भगवद्गीतेच्या
13 व्या अध्यायाचे नाव
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः असे असून
त्यामध्ये 35 श्लोक आहेत.
या अध्यायात क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञ कसे वेगवेगळे
आहेत, ते सांगितले
आहे. याच्या प्रत्यक्ष
अनुभवाने क्षेत्रज्ञाचा, म्हणजे जीवात्म्याचा
परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाचा
अनुभव येतो; म्हणून
अध्यायाचे नाव क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
आहे.
अर्जुन उवाच
प्रकृतिं पुरुषं चैव
क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च।
एतद्वेदितुमिच्छामि
ज्ञानं ज्ञेयं च
केशव।।13.1।।
अर्जुन उवाच - हे
केशव! प्रकृतिम् पुरुषम्
एव च क्षेत्रम्
क्षेत्रज्ञम् एव च
ज्ञानम् ज्ञेयम् च एतत् वेदितुम् इच्छामि।
हा श्लोक पांडुलिपि
मधे अस्तित्वात नाही
त्यामुळे काही पुस्तकांत
तो दिलेला नाही.
अर्जुन उवाच -
हे केशव!
प्रकृतिम् प्रकृति स्त्री. द्वि.
ए. व.
पुरुषम् पुरुष पु.
द्वि. ए. व.
एव च
क्षेत्रम् क्षेत्र नपु. द्वि.
ए. व.
क्षि धातू राहणे
+ष्ट्रन् प्रत्यय
क्षेत्रज्ञम्
क्षेत्रज्ञ पु. द्वि.
ए. व.
एव च
ज्ञानम् ज्ञान नपु.
द्वि. ए. व.
ज्ञेयम् ज्ञेय नपु.
द्वि. ए. व.
च
एतत् हे
वेदितुम् विद् धातू
माहीत करुन घेणे
तुमुन् प्रत्यय
इच्छामि इष् धातू
इच्छा करणे लट लकार उ.
पु. ए. व.
आतापर्यंतच्या
12 अध्यायात आपण कर्मयोग
आणि भक्तीयोग ह्या
संदर्भात माहिती करून
घेतली. आता ह्या
श्लोकात पुरूष प्रकृति,
क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान,
ज्ञेयम् असे शब्द
आले आहेत. म्हणजे
अध्यायाची सुरवात सांख्य
दर्शना पासून झाली
आहे असे वाटते.
क्षेत्र चा आपल्याला
समजतो तो अर्थ म्हणजे भूखंड
किंवा तीर्थक्षेत्र. मात्र
आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन
ह्याचा अर्थ समजावून
घ्यायला हवा.
कपिलमुनींना सांख्ययोगाचा रचयिता मानले
जाते.
महाभारतात सांख्य दर्शनाला
अनन्यसाधारण महत्त्व आहे.
ज्ञानं च लोके
यदिहास्ति किंचित् सांख्यागतं तच्च
महन्महात्मन्।। (शांति पर्व
301.109)
आपल्याला दिसून येणार्या वैविध्यतेचे
गुणात्मक वर्गीकरण त्रिगुणात म्हणजे
सत्व, राजस आणि
तमस असे सांख्य
दर्शन मध्ये केलेले
दिसून येते. सांख्य
दर्शनानुसार सृष्टि ची
उत्पत्ती केवळ पुरुष
आणि प्रकृति मुळे
झाली ज्यामधे परमेश्वराच्या
अस्तित्वाला अजिबात स्थान
नाही. सांख्य दर्शनाचा
मुख्य आधार सत्कार्यवाद
मानला जातो. ज्ञा
धातू जानाति, म्हणजे
जाणणारा ह्यापासून तज्ज्ञ,
ज्ञाता असे शब्द
तयार होतात. ह्या
श्लोकात क्षेत्रज्ञम् म्हणजे
क्षेत्राची माहिती असणारा
पुरूष असा अर्थ
घेता येईल. पृथ्वी,
जल, तेज, वायु,
आकाश हे पञ्चमहाभूत
आणि मन, बुद्धि
व अहंकार -- अशी
8 वैशिष्ट्ये असणारी माझी
अपरा प्रकृति आहे
आणि तू परा प्रकृती चे ज्ञान
करून घे असे भगवंतांनी 7 व्या अध्यायातील
5 व्या श्लोकात सांगितले
आहेच.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की हे केशव!
मला प्रकृति आणि
पुरुष? क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञ तथा ज्ञान
आणि ज्ञेय हे सर्व
जाणून घेण्याची इच्छा
आहे.
श्री भगवानुवाच
इदं शरीरं कौन्तेय
क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं
प्राहुः क्षेत्रज्ञ इति
तद्विदः।।13.2।।
श्रीभगवानुवाच
- हे कौन्तेय ! इदम्
शरीरम् क्षेत्रम् इति
अभिधीयते। एतत् यः
वेत्ति, तम् क्षेत्रज्ञः
इति तत्-विदः
प्राहुः।
श्रीभगवानुवाच
हे कौन्तेय
कुन्त्याः अपत्यं पुमान्
सं. ए. व.
इदम् हे नपु.
द्वि. ए. व.
शरीरम् शरीर नपु.
द्वि. ए. व.
क्षेत्रम् क्षेत्र नपु. द्वि.
ए. व.
इति
अभिधीयते असे मानतात
अभि +धा धातू
धारण करणे
कर्मणि लट
लकार प्र. पु.
ए. व.
(अभीधान - उपाधि)
एतत् या एतद्
नपु. द्वि. ए.
व.
यः जो यद्
पु. प्र. ए. व.
वेत्ति, जाणणारा विद् धातू
माहीत करुन घेणे
लट लकार प्र.
पु. ए. व.
तम् त्याला तद्
पु. द्वि. ए.
व.
क्षेत्रज्ञः क्षेत्र जाणणारा
क्षेत्रं जानाति क्षेत्रज्ञ
पु. प्र. ए. व.
इति
तत्-विदः ज्ञानी
तद् वेत्ति तद्
नपु.
प्राहुः म्हणतात प्र +ब्रू
धातू बोलणे लट
लकार प्र.पु.ब.व.
आधीच्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना
काही गोष्टी जाणून
घेण्याची इच्छा दर्शवली
आता श्रीभगवानकृष्णांनी त्यावर
भाष्य करण्यास सुरुवात
केली आहे. त्यांनी
प्रकृति आणि आत्मा
ह्या दोन्हीमधील फरक
सांगायला सुरुवात केली आहे.
आधुनिक युगात वीज,
विविध प्रकारच्या चुंबकीय
लहरी प्रत्यक्षात दिसत
नसल्या तरी आपले
अस्तित्व दाखवून देतात.
व्यक्ति आणि व्यक्तिमत्त्व
ह्यामधे फरक समजून
घ्यायला हवा.
प्रत्येक व्यक्ति ची दोन रूपात विभागणी
होते जसे बाह्यरूप
आणि अंतररूप.
पाच ज्ञानेन्द्रिय, पाच कर्मेन्द्रिय
पाच प्राण (तन्मात्रा)
मन आणि बुद्धि
-- ह्या 17 तत्त्वांनी तयार झालेल्या
अंतरंगाला सूक्ष्मशरीर असे म्हणतात.
स्थूलशरीराला अन्नमयकोश असे म्हटले
जाते. सर्व शरीराला
चेतना देणारा प्राणमयकोश.
मन म्हणजे आपल्या
निरनिराळ्या भावना ज्याला
मनोमयकोश म्हटले जाते.
आणि बुद्धी प्रधान
अंग म्हणजे विज्ञानमय
कोश. हे सर्व जो जाणतो
तो क्षेत्रज्ञ.
आतापर्यंतच्या
गीते तील अध्यायात
जीवात्मा हा परमात्म्याचा
अंशच होय हे आपण समजून
घेतले आहेच.
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च
जगत्यां जगत्।1।।
ईशावास्योपनिषदाच्या
पहिल्या श्लोकात, जीवन
आणि जग ह्याला
ईश्वराचे आवास म्हटले
आहे..
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की हे कौन्तेय!
हे
जे शरीर आहे
त्याला क्षेत्र असे
म्हणतात, जे हे
सर्व जाणतो त्याला
ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ
असे म्हणतात.
क्षेत्रज्ञं चापि मां
विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं
यत्तज्ज्ञानं मतं मम।।13.3।।
अपि च हे
भारत! सर्व-क्षेत्रेषु
क्षेत्रज्ञम् माम् विद्धि।
क्षेत्र-क्षेत्रज्ञयोः यत्
ज्ञानम्, तत् ज्ञानम्
मम मतम्।
च सुद्धा
हे भारत! विशेषनाम
भरतवंशोद्भव अर्जुन
सर्व क्षेत्रेषु संपूर्ण क्षेत्रात
सर्वाणि क्षेत्राणि
क्षेत्रज्ञम्
क्षेत्रज्ञ क्षेत्रं जानाति इति
माम् अपि. मलाच
अस्मद् सर्व. द्वि.
ए. व.
विद्धि समज विद्
धातू माहीत करुन
घेणे लोट लकार
म. पु. ए. व.
क्षेत्र-क्षेत्रज्ञयोः क्षेत्र क्षेत्रज्ञाचे
क्षेत्रं च क्षेत्रज्ञः
च
यत् जे यद्
नपु. द्वि. ए.
व.
ज्ञानम्, ज्ञान नपु
द्वि. ए. व.
तत् ते तद्
नपु. द्वि. ए.
व.
ज्ञानम् ज्ञान नपु
द्वि. ए. व.
मम माझे अस्मद्
ष. ए. व.
मतम् मत मन्
धातू क्त प्रत्यय
प्र. ए. व.
जरी जीवात्मा हा परमात्म्याचाच
अंश असला तरीसुद्धा
दोन्हीमधील विश्लेषक फरक आपण समजून घ्यायला
हवा.
9व्या अध्यायातील बरेचसे श्लोक,
8व्या अध्यायातील 9वा
श्लोक परमेश्वराच्या अस्तित्वाची
पुरेशी माहिती करून
देतात.
भोक्ता भोग्यं प्रेरितारं
च मत्वा सर्वं
प्रोक्तं त्रिविधं ब्रह्ममेतत्॥
श्र्वेताश्र्वतरोपनिषद् 1.12
येथे भोक्ता (जीवात्मा), भोग्य
(जगत्) असा अर्थ
आहे.
कार्यक्षेत्र
म्हणजे प्रकृति ब्रह्म
आहे, त्याचा उपभोग
घेणारे जीव पण ब्रह्मच आहेत, ह्या
दोघांचा नियंत्रक ही ब्रह्मच.
पण वास्तवात ते
नियंता आहेत.
क्षेत्राणि हि शरीराणि
बीजं चापि शुभाशुभे
|
तानि वेत्ति स
योगात्मा ततः क्षेत्रज्ञ
उच्यते ||
शरीररूपी क्षेत्रांत शुभाशुभ कर्मांची
बीजे वाढत असतात
जे योगात्मा जाणत
असतो म्हणून त्यांना
क्षेत्रज्ञ म्हणतात.
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की हे भारत! संपूर्ण
क्षेत्राचा क्षेत्रज्ञ तू मलाच समज. क्षेत्रक्षेत्रज्ञाचे
जे आकलन आहे
तेच माझ्या मते
ज्ञान आहे.
तत्क्षेत्रं यच्च यादृक्
च यद्विकारि यतश्च
यत्।
स च यो
यत्प्रभावश्च तत्समासेन मे श्रृणु।।13.4।।
तत् क्षेत्रं यत् च यादृक् च
यत्-विकारि च
यतः च यत् स च
यः यत्-प्रभावः
तत् समासेन मे
शृणु।
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
क्षेत्रं क्षेत्र नपु. प्र.
ए. व.
यत् काय यद्
नपु. प्र. ए. व.
च सुद्धा अव्यय
यादृक् च्या सारखे
दिसणारे (यथारूप) दृश् धातू
पाहणे
च अव्यय
यत् ज्या यद्
नपु. प्र. ए. व.
विकारि रूपांतरीत
विकारिन् नपु. प्र.
ए. व.
च
यतः ज्यापासून
च
यत् ज्या यद्
नपु. प्र. ए. व.
स सः तो
तद् पु. प्र.
ए. व.
च
यः जो यद्
पु. प्र. ए. व.
यत् ज्या यद्
नपु. प्र. ए. व.
प्रभावः दैदीप्यमान प्रकर्षेण भावः
प्रभाव पु. प्र.
ए. व.
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
समासेन एकत्रित (सारांशाने) समास
पु. तृ. ए. व.
मे माझ्या कडून
अस्मद् च. ए. व.
शृणु ऐक श्रु
धातू ऐकणे लोट
लकार म. पु. ए. व.
श्रीभगवानकृष्णांच्या
मतानुसार जीव आणि
परमात्मा यांचे स्वरूप
पूर्णपणे जाणून घेणे,
हेच ज्ञान आहे.
आपल्याला प्रकृतिं पुरूष आणि
ईश्वर ह्यामधील भेद
नीट समजून घेणे
आवश्यक आहे. जसे
एखादा कुंभार, कुंभाराची
मडके आणि कुंभारकला
वेगवेगळे आहेत.
आता इथून पुढील
श्लोकात क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञ ह्या दोन्ही
चे वर्णन वाचायला
मिळणार आहे.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की ते क्षेत्र
म्हणजे काय, त्याचे
स्वरूप, त्यामध्ये होणारे
बदल, त्याच्यावर असणारा
प्रभाव हे सर्व सारांशाने, त्याचे संक्षिप्त
वर्णन तू माझ्याकडून
ऐक.
ऋषिभिर्बहुधा
गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव
हेतुमद्भिर्विनिश्िचतैः।।13.5।।
ऋषिभिः विविधैः छन्दोभिः बहुधा
गीतम् विनिश्चितैः हेतुमद्भिः
ब्रह्म-सूत्र-पदैः
पृथक् एव च ।
ऋषिभिः ऋषींनी ऋषि
पु. तृ ब. व.
विविधैः विविध
वि. तृ. ब. व.
छन्दोभिः छन्दयुक्त छन्दस् नपु.
तृ. ब. व.
