्यावर आणि इन्द्रियांवर विजय मिळविला आहे, सर्व जीवांच्या आत्म्याला आपलाच आत्मा मानतो त्याने कर्म केले असता तो कर्म बंधनमुक्त असतो.

नैव किंचित्क्रोमीति युक्तो मन्येत् तत्त्ववित्।

पश्यञ्चश्रृण्वन्स्पृश्ञ्जिघ्रन्नश्नंगच्छन्स्वपञ्चश्वसं।।5.8।।

युक्तः तत्त्ववित् पश्यन श्रुण्वन्, स्पृशं, जिघ्रन्, अश्न्न, गच्छन, स्वपन, श्वसन  न एव किञ्चित् , करोमि इति मन्येत् ।

प्रलपण्विसृजन्गृहन्नुन्नमिषन्निमिष्न्नपि।

इन्द्रियाणिन्द्रियार्थेषु वर्तान्त इति धारयन् ॥ 5.9 ॥

प्रलप्न, विसृजन, गृह्नन् , उन्मिषां निमिषां अपि , इंद्रियाणि इंद्र-अर्थेषु एव वर्तन्ते इति धारयन्


 युक्तः युक्त पु. प्र. ए. व. 

तत्त्ववित् सत्य जाणणारा तत्त्वविद् पु. प्र. ए. व.

पश्यन्स पाहताना दृश् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

श्रुण्वन् ऐकताना श्रु धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

स्पृशन् स्पर्श करताना स्पृश् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

जिघ्रन् वास घेताना घ्रा धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.

अश्नन् खाताना अश् धातू खाणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

गच्छन जाताना गम धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

स्वपन् झोपताना स्वप् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

श्वसन श्र्वास घेताना श्वस् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.

न अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

किञ्चित् काहीही किञ्चित् नपु. द्वि. ए. व. 

करोमि करतो कृ धातू करणे कर्तरि लट लकार उ. पु. ए. व. 

इति असे अव्यय 

मन्येत् मानतात मन् धातू मान्य करणे कर्तरि विधीलिडः लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

 प्रलप्न बोलून प्र+लप् धातू बोलणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

विसृजन वि+सृज् धातू सोडून देणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

गृह्नन् गृह् धातू ग्रहण करणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

उन्मिषन् डोळे उघडून उत् +मिष धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

निमिषन् डोळे मिटून नि+मिष धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

अपि सुद्धा अव्यय 

इंद्रियाणि इन्द्रिये इन्द्रिय नपु. प्र. ब. व. 

इंद्र-अर्थेषु इन्द्रियांविषयी इंद्रियार्थ पु. स. ब. व. 

एव सुद्धा अव्यय 

वर्तन्ते वृत् धातू असणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ब. व. 

इति असे अव्यय 

धारयन् ‌धारण करून धृ धातू धारण करणे णिच् शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.

आधीच्या श्लोकाचा कर्मयोगी ला कोणत्याही कर्मांचे बंधन नसते हे सांगून झाल्यावर त्याचे विश्लेषण ह्या श्लोकात करून सांगणारा हा श्लोक. इन्द्रिये आपापली कामे करत आहेत. मात्र योगी च्या दृष्टीने ही सर्व कर्म शून्य आहेत. कारण आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो विशुद्ध-आत्मा, जित-इन्द्रियः विजित-आत्मा असा आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सत्य जाणणारा योगी बघताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, सोडून देताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, ग्रहण करताना, डोळे उघडताना, डोळे मिटताना असाच विचार करत असतो की ह्या सर्व गोष्टींचा कर्ता नाही. फक्त त्याची इन्द्रिये त्या त्या विषयात क्रियाशील आहेत.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः। लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।5.10।।

यः सङ्गम् ‍ त्यक्त्वा ब्रह्मणि आधाय कर्माणि , सः अम्भसा पद्म – पत्रम् इव , पापे न न लिप्यते


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

सङ्गम् आसक्ती सङ्ग पु. द्वि. ए. व. ‍ 

त्यक्त्वा त्यागून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय 

ब्रह्मणि परमात्म्याला ब्रह्मन् नपु. स. ए. व. 

आधाय अर्पण करतो आ+धा धातू ल्यप प्रत्यय 

कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

अम्भसा पाण्याने अम्भस् नपु. तृ. ए. व. 

पद्मपत्रम् कमलपत्र पद्मपत्र नपु. द्वि. ए. व. 

इव जसे अव्यय 

पापेन पापाने पाप नपु. तृ. ए. व. 

न लिप्यते लिप्त होत नाही लिप् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

एकूणच भारतीय तत्त्वज्ञानात आणि संस्कृत साहित्यात कमळाची उपमा बरेचदा वाचायला मिळते, जसे कमलनयन, चरणकमल, करकमल वगैरे. अनेक रंगी कमळ सुंदर तर दिसतेच, त्याचा काही भाग खाण्यासाठी पण वापरतात. याहीपेक्षा एक महत्त्वाचा गुण म्हणजे कमल चिखलात उगवते आणि त्याची पाने पाण्यात असून सुद्धा भिजत नाहीत. ह्या अध्यायातील 3,7.8.9.10 ह्या श्लोकात निष्काम कर्मयोग छान समजावून सांगितला आहे. निरपेक्ष भावनेने काम करता करता आधी चित्त शुद्धी आणि त्यानंतर ज्ञान, अनुभव आणि मुक्ती अशा वरच्या पायर्‍या कर्म योगी चढत जातो. आत्मा अकर्ता आणि अभोक्ता आहे हे त्याला चांगले माहीत आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण आपल्या हातून नकळत घडणाऱ्या चुकांबद्दल बोलत आहेत. एखाद्याला हेतूपुरस्सर त्रास देणे आणि नकळत दुसर्‍या चे नुकसान करणे ह्यातील फरक न्यायदान करताना आपली न्यायप्रणाली सुद्धा मानते. आपल्या मनातील हेतू शुद्ध असावा.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जो आसक्ती चा त्याग करून आपली सर्व कर्मे ब्रह्माला अर्पण करतो त्याला जसे कमळाच्या पाने पाण्याने भिजत नाहीत तसे त्याची पापे चिकटत नाहीत.

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि। योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये।।5.11।।

योगिनः कायेन , मनसा , बुद्धध्या, केवलैः इन्द्रियैः अपि सङ्गम् ‍ त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति


योगिनः योगी योगिन् पु. प्र. ए. व. 

कायेन शरीराने काय नपु. तृ ए. व. 

मनसा मनाने मनस् नपु. तृ ए. व. 

बुद्धध्या बुद्धिने बुद्धि स्त्री. तृ ए. व. 

केवलैः केवळ केवल नपु. तृ ब. व. 

इन्द्रियैः इन्द्रियांच्या साह्याने इन्द्रिय नपु. तृ ब. व.  

अपि सुद्धा अव्यय 

सङ्गम् आसक्ती सङ्ग ‍ पु. द्वि. ए. व. 

त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय 

आत्मशुद्धये आत्मशुद्धी साठी आत्मशुद्धि स्त्री च. ए. व. 

कर्म कर्मे कर्मन् नपु. द्वि. ए. व. 

कुर्वन्ति करतात कृ धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

काया मनस् आणि बुद्धि हे तीनही आत्म्यापासून वेगळे आहेत म्हणजेच प्रकृती चा भाग आहेत. हे आता ह्या श्लोकात प्रकर्षाने सांगितले आहे. आता पर्यंत आपण कर्मयोगी परमेश्वराला सर्व कर्मे अर्पण करतात असे वाचले होते आता थोडासा वेगळा अर्थ ह्या श्लोकात वाचायला मिळतो. येथे आत्मशुद्धी चा उल्लेख केला आहे.

पिशाचान् दानवान् यक्षान् पृथिव्यां चैव राक्षसान् ।

अंगुग्रेन तान्हन्या मिच्छन् हरी गणेश्वरः।। वाल्मीकि रामायण युद्धकाण्ड 6.18.23

सुग्रीव युद्धापूर्वी जेव्हा भयभीत झाले होते त्यावेळी श्रीराम म्हणतात की मला वाटले तर सहजच रावणच काय सर्व दैत्यांचा संहार करू शकतो, (पण ही आत्मशोध करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होत आहे.)

