बुधवार, २९ जून, २०२२

श्रीमद्भगवद्गीता अध्याय 10 वा

 

                    श्रीमद्भगवद्गीता अध्याय 10 वा 

श्रीमद्भगवद्गीतेच्या 10 व्या अध्यायाचे नाव विभूतीयोग असून त्यात एकूण 42 श्लोक आहेत.

 

श्रीभगवानुवाच

 

भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः।

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया।।10.1।।

श्रीभगवानुवाच - हे महाबाहो! भूयः एव मे परमम्‌ वचः शृणु। यत्‌ अहम्‌ प्रीयमाणाय ते हित-काम्यया वक्ष्यामि।

 

श्रीभगवानुवाच -

हे महाबाहो!

भूयः  भूयस् पुन्हा

एव

मे माझे

परमम्‌ श्रेष्ठ

वचः वचस् शब्द

शृणु ऐक

श्रु धातू ऐकणे

यत्‌ तो

अहम्‌ मी

प्रीयमाणाय  सर्वात प्रिय

प्रीयमाण शानच

प्रत्यय

प्री धातू प्रीती करणे

ते युष्मद्

हित-काम्यया हिताची कामना करण्या सारखी

कम् धातू इच्छा करणे

वक्ष्यामि। बोलतो

वच् धातू बोलणे

 

विभूति ह्या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ महान, सर्वोच्च.

वि +भू धातू म्हणजे होणे, असणे

आतापर्यंतच्या अध्यायातील श्लोका मुळे हे आता स्पष्ट माहीत झाले आहे की ह्या सृष्टीला निर्माण करणारे श्रीभगवानकृष्ण, त्यांचे अस्तित्व सगळीकडेच व्यापले आहे. सात महर्षि, चार महान ऋषि आणि चौदा मनु सुद्धा ह्यांच्या पासून निर्माण झाले आणि इतर मानव त्यानंतर अस्तित्वात आले.

7व्या अध्यायातील 8 - 12 श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी आपल्या वेगवेगळ्या अस्तित्वाची ओळख करून दिली आहेच. तसेच 9 व्या अध्यायातील 16 - 19 श्लोकात सुद्धा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून दिली आहे.

भगवान ह्या शब्दाचा सर्वांना सहज समजणारा अर्थ म्हणजे तेज.

पराशर मुनींनी भगवान ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे.

ऐश्वर्या समग्र्य:

वीर्यस्य यशसं श्रीय:

ज्ञान-वैराग्ययो: कैवैं

शनशान भाग इतगान:

(विष्णु पुराण 6.5.47)

भगवान म्हणजे ज्याच्या कडे धन, शक्ति, प्रसिद्धि, सौंदर्य, ज्ञान आणि त्याग आहे.

श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की

हे महाबलशाली माझी श्रेष्ठ वचने तू पुन्हा एकदा ऐक. जे मी तुला तुझा हितचिंतक म्हणून सांगत आहे कारण तुला मी सर्वात प्रिय आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः।

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः।।10.2।।

न सुर-गणाः न महर्षयः मे प्रभवम्‌ विदुः हि, अहम्‌ सर्वशः देवानाम्‌ महर्षीणाम्‌ च आदिः।

 

सुर-गणाः देवांचा गण

महर्षयः महर्षि

मे प्रभवम्‌ माझा प्रभाव उत्पत्ती

विदुः जाणतात

विद् धातू जाणणे

हि, अहम्‌ मीच

सर्वशः पूर्णपणे

देवानाम्‌ देवांचे

महर्षीणाम्‌  च महर्षि चे सुद्धा

आदिः सुरवात

आपल्याला श्रीभगवानकृष्ण स्वतः बद्दल सांगत आहेत.

7व्या अध्यायातील 7व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्पष्टपणे सांगितले आहे सर्व गोष्टींची सुरुवात माझ्यापासून होते आणि सर्व गोष्टींचा शेवट सुद्धा.

 

नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत्।

(ईषोपनिषद्-4) परमेश्वराबददल स्वर्गातील देवांना फारशी माहिती नाही कारण त्याचे अस्तित्व ह्यांच्या आधीचे आहे.

को अद्धा वेद क इह प्रावोचत् कुत आ जाता कुत इयं विश्रुतिः।

अर्वागदेवा अस्य विसर्जनाय, अथा को वेद यत आबभूव।।

(ऋग्वेद-10.129.6)

ह्या जगात असा कोण आहे जो सांगू शकेल ब्रहमांडाची उत्पत्ती कधी झाली? सृष्टि कशी उत्पन्न झाली?

त्याच्या पुढे ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

स्वर्गातील देवता आणि महाऋषी कोणीही माझी उत्पत्ती, माझी शक्ती जाणत नाही कारण मीच त्यांच्या उत्पत्ती चा उगम आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्।

असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते।।10.3।।

यः माम् अजम् अनादिम् लोक-महेश्वरम् च वेत्ति, मर्त्येषु असम्मूढः सः सर्व-पापैः प्रमुच्यते।।

 

यः जो

माम् मला

अजम्. न जन्मलेला अजा

जन् धातू उत्पन्न होणे

अनादिम् सुरवात नसलेला

न +आदी

लोक-महेश्वरम् महान ईश्वर

महत् +ईश् धातू अधिकार असणे

च आणि

वेत्ति, जाणणारा

विद् धातू जाणणे

मर्त्येषु मर्त्य मधील एक

मर्त्य मरण येईल असा

असम्मूढः भ्रमित नसलेला

न + सम्मूढ

सं +मुह धातू बुद्धि भ्रष्ट होणे

सः तो

सर्व-पापैः सर्व पापातून

प्रमुच्यते।।

प्र +मुच धातू मुक्त करणे.

आधीच्या श्लोकात समस्त देव आणि महर्षि मला जाणत नाही असे म्हटले आहे. मात्र 7 व्या अध्यायातील 3 र्या श्लोकात सहस्रांमधील एखादा असा ज्ञानी जो परमेश्वराला जाणून घेऊ शकतो असे म्हटले आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जो मला शाश्वत (अनादी अनंत), सर्व लोकांचा महान ईश्वर असे ओळखतो, त्यावर त्याचा दृढ विश्वास असतो असा मर्त्य लोकांतील जाणकार सर्व पापां पासून मुक्त असतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः।

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च।।10.4।।

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः।

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः।।10.5।।

 

बुद्धिः, ज्ञानम्‌, असम्मोहः, क्षमा, सत्यम्‌, दमः, शमः, सुखम्‌, दुःखम्‌, भवः, अभावः, भयम्‌ च अभयम् एव च।।

अहिंसा, समता, तुष्टिः, तपः, दानम्,‌ यशः, अयशः भूतानाम्‌ पृथक्‌-विधाः भावाः मत्तः एव भवन्ति।।

 

बुद्धिः,

ज्ञानम्‌,

असम्मोहः, मोह नसलेला अविचल

क्षमा,

सत्यम्‌,

दमः, संयम

शमः, शांती

सुखम्‌,

दुःखम्‌,

भवः, असणे

अभावः, नसणे

भयम्‌ च

अभयम् एव च।।

अहिंसा,

समता,

तुष्टिः संतोष समाधान

तपः,

दानम्,‌

यशः,

अयशः अपयश

भूतानाम्‌ लोकांची

पृथक्‌-विधाः पृथक्करण करण्याची क्षमता

भावाः सर्व गुण

मत्तः एव माझ्यामुळे च

भवन्ति।।. निर्माण होतात.