बहुधा विविध प्रकारे
अव्यय
गीतम् वर्णन केले
आहे गै धातू गाणे क्त
प्रत्यय नपु. प्र
ए. व.
विनिश्चितैः निश्चित विनिश्चित पु.
तृ. ब. व.
हेतुमद्भिः कारणे आणि
त्याचे परिणाम
हेतुमत् हेतु +मतुप
प्रत्यय पु. तृ. ब. व.
ब्रह्म-सूत्र-पदैः
ब्रह्म सूत्रांच्या श्लोकांतून
ब्रह्मणः सूत्रं
पृथक् विश्लेषण अव्यय
एव अव्यय
च अव्यय
ह्या श्लोकातील शब्द साधेसुधे
वाटले तरी त्या
मागे महर्षी व्यासांनी
बरेच काही सांगितले
आहे.
भूतं भव्यं भविष्यं
च सर्वं वेदात
प्रसिध्यति (मनु स्मृति-१२. ९७ )
त्याचआध्यात्मिक
सिद्धांतांना मान्यता मिळू शकते
जे वेदांच्या अनुरूप
असतात.
वेद म्हणजे साक्षात
ईश्वराची वाणी. “निःश्वासितमस्या
वेदः" बृहदारण्यकोपनिषद् (4.5.11) वेद ईश्वराच्या
श्वासातून प्रकट झाले.
त्यानंतर महर्षि व्यासांनी
त्याचे 4 विभाग केले.
ह्या 4 वेदांना श्रुती
असेही म्हणतात.
त्यांनी लिहिलेल्या 18 पुराणात जवळपास
4 लाख श्लोक आहेत.
महर्षि वेदव्यासांचा अंतिम ग्रंथ
श्रीमद्भागवत ज्यात सर्व
वेदांचे सार लिहीले
आहे.
अर्थोंयम् ब्रह्मासूत्राणं सर्वोपनिषदामपि।।
षट दर्शन म्हणजेच
वैदिक साहित्यावर चर्चा
करणारे सहा ग्रंथ,सहा ऋषींनी
लिहिले.
1. मीमांसा -
(पूर्व मीमांसा) धार्मिक
रीतीरिवाज, धर्मानुष्ठान ह्यावर भाष्य
करणारा महर्षी जैमिनी
ह्यांचा ग्रंथ
2. वेदान्त दर्शन (उत्तर
मीमांसा, ब्रह्मसूत्र ) बादरायण ह्यांची
उपनिषदांवर तार्किक चर्चा
3. न्याय दर्शन म्हणजे
महर्षी गौतम ह्यांनी
रचलेले तर्कशास्त्र.
4. वैशेषिक दर्शन, ह्यामध्ये
विज्ञान आणि सृष्टि
तील तत्वांसंबंधी विवेचन,
महर्षी कणाद यांनी
सांगितले
5 योग दर्शन महर्षि
पतंजली लिखीत अष्टांग
योगाच्या माध्यमातून परमेश्वराशी एकरूप
होण्यासंबंधी विवेचन.
6. सांख्य योग महर्षि
कपिल द्वारा रचित
ब्रह्मांडातील जीवसृष्टी च्या विकासाच्या
मूलभूत तत्त्वांची चर्चा.
ब्रह्मसूत्रांना
प्रस्थानत्रयी मधील एक
मानले जाते,त्याला
न्यायप्रस्थान असे म्हणतात
कारण येथे वेदान्त
चे तार्किक दृष्ट्या
विवेचन केले आहे
ब्रह्म सूत्रात चार अध्याय
आहेत, ज्यांची नावे
समन्वय, (134) ,अविरोध (157) , साधन(186) आणि फल(78)
प्रत्येक अध्यायाचे चार विभाग
आहेत, आणि एकुण
५५५ सूत्रे ह्यात
दिलेली आहेत.
ह्या श्लोकातील छन्द ह्या
शब्दाचा अर्थ विविध
श्लोकांची रचना असा
घेता येईल.
जरी स्वयं श्रीभगवानकृष्ण
सर्वोच्च ज्ञानी असले
तरी अनेक ज्ञानी
महर्षींचा उल्लेख ह्या
श्लोकात महर्षि व्यासांना
करावासा वाटला.
म्हणूनच
ह्या श्लोकाचा थोडक्यात
अर्थ असा होतो
की श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला
असे म्हणत आहेत
की (क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञ संबंधी ज्ञान)
निरनिराळ्या वैदिक ग्रंथात
ऋषींनी अनेक श्लोकांच्या
माध्यमातून वर्णन केले
आहे. ब्रह्मसूत्रांमधे कार्यकारणभावासहीत
ते पुरेसे स्पष्ट
सांगितलेले आहे.
महाभूतान्यहङ्कारो
बुद्धिरव्यक्तमेव च।
इन्द्रियाणि दशैकं च
पञ्च चेन्द्रियगोचराः।।13.6।।
अव्यक्तम्, बुद्धिः, अहङ्कारः, महाभूतानि,
एव च। दश इन्द्रियाणि, एकम् च
(मनः), पञ्च इन्द्रिय-गोचराः च।
इच्छा द्वेषः सुखं
दुःखं सङ्घातश्चेतनाधृतिः।
एतत्क्षेत्रं
समासेन सविकारमुदाहृतम्।।13.7।।
इच्छा, द्वेषः, सुखम्, दुःखम्,
चेतना, संघातः, धृतिः,
समासेन उदाहृतम् एतत्
सविकारम् क्षेत्रम् ।
अव्यक्तम् न व्यक्तम्
प्र. ए. व.
बुद्धिः बुद्धि स्त्री
प्र. ए. व.
अहङ्कारः अहडःकारः पु. प्र.
ए. व.
महाभूतानि महान्ति भूतानि
एव
च
दश दशन् प्र.
ब. व.
इन्द्रियाणि इन्द्रिय नपु. प्र.
ब. व. एकम्
एक प्र. ए. व.
च (मनः),
पञ्च पन्चन् प्र.
ब. व.
इन्द्रिय-गोचराः इन्द्रिय
विषयक इन्द्रियगोचर पु.
प्र. ब. व.
च
द्वेषः द्वेष पु.
प्र. ए. व.
सुखम् सुख नपु
दुःखम् दुःख नपु.
चेतना चेतना स्त्री.
संघातः समूह संघात
पु.
धृतिः धैर्य धृति
स्त्री.
समासेन संक्षेपाने
समास पु. तृ. ए. वह
उदाहृतम् उदाहरण देऊन
उत+आ+हृ धातू हरण
करणे क्त प्रत्यय
नपु प्र. ए. व.
एतत् हे एतद्
नपु.
सविकारम् विकारांसह विकारेण सहितं
क्षेत्रम् क्षेत्र नपु.
तैत्तिरीय उपनिषदातील ब्रह्मानन्दवल्ली भागात
9 अनुवाक आहेत, त्यामध्ये
ब्रह्मा पासूनच विश्व
ची उत्पत्ति झाली
असे सांगितले आहे.
सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म।
'''ब्रह्म' 'सत्य' आहे
, 'ब्रह्म' 'ज्ञान' आहे
'ब्रह्म' 'अनन्त' आहे
''
त्यापुढे असे म्हटले
आहे की
तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः।
आकाशाद्वायुः।वायोरग्निः। अग्नेरापः। अद्भ्यः
पृथिवी।पृथिव्या ओषधयः। ओषधीभ्योऽन्नम्। अन्नात्पुरुषः।
'आत्मा' हेच 'आत्मतत्त्व'.
ह्या 'आत्मतत्त्व' पासून
आकाश उत्पन्न झाले.
आकाशापासून वायु; वायु
पासून अग्नि; तथा
अग्नि पासून जल.
जळापासून पृथ्वी. पृथ्वी वर
औषधी वनस्पती आणि
अन्न. अन्नापासून मनुष्याची
उत्पत्ति झाली.
भूमिरापोऽनलो
वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे
भिन्ना प्रकृतिरष्टधा || 7.4||
भूमिः पृथ्वी
आपः जल
अनलः, अग्नि
वायुः, वायु
खम्, आकाश
मनः, बुद्धिः अहंकारः च
इति इयम् मे
ह्या सर्व माझ्याच
अष्टधा भिन्ना आठ
भिन्न
प्रकृतिः एव ।
प्रकृति आहेत
पुरुष आणि प्रकृती
प्रकृतीला मूलप्रकृती, अहेतुमत्, प्रधान,
अव्यक्त अशीही नावे
आहेत.
प्रकृति च्या उत्पत्तीचे
दुसरे कारण, हेतु
नसल्यामुळे तिला अहेतुमत्
म्हटले आहे.
इंद्रियांना न दिसणारी
असल्यामुळे तिला अव्यक्त
म्हटले आहे.
प्रकर्षेण करोति इति
प्रकृति:’ अर्थात् जे (सृष्टीतील
पुरुषाव्यतिरिक्त सर्व अन्य
तत्त्वांना) उत्पन्न करते, ते
तत्त्व म्हणजे प्रकृती
होय.
प्रकृतेर्महांस्ततोऽहङ्कारस्तस्माद्गणश्च
षोडशक:।
तस्मादपि षोडशकात् पञ्चभ्य: पञ्चभूतानि॥सांख्यकारीका
२२।।
प्रकृति पासून महतत्व
ची उत्पत्ती, त्यापासून
अहंकार. अहंकारापासून (5 ज्ञानेन्द्रिये,
5 कर्मेन्द्रिये 5 तन्मात्रा आणि मन)
16 तत्व निर्माण होतात
त्यापैकी पाच तत्वे
म्हणजे पंचमहाभूत. सांख्यदर्शनानुसार
सत्त्व, रज आणि तम हे
त्रिगुण जेव्हा साम्यावस्थेत
असतात, त्या अवस्थेलाच
प्रकृती हे नाव आहे (सत्त्वरजस्तमसां
साम्यावस्था प्रकृति:| सांख्यसूत्र १.६१)
पृथ्वी, जल, अग्नी,
वायू आणि आकाश
ही पाच स्थूल
महाभूते ज्या सूक्ष्म
तत्त्वांपासून उत्पन्न होतात, त्यांना
तन्मात्र असे म्हणतात.
गंधतन्मात्र, रसतन्मात्र, रूपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र
आणि शब्दतन्मात्र अशी
पाच तन्मात्रांची नावे
आहेत. सांख्य-योग
दर्शनांमध्ये मानलेल्या सत्कार्यवादाच्या सिद्धांतानुसार
महाभूते ही उत्पत्तीच्या
आधीही त्यांच्या कारणांमध्ये
म्हणजेच तन्मात्रांमध्ये सूक्ष्म
रूपाने अस्तित्वात असतात
व नंतर ती प्रकट होतात.
तन्मात्र हे महाभूतांचे
पूर्वरूप आहे. तन्मात्र
सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे
ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ
शकत नाही.
अहंकार म्हणजे आपली
ओळख आहे.
कश्मीर शैव तत्वज्ञानाप्रमाणे
सर्व काही शिवा
पासून निर्माण झाले.
मात्र ह्या शिवाच्या
बरोबर शक्ती सुद्धा
आहे.जसे इच्छाशक्ती,
ज्ञानशक्ति,क्रियाशक्ति,निर्णयशक्ती, ह्या
शक्तींमुळे सर्व काही
निर्माण झाले.
सात्त्विक एकादशक: प्रवर्तते वैकृतादहङ्कारात्।
भूतादेस्तन्मात्र:स तामसस्तैजसादुभयम्॥सांख्यकारीका
२५।।
अहंकारापासून
अकरा इन्द्रियांची उत्पत्ति
होते हे सांगणारा
श्लोक.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
पंचमहाभूते,
अव्यक्त, बुद्धि, अहंकार, दहा
इन्द्रिय, मन, पाच
इन्द्रिय विषय, इच्छा,
द्वेष, सुख, दुःख
समूह, चेतना आणि
धैर्य ह्या सर्वांना
त्याच्या विकारांसहित क्षेत्र असे
म्हटले आहे.
अमानित्वमदम्भित्वमहिंसा
क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं
शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः।।13.8।।
अमानित्वम्,
अदम्भित्वम्, अहिंसा, आर्जवम्, क्षान्तिः,
शौचम्, स्थैर्यम्, आत्म-विनिग्रहः, आचार्य-उपासनम्।
अमानित्वम्,
मान अपमान नसलेला
मान +त्व न
मानित्वं प्र. ए.
व.
अदम्भित्वम्,
अवडंबर नसलेला दम्भ
+त्व न दम्भित्वं
प्र. ए. व.
अहिंसा, स्त्री. प्र. ए. व.
आर्जवम्, आर्जव नपु
. प्र. ए. व.
क्षान्तिः, क्षमाशील क्षान्ति स्त्री.
प्र. ए. व.
शौचम्, शुद्धता शौच नपु
. प्र. ए. व.
स्थैर्यम्, दृढता स्थैर्य
नपु . प्र. ए. व.
आत्म-विनिग्रहः, आत्मसंयम आत्मनः
विनिग्रहः प्र. ए.
व.
आचार्य-उपासनम् गुरू सेवा
आचार्यस्य उपासनं प्र.
ए. व..
ह्या अध्यायातील 6व्या आणि
7व्या श्लोकात क्षेत्र
चे निरनिराळे घटक
सांगितले. आपले हे
शरीर म्हणजे क्षेत्र.
त्यातील मन हा महत्त्वाचा अवयव. डोळ्यांना
न दिसणारा आणि
प्रचंड गुंतागुंतीचा. मन
आणि बुद्धी मिळून
आपले व्यक्तिमत्त्व विकसित
होते. एखादी गोष्टीचे
आपण बुद्धि च्या
साह्याने विश्लेषण करतो आणि
त्यावर प्रतिक्रिया देतो,
आपल्या मनाप्रमाणे, त्याच
आपल्या भावना. आता
8 ते 12 व्या श्लोकात
क्षेत्रज्ञाच्या गुणांचे वर्णन केले
आहे.
यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिञ्चना
सर्वैर्गुणैस्तत्र
समासते सुरा: ।
हरावभक्तस्य कुतो महद्गुणा
मनोरथेनासति धावतो बहि:
॥श्रीमद्भागवतम् 5.18.12 ॥
जे भक्त भक्तीमार्गचा
अवलंब करतात त्यांच्या
मधे देवतांचे गुण
उतरतातच. ज्यांचे मन इकडे तिकडे अन्य
विषयांत धावत असते
त्यांच्या मधे असे
महापुरुषांचे गुण नसतात.