निष्काम कर्म करता करता आत्मशुद्धि होतेच,ज्ञान सुद्धा प्राप्त होते. 

मम नाथ यद् अस्ति योऽस्म्यहं सकलम् तद्धी तवैव माधव । नियतस्वम् इति प्रबुद्धधैरथवा किं नु समर्पयामि ते।। 

श्रीस्त्रोत रत्न-50

मी जेंव्हा अज्ञानी होतो तेव्हा मला असे वाटायचे की मी तुम्हाला (श्रीविष्णूंना) खूप काही अर्पण करू शकतो. पण आता मला समजले आहे की हे सर्व तुमचेच आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की

योगी आसक्ती चा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इन्द्रियांद्वारे केवळ आत्मशुद्धी साठी कर्म करतात.

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।

अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते।।5.12।।

युक्तः कर्म-फलं त्यक्त्वा नैष्ठिकीम्‌ शान्तिम्‌ आप्नोति। अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते।


युक्तः योगी युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

कर्म-फलं कर्मफलांचा कर्म-फल नपु. द्वि. ए. व. 

त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय 

नैष्ठिकीम्‌ निश्चित नैष्ठिकी स्त्री. द्वि. ए. व. 

न+ई+स्था धातू स्थिर असणे 

शान्तिम्‌ शान्ति स्त्री. द्वि. ए. व. 

आप्नोति प्राप्त करतो आप् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

अयुक्तः परमेश्वराला जोडून न घेतलेला अ+युक्तः युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

कामकारेण कामने मुळे कामकार पु. तृ. ए. व. 

फले फलांत फल नपु. स. ए. व. 

सक्तः आसक्त होऊन सञ्ज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

निबध्यते बंधनात अडकतो नि+बन्ध् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

एकाचवेळी जन्मलेल्या बाळांचे प्रारब्ध सारखेच असते का? असा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. त्याचप्रमाणे एकच प्रकारच्या कर्माची फळे समानच असतील का? ह्या प्रश्नाचे उत्तर येथे दिले आहे असे म्हणता येईल. त्यासाठी कर्म करतेवेळी कोणता हेतू मनात होते ते तपासून पहावे लागेल. 

युक्त म्हणजे युक्तीने काम करणारा (आयुक्त) त्याच्या विरुद्ध अयुक्त.

युक्त चा दुसरा अर्थ जोडून घेतलेला. युक्त आणि अयुक्त म्हणजे परमेश्वराशी जोडले गेलेला आणि परमेश्वराशी जोडून न घेतलेला. 

निष्काम कर्म करता करता आत्मशुद्धि होऊन ज्ञान प्राप्ती होते. कर्म योगीला नित्य आणि अनित्य ह्यामधील फरक उमजून येतो. विवेक वैराग्य अशा सद्गुणांचा उदय होणे ती निष्ठा, ज्याला ती प्राप्त झाली तो नैष्ठिक. हे संस्कृत भाषेतील सौंदर्यस्थळ आहे . (भाव भावकी) जी व्यक्ती निष्ठावान असते त्याची श्रद्धा कायमस्वरूपी असते. अशा योगीला शांती प्राप्त होते ती सुद्धा निरंतर. (दोन देशातील राजकीय शांती नव्हे.) 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून शाश्वत अशी शांतता प्राप्त करतो. सकाम पुरुष कर्मफळाच्या आसक्तीमुळे कर्मबंधनात बांधले जातात.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।।5.13।।

वशी देहि सर्व-कर्माणि मनसा सन्न्यस्य न कुर्वन् , न  कारयन् एव नव-द्वारे पूरे , सुखम् आस्ते ।


वशी संयमी वशिन् पु. प्र. ए. व. 

वश धातू इच्छा करणे

देहि देहधारी देहिन् पु. प्र. ए. व. 

सर्व-कर्माणि सर्व कर्मे सर्व-कर्मन् नपु. द्वि. ब. व. 

मनसा मनाने मनस् नपु. तृ. ए. व. 

सन्न्यस्य त्यागून सम+नि+अस् ल्यप प्रत्यय 

न अव्यय 

कुर्वन् करणारा कृ धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

नव-द्वारे (शरीराची) नऊद्वारे नवन् द्वार नपु. स. ए. व. 

कारयन् करवून घेणारा कृ णिच् शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व. 

पूरे घरात पुर नपु. स. ए. व. 

सुखम् आनंदपूर्वक अव्यय 

आस्ते स्थित असतात आस् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व. 

मूत्रपुरीषोत्सर्ग, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुडी, एक जिव्हा अशा शरीराला असणाऱ्या 9 द्वारांचा ह्या श्लोकात उल्लेख केला आहे. 

नवद्वारे पुरे देही हंसो लेलायते बहिः। वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च ।।श्वेताश्वतरोपनिषद्-3:18

जीवात्मा नऊ द्वारांच्या शरीरात राहणारा, परमात्म्याचाच अंश आहे जो ह्या संसाराचा स्वामी आहे. 

सुखाची जणू व्याख्याच ह्या श्लोकात सांगितली आहे. देहधारण केलेला संन्यस्त जीव, आत्मसंयमित आहे तो ह्या 9 दरवाजे असलेल्या शरीरात सुखाने नांदत आहे. कारण तो मीच कर्ता, करविता अशा विचारांपासून दूर आहे.

ह्या नगरीमध्ये इन्द्रिये, मन, बुद्धी हे नागरिक सुद्धा राहतात. मात्र योगी अहंकारशून्य निष्कामी असा आहे, 4.18 श्लोकात सांगितल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक काम्य प्रतिषिद्ध अशा सर्व कर्मांचा त्याग करून अकर्म ला कर्म आणि कर्म ला अकर्म मानणारा असा तो खरा बुद्धीवान आहे. त्याचे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की 

सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून नवद्वार असणार्‍या नगरीत राहून कर्म न करता न करविता सुखाने राहतो.

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14।।

प्रभुः न लोकस्य कर्माणि , न कर्तव्यम् , न कर्म-फल-संयोगम् सृजति । स्वभावः तु प्रवर्तते ।


प्रभुः परमेश्वर प्रभु पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

लोकस्य लोकांची लोक पु. ष. ए. व. 

कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व. 

न अव्यय 

कर्तव्यम् कर्तव्य नपु द्वि. ए. व. 

न अव्यय 

कर्म-फल-संयोगम् कर्मफळाचा संबंध कर्म-फल-संयोग पु. द्वि. ए. व. 

सृजति तयार करतो सृज् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

स्वभावः प्रकृति स्वस्य भावः  स्वभाव पु. प्र. ए. व. 

तु परन्तु अव्यय 

प्रवर्तते कार्यंवित करतो प्र+वृत् धातू प्रवृत्त करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

प्रभू हा शब्द प्रथमच ह्या श्लोकात वाचायला मिळतो आहे. प्र+भू भवति धातू होणे. प्रभवति म्हणजे प्रभाव टाकणारा. जो लोकांवर प्रभाव टाकतो तो प्रभू. आता प्रश्न असा आहे की प्रभाव कोणावर पडतो आहे? आस्तिकांवर की नास्तिकांवर? वेदांत सांगितल्याप्रमाणे जो वेदांना मानतो तो आस्तिक, वेदांना न मानणारे नास्तिक. येथे प्रभूचे अस्तित्व जो मानतो तो आस्तिक.

प्रत्येकाच्या मनात जसा भाव असतो, त्याला तसा तो दिसतो. ज्यांचा देवावर अजिबात विश्वास नाही ते फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतील, वादविवाद, चर्चा करतील आणि आपले काम करतील. आणि दुसर्‍या गटातील लोक मात्र नशीबावर हवाला, फारसे प्रयत्न न करता काम करतील.

कर्तृत्व =कर्तृ (कृ धातू तृच् प्रत्यय देणारा ) +त्व

कर्ता करणारा कर्तृ पु. प्र. ए. व.