प्रत्येक व्यक्ति ही जशी बाह्य रुपाने ओळखता येते तशीच ती त्याच्या स्वभाव आणि व्यक्तीमत्वाने.

प्रत्येक व्यक्तिमत्त्व हे त्या व्यक्तीच्या जन्मापासून घडत जाते. आधी त्याच्या आईवडिलांचे संस्कार होतात. त्यानंतर इतर नातेवाईक आणि मित्रमंडळींचा प्रभाव त्याच्या वर असतो. गुरू त्या व्यक्तीस घडवत असताना आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती चा सुद्धा त्याच्यावर परीणाम होत असतो.

कोणताही एक मनुष्य दुसर्‍या माणसासारखा नसतो. अगदी एकाच आईवडिलांची, एकाच वातावरणात वाढलेल्या मुलांचे  व्यक्तीमत्व वेगवेगळे असते.

आपल्या स्वभावातील निरनिराळ्या छटा ह्या दोन श्लोकात सांगितल्या आहेत.

आणि हे सर्व भाव माझ्यामुळेच निर्माण होतात असे श्रीभगवानकृष्ण सांगत आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा।

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः।।10.6।।

सप्त पूर्वे महर्षयः तथा चत्वारः मनवः मत्‌ भावाः, मानसाः जाताः येषाम्‌ लोके इमाः प्रजाः।

 

सप्त  महर्षयः सात महर्षि

पूर्वे  पूर्वी

तथा सुद्धा

चत्वारः  चार

मनवः. मनु

 मत्‌ भावाः, माझ्या प्रमाणे

मानसाः मानसिकता

जाताः जन्मलेला

जन धातू उत्पन्न करणे

येषाम्‌ यद् ज्याचे

लोके लोक जगात

इमाः हे सर्व

प्रजाः।

प्र +जन् धातू उत्पन्न करणे.

आधीच्या श्लोकात 20 गुणांचा उल्लेख केला आहे आता ह्या श्लोकात सात महर्षि, चार ऋषि, आणि चौदा मनुं चा उल्लेख केला आहे.

7व्या अध्यायातील सुरवातीच्या श्लोकात आपल्या सृष्टिची व्युत्पत्ती कशी झाली ते आपण जाणून घेतले. 7.6 मध्ये पृथ्वीची व्युत्पत्ती कशी झाली ते विस्ताराने पाहिले. 8 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकात ब्रह्मा चा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे कल्प ह्याबद्दल माहिती आलेली आहे.

हिरण्यगर्भ पासून पृथ्वी आकाश आणि पाणी निर्माण झाले.

स्वतः भगवान विष्णु हे पाण्यात काही काळ बसून होते. म्हणून त्यांचे नाव नारायण. नार म्हणजे पाणी.

नार +अयन =नारायण

आपो नरा इति प्रोक्ता आपो वै नरसूनवः।

अयनं तस्य ता पूर्वं तेन नारायणः स्मृतः॥ विष्णू पुराणातील ह्या श्लोकाचा मनुस्मृति मधे उल्लेख आहे. मनुस्मृति 1.10.

ब्रहमपुराणातील 180. 16 मधे थोड्या वेगळ्या शब्दात असेच वर्णन आहे.

भगवान विष्णुंचा पहिला अवतार म्हणजे सनकादि ऋषि (सनक +आदि) जे ब्रह्मा चे चार पुत्र

सनक, सनन्दन, सनातन व सनत्कुमार. ह्यांनाच चार ऋषी असे म्हणतात. त्यानंतर सात महर्षि.

वेद आणि पुराणे विशेषतः विष्णू पुराणातील माहिती नुसार सात महर्षि च्या नावात थोडा फरक आढळून येतो. वेदांमध्ये ह्यांना धर्म संरक्षक मानले आहे. उपनिषदात सुद्धा महर्षिंचा उल्लेख आढळतो.

वसिष्ठ विश्वामित्र अत्री भारद्वाज ह्या नावांचा संदेह नाही.

मानव जातीतील प्रथम पुरूष म्हणजे मनु. आपण सर्व मनु वंशज म्हणून मानव.

14 मनुं ची नावे खालील प्रमाणे -

1) स्वायम्भुव, (2) स्वारो‍‍चिष, (3) उत्तम, (4) तामस, (5) रैवत, (6) चाक्षुष, (7) वैवस्वत, (8) सावर्णि, (9) दक्षसावर्णि, (10) ब्रह्मसावर्णि, (11) धर्मसावर्णि, (12) रुद्रसावर्णि, (13) देवसावर्णि (14) इन्द्रसावर्णि

मन्वंतर म्हणजे मनु +अन्तर म्हणजे मनु चे वय.

14 मन्वंतर मिळून एक कल्प होतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की सात महर्षि, चार ऋषी आणि चौदा मनु हे सर्वजण माझ्या मनाच्या संकल्पनेतून निर्माण झाले ज्यांची माझ्यावर श्रद्धा आहे आणि ह्या जगातील लोक त्यांची प्रजा आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः।

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः।।10.7।।

यः मम एताम्‌ विभूतिम्‌ योगम्‌ च तत्त्वतः वेत्ति, सः अविकम्पेन योगेन युज्यते अत्र संशयः न।

 

यः जो

मम माझे

एताम्‌ एतद् ह्या

विभूतिम्‌ महिमा ऐश्वर्य

योगम्‌  योग

च आणि

तत्त्वतः वस्तुतः

वेत्ति, जाणणारा

विद् धातू माहीत असणे

सः तो

अविकम्पेन स्थिर राहून

कम्प् धातू थरथरणे कम्पन होणे

योगेन योग मुळे

युज्यते जोडून घेतो

युज् धातू जोडणे

अत्र येथे

संशयः न। संदेह नाही.

 

भक्त्याहमेकया ग्राह्य: श्रद्ध्य्चार्य प्रिय: सताम्।

श्रीमद्भागवतम् 11.14.21

केवळ माझ्या वर पूर्ण विश्वास ठेवून केवळ माझीच भक्ती करून भगवान पुरूषोत्तमाला प्राप्त करून घेता येईल.