12 व्या अध्यायातील 15,16,17, 18,19,20 व्या श्लोकात
श्रीभगवानकृष्णांना प्रिय असणार्या भक्तांचे
वर्णन आले आहेच.
ह्या श्लोकांत सर्वात पहिला
गुणविशेष विनम्रता हा सांगितला
आहे. अर्धवट ज्ञान
हेच तर आपल्या
अहंकाराचे मूळ कारण.
जितका मनुष्य ज्ञानी
तितका तो विनम्र
होत जातो म्हणजेच
क्षेत्रज्ञ होत जातो.
ज्ञान प्राप्त झाले की दांभिकता आपोआपच नष्ट
होणार, हा दुसरा
गुण सांगितला आहे.
त्यानंतर सांगितले आहेत ते गुण म्हणजे
अहिंसा, क्षमाशीलता आणि
आर्जव. हिंसा ही
फक्त शारिरीक पातळीवर
अपेक्षित नसून ती
मानसिक पातळीवरसुदधा अपेक्षित
आहे. हिंसा करायची
नाही म्हणजे आपल्या
मधील हिंसा घडवणाऱ्या
कारणांचा नाश करायचा
म्हणजेच आपल्यातील क्रोध,
लालसा आणि मोह नष्ट करायचा. ‘अहिंसा
परमो धर्म:’ महाभारतात
अहिंसे वर व्यापक
चर्चा आहे. बुद्ध
आणि जैन धर्माचे
मुख्य तत्वच अहिंसा
होय.
क्षमाशीलता आपलेच दुःख
कमी करायला मदत
करते म्हणजेच आपल्या
(अध्यात्मिक) प्रगती चा
मार्ग मोकळा करते.
आर्जव म्हणजे ऋजुता.
दुसर्यांना जिंकून
घेण्याची क्षमता.
तैसे प्राणिमात्रीं सौजन्य ।
आर्जव तें ।' -ज्ञा १६.११३
त्यानंतर सांगितलेला गुण म्हणजे
शुद्धता जी आंतरिक
आणि बाह्य दोन्ही
अंगांची. विपश्यना ह्या क्रियेचा
मूळ आधार आत्मशुदधता
आहे जी आत्म परीक्षण करून साधता
येते. अष्टांग योगातील
महत्त्वाचा नियम म्हणजे
शौच. दृढ संकल्प
असल्याशिवाय अध्यात्मिक उन्नती शक्य
नाही. त्यासाठी मानसिक
स्थैर्य असायला हवे.
आत्मसंयम हा खूप
मोठा विचार आहे.
आपल्या 5 ज्ञानेन्द्रियांनी चांगले तेच
घ्यावे आणि अनावश्यक
गोष्टी सोडून द्याव्यात.
म्हणजे चांगले ऐकावे,
चांगले पहावे, चांगले
बोलावे. आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे गुरूची
सेवा, गुरू प्रती
आदर आणि श्रद्धा.
सत गहे, सतगुरु
को चीन्हे, सतनाम
विश्वासा,
कहै कबीर साधन
हितकारी, हम साधन
के दासा।
गुरू
भक्ती आणि साधना
करून ज्ञानप्राप्ती आणि
सत्याच्या मार्गातील अडसर दूर
होतील.
इन्द्रियार्थेषु
वैराग्यमनहङ्कार एव च
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम्।।13.9।।
इन्द्रिय-अर्थेषु वैराग्यम्, अनहंकारः
एव च, जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख-दोष-अनुदर्शनम्।
इन्द्रिय-अर्थेषु इन्द्रिय विषयक
इन्द्रियाणां अर्थ स.
ब. व.
वैराग्यम्, वैराग्य नपु. प्र.
ए. व.
अनहंकारः न अहंकारः
प्र. ए. व.
एव
च,
जन्म-मृत्यु-
जरा-व्याधि- वृद्धत्व रोग
दुःख-दोष-
अनुदर्शनम् बोध अनुदर्शन
प्र. ए. व.
क्षेत्र विषयक ज्ञानाचे
आणखी गुणविशेष सांगताना
इन्द्रिय विषयांची अनासक्ती असे
म्हटले आहे. जागतिक
तापमान वाढ आणि बदलते हवामान
ह्या सध्या भेडसावणाऱ्या
समस्यांवर कमीतकमी गरजा आणि
कमीत कमी संसाधनांचा
वापर हे अनिवार्य
झाले आहे.
हा विचार गीतेच्या
माध्यमातून आपल्याला आधीच सांगितला
आहे.
त्यानंतर चा विचार
आहे जन्म मृत्यू
म्हातारपण आणि आजारपण
ह्यांचे मर्म जाणून
घेण्याचा. साधारणपणे 18 व्या आठवड्यापासून
आईच्या पोटातील गर्भाला
ऐकू येऊ शकते.
26 व्या आठवड्यापासून ते
बाळ आईच्या आवाजाला
हुंकार देऊ शकते.
32 व्या आठवड्यात पोटातील
बाळ काही स्वर
आणि व्यंजन ओळखू
शकतात हे आता विज्ञानाच्या साह्याने सिद्ध
झाले आहे. गर्भसंस्काराचे
महत्त्व आता पटू लागले आहे.
बाकी म्हातारपण आजारपण
आणि मृत्यू मुळे
होणाऱ्या यातना सर्वांना
माहित आहेतच.
सांख्य दर्शनानुसार अहंकारापासून 16 तत्व
निर्माण झाली हे आपण 6व्या
श्लोकात वाचले आहे.
माणसाकडून जे काही
चांगले वाईट कर्म
केले जाते ते फक्त शरीराच्या
माध्यमातून. माणूस सुख
दुःख भोगतो तेही
शरीराच्या माध्यमातून.
'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्'.
आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्व काही
परमेश्वराच्या इच्छेने घडते हे स्पष्ट झाल्यावर
'अहम् कार ' असे
म्हणण्याचे काही कारणच
उरत नाही.
अभिमानात् दशाननोsपि
नष्टः।। असे रावणाबददल
म्हटले जाते.
अहंकारः सदा त्याज्यः
साक्षात् नरकस्य कारणम्।
हे आपण जाणतोच.
जब मैं था
तब हरि नाहिं,
अब हरि हैं,
मैं नाहिं, प्रेम
गली अति सांकरी,
तामे द्वे न समाहीं (संत कबीर)
जेव्हा
माझा अहं होता
तेव्हा माझ्यात परमेश्वर
नव्हते. आता परमेश्वर
आहेत आणि मी नाहीये.
असक्ितरनभिष्वङ्गः
पुत्रदारगृहादिषु।नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु।
।13.10।।
पुत्र-दार-गृह-आदिषु असक्तिः,अनभिष्वङ्गः च, इष्ट-अनिष्ट-उपपत्तिषु
नित्यम् सम-चित्तत्वम्।
पुत्र-दार-गृह-आदिषु
पुत्र स्त्री घर-गृहस्थी
पुत्रः च दारः
च गृहः
पुत्रदारगृहादि
स. ब. व.
असक्तिः न सक्तिः
स्त्री. प्र. ए. व.
अनभिष्वङ्गः लालसा रहित
न अभिष्वंगः पु. प्र.
ए. व.
च,
इष्ट-अनिष्ट- इष्टं च अनिष्टं च
उपपत्तिषु प्राप्त करून
उपपत्ति स्त्री. स. ब. व.
नित्यम् अव्यय
सम-चित्तत्वम् समभाव समचित्तत्व
नपु. प्र. ए. व.
माणूस समाजप्रिय प्राणी आहे,
तो प्रेमाचा भुकेला
असतो. एकमेकांच्या साह्याने
प्रत्येकजण आपापली जबाबदारी
पार पाडत माणूस
आपले जीवन सुसह्य
करत असतो. ह्या
श्लोकात मात्र आपली
मुलेबाळे घरसंसार ह्यापासून अलिप्त
राहण्यास सांगितले आहे. ह्याचा
दुसरा अर्थ आपण
इतरांवर फार अवलंबून
न राहता आत्मनिर्भर
रहावे असाही होऊ
शकतो. आजही हिमालयात
पहाड़ी भागात असे
एकेकटे संन्यासी समर्थपणे
राहताना दिसून येतात.
12 व्या अध्यायातील
18 व्या श्लोकात शत्रू
आणि मित्र दोघांशीही
समानतेने वागावे असे
म्हटले आहे. ह्या
श्लोकात अनुकूल आणि
प्रतिकूल परिस्थितीत समतोल राखण्यास
सांगितले आहे.
मयि चानन्ययोगेन भक्ितरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।13.11।।
मयि अनन्य-योगेन
अव्यभिचारिणी भक्तिः, विविक्त-देश-सेवित्वम्, जन-संसदि
अरतिः।
मयि अस्मद् सर्व.
स. ए. व.
अनन्य-योगेन अनन्ययोग
पु. तृ. ए. व.
अव्यभिचारिणी
निरंतर स्त्री. वि.
वि +अभि+चार
चर धातू संशय
घेणे
भक्तिः, भक्ति स्त्री
प्र. ए. व.
विविक्तदेशसेवित्वम्
= विविक्ते देशे सेवित्वम्
विविक्त एकान्त वि+विच् धातू
विलग करणे क्त
प्रत्यय
वि+विज् धातू
विविक्त
विज् = विचलित करणे,
विविज् = विचलित न
करणे, शांत, निवांत
असणे
सेव् = सेवा करणे,
सेवन करणे.
सेवित्व = तसा स्वभाव
बनणे
विविक्तदेशसेवित्वम्
= निवांत जागी असावे
हाच स्वभाव असणे
विविक्तः देशः
देश - स्थळ
सेवित्वम्, इच्छा करणे
सेव धातू सेवा
करणे
जन-संसदि लौकिक
समुदाय जनानां संसद
स. ए. व.
अरतिः विरक्त
न रतिः रम्
धातू क्त प्रत्यय
आधीच्या श्लोकात मुलेबाळे घर-गृहस्थी ह्या पासून
अलिप्तता सांगितली होती. आता
ह्या श्लोकात एकांतवासाचा
उल्लेख केला आहे.
एकाकीपण आणि एकांत
ह्यातील फरक समजून
घ्यायला हवा. विज्ञानाच्या कसोटीवर एकांताचे
अनेक फायदे दिसून
आले आहेत. जसे
जगण्याचे कौशल्य आत्मसात
करता येते, आयुष्यातील
ताणतणाव कमी होतात.
आणि खरेखुरे स्वातंत्र्य
उपभोगता येते. एकांत
म्हणजे एकटेपणाचा अंत
म्हणजेच स्वतः शी
नव्याने ओळख, आत्मपरीक्षण.
विपश्यना करण्यामागे हाच विचार
आहे.
भक्ताचे गुण 12 व्या
अध्यायात आपण वाचले.
त्यातील बरेचसे गुण
जसे दक्ष, विचलित
न होणारा, (स्वतः
बद्दल) ममतारहीत हे
एकांताने विकसित होऊ
शकतात. एकांत आणि
एकटेपण ह्यावर ओशोंनी
भाष्य केले आहे.
श्रीमद्भगवद्गीते
मध्ये जरी सर्व
योगाचे विवेचन केले
असले तरी भक्तीयोग
हा जास्त अधोरेखीत
करून सांगितला आहे.
एकांतवासाचा सर्वात जास्त
सदुपयोग म्हणजे परमेश्वराच्या
भक्ती मध्ये रममाण
होणे.
आता
ह्या श्लोकात क्षेत्र
संबंधी श्रीभगवानकृष्ण आणखी
वैशिष्ट्ये सांगत आहेत
जसे माझी निरंतर
अनन्य साधारण भक्ती,
एकांतवासाची ओढ आणि
सामान्य लोकांपासून विलगीकरण.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं
तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतज्ज्ञानमिति
प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा।।13.12।।
च अध्यात्म-ज्ञान-नित्यत्वम्,
तत्त्व-ज्ञान-अर्थ-दर्शनम्, एतत् ज्ञानम्
यत् अतः अन्यथा
अज्ञानम् इति प्रोक्तम्।
च
अध्यात्म-ज्ञान-नित्यत्वम्,
निरंतर आत्म्याचे ज्ञान
अध्यात्मज्ञानस्य
नित्यत्वम् तत्त्व-ज्ञान
सिद्धांतांचे ज्ञान
अर्थ हेतू
दर्शनम्, दर्शनशास्त्र
तत्वज्ञानस्य
अर्थदर्शनम्
एतत् हे एतद्
नपु. प्र. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु.
प्र. ए. व.
यत् जो यद्
नपु. प्र. ए. व.
अतः म्हणून अव्यय
अन्यथा नाहीतर अव्यय
अज्ञानम् न ज्ञानम्
इति
प्रोक्तम् म्हटले जाते
प्र+वच् धातू
बोलणे क्त प्रत्यय
नपु. प्र. ए. व.
ह्या अध्यायातील 8 व्या श्लोकापासून
12 व्या श्लोकापर्यंत क्षेत्र
संबंधी जवळपास 24 वैशिष्ट्ये
सांगितली आहेत.
आत्म शोध करण्यासाठी
आवश्यक असणारी निरनिराळी
गुणवैशिष्ट्ये म्हणजे एकप्रकारे
परमेश्वराला जोडून घेण्याची
पूर्वतयारी. जसे योगशास्त्राचे
निरनिराळे यम आणि
नियम आहेत. त्यानंतर
समाधी अवस्था प्राप्त
होईल.
जो ह्या पायरीपर्यंत
पोहोचला तो क्षेत्रज्ञ.
वदन्ति तत्तत्त्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयम् ।
ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते
॥ श्रीमद्भागवतम् 1.2.11 ॥
परम सत्य जाणणारे
ज्ञानी त्याला ब्रह्म,
परमात्मा आणि भगवान
असे म्हणतात.
अनेक ठिकाणी भगवान
ह्या शब्दाचे विविध
अर्थ वाचायला मिळतात
जसे
भ = भूमि
अ = अग्नि
ग = गगन
वा = वायु
न = नीर
भगवान म्हणजे ऐश्वर्य,
धर्म, यश, लक्ष्मी,
ज्ञान आणि वैराग्य.