त्व प्रत्यय त्या व्यक्तीची योग्यता दर्शविते.

न कर्तृत्वं सृजति प्रभुः म्हणजेच कोणतेही कर्म  तुम्ही आस्तिक असलात तरीही प्रभू घडवून आणत नाही.

मग मनात प्रश्न येतो, कर्म म्हणजे तरी काय? त्याची व्याख्या कोठे सांगितली आहे का?

भूतभावोद्भवकरो विसर्ग: कर्मसंज्ञित: ||8. 3||

भूत भावो उद्भव करोति

उद्+भू धातू प्रगती होणे 

भूतस्य (भूतकाळ) भावः (वर्तमानकाळ) उद्भवं(भविष्यकाळ) करोति

आपल्या भूतकाळात वर्तमानकाळ आणि वर्तमानकाळात भविष्यकाळ असतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा भूतकाळ होतो. म्हणजेच त्याचा विसर्ग होतो. 

असे एकेक सोडून दिलेले क्षण म्हणजे कर्म. 

3र्या अध्यायातील 4 थ्या श्लोकात आपण वाचले आहेत की कर्माचा आरंभच केला नाही म्हणून नैष्कर्म्यं प्राप्त होणार नाही तसेच कर्मांचा त्याग (भौतिक पातळीवर) केला म्हणून सिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणजेच कर्म तर केलेच पाहिजे. आणि आधीच्या व्याख्येप्रमाणे निघून जाणारा क्षण संस्मरणीय असावा. मात्र त्यामध्ये मोह माया आसक्ती असू नये. प्रकृतीची ही वैशिष्ट्येच या जगाच्या रंगमंचावर नाट्य घडवून आणतात.

प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. 

सर्वांनाच साधु आणि विंचवाची गोष्ट माहीत आहे . पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला साधू पुन्हा पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विंचू पुन्हा पुन्हा साधूला दंश करत असतो. ह्याला कारण स्वभाव. दोघेही आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतात.

कर्म तर आपण करतोच पण दरवेळेस आपल्याला यश मिळतेच असे नाही. ह्यावर 18 व्या अध्यायातील 13 व्या श्लोकात सुंदर विवेचन दिले आहे.

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।

सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।18.13। कर्म सिद्धीस नेण्यासाठी 5 कारणांची आवश्यकता असते ती कोणती?

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।

अधिष्ठानं म्हणजे काम करणारे साधन, कर्ता म्हणजे क्रिया घडवून आणणारा.. (इच्छा करणारा) 

करणं पृथकविधम् म्हणजे विविध कार्य करू शकणारी इंद्रिये 

विविध पृथक्चेष्टा म्हणजे इंद्रियांची विविध काम करण्याची शक्ती (skills) 

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैव. 

पळण्याच्या स्पर्धेत अर्ध्या सेकंदाने पदक हुकते,ते दैव असते. 

आपण बिया पेरतो पण सर्वच उगवतात असे काही नाही. क्षत्रियाचा धर्म लढण्याचा पण त्याच्या कर्मफलसंयोगाप्रमाणेच त्याला विजय मिळेल. (कोणीतरी एक नक्की हरणार असतो) 

थोडक्यात आपले कर्तृत्व, कर्म ह्यावर भगवंताचा प्रभाव नसतो तसेच त्यांच्या कर्मा ची फळे सुद्धा तो देत नाही. 

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

परमेश्वर माणसाच्या कर्माचे नाही कर्तृत्वाचे नाही, ना कर्म आणि कर्मफळाच्या संबंधाची रचना करत. मात्र प्रकृती कार्यान्वित असते.

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः।।5.15।।

विभुः न कस्यचित् पापम् , न च एव सुकृतम् आदत्ते । अज्ञानेन ज्ञानम् आवृत्तम् , तेन जन्तवः मुह्यन्ति ।


विभुः विशेष भवति इति विशेष घडणे 

विभु पु. प्र. ए. व. 

भू धातू होणे 

न अव्यय 

कस्यचित् कोणाचे किञ्चित् नपु. ष. ए. व. 

पापम् पाप नपु. द्वि. ए. व. 

न अव्यय 

च सुद्धा अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

सुकृतम् पुण्यकर्म सुकृत नपु. द्वि. ए. व. 

आदत्ते परत घेणे आड्ः +दा धातू देणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व. 

अज्ञानेन अज्ञानामुळे अज्ञान नपु. तृ. ए. व. 

ज्ञानम् ज्ञान नपु. प्र. ए. व. 

आवृत्तम् झाकलेले आवरण आड्ः+वृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व. 

तेन त्याने तद् नपु. तृ. ए. व. 

जन्तवः जीव जन्तु पु. प्र. ब. व. जन् धातू उत्पन्न करणे

मुह्यन्ति मोहित होतो मुह् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

आधीच्या श्लोकात प्रभू शब्द वापरला होता आता ह्या श्लोकात विभू असे म्हटले आहे.

पाप पुण्ण्याच्या कल्पना ह्या श्लोकाच्या निमित्ताने समजून घेता येतील.

पा धातू रक्षण करणे +अप (त्यापासून दूर) =पाप

वाईट कर्म करणार्‍यांचे प्रभू रक्षण करणार नाही असा पाप ह्या शब्दाचा अर्थ घ्यायला हवा. 

सुखदु:खे समे कृत्वा लाभलाभौ जयाजयौ |

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि || 2.38||

सुख दुःख लाभ हानि जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही.

पु पुनाति शुद्ध करणे पुण्यकर्म म्हणजे पवित्र कर्म.

पुन्हा एकदा प्रकृति पासून निर्माण होणाऱ्या विकारांचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।

जरी 5व्या अध्यायात भगवंत म्हणत असले की ते पापही घेत नाहीत आणि पुण्य सुद्धा घेत नाहीत

पण 18 व्या अध्यायात मात्र अर्जुनाला असे सांगत आहेत की तू मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्ति देईन.

ह्याचा नक्की अर्थ काय असावा?

मुळात वाईट आणि चांगले कर्म कसे ठरवायचे?

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।2.38।।

सुख दुःख, लाभ हानि, जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही. थोडक्यात सर्व कर्मे आपण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करायची. स्वार्थ आला की कर्मफळे सुद्धा आली. 

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य येथे चपखल लागु पडते. 

अज्ञानेनावृतं ज्ञानं ह्याचा अर्थ अज्ञानामुळे ज्ञान झाकून ठेवणे

अज्ञानामुळे जर ज्ञान झाकले गेले असेल तर मनात चलबिचल होते. Knowledge makes man perfect.

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव। येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि।।4.35।। इथे सुद्धा भगवान् हेच सांगत आहेत.

जर तुझ्याकडे ज्ञान असेल तर तुला पुन्हा मोह होणार नाही.

Half knowledge is dangerous.

एखादी गोष्ट लहान मुलाला करू नको असे सांगितले की त्याला तेच करावेसे वाटते कारण त्यातील धोके त्याला माहीत नसतात. मग तीच गोष्ट करण्याचा त्याला मोह आवरत नाही. 

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥ ईशावास्योपनिषद 9।।

ज्याच्या कडे ज्ञान नाही तो घोर अंधकारमय जीवन जगतो पण ज्याला आपल्या कडे खूप ज्ञान आहे असे वाटते तो त्यापेक्षा वाईट अवस्थेत असतो. (आपल्या अज्ञानाची त्याला जाणीव नसते)

विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।

अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ।।

ईशोपनिषद् 11।। 

अविद्या चा शेवट अटळ आहे पण विद्या अमर्त्य आहे. सत्य हे चिरंतन आहे.

यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।

अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ॥केनोपनिषद् 3॥

ज्याला असे वाटते की त्याला सर्व काही समजले आहे खरे तर ते त्याचे अज्ञान असते. 

आपण कायम ज्ञान प्राप्ती करत राहिले पाहिजे.

म्हणजेच आपण आपले ज्ञान सतत तपासून घेत राहिले पाहिजे. थोडक्यात 

जर अज्ञानाचे आवरण ज्ञानावर नसेल तर मोह होणार नाही.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सर्व व्यापी परमात्मा कोणाचे पुण्य आणि पाप घेत नाही. ज्ञानावर असलेल्या अज्ञानाच्या आवरणामुळे जीव मोहात पडत असतात.