ह्या श्लोकातील विभूति आणि योग हे शब्द महत्त्वाचे. विभूति म्हणजे परम शक्ति. आणि योग म्हणजे सुद्धा विलक्षण शक्ती. ह्या विभूतिंचा अनुभव तेव्हाच होतो जेव्हा आपण पूर्णपणे शरण गेलेलो असतो म्हणजेच आपण योगयुक्त होतो. परमेश्वराशी जोडले जातो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जो मनुष्य माझ्या ह्या शक्तिंना (विभूति आणि योग) जाणतो आणि अर्थात त्याचा ह्यावर गाढ विश्वास आहे म्हणजेच तो आता अनिश्चल भक्ती योगयुक्त आहे ह्यात शंकाच नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः।।10.8।।

अहम्‌ सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वम्‌ प्रवर्तते, इति मत्वा भाव-समन्विताः बुधाः माम्‌ भजन्ते।

 

अहम्‌ मी

सर्वस्य सर्वांचा

प्रभवः उत्पत्ती

मत्तः माझ्यापासून

सर्वम्‌ सर्व

प्रवर्तते, निर्माण होतात

प्र +वृत धातू होणे, प्रवृत्त होणे

इति

मत्वा समजून

मन् धातू समजणे

भाव-समन्विताः मग्न झालेला तल्लीन

भाव समन्वित

बुधाः बुद्धिमान

माम्‌ भजन्ते। मला भजतात

भज् धातू भजणे

 

आपण आधीच्या श्लोकांमधे कल्प म्हणजे काय ते वाचले आहे, त्याचा काळ किती मोठा आहे ते सुद्धा पाहिले आहे. खाली दिलेल्या श्लोकात थोडी वेगळी कल्पना मांडली आहे. 

यस्यैकनिश्वासितकालमथावलम्बय जीवन्ति लोमविलजा जगदण्डनाथाः।।

विष्णुर्महान् सैहयस्य कलाविशेषो।

गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि ।। (ब्रह्मसंहिता-5.48)

महविष्णूंच्या श्वास घेण्याने निर्माण झालेल्या रोमांतून, अनंत ब्रह्मांडातील प्रत्येक ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात आणि श्वास सोडल्यावर ते परत त्यांच्या मध्ये विलीन होतात.

यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं

यो विद्यास्तस्मै गोपायति स्म कृष्णः ।

गोपाल तपनि उपनिषद् 1.24

कृष्णानेच ब्रह्माला वेदांचे ज्ञान दिले आणि पूर्वीच त्याचा प्रसार केला.

ॐ अथ पुरुषो ह वै नारायणोऽकामयत प्रजाः सृजेयेति ।नारायण उपनिषद्

आणि त्यानंतर श्रीनारायणांना सृष्टि उत्पन्न करण्याची इच्छा झाली.

त्या पुढे असेही म्हटले आहे नारायणाद् ब्रह्मा जायते नारायणाद् प्रजापतिः प्रजायते नारायणाद् इन्द्रो जायते | नारायणादष्टौ वसवो जायन्ते नारायणादेकादश रुद्रा जायन्ते नारायणाद्द्वादशादित्याः।

श्रीनारायणांपासून ब्रह्मा, प्रजापति उत्पन्न झाले. त्यांच्या पासून इन्द्र आणि आठ वसु निर्माण झाले आणि त्यांच्याच पासून अकरा रुद्र आणि बारा आदित्य निर्माण झाले.

ह्या श्लोकाचा आता थोडक्यात अर्थ असा की

मीच सर्व गोष्टींचे उगम स्थान आहे, माझ्या पासूनच सर्व गोष्टींचा विकास होते, हे सर्व जाणणारे बुद्धिमान माझीच अत्यंत श्रद्धापूर्वक पूजा करतात.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्।

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च।।10.9।।

मत्‌ चित्ताः मत्‌ गत-प्राणाः च परस्परम्‌ बोधयन्तः माम्‌ कथयन्तः च नित्यम्‌ तुष्यन्ति रमन्ति च।

 

मत्‌ चित्ताः माझेच चिंतन करणारे

मयि चित्तं येषां ते

मत्‌ गत-प्राणाः मलाच प्राण समर्पित केलेले

च आणि

परस्परम्‌ ऐकमेकांचे

बोधयन्तः ज्ञान बोध झालेला

बुध+णिच प्रत्यय शतृ

माम्‌ मला

अस्मद् द्वि एव

कथयन्तः  कथन करताना

कथ् धातू सांगणे

च आणि

नित्यम्‌ नेहमी

तुष्यन्ति आनंदी होतात

तुष् धातू संतुष्ट होणे

रमन्ति । रमतात

रम् धातू रमणे

च आणि

ह्या श्लोकातील मत् गत-प्राणाः हा शब्द महत्त्वाचा. म्हणजे अक्षरशः स्वतःचे प्राण समर्पित करणे. म्हणजे इतकी श्रद्धा आणि इतकी भक्ती. नवविधा भक्तिप्रकारातील श्रवण किर्तन स्मरण ह्या प्रकारांची ओळख करून देणारा हा श्लोक.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ज्यांच्या कायमच मी मनात असतो, ज्यांनी आपले प्राण च मला समर्पित केले आहेत, जे एकमेकांशी आपल्या विचारांचे आदान-प्रदान करतात, वार्तालाप करतात ते नेहमीच ह्या आनंदात रमून गेलेले असतात.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते।।10.10।।

तेषाम्‌ सतत-युक्तानाम्‌ प्रीति-पूर्वकम्‌ भजताम्‌ तम्‌ बुद्धि-योगम्‌ ददामि येन माम्‌ ते उपयान्ति।

 

तेषाम्‌ त्यांचे

तद ष बव

सतत-युक्तानाम्‌ कायम जोडला गेलेला

सततयुक्ताः

प्रीति-पूर्वकम्‌ अव्यय प्रेमाने

भजताम्‌

भज् धातू

तम्‌ ते

तद द्वि एव

बुद्धि-योगम्‌

बुद्धि एवं योगः

ददामि देतो

दा धातू देणे

येन ज्याने

यद तृ एव

माम्‌ मला

अस्मद्

ते

तद

उपयान्ति।

उप +या धातू जाणे पोहोचणे

आतापर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग ह्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या श्लोकातील बुद्धियोग हा शब्द भक्तीयोग दर्शवितो.

स एष नेति नेत्यात्मागृह्योः।

(बृहदारण्यकोपनिषद-3.9.26)

आपल्या स्व प्रयत्नाने आपल्या बुदधिनुसार कोणीही परमेश्वराला समजून घेऊ शकत नाही.

 

यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः।अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम्।।

(केनोपनिषद्-2.3)

ज्यांना असे वाटते की ते आपल्या बुद्धि च्या जोरावर परमेश्वराला जाणून घेऊ शकतात, त्यांना खरे ज्ञान प्राप्त नाही होत. पण ज्यांना परमेश्वराला जाणून घेणे आपल्या कुवतीबाहेरचे वाटते त्यांनाच परमेश्वर समजतो.

दुसर्‍या अध्यायातील 49 व्या श्लोकात बुद्धियोग चा उल्लेख आला आहे. ज्यामधे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगतात की फळाची अपेक्षा न करता काम करण्याची जाणीव मनाला होणे म्हणजेच बुदधि च्या पातळीवर असा निर्णय घेणे म्हणजेच बुद्धियोग.

आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे जणू सूचित करताहेत की अशी बुद्धियोगाची कल्पना सुद्धा त्यांच्यामुळेच भक्तांना सुचते.