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की चिरंतन
असे अध्यात्मिक ज्ञान,
परम सत्याची तात्विक
जिज्ञासा ह्यालाच मी ज्ञान
असे घोषित करतो.
बाकी सर्व गोष्टींना
अज्ञान असे म्हणतात.
ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वाऽमृतमश्नुते।
अनादिमत्परं ब्रह्म न
सत्तन्नासदुच्यते।।13.13।।
यत् ज्ञेयम्, यत् ज्ञात्वा
अमृतम् अश्नुते, तत्
प्रवक्ष्यामि। तत् अनादिमत्
परम् ब्रह्म न
सत्, न असत् उच्यते।
यत् यद् नपु.
प्र. ए. व.
ज्ञेयम्, जाणण्या योग्य ज्ञेय
ज्ञा धातू यत्
नपु. प्र. ए. व.
यत् जे यद्
नपु. प्र. ए. व.
ज्ञात्वा जाणल्याने ज्ञा धातू
क्त्वा प्रत्यय
अमृतम् अमर अमृत
नपु. द्वि. ए.
व.
अश्नुते अनुभव गाठीशी
असणे अश् धातू
जमा करणे आत्मने
लट लकार प्र.पु.ए.व
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
प्रवक्ष्यामि
वर्णन करून सांगतो
प्र+वच् धातू
बोलणे लृट लकार
उ. पु. ए. व.
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
अनादिमत् शाश्वत अनादि
+मतुप प्रत्यय प्र.
ए. व.
परम् श्रेष्ठ पर नपु. प्र. ए.
व.
ब्रह्म ब्रहमन् नपु. प्र.
ए. व.
न
सत्, सत् नपु
प्र ए. व.
न
असत् न सत्
उच्यते म्हणतात वच् धातू
बोलणे लट लकार प्र. पु.
ए. व.
आतापर्यंतच्या
श्लोकात आपण क्षेत्र,
क्षेत्रज्ञ ह्याविषयी जाणून घेतले.
आता ' ज्ञेय' म्हणजे
जाणून घेण्यासारखे ह्या
बद्दल माहिती करून
घेणार आहोत. म्हणजे
आत्म्यासंबंधी, परमात्म्यासंबंधी श्रीभगवानकृष्ण स्वतः भाष्य
करणार आहेत.
ह्या संबंधी उपलब्ध
असलेले इतर काही
श्लोक.
न जायते म्रियते
वा विपश्चिन्नायं कुतश्चिन्न
बभूव कश्चित्।
अजो नित्यः शाश्वतोऽयं
पुराणो न हन्यते
हन्यमाने शरीरे ॥
कठोपनिषद् 1.2.18।।
ह्या (आत्म्याचा) जन्म होत
नाही, मृत्यु पण
नाही. हा कुठुन
आला नाही, तो
व्यक्ती सापेक्ष नाही.
तो निर्माण होत
नाही, शाश्वत आहे,
नित्य आहे, प्राचीन
आहे, आणि शरीराच्या
संपण्यानंतर, नाश पावत
नाही.
स विश्वकृद्विश्वविदात्मयोनिर्ज्ञः कालकारो गुणी सर्वविद्
यः।
प्रधानक्षेत्रज्ञपतिर्गुणेशः
सम्सारमोक्षस्थितिबन्धहेतुः॥ श्र्वेताश्र्वतरोपनिषद् 6.16।।
तो सर्व काही
निर्माण करणारा, स्वतः
मुळे च निर्माण
झालेला, सर्व काही
जाणणारा, सर्व गुणसंपन्न,
काळाचा रचयिता, क्षेत्र
क्षेत्रज्ञ, सर्व गुणांचा
स्वामी, बन्धने निर्माण
करणारा आणि बन्ध
मुक्त करणारा तोच
आहे.
अष्टावक्र गीते मध्ये
दिलेला एक श्लोक
ज्ञानं ज्ञेयं तथा
ज्ञाता त्रितयं नास्ति
वास्तवं। अज्ञानाद् भाति यत्रेदं
सोऽहमस्मि निरंजनः॥ अष्टावक्र 2.15 ॥
ज्ञान ज्ञेय ज्ञाता
आहे तरी काय?
ह्या तीन्हीचे मूर्त
रूप नाही. मीच
ते सत्य आहे
जे अज्ञानातून प्रकट
होते.
गीतेमध्येच असलेला श्लोक
ज्ञानाची महती सांगणारा.
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता
त्रिविधा कर्मचोदना।
करणं कर्म कर्तेति
त्रिविधः कर्मसंग्रहः।।18.18।।
ज्ञाता ज्ञान आणि
ज्ञेय हे तीनही
कर्माचे प्रेरक आहेत.
हे कर्माला प्रवृत्त
करतात..
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की आता मी तुला जाणून
घेण्यायोग्य असे सांगतो,
ज्यामुळे अमरत्व प्राप्त
होते. हे अनादी
ब्रह्म अस्तित्व आणि
अस्तित्वहीन ह्या पेक्षा
श्रेष्ठ आहे.
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम्।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति।।13.14।।
तत् सर्वतः पाणि-पादम्, सर्वतः अक्षि-शिरः-मुखम्,
सर्वतः श्रुतिमत्, लोके
सर्वम् आवृत्य तिष्ठति।
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
सर्वतः सर्वत्र अव्यय
पाणि-पादम्, हात आणि पाय पाणी
च पादौ च प्र. ए.
व.
सर्वतः अव्यय
अक्षि-शिरः-मुखम्,
डोळे मस्तक मुख
अक्षिणी च शिरः
च मुखं च
सर्वतः अव्यय
श्रुतिमत्, कान असलेले
श्रुति +मतुप प्रत्यय
नपु. प्र. ए. व.
लोके जगात लोक
पु. स. ए. व.
सर्वम् सर्व नपु.
द्वि. ए. व.
आवृत्य व्यापून वृ धातू आच्छादन करणे ल्यप
प्रत्यय
तिष्ठति राहिले आहे
स्था धातू लट लकार प्र.पु.ए.व
आधीच्या श्लोकापासून 'ज्ञेय' म्हणजे
जाणून घेण्यासारखे ह्याचे
वर्णन करायला सुरुवात
झाली आहे. ह्या
श्लोकात हात, पाय,
डोळे, डोके, तोंड,
कान ह्या अवयवांचा
उल्लेख आहे. म्हणजेच
बोलणे ऐकणे विचार
करणे पाहणे आणि
कृती करणे ह्या
क्रियांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला
आहे. गीतेच्या 11 व्या
अध्यायात आपण विराट
रूप विस्ताराने वाचले
आहे. तसेच 9व्या
अध्यायातील निरनिराळ्या श्लोकात परमेश्वराच्या
अस्तित्वाचे दाखले आपण
वाचले आहेत.
परमात्म्याचे
अस्तित्व सगळीकडे आहे हे सांगणारे आणखी श्लोक.
ब्रह्मैवेदममृतं
पुरस्ताद् ब्रह्म पश्चाद्
ब्रह्म दक्शिणतश्चोत्तरेण।
अधश्चोर्ध्वं
च प्रसृतं ब्रह्मैवेदं
विश्वमिदं वरिष्ठम् ॥ मुण्डकोपनिषद्
2.2.12।।
हे सर्व अमृतस्वरूप
'ब्रह्म' च आहे,आणि दुसरे
काहीच नाही. 'ब्रह्म'
आपल्या समोर आहे,
मागे आहे उजवीकडे,
डावीकडे, खाली वर,
सर्वत्र आहे. हे सम्पूर्ण विश्व ब्रह्मच
आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति
शान्त उपासीत। अथ
खलु क्रतुमयः पुरुषो
यथाक्रतुरस्मिल्लोके पुरुषो भवति
तथेतः प्रेत्य भवति
स क्रतुं कुर्वीत॥
छान्दोग्य उपनिषद् 3.14.1।।
हे ब्रह्म च
सर्व काही आहे.
ह्या जगाची उत्पत्ती
ब्रह्मा पासून झाली.
इथेच सर्व भूतांचे
जीवन सुरू होईल
आणि इथेच लीन
होतील. हे सर्व समजून साधकाने
मन शांत ठेवून,
राग लोभ बाजूला
निरंतर उपासना केली
पाहिजे.
हे सर्व वाचल्यावर
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या
ओवींची आठवण येते
‘तुज सगुण
म्हणो की निर्गुण
रे। सगुण निर्गुण
एक गोविंदु रे,
अनुमाने ना अनुमाने
ना।’
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की परमेश्वराचे हात
पाय मस्तक मुख
नेत्र आणि कान सर्वत्र आहेत. तो
सगळीकडे व्यापून राहिलेला
आहे.
सर्वेन्द्रियगुणाभासं
सर्वेन्द्रियविवर्जितम्।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ
च।।13.15।।
सर्व-इन्द्रिय-गुण-आभासम्,
सर्व-इन्द्रिय-विवर्जितम्,
असक्तम्, सर्व-भृत्
एव च, निर्गुणम्
गुण-भोक्तृ च
।
सर्व-इन्द्रिय-
गुण-
आभासम्, आभास
सर्व-इन्द्रिय-
विवर्जितम्,
उपेक्षित विवर्जित
वृज् धातू वर्ज्य
करणे क्त प्रत्यय
अर्ज् धातू संपादन
करणे
अर्ज +क्त प्रत्यय
पोषण करणे
असक्तम्, असक्त नपु.
प्र. ए. व.
सर्व-भृत् भृ
धातू धारण करणे
सर्वान बिभर्ति
एव च,
निर्गुणम् निर्गुण नपु. प्र.
ए. व.
गुण-
भोक्तृ भुज् धातू
पालन करणे, खाणे
तृच् प्रत्यय नपुं.
प्रथमा/द्वितीया ए.
व.
गुणान् भुंक्ते
च ।
आधीच्या श्लोकात परमात्म्याचे वर्णन
वाचताना निरनिराळ्या अवयवांचा
उल्लेख केला होता
आता त्याचे स्पष्टीकरण
दिले आहे. सगुण
- निर्गुण, साकार- निराकार
ह्या कल्पना आता
स्पष्ट व्हायला हरकत
नाही. तो आहे हे तर
नक्कीच खरे आहे.
विरुद्धा धर्मों रूपोसा
वैश्वर्यात पुरुषोत्तमः। ब्रह्मवैवर्तकपुराण।
"परमात्मा
असंख्य विरोधाभासी गुणांनी
भरलेला आहे. "
अपाणिपादो जवनो ग्रहीता
पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः।
स वेत्ति वेद्यं
न च तस्यास्ति
वेत्ता तमाहुरग्र्यं पुरुषं
महान्तम्॥ श्र्वेताश्र्वतरोपनिषद्
।।3.19।।
त्याला हात नाहीत
तरी सर्वांना पकडून
ठेवले आहे. पाय
नसले तरी वेगाने
तो चालू शकतो.
डोळे नाहीत तरी
बघू शकतो. कानांशिवाय
ऐकू शकतो. सर्व
गोष्टी समजून घेऊ
शकतो पण त्याला
कोणी समजू शकत
नाही.
म्हणूनच ज्ञानी पुरुष
त्याला महान पुरुष
म्हणतात.
श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो
यद् वाचो ह वाचं स
उ प्राणस्य प्राणः
।
चक्षुषश्चक्षुरतिमुच्य
धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति
।केनोपनिषद 1.2॥
आपण जे ऐकतो
त्याचे श्रवण तो
आहे, मनाची संवेदनशीलता
तो आहे, आमच्या
बोलण्याचा स्वर, प्राणांचा
प्राण, आमच्या डोळ्यातील
दृष्टी पण तोच आहे. जो
हे जाणतो त्याला
अमरत्व प्राप्त होते.
न तस्य कार्यं
करणं च विद्यते
न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते।
परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया।श्वेताश्वतरोपनिषद्
।।6.8।।
त्याचे कर्म असे
काहीच नाही, त्याला
कर्म करण्यासाठी विशेष
कारण पण नाही.
त्याच्या पेक्षा श्रेष्ठ
कोणीही नाही, तसे
कोणी श्रेष्ठ आहे
असे वाटत सुद्धा
नाही. माणूस त्याची
ओळख पटण्यासाठी विविध
नावे त्याला देतो.
खरे तर त्याची
शक्ती, त्याचे कर्म
आणि ज्ञान हे
स्वतः स्वतःचे कारण
आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
हा
परमात्मा सर्व इन्द्रिय
रहीत आहे पण सर्व इन्द्रियांचा
भाव त्याच्यात आहे.
तो आसक्ती रहीत
आहे पण सर्वांचे
भरणपोषण तोच करतो.
स्वतः गुणविरहीत आहे
पण गुणांचा भोक्ता
आहे.
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च।
सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं
दूरस्थं चान्तिके च
तत्।।13.16।।
तत् भूतानाम् बहिः अन्तः
च, चरम् अचरम्
एव च, सूक्ष्मत्वात्
अविज्ञेयम् च, तत्
अन्तिके दूरस्थम् च
।
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
भूतानाम् सजीवांचे भूत नपु ष ब.
व.
बहिः बाहेर अव्यय
अन्तः आत अव्यय
च,
चरम् चर नपु.
प्र. ए. व.
अचरम् अचर नपु.
प्र. ए. व.
एव च,
सूक्ष्मत्वात्
सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्म
त्व नपु पं. ए. व.
अविज्ञेयम् अज्ञेय वि+ज्ञा धातू
समजून घेणे
विज्ञेय यत् प्रत्यय
प्र ए. व.
च,
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
अन्तिके समीप अव्यय
दूरस्थम् दूरे तिष्ठति
स्था धातू
च ।
आधीच्या श्लोकात परमात्म्याचे कार्य
आपण वाचले. आता
त्याच्या अस्तित्वाची माहिती ह्या
श्लोकात दिली आहे.
परमात्म्याचे
अस्तित्व समजून घेणे
तितके सोपे नाही.
गीतेच्या 7.19 मध्ये सांगितल्या
प्रमाणे त्याला समजून
घेण्यासाठी पुन्हा पुन्हा
जन्म घ्यावा लागेल.