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।5.16।।

येषाम् तु तत् अज्ञानम् आत्मनः ज्ञानेन नाशितम् , तेषाम् ज्ञानम् आदित्यवत् तत् परमं प्रकाशयति ।


येषाम् ज्याचे यद् पु. ष. ब. व. 

तु परन्तु अव्यय 

तत् ते तद् नपु प्र. ए. व. 

अज्ञानम् अज्ञान अ+ज्ञानम् नपु. प्र. ए. व. 

आत्मनः परमात्म्याचे आत्मन् पु. ष. ए. व. 

ज्ञानेन ज्ञानामुळे ज्ञान नपु. तृ. ए. व. 

नाशितम् नष्ट केले आहे नश् धातू णिच् क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व. 

तेषाम् त्यांचे तद् पु. ष. ब. व. 

ज्ञानम् ज्ञान नपु. प्र. ए. व. 

आदित्यवत् अव्यय 

तत् परमं ते श्रेष्ठ तत्पर पु. द्वि. ए. व. 

प्रकाशयति प्रकाशित होते प्र+काश् धातू णिच् कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

एक वेगळीच वाक्यरचना आपल्यासमोर ह्या श्लोकात मांडली आहे. 'अज्ञानम् ज्ञानेन नाशितम् ' म्हणजे ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो. अज्ञान नाशवंत आहे आणि अर्थातच ज्ञान शाश्वत आहे सत्य आहे. सत्य एकच असते. असत्य कितीही असू शकतात.

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥4.19॥ ह्या श्लोकात ज्ञानाला अग्नीची उपमा दिली आहे. कामना रहीत कर्म ज्ञानरूपी अग्नीत भस्म झाले म्हणून कर्मफळाची अपेक्षा सुद्धा नष्ट झाली.

दुसर्‍या वाक्यात ज्ञानम् प्रकाशयति असे म्हटले आहे. मग येथे सहाजिकच प्रश्न पडतो, ज्ञान कर्ता आहे की कर्म?

ज्ञानाला आदित्यवत् म्हणजे सूर्याची उपमा दिली आहे. म्हणजे ज्ञान माणसाला स्वयंप्रकाशित बनवते. त्या काळात सूर्य, स्वयंप्रकाशित आहे हे माहीत होते हे सुद्धा विशेषच. आपल्या सर्वांनाच माहित असलेला अभंग

'मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, 

उजेडी राहिले उजेड होऊन' यथार्थ वर्णन करतात.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जेव्हा ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो तेव्हा सूर्यासारख्या तेजस्वी असा तो परमात्म्याची अनुभूती देतो. 

तबुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिषूतकल्मषाः ॥5.17॥

तत्-बुद्धयः,तत्-आत्मानः,तत्-निष्ठाः,तत्-परायणाः,ज्ञान-निर्धूत-कलमषाः अपुनरावृत्तिम  गच्छन्ति


तत्- बुद्धयः त्याची बुद्धि तद्-बुद्धी स्त्री. प्र. ब. व. 

बुध् धातू बोध होणे 

तत्-आत्मानः त्याचा आत्मा तद्-आत्मन् पु. प्र. ब. व. 

तत्-निष्ठाः त्याची निष्ठा तद्-निष्ठा स्त्री. प्र. ब. व. 

तत्-परायणाः तेच परमलक्ष्य तद्-परायणा स्त्री. प्र. ब. व. 

ज्ञान-निर्धूत-कल्मषाः ज्ञान-निर्धूत-कल्मष ज्ञानामुळे नष्ट झालेले पाप स्त्री. प्र. ब. व. 

निर्+धू धातू नष्ट होणे +क्त प्रत्यय

कर्म +सो धातू नष्ट होणे (स्यति) +कः

अपुनरावृत्तिम् मुक्ती अ+पुनरावृत्ति स्त्री. द्वि. ए. व. 

गच्छन्ति जातात गम् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.

15 व्या श्लोकात ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले होते 16 व्या श्लोकात त्याचे गुणविशेष सांगितले. आता ह्या श्लोकात त्याचे परिणाम सांगितले आहेत. तल्लीन होणे ह्या शब्दाचा अर्थ येथे समजतो.

बुध् धातू म्हणजे बोध होणे, ज्ञान प्राप्त होणे. राजपुत्र सिद्धार्थ ला दुःखाची दिसल्यावर त्याची कारणे शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला आणि बुद्ध झाला.

माणसाची बुद्धी तो आयुष्यात जे काही करणार असतो, त्यासाठी मार्गदर्शन करत असते. अनेक ज्ञानी, कलाकार, समाजसेवक, उद्योजक हे कोणतीही पार्श्वभूमी नसताना अचाट कामगिरी करून दाखवतात.  स्वयंप्रकाशित असा ज्ञानी इतक्या उच्च पातळीवर जाऊन पोहोचला आहे की त्याची बुद्धी परब्रह्मात रममाण झाली आहे., परब्रह्म च त्याचा आत्मा आहे, त्याची निष्ठा परब्रह्मातच दृढ झाली आहे आणि तोच आता त्याचा पुरूषार्थ आहे. अशा आत्मज्ञानामुळे त्याची सर्व पातके धुवून निघाली आहेत. अशा ज्ञानींची पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म होत नाही. ते परमगतीला प्राप्त होतात. ह्या वरून परमवीरचक्र ह्या शब्दाची आठवण येते. चक्र म्हणजे सुद्धा गती. किती उदात्त विचार आहेत ह्या पुरस्कारामागे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की 

ज्याची बुद्धि आत्मा निष्ठा सर्व काही परमात्म्यामधे असे काही रममाण झाले आहे की आता तेथून परत मागे फिरणे होणार नाही. त्याची ज्ञानामुळे सर्व पापे नष्ट झाली आहेत.

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि। शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः।।5.18।।

पण्डिताः विद्या-विनय-सम्पन्ने ब्राह्मणे , गवि , हस्तिनी , च शुनि , श्वपाके च एव सम-दर्शिनः ।


पण्डिताः विद्वान पण्डित पु. प्र. ब. व. 

विद्या-विनय-सम्पन्ने नम्र विद्यासंपन्न विद्या-विनय-सम्पन्न पु. स. ए. व. 

ब्राह्मणे ब्रह्मवेत्त्याकडे ब्राह्मण पु. स. ए. व. 

गवि गाय गो स्त्री. स. ए. व. 

हस्तिनी हत्ती हस्तिन् पु. स. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

शुनि कुत्रा श्र्वन् पु. स. ए. व. 

श्वपाके चांडाल श्वपाक पु. स. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

सम-दर्शिनः सम-दर्शिन् पु. प्र. ब. व.

आता ह्या श्लोकात ज्ञानी पुरुष ओळखायचा कसा त्याचे वर्णन केले आहे, गाय हत्ती कुत्रा आणि कुत्रा खाणारे यांची उदाहरणे देऊन. मागील श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वर्णन आदित्यवत् म्हणजे सूर्यासारखा स्वयंप्रकाशित असे म्हटले होते, येथे सूर्याच्या दुसर्‍या गुणाची उपमा ज्ञानी पुरुषाला दिली आहे. कवी भा. रा. तांबे यांची अर्थपूर्ण कविता 'दिनकर समदर्शी तू खरा'.

पुढे येणाऱ्या 6व्या अध्यायातील 29 आणि 32 व्या श्लोकात सुद्धा समदर्शी असण्याचे दाखले दिले आहेत. येथे ज्ञानी विद्यमान तर आहेच, तो विनयशील आहे, सर्वांकडे एकाच दृष्टीने पाहतो. गाय सत्वगुणी, हत्ती रजोगुणी आणि कुत्रा तमोगुणी तर श्र्वपाक विद्याहीन असे मानले तर अशा सर्वांकडे ज्ञानी पुरुष एकाच नजरेने पाहतो. मनात कोणताच भेदभाव नाही. असे चित्र सामूहिक धार्मिक कार्यक्रमात पाहता येते. जसे पंढरपूरला जाणारी वारी, सर्वांच्या मनात फक्त विठ्ठलाचे चिंतन असते. सर्वच एकमेकांकडे विठ्ठल भावनेने पहात असतात.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

विद्ये ने चित्तवृत्ती शांत आणि मर्यादशील झालेल्या ब्रह्मवेत्त्याकडे, गाय, हत्ती, कुत्रा तसेच चांडाळ  यासर्वांकडे विद्वान सारख्याच दृष्टीने पाहतात.