ते मला प्रेमपूर्वक भजणारे, कायम मला जोडले गेलेले, त्यांना मी बुद्धियोगचा मार्ग दाखवतो ज्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकतात.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः।

नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता।।10.11।।

तेषाम्‌ अनुकम्पार्थम्‌ अहम्‌ एव आत्म-भावस्थः अज्ञानजम्‌ तमः भास्वता ज्ञान-दीपेन नाशयामि।

 

तेषाम्‌ त्यांचे

अनुकम्पार्थम्‌ दया, विशेष कृपादृष्टी

अनुकम्पा अर्थम्, अनुकम्पायै इदं

अहम्‌ एव

आत्म-भावस्थः आत्म्यात वास केलेला

आत्मनि भावस्थः

अज्ञानजम्‌ अज्ञानाचे कारण

अज्ञानात जायते, न ज्ञानं

तमः तमस्

भास्वता

भास+वत्

भास धातू चमकणे

ज्ञान-दीपेन

ज्ञानं एव दिपः

नाशयामि। नाश

नश् धातू नाश होणे

आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण स्वतःच बुद्धियोगचा मार्ग दाखवतात असे म्हटले आहे. मात्र त्यासाठी भक्तांची समर्पित भावना आवश्यक आहे.

विशेषानुग्रहश्र्च ।। वेदांत दर्शन। 3.4.38।।

परमेश्वराची श्रद्धावान भक्तांप्रती विशेष कृपादृष्टी असते.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

त्यांच्यावर विशेष कृपादृष्टी दाखवण्यासाठी मी त्यांच्या अंतःकरणात वास करतो आणि अज्ञानाचा अंधकार ज्ञानरूपी दिव्याने नष्ट करतो.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अर्जुन उवाच

परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्।

पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम्।।10.12।।

अर्जुन उवाच - भवान्‌ परम्‌ ब्रह्म, परम्‌ धाम, परमम्‌ पवित्रम्‌ । शाश्वतम्‌, दिव्यम्‌ पुरुषम्‌, आदिदेवम्‌, अजम्‌, विभुम्‌।

 

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा।

असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे।।10.13।।

त्वाम्‌ सर्वे ऋषयः, देवर्षिः नारदः, असितः, देवलः, व्यासः तथा आहुः। (त्वं) स्वयम्‌ च एव मे ब्रवीषि।

 

अर्जुन उवाच -

भवान्‌

परम्‌ पर श्रेष्ठ

ब्रह्म, ब्रह्मन्

परम्‌ धाम, धामन् श्रेष्ठ स्थान

परमम्‌ पवित्रम्‌ । चोख, शुद्ध

शाश्वतम्‌,

दिव्यम्‌

पुरुषम्‌,

आदिदेवम्‌, आदिः देवः मूळ देव

अजम्‌, न जन्मलेला

न जायते इति अजः

विभुम्‌। व्याप्त

विभु

त्वाम्‌ आपले

सर्वे सर्व

ऋषयः,

देवर्षिः

नारदः,

असितः, (विशेष नाम) काळा

देवलः,

व्यासः

तथा आणि

आहुः। म्हणतात

ब्रू वच् धातू बोलणे

(त्वं) स्वयम्‌ च एव स्वतःच

मे ब्रवीषि। मला सांगत आहात.

 

ह्या श्लोकात काही नावे आली आहेत जसे व्यास, नारद, देवल आणि इतर ऋषी आणि देवर्षि.

काही पुराणांत आणि भागवतात देवल ह्या नावाचा उल्लेख आला आहे.

देवल (पहिला ) - :

हरिवंश पुराणातील हरिवंश पर्वातील अध्याय  ३ श्लोक ४४ व गरुण पुराणातील आचार काण्ड मधील अध्याय ६ प्रमाणे

देवर्षि देवल, ज्यांना असित किंवा असित देवल ह्या नावांनी ओळखले जाते. देवल ऋषि प्रत्यूष नावाच्या  वसुंचे पुत्र होते.

देवल (द्वितीय)  -:

श्रीमद भागवद के सहाव्या स्कंधातील सहाव्या अध्यायातील 20 व्या श्लोकाप्रमाणे                                     कृशाश्वों दार्चिषि भार्यायं धूमकेशं जीजनत। धीश गाया वेदशिरों देवल वमुन मनुम।।

दक्ष प्रजापति च्या धृश्णा नामक मुलीचा विवाह कृशाश्व ऋषि बरोबर झाला होता ज्यांच्या मुलाचे नाव देवल.

मागील काही अध्यायात आणि ह्या अध्यायातील मागील श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी आपल्या अद्भूत शक्ती आणि गूढ रहस्य ह्याबद्दल सांगितले.

आधीचे चार श्लोक ऐकून अर्जुन आता उघडपणे श्रीभगवानकृष्णाला सांगत आहे की आपण परम ब्रह्म आहात, आपणच श्रेष्ठ असे स्थान आहात जेथून सृष्टी निर्माण झाली. आपण अती पवित्र आहात. देवर्ष नारद, असित, देवल आणि व्यास ह्या सारख्या ऋषींनी म्हणून ठेवले आहे की आपण सनातन, आदी देव, दिव्य पुरूष, व्याप्त अजन्म असे आहात, जे तुम्ही स्वतः च मला पण सांगितले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वम्, एतत्, ऋतम्, मन्ये, यत्, माम्, वदसि, केशव,

, हि, ते, भगवन्, व्यक्तिम्, विदुः, देवाः, , दानवाः।।14।।

हे केशव! यत्‌ माम्‌ वदसि, एतत्‌ सर्वम्‌ ऋतम्‌ मन्ये। हे भगवन्‌! ते व्यक्तिम्‌ न देवाः न हि दानवाः विदुः ।

 

हे केशव!

यत्‌ यद् (नपु) जे

माम्‌ मला

वदसि, सांगितले

वद् धातू बोलणे

एतत्‌ एतद् ते

सर्वम्‌ सर्व

ऋतम्‌ ऋ पूर्ण सत्य

मन्ये। मान्य करतो

मन् धातू समजणे

हे भगवन्‌!

ते युष्मद् ष. एव. ते (सर्व)

व्यक्तिम्‌

न देवाः देव नाही

न हि दानवाः दानव सुद्धा नाही

विदुः ।समजू शकत

विद् धातू जाणणे

4थ्या अध्यायातील 6व्या श्लोकात मी अजः आहे, अविनाशी आहे, सर्व जीवांचा ईश्वर आहे आणि मी माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार प्रकट होतो असे स्वतः श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहे. त्यांची सर्व रूपे ओळखणे तसे कठीणच.

देवीभागवतपुराणात भगवान ह्या शब्दाची व्याख्या सांगितली आहे.

ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रीयः।

ज्ञानवैराग्योश्चैव सन्नाम भगवान्नीह ।।

"भगवान म्हणजे शक्ति, ज्ञान, सौंदर्य, कीर्ति, ऐश्वर्य आणि वैराग्य"।

आधीच्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णाचे स्वरूप ओळखून भगवंतांचे वर्णन यथार्थ शब्दात करायला सुरुवात केली. आता त्यापुढे अर्जुन असे म्हणतो की

हे केशव

आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी मला पूर्णपणे मान्य आहेत. (मनात कोणतीही शंका नाही).