आसीनो दूरं व्रजति
शयानो याति सर्वतः।
कस्तं मदामदं देवं
मदन्यो ज्ञातुमर्हति ॥कठोपनिषद्।
1.2.21।।
हा बसून असला
तरी दूरपर्यंत जातो,
पडून राहिलेला असला
तरी सर्वत्र जात
असतो.
श्रुतींमधे दिलेल्या वेगवेगळ्या श्लोकात
असेच म्हटले आहे
की ह्याला अज्ञानी
लोक समजून घेऊ
शकत नाहीत.
तदेजति तन्नैजति तद्रे तद्वन्तिके
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य
बाह्यत।। ईशोपनिषद 5।।
"परम ब्रह्म चालू
शकत नाही पण पळू शकतो.
तो दूर आहे आणि जवळ
सुद्धा आहे. तो सर्वांच्या आत मध्ये
सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा
आहे".
बृहच्च तद् दिव्यमचिन्त्यरूपं
सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरं
विभाति।
दूरात् सुदूरे तदिहान्तिके
च पश्यन्त्विहैव निहितं
गुहायाम् ॥ मुण्डकोपनिषद्
।3.1.7।।
हे विशाल, स्वर्गीय
अचिन्त्य-रूप, सूक्ष्मापेक्षाही
सूक्ष्म, दूर पेक्षा
सुद्धा दूर, अतीसमीप
ज्ञानी पुरुषांना बुद्धि
सामर्थ्याने दिसू शकते.
सहाजिकच प्रश्न पडतो
ह्या परमात्म्याला जाणून
घ्यायचे तरी कसे?
ह्याचे उत्तर स्वतः
च श्रीभगवानकृष्णांनी 11 व्या
अध्यायातील 54 व्या श्लोकात
दिले आहे. केवळ
भक्ती च्या मार्गाने
मला तत्त्वतः जाणून
घेणे शक्य आहे.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की भगवान सर्वांमध्ये
आणि सर्वांच्या बाहेर
स्थित आहे मग ते चर
असो वा अचर. तो अती
सूक्ष्म आहे म्हणून
आपल्याला त्याची जाणीव
होत नाही. तो
खूप दूर आहे आणि आणि
आपल्या जवळ सुद्धा
आहे.
अविभक्तं च भूतेषु
विभक्तमिव च स्थितम्।
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं
ग्रसिष्णु प्रभविष्णु च।।13.17।।
अविभक्तम् भूतेषु विभक्तम्
इव च स्थितम्,
तत् ज्ञेयम् भूत-भर्तृ च
ग्रसिष्णु च प्रभविष्णु
च ।
अविभक्तम् भाग होऊ
न शकणारे न
विभक्तं
भूतेषु संपूर्ण जीवात भूत
नपु. स. ब. व.
विभक्तम् वेगवेगळा विभक्त वि+भज् क्त प्रत्यय
नपु. प्र. ए. व.
इव सारखे
च आणि
स्थितम्, स्थित आहेत
स्था धातू क्त प्रत्यय
नपु. प्र. ए. व.
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
ज्ञेयम् जाणण्या-योग्य ज्ञेय
ज्ञा धातू यत्
प्रत्यय नपु. प्र.
ए. व.
भूत-भर्तृ भरण
पोषण करणारे तृच
प्रत्यय भूतानि भरति
भृ धातू भरण
करणे लट लकार प्र.पु.ए.व
च
ग्रसिष्णु संहारक ग्रासूं
पाहणारा
ग्रस् धातू ग्रहण
करणे
च
प्रभविष्णु प्रभूत
होऊं पाहणारा
प्र +भू, भू
धातू असणे
प्र +भू प्रकट
होणे
विश् धातू प्रवेश
करणे विश् विष्णु
च ।
परमेश्वराच्या
अस्तित्वाचे वर्णन करणारा
अजून एक श्लोक.
हा श्लोक वाचल्यावर
मला आपल्या भोवती
असणाऱ्या वातावरणाचे उदाहरण द्यावेसे
वाटते. डोळ्यांना कधीच
न दिसणारा वायू
कधी झुळूक तर
कधी वादळ बनून
आपल्या अस्तित्वाची जाणीव
करून देतो. प्राणवायू
शिवाय जगणे अशक्यच.
एखाद्या बंद घटात
वायू भरलेला असतो
तोच वायू घट फुटल्यावर वातावरणात
मिसळून जातो. त्याचे
वेगळे अस्तित्व संपते.
यथाऽऽकाशस्थितो
नित्यं वायुः सर्वत्रगो
महान्। तथा सर्वाणि
भूतानि मत्स्थानीत्युपधारय।।9.6।।
जसा वायू सदैव
आकाशात स्थित असतो
त्याप्रमाणे सर्व जीव
माझ्या मधे स्थित
आहेत.
द्रव्यं कर्म च
कालश्च स्वभावो जीव
एव च। वासुदेवात्परो
ब्रह्मन्न चान्योऽर्थोऽस्ति तत्त्वतः।।
(श्रीमद्भागवतम्-2.5.14)
सृष्टि तील विविध
अंतरंग जसे काळ कर्म प्रकृति
सर्व काही स्वयं
भगवान श्रीकृष्ण आहेत.
सृष्टि मध्ये त्यांच्या
पासून वेगळे असे
काहीच नाही.
यतो वा इमानि
भूतानि जायन्ते येन
जातानि जीवन्ति यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति
तद्ब्रह्म तद्विजिज्ञासस्व।तैत्तिरीय उपनिषद् ३.१।।
हे समस्त जीव
कसे उत्पन्न होतात,
कसे जीवित राहतात
आणि ते विलीन
कसे होतात हे
जाणून घेण्याचा तू
प्रयत्न कर कारण तेच ब्रह्म
आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
तो
एकसंध आहे, मात्र
सर्व जीवांमधे विभागलेल्या
स्थितीत आहे. हा जाणून घेण्याजोगा
ब्रह्म सर्वांचा पालनकर्ता,
सर्वांचा जनक आणि
संहारक आहे.
ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं
हृदि सर्वस्य विष्ठितम्।।13.18।।
ज्योतिषाम् अपि ज्योतिः,
तत् तमसः परम्
उच्यते, ज्ञानम्, ज्ञेयम्,
ज्ञानगम्यम्, सर्वस्य हृदि विष्ठितम्
।
ज्योतिषाम् तेजस्वी गोष्टींमध्ये ज्योतिस्
नपु.ष.ब.व.
अपि सुद्धा
ज्योतिः ज्योत ज्योतिस्
नपु. प्र. ए. व.
तत् ते तद्
नपु. प्र. ए. व.
तमसः अंधकार तमस्
नपु. पं ए. व.
परम् वि. प्र.
ए. व.
उच्यते म्हटले जाते
ब्रू धातू बोलणे
लट लकार कर्मणि
प्र. पु. ए. व.
ज्ञानम्, ज्ञान नपु.
प्र. ए. व.
ज्ञेयम् जाणून घेण्यायोग्य
ज्ञेय ज्ञा धातू
यत् प्रत्यय नपु.
प्र. ए. व.
ज्ञानगम्यम्,
ज्ञानाने मिळणारे ज्ञानेन गम्यं
प्र. ए. व.
सर्वस्य सर्वांच्या सर्व पु.
ष. ए. व.
हृदि हृदयात हृद्
नपु. स. ए. व.
विष्ठितम् विशेष स्थित
आहे वि+स्था धातू विष्ठित
क्त प्रत्यय नपु.
प्र. ए. व.
परमेश्वराच्या
अस्तित्वाचे अनेक दाखले
आपण 7व्या आणि
9व्या अध्यायातील अनेक
श्लोकात वाचले आहेत.
तेजश्चामि विभावसौ 7.9।। अग्नि
मधील तेज मीच आहे असे
श्रीभगवानकृष्ण म्हणताहेत.
न तत्र सूर्यो
भाति न चन्द्रतारकं
नेमा विद्युतो भान्ति
कुतोऽयमग्निः।
तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य
भासा सर्वमिदं विभाति
॥कठोपनिषद् 2.2.15।। श्र्वेताश्र्वतरोपनिषद्
6.14।।
वरील श्लोक दोन्ही
उपनिषदांत आला आहे.
त्याचा अर्थ असा
की सूर्य प्रकाशित
होत नाही, चन्द्र
सुद्धा प्रकाशत नाही.
तारे निष्प्रभ होतात.
वीज चमकत नाही,
अग्नी तर काय कथा? ह्या
सर्वांना त्याच्या तेजामुळे चमक
येते जणू त्याचे
प्रतिबिंबच ह्या सर्वांवर
आहे.
सर्व प्रकाशमान गोष्टींचे तेज
म्हणजे परमेश्वर. हे
झाले भौतिक जगातील
ज्ञान. महर्षी व्यासांनी
केलेल्या श्लोकाची शब्द रचना
पहा. परम म्हणजे
पलीकडे. त्याही पलीकडे
ज्ञेय असे आहे जे जाणून
घेण्यायोग्य आहे. इंग्रजी
भाषेतील Enlightened शब्द इथे
चपखल बसतो आहे. Enlightened म्हणजे
प्रबुद्ध. ह्या श्लोकाचा
अध्यात्मिक अर्थ समजून
घ्यायला हवा. ब्रह्म
हेच ज्ञान.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की तो ज्योतीची
ज्योत आणि अंधाराच्या
पलीकडे आहे. तो ज्ञान ज्ञेय
आणि ज्ञानाने मिळणारा,
जाणून घेण्यायोग्य सर्वांच्या
हृदयात वसलेला आहे.
इति क्षेत्रं तथा ज्ञानं
ज्ञेयं चोक्तं समासतः।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते।।13.19।।
इति क्षेत्रम्, ज्ञानम्, ज्ञेयम्
च समासतः उक्तम्। तथा
मत्-भक्तः एतत्
विज्ञाय, मत्-भावाय
उपपद्यते।
इति अव्यय याप्रमाणे
क्षेत्रम् शरीर क्षेत्र
नपु. प्र. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु.
प्र. ए. व.
ज्ञेयम् ज्ञेय ज्ञा
धातू समजून घेणे
यत् प्रत्यय नपु.
प्र. ए. व.
च
समासतः थोडक्यात अव्यय
उक्तम् सांगितले ब्रू धातू
बोलणे क्त नपु.
प्र. ए. व.
तथा अव्यय
मत्-भक्तः माझा
भक्त मम भक्तः
एतत् हे एतद्
नपु. द्वि. ए.
व.
विज्ञाय, जाणून घेतल्यावर
वि+ज्ञा ल्यप
प्रत्यय
मत्-भावाय माझ्या
स्वभावाला मम भावाय
च. ए. व.
उपपद्यते प्राप्त होतात उप+पद् धातू
जाणे, मिळवणे लट
लकार प्र.पु.ए.व.
भगवद्गीते मधे भक्तीयोगाला
प्राधान्य दिले असले
तरी ज्ञानयोग आणि
कर्मयोगाचे किती प्रमाणात
योगदान आहे ह्यावर
संशोधन करता येईल.
आधीच्या श्लोकात ब्रह्मा
विषयी जाणून घेण्यासाठी
अनेक दाखले दिले
आहेत. ह्या श्लोकाच्या
अर्थाप्रमाणे ज्ञान प्राप्त
करणे ही भक्तीमार्गची
पहिली पायरी असे
म्हटले आहे. आधीच्या
अध्यायात विज्ञान म्हणजे विशेष
ज्ञान असे म्हटले
आहे. ह्या अध्यायातील
6व्या आणि 7व्या
श्लोकात क्षेत्र म्हणजे
काय ते समजावून
सांगितले. 8 ते 12 व्या
श्लोकात क्षेत्रज्ञाच्या गुणांचे
वर्णन केले. त्याची
सुरुवातच मुळी अमानित्वम्
म्हणजे मान अपमान
नसलेला आणि त्यानंतर
दम्भ नसलेला अशी
केली आहे. केवळ
ज्ञानामुळेच माणसाचा अहंकार नष्ट
होतो.
न साधयति मां
योगो न सांख्यं
धर्म उद्धव।न स्वाध्यायस्तपस्त्यागो
यथा भक्तिर्ममोर्जिता ।।(श्रीमद्भागवतम्-11.14.20)
हे उद्धव, भक्तांनी
केलेली माझी शुद्ध
भक्तिच मला प्रसन्न
करू शकते, वेदांचे
अध्ययन, तप, यज्ञ,
योगदर्शन, सांख्य दर्शन
वगैरे नाही.
यस्य देवे परा
भक्तीर्यथा देवे तथा
गुरौ। तस्यैते कथिता
ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः।
(श्वेताश्वतरोपनिषद्-6.22)
जे परमेश्वराची नेटाने भक्ती करतात
आणि तितकीच गुरू
ची. अशा योगींच्या
हृदयात परमेश्वराच्या कृपेने
वेदांचे ज्ञान प्रकट
होते.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
अशा
प्रकारे मी तुला क्षेत्र, जाणून घेण्यायोग्य
ज्ञान, ज्ञानाचा अर्थ
सांगितला आहे. हे
सर्व माझे भक्तच
समजून घेऊ शकतात
आणि माझी दिव्य
प्रकृती प्राप्त करून
घेतात.
प्रकृतिं पुरुषं चैव
विद्ध्यनादी उभावपि।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्।।13.20।।
पुरुषम् प्रकृतिम् च उभौ एव अनादी
विद्धि। विकारान् गुणान्
अपि च प्रकृति-सम्भवान् एव च विद्धि।
पुरुषम् पुरूष पु.
द्वि. ए. व.
प्रकृतिम् प्रकृति स्त्री द्वि.
ए. व.
च
उभौ एव दोघांनाही
उभ सर्व. द्वि.
द्वि. व.
अनादी सुरवात
नसलेला न आदि अनादि द्वि.
द्वि. व.
विद्धि समज विद्
धातू जाणणे लोट
लकार म. पु. ए. व.
विकारान् (प्रकृतीचे) बदल
विकार पु. द्वि.
ब. व.
गुणान् गुण पु.
द्वि. ब. व.
अपि च
प्रकृति-सम्भवान् प्रकृति पासून
निर्माण
प्रकृत्याः सम्भवन्ति
एव च
विद्धि जाण
विद् धातू जाणणे
लोट लकार म. पु. ए.