इहैव तैर्जितः सर्गों येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥5.19॥

येषाम् ‍ मनः साम्ये स्थितम् ‍ ‍, तैः इह एव सर्गः जितः , हि समम् ‍ ब्रह्म निर्दोषम् ‍ , तस्मात् ‍ ते ब्रह्मणि स्थितः


येषाम् ‍ज्याचे यद् पु. ष. ब. व. 

मनः अंतःकरण मनस् पु. प्र. ए. व. 

साम्ये समतेत साम्य नपु. स. ए. व. 

स्थितम् स्थिर ‍ ‍स्थित स्था धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व. 

तैः त्यांनी तद् पु. तृ. ब. व. 

इह ह्या आयुष्यात अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

सर्गः संपूर्ण जगाला सर्ग पु. प्र. ए. व. 

सृज् धातू निर्माण करणे घञ्  प्रत्यय

जितः जिंकले आहे जि धातू जिंकणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

हि कारण अव्यय 

समम् ‍समत्व सम नपु. प्र. ए. व. 

ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व. 

निर्दोषम् निर्दोष नपु. प्र. ए. व. 

तस्मात् ‍म्हणून तद्. पु. पं. ए. व. 

ते ते तद् पु. प्र. ब. व. 

ब्रह्मणि ब्रह्मात ब्रह्मन् नपु. स. ए. व. 

स्थितः स्थित स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

ह्या श्लोकात ब्रह्माचे गुणविशेष सांगताना निर्दोष असे विशेषण वापरले आहे. आधीच्या श्लोकात सूर्याची उपमा देऊन स्वयंप्रकाशित आणि समता असे ब्रह्मवेत्त्याचे गुण सांगितले होते. सर्वांप्रती समता राखणे हे आत्मसाक्षात्काराचे लक्षणच होय. सर्व आत्म्यांमधे परमेश्वराचा अंश आहे असे गीता आपल्याला सांगते. मात्र व्यावहारिक दृष्ट्या आपण लोकांचे वर्गीकरण करतो कधी धार्मिक, कधी आर्थिक कधी सामाजिक. ज्याच्या मनात लोभ लालसा नाही, ज्याच्या मनातून राग लोभ नष्ट झाले आहेत, ज्याला कोणी जवळचा नाही आणि दूरचा सुद्धा नाही, त्यालाच समता साधता येते. म्हणूनच संतांना आपण देवासमान मानतो. ब्रह्माला ह्या श्लोकात दोषरहित म्हटले आहे.

ब्रह्मा म्हणजेच समता.

समत्वं योग उच्यते।।2.48।। हे आपण वाचले आहेच. 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की 

ज्याच्या मनात आता फक्त समतेचा भाव आहे, त्याने सर्व जगाला जिंकून घेतले आहे, कारण समत्व असा ब्रह्म निर्दोष आहे, म्हणून अशा लोकांना ब्रह्मत्व प्राप्त झाले आहे.

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।

स्थिरबुद्धिर्सम्मूधो ब्रह्मविदब्रह्माणि स्थितः ॥ 5.20॥

स्थिर-बुद्धिः, असम्मूढः , ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः प्रियम् ‍ प्राप्य न प्रहृष्येत् अप्रियम् ‍ प्राप्य च न उद्विजेत् ‍।


स्थिर-बुद्धिः स्थिर-बुद्धि स्त्री. प्र. ए. व. 

असम्मूढः संशयरहित असम्मूढ पु. प्र. ए. व. 

अ+सम+मुह् धातू बुद्धि भ्रम होणे क्त प्रत्यय

ब्रह्मवित् ब्रह्म जाणणारा ब्रह्मन्+विद् पु. प्र. ए. व. 

ब्रह्मणि ब्रह्मा ब्रह्मन् नपु. स. ए. व. 

स्थितः अचल स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

प्रियम् ‍आवडणार्या प्रिय पु. द्वि. ए. व. 

प्राप्य प्राप्त होऊन प्र+आप् धातू ल्यप प्रत्यय 

न अव्यय 

प्रहृष्येत् हर्षित होणे ‍प्र+हृष् धातू कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व. 

अप्रियम् नावडत्या न प्रिय पु. द्वि. ए. व. 

प्राप्य प्राप्त होऊन प्र+आप् धातू ल्यप प्रत्यय 

च सुद्धा अव्यय 

न अव्यय 

उद्विजेत् ‍उद्विग्न होतो उद्+विज् धातू कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.

रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असा श्लोक. आपल्या आयुष्यात रोजच चढ-उतार, यश-अपयश कडू-गोड अशा घटना घडत असतात. ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने हाताळाव्या हे सांगणारा हा श्लोक.

ब्रह्म स्थित व्यक्ती आयुष्यात कशी वागते ते सांगताना दोन विशेषणे वापरली आहेत. स्थिरबुद्धि आणि असम्मूढ

अचल आणि स्थिर अशा मानसिकतेचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी पर्वताची उपमा दिली आहे.

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।

तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥ 5.103 ॥

मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामधे चलबिचल उत्पन्न होत नाहीत ॥ ज्ञानेश्वरी। 5. 103॥

काय कमावलं काय गमावलं ह्याचा हिशोब करून साध्य तरी काय करायचे आहे?ज्याचे अंतिम लक्ष्य केवळ ब्रह्म प्राप्ती हेच आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जो स्थिरबुद्धि, संमोहरहित ब्रह्म जाणणारा पुरुष ब्रह्मात स्थित आहे त्याला प्रिय गोष्ट प्राप्त झाली म्हणून हर्ष होत नाही आणि अप्रिय गोष्ट प्राप्त झाली म्हणून उद्विग्नता येत नाही.

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्। स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते।।5.21।। 

बाह्य -स्पर्शेषु असक्त-आत्मा  आत्मनि यत् सुखम् विन्दति  सः ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम् सुखम् अश्नुते ।


बाह्य-स्पर्शेषु बाह्यविषयसुखात बाह्य-स्पर्श पु. स. ए. व. 

असक्त-आत्मा आसक्ती रहीत आत्मा 

असक्त-आत्मन् पु. प्र. ए. व. 

आत्मनि आत्म्यातच आत्मन् पु. स. ए. व. 

यत् जो यद् नपु. प्र. ए. व. 

सुखम् सुख नपु. प्र. ए. व. 

विन्दति मानतो विद् धातू जाणणे, मनन करणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

ब्रह्मयोगयुक्तात्मा ब्रह्माला जोडला गेलेला आत्मा  ब्रह्मयोगयुक्तआत्मन् पु. प्र. ए. व. 

अक्षयम् न संपणारे न+क्षय अक्षय नपु. द्वि. ए. व. 

सुखम् सुख नपु. द्वि. ए. व. 

अश्नुते अनुभवतो अश् धातू अनुभव करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

श्रीमद्भगवद्गीतेत कधीच देवाला घाबरून रहा, देवाचा कोप होईल अशा प्रकारची भाषा वापरलेली नाही. उलट परमात्म्याशी जोडून घेऊन निस्सीम आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. सर्वांनी कायम आनंदाने जगावे असाच संदेश गीतेत दिलेला आहे. मात्र आपला आनंद शाश्वत असावा. क्षणभंगूर नसावा.

आनन्दो ब्रह्मेति व्यजानात्। तैत्तिरीयोपनिषद् भृगुवल्ली षष्ठोऽनुवाकः 1।।

आनंद हाच ब्रह्म आहे.

केवलानुभवानंदस्वरूप: भगवान:। श्रीमद्भागवतम्। 7.6.23।।

परमेश्वराचा अनुभव केवळ आनंद आहे.