परमेश्वरा..

आपले खरे स्वरूप ना देव ना दानव नीट समजू शकत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।

भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥15।।

हे पुरुषोत्तम! भूत-भावन, भूत-ईश, देव-देव, हे जगत्‌-पते ! हे पुरुषोत्तम! त्वम्‌ स्वयम्‌ एव आत्मना आत्मानम्‌ वेत्थ।

 

हे पुरुषोत्तम!

भूत-भावन, जीवांचा निर्माता

भू धातू होणे

भूत-ईश, भूतानां ईशः भूतांचा ईश्वर

देव-देव, देवानां देवः देवांतील श्रेष्ठ

हे जगत्‌-पते ! जगतः पतिः जगाचा स्वामी

हे पुरुषोत्तम!

त्वम्‌ आपण

युष्मद् षष्ठी एव

स्वयम्‌ एव स्वतःच

आत्मना आत्मानम्‌ आपण आपले

आत्मन्

वेत्थ।जाणता

विद् धातू जाणणे

वदन्ति तत्तत्त्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयम् |

ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते ||श्रीमद्भागवत 1.2.11

परमसत्य चा अनुभव तीन प्रकारे केला जातो. – निराकार ब्रह्म, अन्तर्यामी परमात्मा किंवा भगवान् |

यस्मात् परं नापरमस्ति कश्चिद् ।

(श्वेताश्वतरोपनिषद्-3.9)

भगवानांच्या पलिकडे काहीही नाही.

आधीच्या श्लोकात अर्जुनाने असे म्हटले आहे की भगवंतांना देव आणि दानव कोणीही ओळखू शकत नाही. आता ह्या श्लोकात अर्जुनाला असे म्हणायचे आहे की स्वतः भगवानच स्वतःला चांगले ओळखतात.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे पुरुषोत्तम

सर्व जीवसृष्टी उत्पन्न करणारा, सर्व भूतांचा ईश्वर, ह्या जगाचा स्वामी, सर्व देवांमधील देव आपण स्वतःच स्वतःला चांगले ओळखता.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।

याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥10.16 ।।

त्वम्‌ याभिः विभूतिभिः इमान्‌ लोकान्‌ व्याप्य तिष्ठसि हि दिव्याः आत्म-विभूतयः अशेषेण वक्तुम्‌ अर्हसि।

 

त्वम्‌ आपण

युष्मद् प्र एव

याभिः ज्यांच्यामुळे

यद् स्त्री. तृ बव

विभूतिभिः विभूति

इमान्‌ हे

इदम् द्वि. बव

लोकान्‌ लोक

व्याप्य व्यापलेले

वि+आप् धातू मिळणे, व्याप्त करणे

तिष्ठसि स्थापित असलेले

स्था धातू उभे राहणे

हि

दिव्याः दिव्या

आत्म-विभूतयः स्वतःची दिव्य शक्ती

आत्मनः विभूतिः

अशेषेण (वि) काहीही न वगळता

न शेष

वक्तुम्‌ कथन

तुमुन् प्रत्यय वच् धातू बोलणे

अर्हसि। कृपा करावी

अर्ह धातू पूजा करणे.

श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे विविध प्रकारचे नाते होते, त्यापैकी गुरू आणि शिष्य हे नाते महत्वाचे.

संस्कृत भाषेत शिकवणाऱ्या व्यक्तीसाठी निरनिराळे शब्द आहेत. जसे शिक्षक जो अभ्यासक्रम शिकवतो. गुरू शब्दाचा दुसरा अर्थ मोठा. दोन्ही अर्थांचा एकमेकांशी संबंध आहे. एखादी गोष्ट मोठी करून सांगणारा, एखाद्या गोष्टीचा गूढ अर्थ सांगणारा तो गुरू. आचार्य म्हणजे स्वतःच्या आचरणातून शिकवणारे.

आधीच्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णाचे थोरपण मान्य केले आहेच आता अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की आपण आपल्या ज्या दिव्य सामर्थ्याने ह्या जगाला व्यापून टाकले आहे त्या श्रेष्ठ शक्तींचे संपूर्णपणे वर्णन करण्यास केवळ आपणच समर्थ आहात, म्हणून कृपया कथन करा.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्।

केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया।।10.17।।

योगिन्‌! कथम्‌ सदा परिचिन्तयन्‌ त्वाम्‌ अहम्‌ विद्याम्‌ ? हे भगवन्‌! केषु केषु च भावेषु मया चिन्त्यः असि?

 

योगिन्‌!

कथम्‌ (अव्यय) कसे

सदा  (अव्यय) नेहमी

परिचिन्तयन्‌ चिंतन करणे

परि + चिन्त् धातू

त्वाम्‌ आपल्याला

युष्मद् द्वि एव

अहम्‌ मी

विद्याम्‌ ? समजू शकतो

विद् धातू माहीत करुन घेणे

हे भगवन्‌!

केषु केषु कसे

किम् सप्तमी बव.

भावेषु रुप

भाव

मया माझ्या कडून

अस्मद् तृ एव

चिन्त्यः चिन्त् यत

असि? चिंतन केले जाईल

अस् धातू असणे

ह्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णाला योगिन् असे संबोधले आहे, त्यामुळे चिंतन ह्या शब्दाचा अर्थ विचार करणे असा फक्त न घेता ध्यान करणे असा पण घेता येईल. म्हणजेच जो कोणी ध्यानधारणा करतो तो परमेश्वराच्या रुपाचे, त्यातून उत्पन्न होणाऱे भाव मनात ठेवू शकतो. म्हणजेच स्वतःला परमेश्वराशी जोडून घेणे.

भाव ह्या शब्दाचा अर्थ भगवंताची निरनिराळी रुपे असाही घेता येईल.

आधीच्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना विनंती केली होती कि तुम्हीच स्वतः बद्दल मला सर्व काही उलगडून सांगा. आता पुढे अर्जुन असे म्हणतो की

हे योगिन् मी आपले सतत चिंतन करत असताना मी तुम्हाला कसे जाणून घेऊ? तुम्हाला कोणकोणत्या रूपात, भावांत जाणून घेऊ?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।

भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम्।।10.18।।

हे जनार्दन! आत्मनः योगम्‌ विभूतिम्‌ च भूयः विस्तरेण कथय। हि अमृतम्‌ शृण्वतः मे तृप्तिः न अस्ति।

 

हे जनार्दन!

आत्मनः आत्मन्

योगम्‌ योग

विभूतिम्‌ विभूति महिमा

च आणि

भूयः पुन्हा

भूयस् अव्यय

विस्तरेण विस्तृत

वि +स्तृ धातू पसरणे विस्तार होणे

कथय। वर्णन करावे

कथ् धातू सांगणे

हि (अव्यय) कारण

अमृतम्‌ अमृत

शृण्वतः ऐकताना

श्रु धातू

मे माझे

अस्मद् ष एव

तृप्तिः

न अस्ति।

अस् धातू असणे

आता अर्जुनाची श्रीभगवानकृष्णांना जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे.