व.
दुसर्या श्लोकात
क्षेत्र म्हणजे काय
ते आपण समजून
घेतले. 6व्या आणि
7व्या श्लोकात क्षेत्र
आणि त्याचे विकार
म्हणजे काय ते समजावून घेतले. त्यानंतर
आपण क्षेत्रज्ञ चे
निरनिराळे गुण समजून
घेतले. आता ह्या
सर्वांची उजळणी करून
त्याचे आणखी एक वैशिष्ट्य ह्या श्लोकात
सांगितले आहे. प्रकृति
मधे वैविध्यपूर्ण गुणवत्ता
दिसून येते. पुरूष
मात्र गुण रहीत.
7व्या अध्यायातील 12 व्या
श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी असे
म्हटले आहे की तीन गुण
सत्व रज आणि तम हे
त्यांच्या पासून निर्माण
झाले आहेत. मात्र
ह्या श्लोकात हे
सर्व गुण प्रकृति
पासून निर्माण झाले
आहे असे म्हटले
आहे. (प्रकृति त्यांनीच
निर्माण केली आहे
ना)परा आणि अपरा प्रकृति
चा उल्लेख 7 व्या
अध्यायातील 4,5 व्या श्लोकात आहेच.
आता
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण
असे म्हणतात की
पुरूष आणि प्रकृति
दोन्ही अनादी आहेत.
हे तू समजून
घे. तसेच (क्षेत्राचे)
गुण आणि त्यात
होणारे बदल हे प्रकृति पासून निर्माण
होतात हे पण तू समजून
घे.
कार्यकारणकर्तृत्वे
हेतुः प्रकृतिरुच्यते।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते।।13.21।।
कार्यकरणकर्तृत्वे
हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते
॥
कार्यकरणकर्तृत्वे
कार्य करण द्वारा
उत्पन्न होणाऱ्या क्रिया
करण्यात
कार्यकरणयोः कर्तृत्वं स. ए. व.
कार्यं च करणं
च
हेतुः हेतु पु.
प्र. ए. व.
प्रकृतिरुच्यते
प्रकृति स्त्री प्र.
ए. व.
उच्यते म्हटले जाते
ब्रू धातू बोलणे
लट लकार प्र.पु.ए.व
पुरुषः पुरूष पु.
प्र. ए. व.
सुखदुःखानां सुखं च
दुःखं च ष. ब. व.
भोक्तृत्वे भोगाला भोक्तृत्व
स. ए. व.
भुज् धातू भक्षण
करणे
हेतुरुच्यते हेतुः उच्यते
हेतुः कारण हेतु
पु. प्र. ए. व.
उच्यते असे म्हणतात
ब्रू धातू बोलणे
लट लकार प्र.पु.ए.व
आधीच्या श्लोकात पुरूष आणि
प्रकृति दोन्ही अनादी
आहेत असे सांगितले.
तसेच शरीरात (क्षेत्रात)
निर्माण होणारे गुण
आणि त्यातील बदल
हे प्रकृति पासून
निर्माण होतात असे
पण सांगितले. आता
ह्या श्लोकात कार्यकारण
भाव ह्यावर भाष्य
केले आहे. जे उत्पन्न होते ते कार्य आणि
ज्याच्या मुळे उत्पन्न
होते ते करण.
करण तीन प्रकारचे
आहेत. कर्मेन्द्रिये, ज्ञानेन्द्रिये,
मन बुद्धि आणि
अहंकार. कर्मेन्द्रियांवर ज्ञानेन्द्रियांचे
नियंत्रण आहे तर
ज्ञानेन्द्रियांवर मनाचे. चांगल्या
वाईटातील फरक बुद्धि
करते. बुद्धि वर
अहंकाराचे वर्चस्व असते.
कार्यकारणभावाच्या
तत्त्वांनुसार, प्रत्येक
प्रकारच्या परिणामाला कारण असते.
प्रतित्य म्हणजे प्रत्यय
किंवा कारण आणि
समुत्पाद म्हणजे उत्पत्ती.
अर्थात प्रतित्यसमुत्पाद म्हणजे
हेतूमुळे किंवा कारणामुळे
कार्याची उत्पत्ती होणे.
प्रतित्यसमुत्पाद
हा सिद्धांत केवळ
दु:खापुरताच मर्यादित
नाही, तर तो विश्वातील सर्व गोष्टींना
लागू पडतो.
याच सिध्दांताच्या आधारे तथागत
बुद्धाने सृष्टीचा निर्माता म्हणून
ईश्वराला नाकारले. कोणीही जग
शून्यातून निर्माण करु शकत नाही व
कोणतीही गोष्ट शून्यातून
निर्माण होत नाही
तर ती कारणाने
निर्माण होत असते.
त्यामुळे सृष्टीचा निर्माता ईश्वर,
देव आहे हे बौद्ध तत्त्वज्ञानाला
मान्य नाही.
एक जीव निरनिराळी
शरीरे धारण करतो
पण भौतिक सुखदुःखांना
तो जबाबदार नसतो
तर त्याचे शरीर
जबाबदार असते. म्हणजेच
प्रकृति च्या अधिपत्याखाली
हे सर्व घडते.
मात्र जीवाने कोणते
शरीर धारण करायचे
हे त्याच्या कर्मानुसार
ठरते असे आधीच्या
अध्यायात म्हटले आहेच.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की भौतिक कार्यकारणांना
प्रकृति कारणीभूत आहे
असे म्हटले जाते
तर विविध सुखदुःखांच्या
भोगास पुरूष कारणीभूत
आहे असे म्हटले
जाते.
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते
प्रकृतिजान्गुणान्।
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु।।13.22।।
प्रकृतिस्थः पुरुषः हि
प्रकृतिजान् गुणान् भुङ्क्ते
। गुण-सङ्गः
अस्य सत्-असत्-योनि-जन्मसु
कारणम् ।
प्रकृतिस्थः प्रकृतिमधे स्थिर असलेले
प्रकृत्याम् तिष्ठति
पुरुषः पुरूष पु.
प्र. ए. व.
हि
प्रकृतिजान्
प्रकृतिजन्य
प्रकृत्याः जायते
जन् धातू उत्पन्न
करणे लट लकार प्र.पु.ए.व
गुणान् गुणांचा गुण पु. द्वि.ब.व.
भुङ्क्ते भोक्ता
होतो
भुज् धातू भक्षण
करणे लट लकार प्र.पु.ए.व
गुण-सङ्गः गुणांची
साथ
गुणानाम् संगः
अस्य त्याच्या इदं पु. ष. ए.
व.
सत्-असत् सत्यं
च असत्यं च
योनि-जन्मसु योनयः
जन्मानि
जन्मसु जन्म घेण्याला
कारणम् कारण नपु.
प्र. ए. व.
सांख्य दर्शनानुसार समाजात दिसणार्या निरनिराळ्या
प्रवृत्ती ह्या त्रिगुणांच्या
प्रभावामुळे दिसून येतात.
आधीच्या श्लोकात 84 लक्ष
योनीत फिरणार्या
जीवात्म्याचा उल्लेख आला
आहेच. दुसर्या
अध्यायात स्पष्ट म्हटले
आहेच की जसे आपण कपडे
बदलतो त्याप्रमाणे जीव
एका शरीरातून दुसर्या शरीरात
प्रवेश करतो. 7व्या
अध्यायातील 19 व्या श्लोकात
ज्ञान मिळवण्यासाठी पुनर्जन्म
आवश्यक आहे असे म्हटले आहे.
त्यानंतर 8 व्या अध्यायातील
16 व्या श्लोकात जे
श्रीभगवानकृष्णांना शरण जातात
ते जन्म मृत्यू
च्या विळख्यातून मुक्त
होतात असे सांगितले
आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपले अज्ञान
हे मोहमायेच्या पटलामुळे
निर्माण होते. मोह-माया आयुष्यात
काय काय करायला
लावते? सर्व प्रकारच्या
गुन्हेगारी चे मूळ
हेच. जसे कर्म
तसेच त्याचे फळ.
ह्या श्लोकात नेमके हेच
सांगितले आहे.
पुरूष
म्हणजे जीवात्मा प्रकृति
मधे असलेल्या गुणांचा
उपभोग घेऊ पाहतो.
त्या गुणांच्या आसक्ती
मुळे च तो उत्कृष्ट निकृष्ट अशा
योनीत जन्म घेण्यास
कारणीभूत होतो.
उपद्रष्टाऽनुमन्ता
च भर्ता भोक्ता
महेश्वरः।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः।।13.23।।
अपि च परः
पुरुषः अस्मिन् देहे
उपद्रष्टा, अनुमन्ता, भर्ता, भोक्ता,
महेश्वरः, परमात्मा च इति उक्तः।।
अपि च
परः दिव्य पर
पु. /नपु. प्र.
ए. व.
पुरुषः पुरूष पु.
प्र. ए. व.
अस्मिन् या इदम्
पु. स. ए. व.
देहे शरीरामधे देह पु. नपु. स.
ए. व.
उपद्रष्टा, निरीक्षक उपद्रष्टृ पु.
प्र. ए. व.
अनुमन्ता, अनुमति देणारा
अनुमन्तृ पु. प्र.
ए. व.
अनु +मन+त्र
भर्ता, स्वामी भर्तृ
पु. प्र. ए. व. भृ
धातू पोषण करणे
तृच प्रत्यय
भोक्ता, उपभोक्ता भोक्तृ पु.
प्र. ए. व. भुज् धातू
तृ प्रत्यय
महेश्वरः, महान ईश्वरः
परमात्मा परमात्मन् पु. प्र.
ए. व.
च
इति
उक्तः ब्रू धातू
बोलणे क्त प्रत्यय
तूच तुझ्या जीवनाचा
शिल्पकार असे कोणी
म्हटले आहे. आधीचा
श्लोक वाचल्यावर आपल्याला
असेच वाटते जणू
आपणच जबाबदार आपल्या
बर्यावाईट कर्मांसाठी.
आणि त्याप्रमाणे आपल्याला
पुढील जन्म मिळतो.
ह्यावर महर्षी व्यासांनी
लगेचच उत्तर देऊन
टाकले आहे.
तशाच अर्थाचा आणखी एक श्लोक.
द्वा सुपर्णा सयुजा सखाया
समानं वृक्षं परिषस्वजाते।
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति
॥मुण्डकोपनिषद् 3.1.1।।
दोन सुन्दर पंख
असलेले पक्षी, घनिष्ठ
मित्र , एकाच वृक्षावर
रहात आहेत. त्यातील
एकजण वृक्षावरील गोड
फळे खात आहे तर दुसरा
काहीच न खातापिता
फक्त आपल्या मित्राकडे
पहात आहे.
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला
असे म्हणतात की
ह्या शरीरात दिव्य
असा भोक्ता आहे
जो महान ईश्वर
आहे, निरीक्षक, अनुमति
देणारा, पोषण करणारा
असा आहे ज्याला
परमात्मा असे म्हणतात.
य एवं वेत्ति
पुरुषं प्रकृतिं च
गुणैःसह।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते।।13.24।।
एवम् पुरुषम् गुणैः सह
प्रकृतिम् च यः
वेत्ति, सः सर्वथा
वर्तमानः अपि भूयः
न अभिजायते।
एवम् अशाप्रकारे
पुरुषम् पुरूष पु.
द्वि. ए. व.
गुणैः गुण पु.
तृ. ब. व.
सह
प्रकृतिम् प्रकृति स्त्री द्वि.
ए. व.
च
यः जो यद्
पु. प्र. ए. व.
वेत्ति, जाणतो विद्
धातू माहीत करुन
घेणे लट लकार प्र.पु.ए.व
सः तो
सर्वथा सर्व प्रकारचे
वर्तमानः सद्य स्थिती
वृत् धातू प्रवृत्त
करणे शानच प्रत्यय
प्र. ए. व.
अपि सुद्धा
भूयः पुन्हा
न
अभिजायते जन्म घेतो
अभि+जन् धातू
उत्पन्न करणे लट लकार प्र.पु.ए.व.
क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञेय अशा
सर्व शब्दांचे अर्थ
आपण समजून घेतले.
ज्याला हे सर्व नीट समजले
आहे तो ज्ञानी.
आता प्रश्न असा
आहे की ह्या सर्व ज्ञानाचा
उपयोग तरी काय?
मानवजातीला आपल्या जन्म
आणि मृत्यू चे
कारण उलगडलेले नाही.
मृत्यू पश्चात त्याचे
काय होते हे नक्की माहित
नसल्याने पाप पुण्य
मुक्ती अशा अनेक
संकल्पना मांडल्या गेल्या. प्रत्येक
धर्मामध्ये आपापल्या परीने ह्या
सर्वांची उकल करण्याचा
प्रयत्न केला गेला.
ज्ञानी होणे म्हणजे
बुद्ध होणे. म्हणजेच
अशा माणसाचा अहंकार,
मोह, माया, राग
लोभ सर्व काही
लोप पावले आहे. आधीच्या
अध्यायात आपण वाचले
आहेच की स्वतः
श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे
की ज्ञान मिळवण्यासाठी
पुन्हा पुन्हा जन्म
घ्यावा लागेल. ज्ञानी
व्यक्तीला पुन्हा जन्म
घेण्याची गरजच नाही.
वेदान्त दर्शनात कर्माचे 3 प्रकार
सांगितले आहेत.
1. संचित कर्म म्हणजे
आधीच्या धारण केलेल्या
शरीराच्या कर्मांच्या पाप पुण्ण्याचा
हिशोब.
2. प्रारब्ध म्हणजे आपल्या
कर्माचे फळ भोगण्यासाठी
मिळालेला जन्म.
3. आगामी कर्म जे
पुढे आपल्या हातून
घडणार आहे असे.
संयुक्तमेतत्
क्षरमक्षरं च व्यक्ताव्यक्तं
भरते विश्वमीशः
अनीशश्चात्मा
बध्यते भोक्तृभावात् ज्ञात्वा
देवम् मुच्यते सर्वपाशैः।
(श्वेताश्वतरोपनिषद्-1.8)
जड आणि चेतन,
व्यक्त आणि अव्यक्त
अशा जगाचा स्वामी,
त्याचा उपभोग घेणारा
जीवात्मा (केवळ अज्ञानामुळे)
बंधनातून ज्ञानामुळेच मुक्त होतो.