ह्या श्लोकात बाह्य-स्पर्श असक्त असा शब्द वापरला आहे म्हणजे शब्द, रूप, गंध इ. विषयांमध्ये ज्यांचे अंतःकरण रममाण होत नाही असा विषयविरक्त व्यक्ति, जो केवळ आत्मनिष्ठ होऊन, आत्म्याशी तादात्म्य पावलेला असा, ज्याच्या आनंदाची पराकाष्ठा झाली आहे.

सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥ज्ञानेश्वरी 5.107 ॥

सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय ? ॥ 5.107।। 

थोडक्यात आनंद, मनाची शांती हे सर्व आपल्या मधेच असते, हेच ते आत्मज्ञान. 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की 

बाह्य सुखाची निरीच्छा असणारा स्वतः च्या आत्म्यामधेच सुखाचा अनुभव घेतो, ब्रह्माशी जोडले गेलेला असा शाश्वत सुख अनुभवतो.

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।5.22।।

हे कौन्तेय ! ये भोगाः संस्पर्शजाः ते हि दुःख-योनिः आदि अन्तवन्तः एव ,  बुधः तेषु न रमते ।


हे कौन्तेय ! 

ये यद् पु. प्र. ब. व. 

भोगाः भोग पु. प्र. ब. व.

संस्पर्शजाः संपर्कातून उत्पन्न होणारे संस्पर्शज पु. प्र. ब. व.

सम+स्पृश् धातू स्पर्श करणे +जन् धातू उत्पन्न होणे 

ते तद् पु. प्र. ब. व. 

हि कारण अव्यय 

दुःख-योनयः दुःखाचा उगम दुःख योनि पु. प्र. ब. व.

आदि अन्तवन्तः आरंभ आणि अंत आदि अन्तवन्त् पु. प्र. ब. व.

एव सुद्धा अव्यय 

बुधः बुद्धिवान बुध पु. प्र. ए. व. 

तेषु त्यामध्ये तद् पु. स. ब.व.

न अव्यय 

रमते रमतो रम् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

आपण एखादी गोष्ट वापरून, काही दिवसांनी फेकून देण्याची संस्कृती पाश्चात्यांकडून शिकलो. त्यापूर्वी आपल्याला घरातील जुन्या वस्तू अगदी पणजोबांच्या वेळेपासून आहेत असे सांगायला अभिमान वाटायचा. ह्यामुळे नक्की संसाधनांची बचत आणि कमी कचरा निर्माण होत असे. ह्यालाच शाश्वत जीवनशैली असे म्हणतात. हिच गोष्ट श्रीभगवानकृष्णांनी अध्यात्मिक अंगाने सांगितली आहे.

नायं देहो देहभाजां नृलोके

कष्टान् कामनरर्हते विड्ःभुजां ये।

तपो दिव्यं पुत्रका येन सत्त्वं

शुद्ध्येद्यस्माद् ब्रह्मसौख्यं त्वनन्तम् ॥श्रीमद्भागवतम् 5.5.1॥

इन्द्रिय सुखाच्या मागे धावण्यापेक्षा, भक्ती आणि कठोर परिश्रमांनी खरा आनंद मिळवला पाहिजे कारण इन्द्रिय सुख तर विष्ठा खाणारी डुक्करे सुद्धा मिळवतात. 

आधीच्या श्लोकात स्वतःच्या आत्म्यामधेच रममाण असणारे नितांत सुखी असतात असे म्हटले आहेच.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की 

कारण हे कौन्तेय! जे इन्द्रिये आणि विषयांच्या संयोगातून निर्माण होणारे भोग आहेत ते दुःख निर्माण करतात अशा सुखांना सुरवात आणि  शेवट आहे, ह्यामधे बुद्धीमान माणसे रमत नाहीत.

शक्नोतिहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः।।5.23।।

यः इह शरीर-विमोक्षणात्  प्राक्, एव काम-क्रोध-उद्भवम्  वेगम्  सोढुम् शक्नोति सः युक्तः सः सुखी नरः ,।


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

इह ह्या (शरीरात) अव्यय 

शरीर-विमोक्षणात् शरीराला मोक्ष शरीर-वि मोक्षण पु. पं. ए. व. 

वि+मोक्ष् धातू मुक्ती मिळणे

प्राक् आधी अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

काम-क्रोध-उद्भवम् काम क्रोधाने उत्पन्न होणाऱ्या काम-क्रोध-उद्भव पु. द्वि. ए. व. 

वेगम् वेगाला वेग पु. द्वि. ए. व. 

सोढुम् सहन करून सह् धातू तुमून प्रत्यय 

शक्नोति शकतो शक् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

युक्तः योगी युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

सुखी सुखिन् पु. प्र. ए. व. 

नरः पुरूष नर पु. प्र. ए. व.

दोन माणसे एकत्र राहू लागली कि काहीना काही तरी भावनिक नाते निर्माण होणार मग ते प्रेम असेल, राग लोभ असेल नाहीतर द्वेष किंवा आसूया. ह्या सगळ्याला काही मर्यादा नसते. किंवा ती आपल्यालाच ठरवावी लागते. नाहीतर त्याचा आपल्याला त्रास होतो. आपले मन आणि शरीराची ताकद वाढवून कोणत्याही प्रसंगाला टक्कर देण्याची तयारी हवी. टक्कर देणे म्हणजे प्रत्युत्तर नव्हे तर आपले मन संतुलित ठेवणे. कोणत्याही त्रासदायक गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम न होऊ देणे. (योगी हा असाच असतो.) आपल्यालाच हे करावे लागते कारण दुसरा व्यक्ती कसा विचार करेल कसा वागेल ते आपल्याला ठरवता येत नाही. श्रीभगवानकृष्ण आपल्याला ह्या श्लोकातून हेच सांगत आहेत. पतंजली योगसूत्र आणि श्रीमद्भगवद्गीता दोन्ही मधे मन आनंदी असावे, शांत असावे असा आवर्जून उल्लेख केला आहे. ह्या श्लोकात वेग हा शब्द वापरला आहे म्हणजे काम, क्रोधाचे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की 

जो ह्या लोकांतच शरीर त्याग करण्यापूर्वी काम आणि क्रोध सहन करू शकतो तो खरा योगी आणि सुखी पुरूष होय.

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथन्तर्ज्योतिरेव यः।स योगी ब्रह्म निर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति।।5.24।।

यः अन्तःसुखः, अन्तर आरामः, तथा एव यः अन्तर्ज्योतिः, सः योगी ब्रह्म-भूतः ब्रह्म-निर्वाणम् अधिगच्छति


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

अन्तःसुखः स्वतः मध्ये सुख अन्तस्सुख पु. प्र. ए. व. 

अन्तर आरामः आत्म्यामधेच रमणारा अन्तर आराम पु. प्र. ए. व. 

रम् धातू रमणे. 

तथा त्याप्रमाणेअव्यय  

एव नक्कीच अव्यय 

यः जो यद् पु. प्र. ए. व. 

अन्तर ज्योतिः आत्मज्ञानी अन्तर ज्योति पु. प्र. ए. व. 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

योगी योगिन् पु. प्र. ए. व. 

ब्रह्म-भूतः ब्रह्माशी जोडला गेलेला ब्रह्मन् भूत पु. प्र. ए. व. 

ब्रह्म-निर्वाणम् मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व. 

अधिगच्छति प्राप्त होते अधि+गम् धातू जाणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.

राम ह्या शब्दाच्या शाब्दिक कोटी बर्‍याच आहेत. जेथे रमावेसे वाटते तेथे राम असतोच. नाहीतर जगण्यात काही रामच उरत नाही.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ । अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥रामरक्षा 16।।

जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे, जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे, तोच राम आपला परमेश्वर आहे ॥16॥

आपल्याला 5 ज्ञानेन्द्रिये दिली आहेत ज्याच्या साह्याने आपण बाहेरील जग अनुभवू शकतो पण खरा आनंद तर आपल्या अंतरात्म्यात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सतत दुसर्‍याशी तुलना करून आपण आनंदी होतो.