वयं तु न वितृप्याम उत्तमश्लोकविक्रमे।

यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे।(श्रीमद्भागवतम्-1.1.19)

श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांची नुसती स्तुतीपर वर्णने ऐकून तृप्ती होत नाही. पण जे श्रीभगवानकृष्णांशी जोडले गेले आहेत, म्हणजेच एकरूप झाले आहेत त्यांना पदोपदी कृष्णलीलांचे वर्णन ऐकून समाधान मिळते.

हे जनार्दन

आपली योगशक्ती आणि ऐश्वर्य ह्याबद्दल मला पुन्हा पुन्हा विस्ताराने सांगा कारण आपले अमृतवचन (एकदाच) ऐकून माझे काही समाधान होत नाहीये.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री भगवानुवाच

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः।

प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे।।10.19।।

श्रीभगवानुवाच - हन्त हे कुरु-श्रेष्ठ!, दिव्याः आत्म-विभूतयः प्राधान्यतः ते कथयिष्यामि, हि मे विस्तरस्य अन्तः न अस्ति।

 

श्रीभगवानुवाच

हन्त अव्यय हो

हे कुरु-श्रेष्ठ!,

दिव्याः दिव्य

आत्म-विभूतयः स्वतःचा महिमा

आत्मनः विभूतिः

प्राधान्यतः मुख्यत्वे निवडक

प्राधान्य तस् प्रत्यय

ते तुला

युष्मद् च एव

कथयिष्यामि, सांगेन

कथ् धातू सांगणे

हि अव्यय नक्की

मे माझी

अस्मद् ष एव

विस्तरस्य अनेक स्तर

स्तरस्य उपरि स्तर. विस्तर ष एव

अन्तः अव्यय शेवट

न अस्ति। असत नाही

अस् धातू असणे

 

प्रत्येक व्यक्ति आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असते. घरामध्ये सुरवातीला मुलगा, मग पती, पिता, मित्र, शेजारी, कामाच्या ठिकाणी त्याची निर्माण झालेली निरनिराळी नाती, त्याचे सामाजिक स्थान अशा असंख्य भूमिका तो निभावत असतो. प्रत्येकजण त्याला आपापल्या नात्याप्रमाणे ओळखत असतो. म्हणजेच एखाद्याला आपण पूर्ण ओळखतो असे म्हणणे धाडसाचे ठरेल. इथे तर प्रत्यक्ष श्रीभगवानकृष्ण. त्यांची असंख्य रूपे. त्याबद्दल स्वतः सांगणे आणि अर्जुनाने (म्हणजे आपण सर्व) ते पूर्णपणे समजून घेणे फारच अवघड.

अगदी मुक्ती मिळाली तरी त्याचे पाच प्रकार सांगितले आहेत ज्याचे अर्थ निरनिराळे आहेत. 1.सालोक्य म्हणजे देवलोक प्राप्त होणे. 2. सार्ष्टि म्हणजे देवासारखे ऐश्वर्य प्राप्त होणे. 3. सारूप्य म्हणजे देवाचे रूप प्राप्त होणे. 4. सामीप्य म्हणजे देवाच्या निकट जाणे आणि 5. सायुज्य म्हणजे देवाशी एकरूप होणे.

 

रामचरितमानस मध्ये म्हटल्याप्रमाणे

हरि अनन्त हरि कथा अनन्ता।

भगवान आणि त्याच्या लीला अनंत आहेत.

 

यो वा अनन्तस्य गुणाननन्ताननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः। रजांसि भूमेर्गणयेत् कथञ्चित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः।।

(श्रीमद्भागवतम्-11.4.2)

जे लोक भगवानांचे गुण मोजायला जातात ते मंदबुद्धीच म्हणावे लागेल. एकवेळ जमिनीवर विखुरलेल्या वाळू चे कण मोजता येतील पण भगवंताची रूपे नाही मोजता येणार.

म्हणूनच श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणत आहेत की

माझ्या दिव्य शक्तींचे अनेक स्तर आहेत पण हो त्यातील काही निवडक गोष्टी मी तुला नक्की सांगेन.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च।।10.20।।

हे गुडाका-ईश! अहम्‌ आत्मा, सर्व-भूत-आशय-स्थितः, अहम्‌ भूतानाम्‌ आदिः च मध्यम्‌ च अन्तः च एव।

 

हे गुडाका-ईश!

अहम्‌ मी

आत्मा, आत्मन्

सर्व-भूत- सर्व लोक

आशय-

आ+शी धातू झोपणे

स्थितः,

स्था धातू स्थापित करणे

अहम्‌

भूतानाम्‌ भूत ष बव

आदिः सुरवात

मध्यम्‌

अन्तः

च एव।

आपल्या दिव्य शक्तीबद्दल सांगायला सुरुवात करताना श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला गुडाकेश ह्या विशेषणाचा वापर करून एक वेगळीच उंची गाठली आहे. गुडाक +ईश.

गुडाकेश चा एक अर्थ चांगले केस

गुडाका म्हणजे निद्रा

निद्रेचा स्वामी म्हणजे गुडाकेश, ज्याने निद्रेवर विजय मिळविला आहे असा म्हणजेच जागरूक. निद्रा म्हणजे अंधकार, अज्ञान.

श्रीभगवानकृष्ण हेच ह्या जगाच्या उत्पत्तीचे कारण, सर्व जीवांचे पालनपोषण करणारे तेच आणि ह्या सृष्टीच्या विनाशाचे कारण पण तेच. असे अर्थ सांगणारे श्लोक आधी आपण वाचले आहेत.

यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति ।

यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति।

(तैत्तरीयोपनिषद-3.1.1)

भगवानांपासून सर्व जीवांचा उत्पत्ति झाली, सर्व जीवांमधे भगवान वसलेले आहेत. आणि सर्व जीव भगवानांच्यात लीन होऊन जातील.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

सर्व जीवांचा आरंभ, मध्य आणि अंत मीच आहे. सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात, आत्म्याच्या रूपांत मीच स्थानबद्ध आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान्। मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी।।10.21।।

अहम्‌ आदित्यानाम्‌ विष्णुः, ज्योतिषाम्‌ अंशुमान्‌ रविः, अहम्‌ मरुताम्‌ मरीचिः, नक्षत्राणाम्‌ शशी अस्मि ।

 

अहम्‌ मी

आदित्यानाम्‌ आदित्य

विष्णुः, सर्वव्यापी

विष् धातू व्यापणे पसरणे

ज्योतिषाम्‌ ज्योतिष् स्वयंप्रकाशित

ज्योत, ज्युत् धातू प्रकाशणे

अंशुमान्‌ अंशुमत्

अंशु किरण

अश् धातू खाणे, पसरणे

रविः,

अहम्‌

मरुताम्‌ मरूत्

मरीचिः, मरीचि किरण, प्रभा

नक्षत्राणाम्‌ नक्षत्र

नक्ष् धातू जाणे

शशी शशीन्

अस्मि । आहे

अस् धातू असणे

अदिती आणि कश्यप ऋषीं चे बारा सुपुत्र [धाता, मित्र, अर्यमा, शंकरा,(रूद्र) वरूण, अंश, भाग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा (विश्वकर्मा) और वामन (त्रिविक्रम)] आपल्याला माहीत आहेतच. अदिती चे पुत्र आदित्य.