राजा जनकाचे उदाहरण
आपल्याला माहीत आहेच.
ते ज्ञानी होते,
त्यांना कसलीही आसक्ती
नव्हती पण ते राज्य करीत
होते. ह्या श्लोकात
अपि असा शब्द
वापरला आहे. ज्ञान
तर मिळाले आहे
पण लगेच मुक्ती
मिळेल असे नाही
म्हणजे आपले कर्म
चालूच ठेवायचे आहे.
असे म्हटले आहे.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की जो पुरूष
आणि प्रकृति तिच्या
तीनही गुणांसह जाणतो,
त्याची सद्य स्थिती
कशीही असली तरी
तो पुन्हा जन्म
घेत नाही.
ध्यानेनात्मनि
पश्यन्ति केचिदात्मानमात्मना।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन
चापरे।।13.25।।
केचित् ध्यानेन आत्मनि आत्मानम्
आत्मना पश्यन्ति। अन्ये
साङ्ख्येन योगेन ।
अपरे च कर्म-योगेन।
केचित् काही जण
अव्यय
ध्यानेन ध्यान करून
ध्यान नपु. तृ.
ए. व.
आत्मनि आपल्या मध्ये
आत्मन् पु. स. ए. व.
आत्मानम् परमात्म्याचे आत्मन् पु.द्वि. ए.
व.
आत्मना मनाने तृ.
ए. व.
पश्यन्ति पाहतात दृश्
धातू लट लकार प्र.पु.ब.व.
अन्ये इतर अन्य
पु. प्र. ब. व.
साङ्ख्येन सांख्य योगाच्या
साह्याने साडःख्य पु. तृ. ए. व.
योगेन योग पु.
तृ. ए. व.
अपरे च अन्य
अपर नपु. प्र.
ब. व.
कर्म-योगेन कर्म
एव योगः निष्काम
कर्माने
आधीच्या अध्यायात ज्ञान मिळवून
झाल्यावर डोळसपणे भक्ती करावी
असे स्पष्ट म्हटले
आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाला दर्शन म्हटले
जाते. दृश् धातू
म्हणजे पाहणे. पाणिनीय
व्याकरणाप्रमाणे दर्शन शब्द,
'दृशिर् प्रेक्षणे' धातू
ला ल्युट प्रत्यय
लावून होतो. डोळ्यांनी
पाहणे आणि मनाने
समजून घेणे दोन्ही
क्रिया दर्शनात अपेक्षित
आहेत.
दृश्यते यथार्थ तत्वमनेन
म्हणजेच ज्याच्या द्वारे
यथार्थ तत्त्वांची अनुभूती
होते ते दर्शन.
दृश्यते अनेन इति
दर्शनम् असे उपनिषदात
म्हटले आहे. थोडक्यात
दर्शन म्हणजे ज्याच्या
साह्याने तत्वज्ञान समजून घेता
येते.
प्रमुख दर्शनशास्त्रांत दिलेली प्रथम
सूत्रे ज्याच्या मुळे
त्या दर्शनाचा परीचय
होतो. हाताची पाचही
बोटे सारखी नसतात
ह्या उक्तीप्रमाणे ही
सहा दर्शने जरी
वेदांना मानत असली
तरी वेगवेगळे विचार
मांडतात.
1.अथातो धर्मजिज्ञासा ( पूर्वमीमांसा)
2. अथातो ब्रह्मजिज्ञासा। ( वेदान्तसूत्र )
3. अथातो धर्मं व्याख्यास्यामः।
( वैशेषिकसूत्र )
4. अथ योगानुशासनम्। ( योगसूत्र )
अथ
5.त्रिविधदुःखात्यन्तनिवृत्तिरत्यन्तपुरुषार्थः।
( सांख्यसूत्र )
6.प्रमाणप्रमेयसंशयप्रयोजनदृष्टान्तसिद्धान्तावयवतर्कनिर्णयवादजल्पवितण्डाहेत्वाभासच्छलजातिनिग्रहस्थानानाम्तत्त्वज्ञानात्निःश्रेयसाधिगमः
। ( न्यायसूत्र )
आता ह्या श्लोकात
योगदर्शन आणि सांख्य
दर्शन ह्यांचा उल्लेख
केला आहे. म्हणजेच
जे ईश्वर मानत
नाहीत असे. म्हणून
हा श्लोक बर्याच अंगांनी
महत्त्वाचा ठरतो.
5व्या अध्यायातील 4,5 व्या श्लोकात
सांख्य दर्शन चा
उल्लेख सापडतो. 5व्या
6व्या 8व्या अध्यायात
सगुण आणि निर्गुण
निराकार भक्तीचे विवेचन
आपण वाचले आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की
काही
जण परमात्म्याची अनुभूती
आपल्या अंतर्मनात पाहून
ध्यानमार्गाने घेतात काही
जण सांख्य योगाने
तर काही जण निष्काम कर्माने घेतात.
अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः।।13.26।।
एवम् अजानन्तः अन्ये तु,
अन्येभ्यः श्रुत्वा उपासते। श्रुति-परायणाः ते अपि च मृत्युम्
अतितरन्ति एव।।
एवम् असे सर्व
(सांख्य दर्शन आणि
योग)
अजानन्तः न जाणणारे
न जानन्तः ज्ञानत्
ज्ञा धातू समजून
घेणे शतृ प्रत्यय
प्र. ब. व.
अन्ये काहीजण अन्य
पु. प्र. ब. व.
तु, परंतु
अन्येभ्यः इतरांकडून अन्यत् पु.
च. ब. व.
श्रुत्वा ऐकून श्रु
धातू श्रवण करणे
क्त्वा प्रत्यय
उपासते उपासना करतात
उप+आस धातू बसणे लट
लकार प्र.पु.ब.व.
श्रुति-परायणाः ऐकून आचरण
करणारे श्रुतौ परायणः
ते तद् पु.
प्र. ब. व.
अपि च ते
सुद्धा
मृत्युम् मृत्यू ला
मृत्यु पु. द्वि.
ए. व.
अतितरन्ति तरून जातात
अति+तृ धातू लट लकार
प्र.पु.ब.व.
एव
ह्या अध्यायातील 24,25, 26 हे तीन
श्लोक सामाजिक समता
दर्शवितात. सर्वांनाच अध्यात्मिक उन्नती
ज्ञान मार्गाने करणे
शक्य नाही. त्याची
विविध कारणे असू
शकतात जसे बौद्धिक
क्षमता, वेळेचा अभाव,
कौटुंबिक जबाबदाऱ्या, निरनिराळ्या विचारधारांप्रती
श्रद्धा. कसेही असले
तरी प्रत्येक व्यक्तीला
आपले आयुष्य सुखाने
जगता आले पाहिजे
आणि मृत्यू सुद्धा
सहज प्राप्त झाला
पाहिजे.
छांदोग्य उपनिषदातील सत्यपाल जाबाल
ची कथा
हे उत्कृष्ट उदाहरण
आहे श्रवणभक्ती ने
ज्ञान मिळवण्याचे.
श्रृण्वतां स्वकथां कृष्ण:पुण्यश्रवणकीर्तनः।
हृद्यन्तःस्थो
ह्यभद्राणि विधुनोति सुहृत्सताम् ।।
(श्रीमद्भागवतम्-1.2.17)
संतांकडून फक्त परमेश्वराचे
पवित्र नाव रूप,
लीला, विविध गुण,
संबंधी श्रवण केल्याने
तुझे हृदय परीवर्तन
होईल.
महापुरुषांच्या
सहवासात राहून आपले
जीवन सुसह्य करणे
शक्य आहे.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की काही जण हे सर्व
(सांख्य दर्शन आणि
योगसूत्र) जाणत नाहीत
तरी सुद्धा संतांचे
उपदेश ऐकून त्याप्रमाणे
आचरण करून मृत्यू
ला पार करू शकतात.
यावत्सञ्जायते
किञ्चित्सत्त्वं स्थावरजङ्गमम्।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि
भरतर्षभ।।13.27।।
हे भरतर्षभ! यावत् किञ्चित्
स्थावर-जङ्गमम् सत्त्वम्
सञ्जायते, तत् क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगात् विद्धि
।
हे भरतर्षभ! भरतानां ऋषभः
यावत् किञ्चित् जे काही
स्थावर स्थिर राहणारे
जङ्गमम् चर (जलचर,
नभचर, थलचर)
स्थावर-जङ्गमम् स्थावरं च
जङ्गमम् च
सत्त्वम् प्राणी सत्त्व
नपु. प्र. ए. व.
सञ्जायते, उत्पन्न होतात सं+जन धातू
लट लकार प्र.पु.ए.व
तत् त्यांना
क्षेत्र-क्षेत्रज्ञ-संयोगात् क्षेत्र
क्षेत्रज्ञ च्या संयोगाने
क्षेत्रं च क्षेत्रज्ञः
च क्षेत्रक्षेत्रज्ञौ संयोगः
विद्धि समज विद्
धातू माहीत करुन
घेणे लोट लकार
म. पु. ए. व.
ह्या श्लोकाचा अर्थ वरवर
पाहता जरी साधाच
वाटला तरी खूप मोठा उपदेशक
असा वाटतो. एकंदरीतच
आपल्या संस्कृतीच्या महानतेचा
उगम अशा श्लोकातून
झाला असावा असे
वाटते. झाडांमध्ये जीव
असतो, त्यांना भावना
असतात हे आता विज्ञानाने सिद्ध झाले
आहे.
त्याही पुढे जाऊन
सर्व स्थावर गोष्टी
म्हणजेच डोंगरदऱ्या, दगड
ह्यांचा उल्लेख केला
आहे. निरनिराळ्या प्राण्यांना,
नदीला, सूर्य चंद्र
ह्यांच्या प्रती आदर
दाखवण्याची आपली परंपरा
आहेच. कारण हे सर्व परमेश्वरानेच
तर उत्पन्न केले
आहे. सगळीकडेच चेतना
शक्ती भरलेली आहे.
हेच ह्या श्लोकात
श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.
ते असे म्हणतात
की
हे भरत वंशातील
श्रेष्ठ
चर
आणि अचर जे काही अस्तित्व
तुला दिसते आहे
ते सर्व क्षेत्र
आणि क्षेत्रज्ञ च्या
संयोगानेच झाले आहे
असे समज.
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं
परमेश्वरम्।
विनश्यत्स्वविनश्यन्तं
यः पश्यति स
पश्यति।।13.28।।
यः सर्वेषु भूतेषु समम्
तिष्ठन्तम् विनश्यत्सु अविनश्यन्तम् परमेश्वरम्
पश्यति, सः पश्यति
।
यः जो यद्
पु. प्र. ए. व.
सर्वेषु सर्व नपु.
स. ब. व.
भूतेषु जीवांत भूत
नपु. स. ब. व.
समम् सम पु.
द्वि. ए. व.
तिष्ठन्तम् वास करणारा
स्था धातू शतृ
प्रत्यय द्वि. ए.
व.
विनश्यत्सु नष्ट होत
असलेल्या वि +नश्
धातू शतृ प्रत्यय
स. ए. व.
अविनश्यन्तम्
अविनाशी वि+नश् विनश्यत् शतृ प्रत्यय
द्वि. ए. व.
न विनश्यन्तम्
परमेश्वरम् परमेश्वराला परमेश्वर पु.
द्वि. ए. व.
पश्यति, पाहतो दृश
धातू लट लकार प्र.पु.ए.व
सः तो तद्
प्र. ए. व.
पश्यति पाहतो दृश
धातू लट लकार प्र.पु.ए.व
आत्मा अमर आहे
शरीर नश्वर आहे
हे आपण जाणतो.
आधीच्या श्लोकात परमात्मा
सर्व स्थावर आणि
जड्ःगम गोष्टी क्षेत्र
आणि क्षेत्रज्ञ ह्यांच्या
संयोगाने निर्माण झाल्या आहेत
हे सुद्धा वाचले.
ह्या श्लोकात श्रीमद्भगवद्गीते
मध्ये व्यासांनी आपली
भूमिका स्पष्ट केली
आहे. (सांख्य दर्शन
आणि योगसूत्र ह्यांचा
संदर्भ घेऊन)
एको देवः सर्वभूतेषु
गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा
(श्वेताश्वतरोपनिषद्-6.11)
"भगवान एकच आहेत,
ते सर्वांच्या हृदयांत
वास करतात. ते
सर्वव्यापी आहेत आणि
आत्म्याचे श्रेष्ठ आत्मा आहेत.
"
भवान् हि सर्वभूतानामात्मा
साक्षी स्वदृग् विभो
(श्रीमद्भागवतम्-10.86.31)
"भगवान सर्वांमध्ये साक्षी आणि
स्वामींच्या रूपात वास
करतात. "
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की जो नश्वर अशा
सर्व जीवांमधे समभावाने
स्थित असा अविनाशी
परमात्मा पाहतो, तोच
पाहतो.
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम्।
न हिनस्त्यात्मनाऽऽत्मानं ततो याति
परां गतिम्।।13.29।।
हि सर्वत्र समवस्थितम् समं
ईश्वरम् पश्यन् आत्मना आत्मानम्
न हिनस्ति ततः
पराम् गतिम् याति।
हि नक्कीच
सर्वत्र
समवस्थितम् सम भावाने
स्थित सम+अव+स्था धातू
क्त प्रत्यय पु.
द्वि. ए. व.
समं समतेने
ईश्वरम् ईश्वर पु.
द्वि. ए. व.
पश्यन् पाहून दृश्
धातू पाहणे शतृ
प्रत्यय पु.
प्र. ए. व.
आत्मना मनाने आत्मन्
पु. तृ. ए. व.
आत्मानम् आत्मा आत्मन्
पु. द्वि. ए.
व.
न
हिनस्ति इजा करतो
हिंस् धातू नाश
करणे लट लकार प्र.पु.ए.व
ततः नंतर
पराम् दिव्य परा
स्त्री. द्वि. ए.
व.
गतिम् गति स्त्री
द्वि. ए. व.