ऋतम्भरा तत्र प्रज्ञा|| योगसूत्र। 1.48 ||

समाधि अवस्थेत मनुष्याला परम सत्याची अनुभूति  मिळते.

जे ऐसेनि सुखें मातले। आपणपांचि आपण राहिले। ते मी जाने निखीळ ओतले समरस्याचे। ज्ञानेश्वरी 5.137।।

जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ज्याचे सुख बाह्य विषयावर अवलंबून नसून आत्मस्वरूपात तो सुखी असतो, आत्मचिंतन हीच विश्रांती, आत्मसाक्षात्काराने तो उजळून निघतो, तो ब्रह्माशी एकरूप तादात्म्य पावलेला, जणू काही मोक्ष प्राप्त करून घेतो.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः। छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः।।5.25।।

क्षीण-कल्मषाः छिन्न-द्वैधाः  यत्-आत्मानः सर्व-भूतहिते रताः ऋषयः ब्रह्म-निर्वाणम् ‍ लभन्ते


क्षीण-कल्मषाः सर्व पापे नष्ट झाली आहेत असा क्षीण-कल्मष पु. प्र. ब. व. 

क्षी धातू क्षीण होणे 

छिन्न-द्वैधाः सर्व संशय मिटले आहेत असा (दुविधा छाटल्या गेल्या.) 

छिन्न-द्वैध पु. प्र. ब. व. 

यत्-आत्मानः आत्मसाक्षात्कारी, संयमीत यत्-आत्मन् पु. प्र. ब. व. 

सर्व-भूतहिते सर्वांच्या हितासाठी सर्व-भूतहित पु. स. ए. व. 

रताः रमतात रम् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

ऋषयः ऋषि पु. प्र. ब. व. 

ऋष् धातू जाणे

ब्रह्म-निर्वाणम् मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व. ‍ 

लभन्ते प्राप्त होतात लभ् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ब. व.

5व्या अध्यायातील 24. 25. 26 ह्या श्लोकात निर्वाण हा शब्द आला आहे (तसेच तो 2.72 आणि 6.15 मध्ये पण आलेला आहे). निर्वाण शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला हवा.

निर +वाण  वा वाहणे

नि म्हणजे वेगळे होणे, 

(निर्वात, निरिच्छ निर्दोष वगैरे )

जो वाहतो तो वायू,

सर्व वायूंचे वाहणे थांबले. 

निर्वात म्हणजे दिव्यातील वात संपणे

निर्वात म्हणजे वारा सुद्धा नाही म्हणजे जिथे कांहीच नाही अशी पोकळी. Vacuum. Barometer मधे पाऱ्याच्या वर असते तशी. ती पोकळीच असते हा सिद्धांत Torricelli नं मांडला. म्हणून vacuum measurement साठी torr टॅार हें युनिट आहे. समुद्रसपाटीपासून barometer मधे पारा ७६ सें.मी. इतका असतो. जितके वर जाऊं तितकी पाऱ्याची उंची कमी म्हणजे निर्वातता अधिक.

पांडव स्वर्गारोहण करत असताना, ठराविक उंचीवर गेल्यावर युधिष्ठिर सांगतो “इथून पुढे संवाद बंद, आत्मकेंद्रित रहायचं” हिमालयात जाऊन साधना करण्यामागे हेच रहस्य असूं शकतं.

निर्वाण हा शब्द फक्त गीतेत नाही तर बौद्ध, जैन धर्मातील साहित्यात आला आहे. निर्वाण चा साधारण अर्थ मोक्ष, मुक्ति. तात्विक अर्थ आत्मा आणि ब्रहमतत्वाची सांगड जैन तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याची मुक्ति. बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्व इच्छां पासून मुक्त, पुनर्जन्मापासून मुक्ति. ग्रंथसाहिबा मध्ये निर्बाण असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुद्धा मुक्ती.

सर्वात शेवटी निर्वाण षटकम्

ज्यामध्ये 6 श्लोक आहेत. जेव्हा आदि शंकराचार्य आपल्या गुरुंना प्रथम भेटले त्यावेळी त्यांनी स्वतः ची ओळख ह्या 6 श्लोकातून सांगितली.

यम आणि नियम ह्यामधील फरक सुद्धा समजून घ्यायला हवा.

यम म्हणजे स्वतःहून पाळण्याचे जीवनशैली जसे सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह वगैरे. नियम हे  तयार केलेले असतात. जसे वाहतुकीचे नियम.

आधीच्या श्लोकात ब्रह्माशी एकरूप झालेला योगी आत्मस्वरूपातच सुखी असतो असे वाचले. म्हणजे त्याची वासना आणि अहंकार नष्ट झाले आहेत, त्यांना पराकोटीची शांती लाभली आहे. ते फक्त दुसर्‍याच्या कल्याणाचाच विचार करतात. त्यांची सर्व पापे नष्ट झाली आहेत. अशाप्रकारे ज्यांच्या संकल्प विकल्पांचा उच्छेद झाला आहे ते ऋषी. 

ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ज्यांचे मन शरीर आत्मा बुद्धि नियमबद्ध झाले आहेत, सर्व संशय नष्ट झाले आहेत, ज्यांची पापे पूर्ण नष्ट झाली आहेत. जे दुसर्‍यांच्या हितामधेच सुख मानतात त्यांना निर्वाण ब्रह्म प्राप्त होते.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्। अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्।।5.26।।

काम- क्रोध-वियुक्तानाम्‌ यत-चेतसाम् ‍ विदित -आत्मनाम् ‍ यतिनाम् ‍ अभितः ब्रह्म-निर्वाणं वर्तते ।


काम- क्रोध-वियुक्तानाम्‌ काम क्रोधापासून मुक्त काम- क्रोध-वियुक्त  नपु. ष. ब. व. 

वि+युज् धातू क्त प्रत्यय

यत-चेतसाम् मन जिंकले आहे असा यत-चेतस् नपु. ष. ब. व. 

चित् धातू विचार करणे 

विदित-आत्मनाम् परमात्म्याचा साक्षात्कार झालेला विदित-आत्मन् ‍ पु. ष. ब. व. 

यतिनाम् ‍ज्ञानी पुरूषांचे यति पु. ष. ब. व.

अभितः सर्वबाजूंनी अव्यय 

ब्रह्म-निर्वाणं मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व. 

वर्तते परीपूर्ण आहे वृत धातू असणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

निर्वाण शब्दाचा अर्थ आपण आधीच्या श्लोकात समजून घेतला. ह्या अध्यायातील 2र्या श्लोकात कर्मयोग श्रेष्ठ असून सामान्य माणसाला करण्याजोगा आहे असे म्हटले तर 3 र्या श्लोकात कर्मयोगी ची व्याख्या सांगितली आहे. आपले मन सर्वस्वी आपल्या स्वाधीन ठेवून म्हणजे यतचेतसाम् असा, फक्त परमार्थाचा विचार करणार्‍याने कर्म केले काय किंवा न केले काय ते सदैव ब्रह्मसुख च अनुभवतात. त्याला आत्मज्ञान झाले आहेच. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरांनी आत्मानुभव लिहिला.

अशा योगी साठी राग लोभ आता उरलेच नाहीत.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ज्यांचे मन पूर्णतः ताब्यात आहे आणि ते वासना आणि क्रोधापासून मुक्त आहेत अशा ज्ञानी ला नेहमीच शाश्वत आनंद लाभतो.

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः। प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ।।5.27।।

बाह्यान्‌ स्पर्शान्‌ बहिः कृत्वा, एव चक्षुः भ्रुवोः अन्तरे कृत्वा, नास-अभ्यन्तर-चारिणौ प्राण-अपानौ समौ च


यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।

विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः।।5.28।।

यः यत-इन्द्रिय-मनः-बुद्धिः, मोक्ष-परायणः विगत-इच्छा-भय-क्रोधः, सः मुनिः सदा मुक्तः एव ।


बाह्यान्‌ बाहेरील बाह्य पु. द्वि. ब. व. 

स्पर्शान्‌ स्पर्श पु. द्वि. ब. व. 