तिकडे दिती ला झालेल्या पुत्रांना मरूत असे संबोधले जाते.

मरूतांची सात नावे वेदांत सांगितली आहेत. त्यांची नावे पुढिलप्रमाणे -

आवह, प्रवह, संवह, उद्वह, विवह, परिवह और परावह,

हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दिशांना भ्रमण करत असतात. जसे ब्रह्मलोक , इन्द्रलोक ,अंतरिक्ष आणि भूलोकाच्या चार दिशा.

ह्या मरूतांना, मरुद्गण ( मरुत गण) असे सुद्धा म्हटले जाते.

हे मरूत पंचमहाभूतांच्या देवतांच्या कामात मदत करतात.

चारी वेदांत मिळून मरुद्देवता बद्दल 498 मंत्र सापडतात.

 

ते अज्येष्ठा अकनिष्ठास उभ्दिदो

अमध्यमासो महसा विवावृधु:। (ऋ. 5.59.6)

हे मरुत् श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही, आणि मध्यम सुद्धा नाही. ते सर्व समान आहेत.

वामन पुराणातील  71 वा अध्याय आणि  शिवपुराणात (2.3.14) मरूतांचा उल्लेख सापडतो.

मरूत म्हणजे वारा.

कालिदासाच्या रघुवंश च्या श्लोक 5.27 मध्ये मरूतांचा उल्लेख आहे.

त्यानंतर उल्लेख आहे स्वयंप्रकाशित तार्‍यांचा म्हणजे अर्थातच सूर्याचा. ब्रह्मसंहितेत स्वयंप्रकाशित सूर्याचा उल्लेख परमात्म्याचे डोळे असा केला आहे. सूर्योदय झाला की अंधार नष्ट होतो. सर्व काही स्वच्छ दिसू लागते.

रात्रीच्या वेळी मात्र चंद्र हाच सर्वात तेजस्वी, खरेतर तो पृथ्वीचा ग्रह पण येथे त्याला नक्षत्र असे संबोधले आहे.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

मी आदित्यांपैकी विष्णू आहे. स्वयंप्रकाशित असा अंशुमान सूर्य, मरूत गणांतील मरीचि आणि नक्षत्रांमधील चन्द्र आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः।

इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना।।10.22।।

वेदानाम्‌ सामवेदः अस्मि, देवानाम्‌ वासवः अस्मि, इन्द्रियाणाम्‌ मनः अस्मि, भूतानाम्‌ च चेतना अस्मि।

 

वेदानाम्‌ सामवेदः

वेदात सामवेद

साम् धातू समाधान देणे

अस्मि, आहे

देवानाम्‌ वासवः

देवात वासव (वसु)

अस्मि,

इन्द्रियाणाम्‌ मनः

इन्द्रियात मनस्

इन्द् धातू पराक्रमी असणे

इन्द् पासून इन्द्र, इन्द्रिय कार्यक्षमता दर्शविते

अस्मि,

भूतानाम्‌ च चेतना

भूत चेतना

अस्मि।

ह्या श्लोकात काही शब्द षष्ठी बहुवचनी आणि काही प्रथमा एकवचनात दिले आहेत.

येथे सामवेदाचा उल्लेख केला आहे. सामवेदात एकूण 1900 श्लोक आहेत, जे ऋग्वेदातून घेतलेले आहेत. मग ह्या दोन्ही मध्ये फरक काय? जर ऋग्वेद कविता असेल तर सामवेद गाणे आहे. जर ऋग्वेद ज्ञान असेल तर सामवेद त्याचा अनुभव आहे.

वैदिक तत्वज्ञानातील समजुती प्रमाणे 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि इन्द्र व प्रजापति अशी देवतांची नावे आहेत.

वसु म्हणजे वसलेले. पृथ्वीला सुद्धा वसुधा, वसुंधरा अशी नावे आहेत.

स्कंद, विष्णु आणि हरिवंश पुराणानुसार 8 वसुंची नावे 1. आप, 2. ध्रुव, 3. सोम, 4. धर, 5. अनिल, 6. अनल, 7. प्रत्यूष और 8. प्रभाष

भागवत पुराणानुसार- द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु और विभावसु अशी वसुंची नावे आहेत. हे आठ वसू इंद्र आणि विष्णूचे रक्षक देव मानले जातात.

रक्ष् धातू रक्षण करणे.

स्कंद पुराणानुसार महिषासुर मर्दिनी दुर्गेच्या हाताची बोटे आठ वसुंच्या तेजाने निर्माण झाली होती.

आपली सर्व इन्द्रिय मनाच्या आदेशानुसार चालतात. अगदी शेजारी उभ्या असलेल्या माणसाने बोललेले आपल्याला ऐकू येत नाही जर आपले लक्ष नसेल तर. आपण त्याला म्हणतो, परत सांग माझे लक्ष नव्हते. म्हणजेच सर्व इन्द्रियांमधे मन सर्वात श्रेष्ठ.

आणि चेतना म्हणजे प्राणशक्ति.

आता ह्या श्लोकाचा अर्थ अगदीच सोपा आहे.

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवतांमधील वसु मी आहे. सर्व इन्द्रियांमधील मन मी आहे. आणि सर्व जीवातील चेतना मी आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्।

वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्।।10.23।।

रुद्राणाम्‌ शङ्करः अस्मि, यक्ष-रक्षसाम्‌ च वित्त-ईशः, अहम्‌ वसूनाम्‌ पावकः, शिखरिणाम्‌ मेरुः च अस्मि।

 

रुद्राणाम्‌ शङ्करः

रुद्र शंकर

रुद् धातू रडणे

अस्मि, आहे

यक्ष-रक्षसाम्‌ च

यक्षः च रक्षस् च

रक्ष धातू रक्षण करणे

वित्त-ईशः, धनसंपत्ती चा स्वामी

वित्तस्य ईशः

अहम्‌ मी

वसूनाम्‌ पावकः,

वसू

पावक अग्नी

शिखरिणाम्‌ मेरुः च

शिखरिन् मेरु

अस्मि।

आधीच्या श्लोकात आपण 8 वसुंची माहिती घेतली. आता रूद्र म्हणजे काय ते नीट समजून घ्यायला हवे.

सृष्टित घडणारे निरनिराळे बदल आणि अस्तित्वात असणारी अपुरी शास्त्रीय माहिती ह्या पार्श्वभूमीवर रुद्र हि संकल्पना निर्माण झाली. अचानक उद्भवणारी संकटे जसे साथीचे रोग, मुलांचे आजार, टोळधाड, महापूर ह्यांचा रुद्राच्या अस्तित्वाशी संबंध जोडण्यात आला. रुद् रोदयति म्हणजे रडविणारे. कालांतराने ह्या समस्यांचे निवारण करणारे सुद्धा रूद्र च. म्हणून  रुद्र, शर्व, उग्र व अशनी ही त्याची चार नावे त्याच्या रौद्र, संहारक रूपाची, तर भव, पशुपती, महादेव व ईशान ही चार नावे त्याच्या शांत, मांगलिक व जगत्प्रतिपालक रुपाची प्रतीके मानली जाऊ लागली.