याति पोहोचतो या धातू जाणे लट
लकार प्र.पु.ए.व
आपण महात्मा गांधींना अहिंसेचे
पूजक मानतो. त्यापूर्वी
गौतम बुद्धांनी अहिंसेचा
पुरस्कार केला हे
सुद्धा आपल्याला माहीत
आहे. ह्या श्लोकात
थेट आत्मिक पातळीवर
अहिंसा सांगितली आहे.
किती साधा सुंदर
विचार. आधीच्या श्लोकात परमात्मा
सर्व भूमी, काळ,
व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती मध्ये
समान भावाने स्थित
आहे, असे सांगून
झाल्यावर आपणच परमात्म्याला
कसे काय दुखाऊ
शकतो? हा विचार
मांडला आहे आणि तो फक्त
जीवितांच्या बाबतीत नाही
तर सर्व स्थावर
गोष्टींना सुद्धा लागू
पडतो म्हणजेच पर्यावरणाच्या
रक्षणाचा सुद्धा विचार
मांडला आहेच की.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की जो सर्व ठिकाणी
समभावाने स्थित अशा
ईश्वराला समतेने पाहतो
तो स्वतः च स्वतः चे
नुकसान करत नाही
आणि म्हणूनच तो
परमगति प्राप्त करतो.
प्रकृत्यैव च कर्माणि
क्रियमाणानि सर्वशः।
यः पश्यति तथाऽऽत्मानमकर्तारं
स पश्यति।।13.30।।
यः कर्माणि सर्वशः प्रकृत्या
एव च क्रियमाणानि,
तथा आत्मानम् अकर्तारम्
पश्यति, सः पश्यति
।
यः यद् पु.
प्र. ए. व.
कर्माणि कर्म कर्मन्
नपु. प्र. ब. व.
सर्वशः सर्व प्रकारे
प्रकृत्या प्रकृति स्त्री तृ.
ए. व.
एव च
क्रियमाणानि,
केली जातात कृ
धातू करणे शतृ
प्रत्यय प्र. ब. व.
तथा सुद्धा
आत्मानम् स्वतः आत्मन्
पु.द्वि. ए.
व.
अकर्तारम् न कर्तारं
पु. द्वि. ए.
व.
पश्यति, पाहतो दृश्
धातू पाहणे लट
लकार प्र.पु.ए.व
सः तो तद्
पु. प्र. ए. व.
पश्यति पाहतो दृश्
धातू पाहणे लट
लकार प्र.पु.ए.व
एक
विलक्षण सत्य ह्या
श्लोकात नमूद केले
आहे असे म्हणावेसे
वाटते. आत्मा अविनाशी
आहे, शरीर नश्वर
आहे हे आपण समजून घेतले.
केवळ आत्मा कोणीच
पाहू शकत नाही.आत्म्याची ओळख शरीराच्या
माध्यमातूनच होत असते.
आपली कर्मे आपल्याला
निरनिराळ्या जन्मात निरनिराळी
शरीरे देतात. हे
बाह्य रूप अहंकार
निर्माण करते. निरनिराळ्या
भावना आणि कृती
ह्या शरीराद्वारे घडतात.
थोडक्यात जे काही
ह्या लोकांत घडते
ते केवळ शरीराच्या
माध्यमातूनच. आधीच्या अध्यायात कर्मयोग
आपण वाचले आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण
असे म्हणतात की
जो शरीराची सर्व
कर्मे प्राकृत शक्ती
द्वाराच संपन्न होत
असतात आणि आत्मा
प्रत्यक्ष काहीच करत
नाही, तोच पाहतो
(जाणतो).
यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति।
तत एव च
विस्तारं ब्रह्म सम्पद्यते
तदा।।13.31।।
यदा भूत-पृथक्-भावम् एकस्थम्
ततः एव विस्तारम्
च अनुपश्यति, तदा
ब्रह्म सम्पद्यते।
यदा जेव्हा
भूत-पृथक्-भावम्
जीवांच्या गुणांचे विश्लेषण
भूतानां पृथ्गभावः
एकस्थम् एकवटलेले एकस्मिन तिष्ठति
द्वि. ए. व.
ततः एव त्यानंतर
विस्तारम् विस्तार पु. द्वि.
ए. व.
च
अनुपश्यति पाहतो अनु
+दृश् धातू पाहणे
लट लकार प्र.पु.ए.व
तदा
ब्रह्म ब्रह्मन् नपु. द्वि.
ए. व.
सम्पद्यते प्राप्त
करतो वृद्धि होणे
सं +पद् धातू
जाणे लट लकार प्र.पु.ए.व.
ह्या श्लोकात कमीतकमी शब्दात
बरेच काही सांगितले
आहे.
एका ठिकाणच्या जमीनीवर वेगवेगळ्या
बीया पेरल्या असता,
त्या त्या बीयांच्या
गुणधर्माप्रमाणे फळे तयार
होतात.
माणसांत असलेल्या विविध गुणदोषांना
त्याचे कर्म जबाबदार
असते. ब्रह्म मात्र
सर्वांवर सारखीच कृपादृष्टी
ठेवतो. 27 व्या श्लोकात
चर आणि अचर गोष्टींच्या उत्पत्ती विषयी
आपण वाचले आहेच.
आपले शरीर प्रकृती
पासून निर्माण होते
आणि मृत्यू नंतर
त्याची माती होते.
ह्या
श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
की जेव्हा तो
विविध जीव एकाच
शक्ती शी जोडलेले
पाहतो आणि जन्मानंतर
त्यांचा विस्तार झालेला
पाहतो तेव्हा तो
ब्रह्मज्ञान प्राप्त करतो.
अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः।
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते।।13.32।।
हे कौन्तेय! अनादित्वात् निर्गुणत्वात्
अयम् अव्ययः परमात्मा,
शरीरस्थः अपि न
करोति न लिप्यते।
हे कौन्तेय! कुन्त्याः अपत्यं
पुमान्
अनादित्वात्
सर्वकालिन अनादित्व नपु. पं.
ए. व.
निर्गुणत्वात्
गुण रहीत निर्गुणत्व
नपु. पं. ए. व.
अयम् हा इदम
पु. प्र. ए. व.
अव्ययः अविनाशी न व्ययः प्र. ए.
व.
परमात्मा, परमात्मन् पु. प्र.
ए. व.
शरीरस्थः शरीरामधे असणारा शरीरे
तिष्ठति प्र. ए. व.
अपि सुद्धा
न
करोति करतो कृ
धातू करणे लट लकार प्र.पु.ए.व
न
लिप्यते कलंकीत होणे
लेप देणे लिम्प्
धातू कर्मवाच्य प्र.
पु. ए. व.
हा श्लोक पुरुष,
प्रकृति, कर्म, कर्मफल
ह्या सर्वांचा अर्थ
अगदी व्यवस्थित उलगडून
सांगतो.
प्रकृति आणि पुरूष
अनादी आहेत हे
20 व्या श्लोकात सांगून
झाले आहेच. पुरूष
गुण रहीत आहे
तर प्रकृति मधे
वैविध्यपूर्ण गुणवत्ता दिसून येते.
प्रकृति मुळे तीन
गुणांची निर्मिती होते.
आपल्या कर्मानुसार आपला
जन्म (शरीर वैशिष्ट्य)
ठरतो हे सर्व आपण वाचले.
आपल्या मनात असलेल्या
निरनिराळ्या इच्छा आकांक्षा
आणि लालसा ह्यांच्या
प्रभावाखाली आपण आपली
कर्म करत राहतो.
हा श्लोक वाचताना
लहानपणी ऐकलेल्या गोष्टीची
आठवण होते. एक
शंभराची कोरी करकरीत
नोट त्याचे मूल्य
रूपये शंभर आणि
ती मळली, चुरगळली
गेली तरी त्याचे
मूल्य रुपये शंभर.
अशाच प्रकारचा विचार ह्या
श्लोकात मांडला आहे.
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की हे कौन्तेय हा पुरूष
अनादी आणि गुणरहीत
असून अविनाशी परमात्म्याचे
रूप आहे. हा शरीरात वास्तव्य
करत असून सुद्धा
कोणतेही कर्म करत
नाही आणि प्रभावित
होत नाही.
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते।
सर्वत्रावस्थितो
देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते।।13.33।।
यथा सर्वगतम् आकाशम् सौक्ष्म्यात्
न उपलिप्यते, तथा
देहे सर्वत्र अवस्थितः
आत्मा न उपलिप्यते।
यथा ज्याप्रमाणे
सर्वगतम् सर्व व्यापी
सर्वं गतं नपु.
प्र. ए. व.
आकाशम् आकाश नपु.
प्र. ए. व.
सौक्ष्म्यात्
सूक्ष्म असल्यामुळे सौक्ष्म्य
नपु. पं. ए. व.
न उपलिप्यते लिप्त होत
नाही उप+लिप् धातू लेपन
करणे लट लकार प्र.पु.ए.व
तथा त्याप्रमाणे
देहे देहात देह
पु. /नपु. स. ए. व.
सर्वत्र अव्यय
अवस्थितः स्थित असलेला
अव+स्था धातू
क्त प्रत्यय पु.
प्र. ए. व.
आत्मा आत्मन् नपु.
प्र. ए. व.
न उपलिप्यते।
आधीच्या श्लोकाचा अर्थ, आकाशाचे
उदाहरण देऊन स्पष्ट
केला आहे. अशी
कोणतीही गोष्ट नाही
जी आकाशाने व्यापलेली
नाही. म्हणून त्याला
सूक्ष्म आणि सर्वव्यापी
असे म्हटले आहे.
आपल्या देहात आत्मा
कसा प्रवेश करतो
आणि मृत्यूनंतर कसा
बाहेर पडतो हे सांगता येत
नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
ज्याप्रमाणे
सूक्ष्म आकाश , सर्वव्यापी
असूनही लिप्त होत
नाही त्याप्रमाणे देहात
सर्वत्र व्याप्त असलेला
आत्मा लिप्त होत
नाही.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं
रविः।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं
प्रकाशयति भारत।।13.34।।
हे भारत! यथा
एकः रविः इमम्
कृत्स्नम् लोकम् प्रकाशयति,
तथा क्षेत्री कृत्स्नम्
क्षेत्रम् प्रकाशयति।
हे भारत!
यथा अव्यय ज्याप्रमाणे
एकः एक प्र.
ए. व.
रविः सूर्य रवि
पु. प्र. ए. व.
इमम् या इदम
पु. द्वि. ए.
व.
कृत्स्नम् संपूर्ण कृत्स्न पु.
द्वि ए. व.
लोकम् लोक पु.
द्वि. ए. व.
प्रकाशयति प्रकाशित करतो प्र
+काश् धातू लट लकार प्र.पु.ए.व
तथा त्याप्रमाणे
क्षेत्री आत्मा क्षेत्रिन्
पु. प्र. ए. व.
कृत्स्नम् संपूर्ण कृत्स्न पु.
द्वि ए. व.
क्षेत्रम् शरीर क्षेत्र
नपु. द्वि. ए.
व.
प्रकाशयति प्र +काश्
धातू लट लकार प्र.पु.ए.व.
आत्म्याचे गुणविशेष सांगणारा अजून
एक श्लोक.
शरीरात चेतना शक्ती
नसेल तर सारेच
व्यर्थ. पण ही चेतना शक्ती
नक्की आहे तरी कशी?
बालग्रशतभागस्य
शतधा कल्पितस्य च
भागोजीवः स विज्ञेयः
स चानन्त्याम कल्पते
(श्वेताश्वतरोपनिषद्-5.9)
जर केसाच्या टोकाचे शंभर
भाग केले आणि
परत त्यातील एकाचे
शंभर भाग केले
तर आत्म्याच्या आकाराची
कल्पना करता येईल.
म्हणून श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात
की
हे
भारत ज्याप्रमाणे एकच
सूर्य पूर्ण जगाला
प्रकाशमान करतो त्याप्रमाणे
क्षेत्रज्ञ संपूर्ण क्षेत्राला प्रकाशमान
करतो.
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं
ज्ञानचक्षुषा।
भूतप्रकृतिमोक्षं
च ये विदुर्यान्ति
ते परम्।।13.35।।
एवम् क्षेत्र-क्षेत्रज्ञयोः अन्तरम्
भूत-प्रकृति-मोक्षम्
च ये ज्ञान-चक्षुषा विदुः, ते
परम् यान्ति।
एवम् याप्रमाणे अव्यय
क्षेत्र-क्षेत्रज्ञयोः शरीर आणि
शरीराचा स्वामी
क्षेत्रं क्षेत्रज्ञः च ष. द्वि. व.
अन्तरम् फरक अन्तर
नपु. प्र. ए. व.
भूत-प्रकृति-मोक्षम् भौतिक
प्रकृति पासून मोक्ष
च
भूतानां प्रकृति
भूतप्रकृते मोक्षः द्वि.
ए. व.
ये जे यद्
पु. प्र. ब. व.
ज्ञान-चक्षुषा ज्ञान रूपी
डोळ्यांनी ज्ञानं एव
चक्षुः
विदुः जाणतात विद्
धातू माहीत करुन
घेणे लट लकार प्र.पु.ब.व.
ते तद् पु.
प्र. ब. व.
परम् श्रेष्ठ पर नपु. द्वि. ए.
व.
यान्ति प्राप्त होतात या
धातू जाणे लट लकार प्र.पु.ब.व.
ह्या अध्यायातील शेवटचा श्लोक.
8 ते 12 व्या श्लोकात
आपण क्षेत्रज्ञांची गुणवैशिष्ट्ये
वाचली. प्रकृति आणि
पुरूष ह्यामधील फरक
ज्याला समजला तो
खरा ज्ञानी. ज्याला
मिथ्थ्या जगाची ओळख
पटली तो क्षेत्रज्ञ.
ह्या
श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे
म्हणतात की जे ज्ञानचक्षूंनी क्षेत्र आणि
क्षेत्रज्ञ ह्या मधील
फरक पाहू शकतात.
आणि भौतिक प्रकृती
पासून मुक्त होण्याचा
मार्ग जाणतात ते
आपले परम लक्ष्य
गाठू शकतात.
----------------------------🙏🙏🙏🙏-------------------------