बहिः बाहेर अव्यय 

कृत्वा करून कृ धातू क्त्वा प्रत्यय 

एव सुद्धा अव्यय 

चक्षुः डोळे चक्षुस् नपु. द्वि. ए. व. 

भ्रुवोः भुवयां भ्रु स्त्री. ष. द्वि. व. 

अन्तरे मधे अन्तर नपु. स. ए. व. 

कृत्वा करून कृ धातू क्त्वा प्रत्यय नास-अभ्यन्तर-चारिणौ नाकपुड्यांमधे वहन नास-अभ्यन्तर-चारिन् पु. द्वि. द्वि . व.  

अभि+अन्त् धातू बांधणे +र

चर् धातू जाणे

प्राण-अपानौ  श्वास उच्छ्वास 

प्राण-अपान पु. द्वि. द्वि . व. 

समौ समान सम पु. द्वि. द्वि . व. 

च सुद्धा अव्यय


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

यत-इन्द्रिय-मनः-बुद्धिः संयमित इन्द्रिय, मन बुद्धि  यत - इन्द्रिय-मनस्-बुद्धि स्त्री. प्र. ए. व. 

मोक्ष-परायणः मुक्ती साठी बद्ध 

मोक्ष-परायण पु. प्र. ए. व.  विगत-इच्छा-भय-क्रोधः कामना भीती राग त्यागलेला विगत-इच्छा-भय-क्रोध पु. प्र. ए. व. 

वि+गम् धातू जाणे 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

मुनिः मुनि पु. प्र. ए. व. 

सदा नेहमी अव्यय 

मुक्तः मुक्त मुच् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

एव सुद्धा अव्यय

आधीच्या श्लोकात आपण कर्मयोगी ने आपल्या प्रयत्नांनी साध्य केलेल्या निर्वाण अवस्थेबद्दल वाचले आता ह्या आणि पुढील श्लोकात ध्यानयोगावर विवेचन केले आहे. योगाभ्यासाने आपल्या मनावर ताबा मिळवता येतो. 5 वा अध्याय उपनिषद् ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र ह्यावर आधारित आहे. यज्ञभोक्तामहापुरुषमहेश्वरः असे नाव आहे ह्या अध्यायाचे.  योगाभ्यास आणि प्राणायाम करणार्यांना हा श्लोक चांगलाच मनाला भावेल. 

स्पर्श आपल्या हाताने होतो असे आपल्याला वाटते पण तो नाकाद्वारे गंध, जीभेद्वारे रस आणि कानाद्वारे शब्दांचा आणि अर्थात डोळ्याने रंग आणि रुप असा सुद्धा होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या इन्द्रियांद्वारे आपल्या मनाला स्पर्श होत असतो. आपण जेव्हा ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा डोळे मिटून बाह्य जगाशी संपर्क थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण डोळे मिटून घेतले तरी आपल्याला दिसत असतेच. त्याला कारण आपले मन. सर्व काही आपल्या मनावर अवलंबून असते. अगदी जागेपणी सुद्धा आपले लक्ष नसेल तर शेजारच्या माणसाचे बोलणे ऐकू येत नाही. अगदी सहजपणे आपण म्हणतो, माझे लक्ष नव्हते परत सांग.

मुक्तीचे 5 प्रकार सांगितले जातात. सालोक्य, सार्ष्टि, सारूप्य, सामीप्य और सायुज्य. पण ह्या सर्व मृत्यू नंतर च्या गोष्टी आहेत. आपण त्याचा विचार ह्या श्लोकात करत नाही आहोत. योगाभ्यासाने परमात्म्याशी एकरूप होता येते हे ह्या श्लोकात प्रामुख्याने सांगितले आहे. 


सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।

तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥ ज्ञानेश्वरी 5. 152॥

इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टि स्थिर करून मागे (जे दिसते तेच ब्रह्म) पहावे. 

सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥ ज्ञानेश्वरी 5.153॥

उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांचे  ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात. 

ह्या दोन श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की 

मनावर ताबा मिळवायचा असेल तर डोळे बंद करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवून आपला श्वास आणि उच्छ्वास समान ठेवून, श्वासामूळे निर्माण होणारा ध्वनी (स्पर्श) ऐकण्याचा प्रयत्न करायचा. अशाप्रकारे (ध्यानयोगाचा अभ्यास करुन)  

मन आणि बुद्धी ह्यावर ताबा मिळवलेला मुनी इच्छा भिती राग हे सर्व त्यागून मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो तो नेहमी मुक्त असतो .

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्। सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।5.29।।

यज्ञ-तपसाम्‌ भोक्तारम्‌ सर्व-लोक-महेश्वरम्‌ सर्व-भूतानाम्‌ सुहृदम्‌ माम्‌ ज्ञात्वा शान्तिम्‌ ऋच्छति।



यज्ञ-तपसाम्‌ यज्ञ तपांचा यज्ञ-तपस् नपु. ष. ब. व. 

भोक्तारम्‌ लाभधारक भोक्तृ पु. द्वि. ए. व. 

सर्व-लोक-महेश्वरम्‌ सर्व लोकांचा महान ईश्वर सर्व-लोक-महत् ईश्वरम्  पु. द्वि. ए. व. 

सर्व-भूतानाम्‌ सर्व सजीवांचे सर्व-भूत पु. ष. ब. व. 

सुहृदम्‌ सुहृद पु. द्वि. ए. व. 

माम्‌ मला अस्मद् द्वि. ए. व. 

ज्ञात्वा जाणून ज्ञा धातू क्त्वा प्रत्यय 

शान्तिम्‌ शान्ति स्त्री. द्वि. ए. व. 

ऋच्छति प्राप्त होते ऋ धातू शतृ प्रत्यय पु. स. ए. व.

5व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक. आधीच्या श्लोकात ध्यानयोगावर भाष्य केले होते. त्याला ज्ञानाची जोड असायला हवी. आपण एखादी गोष्ट ज्याला देतो तो त्याचा उपभोग घेतो असे म्हणतो. परमेश्वराचा अंश प्रत्येकामध्ये आहे म्हणजे आपण दिलेल्या दानाचा परमेश्वरच भोक्ता आहे.

तमीश्वरानां परमं महेश्वरं तम देवतानां परमं च दैवतम्। श्वेताश्वतर उपनिषद 6.7।।

आपण ईश्वरांचे ईश्वर, आणि सर्व देवतांचे देव आहात.

धुर् धातू+टाप्=धूरा म्हणजे भार वाहणे

धुर+यत् =धुर्य म्हणजे बैल

मराठीत धूरा वाहणे म्हणजे जबाबदारी घेणे.

जर आपण बैलगाडीत ओढत घेऊन जाणार्‍या बैलांचे निरीक्षण केले तर बरेचदा गाडीवान निवांत गाडीत बसलेला असतो आणि बैल सहजपणे चालत असतो. बैलाला कोठे जायचे आहे ते चांगले माहीत असते. महादेवाच्या देवळात नंदी एकटक पिंडी कडे पहात असतो. ते एकाग्रता आणि स्वामीनिष्ठेचे प्रतिक आहे.

भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ गीताई 29॥

परमात्म्याला विश्वाचा बैल असे मानले तर त्याच्या वर विश्वास ठेवून आपण निवांत रहायचे. तो आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणार आहे. 

एकदा ही समजूत पक्की झाली की परम शांतीचा लाभ होतो. आधीच्या श्लोकात आपण ध्यान योगाने मिळणार्‍या शांती बद्दल वाचले आहे. 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत. 

ते असे म्हणतात की 

मला यज्ञ आणि तपांचा लाभार्थी, सर्व लोकांचा महान ईश्वर सर्व जीवांचा शुभचिंतक असे समजून घेतले की शांती मिळेल. 



ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः । हरिः ॐ तत् सत् ।।

अशा प्रकारे शाश्वत परमसत्य  उपनिषद् ब्रह्मविद्या जाणण्याचा श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असलेल्या कर्मसंन्यासयोग नावाचा पाचवा अध्याय समाप्त होत आहे.

---------------------🙏🙏🙏🙏---------