खरे तर सृष्टीची उत्पत्ती आणि विनाश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. नवीन निर्माण होण्यासाठी आधीच्या गोष्टी नष्ट व्हाव्या लागतात. निसर्ग नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतो हे अगदी आजच्या काळातसुद्धा दिसून येते.

श्वेताश्वतर उपनिषदात रुद्रास सृष्टीची सर्वश्रेष्ठ देवता म्हटले आहे.

भक्तिसंप्रदायाचा व शिवोपासनेचा हे उपनिषद आद्यग्रंथ मानले जाते.

यक्षांचा स्वामी कुबेर आपल्या गडगंज संपत्ती साठी प्रसिद्ध आहे.

आपल्याला सहा ऋतू माहित आहेत. आणखी दोन ऋतू आपल्या आतमध्ये असतात ते म्हणजे सुख आणि दुःख. ह्या 8 ऋतूंचे स्वामी म्हणजे 8 वसू असे म्हणतात.

मेरू पर्वत आज कुठे आहे ते नक्की माहित नसले तरी ते एक सर्वोच्च शिखर संपत्तीचे भांडार आहे अशी मान्यता आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

मी रुद्रा मधला शंकर आहे. (शंकर शम करोति। शमन करणारा.)

मी यक्षांमधला कुबेर आहे. वसू मधला अग्नी आहे आणि सर्व शिखरांमधील मेरू पर्वत आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्।

सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः।।10.24।।

हे पार्थ! माम्‌ पुरोधसाम्‌ मुख्यम्‌ बृहस्पतिम्‌ विद्धि, अहम्‌ सेनानीनाम्‌ स्कन्दः, सरसाम्‌ सागरः च अस्मि।

 

हे पार्थ!

माम्‌।

पुरोधसाम्‌ समस्त पुरोहितांमधे

पुरोधस् ष बव

मुख्यम्‌ मुख्य

बृहस्पतिम्‌  बृहस्पति

विद्धि, जाणून घे

विद् धातू माहीत करुन घेणे

अहम्‌ मी

सेनानीनाम्‌ सेनानी

स्कन्दः, स्कंद विशेष नाम

सरसाम्‌ जलाशय

सरस् नपु ष बव

सागरः

च अस्मि।

अस् धातू असणे

 

वेदोत्तर साहित्यानुसार अंगिरा ऋषिंचे पुत्र बृहस्पतिंना  देवतांचे  पुरोहित असे मानतात. बृहस्पतींनी धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्या विषयावर ग्रंथ लिहिले. ८० श्लोकाची  बृहस्पति स्मृति उपलब्ध आहे.

बृहस्पतिंना देवतांचे गुरु असे म्हणतात. ते रक्षोघ्न मंत्राचे उच्चारण करून देवतांचे रक्षण आणि पोषण करतात असा ऋग्वेदात – मण्डल ४ सूक्तं ४.४  तैत्तिरीयसंहिता(विस्वरः)/काण्ड १/प्रपाठकः २ अनुवाक १४ उल्लेख आहे.

शिवपुत्र भगवान कार्तिकेय ह्यांना स्कन्द ह्या नावाने ओळखले जाते. ते सर्व देवतांचे महासेनानायक समजले जातात.

स्कन्द् धातू शोषण करणे.

सिंधूसागर म्हणजे आजचा अरबी समुद्र ह्याची महती काय वर्णावी? भगवान विष्णुंचे निवास स्थान म्हणजे क्षीरसागर. भर्तृहरिंच्या एक श्लोक जो सागराच्या परोपकाराचे वर्णन करतो तो खूप प्रसिद्ध आहे. त्या श्लोकातील एक उल्लेख म्हणजे वडवानल म्हणजे पाण्यातील अग्नी. (दावानल म्हणजे वनातील अग्नी.) अनल म्हणजे अग्नी, अष्ट वसूंपैकी एक.

धरो ध्रुवश्च, सोमश्च, अहश्चैवानिलोअनत:। प्रत्यूषश्च प्रभासश्च, वसवो अष्टाविति स्मृता:॥

पाण्यातील अग्नी म्हणजे आप-इंधन. हे कसे समजून घ्यायचे? पाण्याचा हायड्रोजन गॅस हा एक घटक आहेच ज्यापासून बाॅम्ब तयार होतो. पावसाळ्यात वीज चमकून आग लागू शकते ह्यावरून पाण्यातील उर्जेची कल्पना येते.

आपल्या जेवणातील मीठाचा एकमेव स्त्रोत.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे पार्थ तू जाणून घे

मी समस्त पुरोहितांमधील बृहस्पति, सर्व सेनानींमधे कार्तिकेय,आणि सर्व जलाशयात सागर आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।

यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

अहम्‌ महर्षीणाम्‌ भृगुः, गिराम्‌ एकम्‌ अक्षरम्‌ अस्मि, यज्ञानाम्‌ जप-यज्ञः, स्थावराणाम्‌ हिमालयः अस्मि।

 

अहम्‌ मी

महर्षीणाम्‌ भृगुः,

महान् ऋषिः

गिराम्‌ गिर् ष बव

गॄ धातू उच्चारण करणे

एकम्‌ एक

अक्षरम्‌ अक्षर

अस्मि,

यज्ञानाम्‌

जप-यज्ञः,

जपः एव यज्ञः

स्थावराणाम्‌

स्थावर

हिमालयः

अस्मि।

भृगु ऋषी हे स्वतः ब्रह्मपुत्र आणि लक्ष्मी चे पिता, त्यांनी लिहिलेली भृगु संहिता सर्वांना माहित आहेच. म्हणजेच भृगु ऋषींना भूतकाळात आणि भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांची माहिती होती.

याशिवाय भृगु स्मृति' (आधुनिक मनुस्मृति), ''भृगु संहिता' (शिल्प), 'भृगु सूत्र', 'भृगु उपनिषद', 'भृगु गीता' इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले.

पृथ्वीवर अग्नी प्रज्वलित करण्याची कला भृगु ऋषींनी शिकवली असे म्हणतात.

 

गॄ धातू उच्चारण करणे. ह्यावरून गिरवणे हा शब्द आला असावा कारण पूर्वी लिहिले जात नव्हते तर पुन्हा पुन्हा म्हणून पाठ केले जात असे. (गीर्वाण) गिरा म्हणजे वाणी.

हिंदू धर्माच्या समजूतीप्रमाणे ॐ ला ब्रह्मांडाचे प्रणव अक्षर मानले जाते, त्यानंतर ब्रहमांडाची उत्पत्ती झाली. ॐ मधील पहिले अक्षर '' जे आपल्या नाभी पासून उत्पन्न होते, ब्रह्मा शी संबंध दर्शविते. दुसरे अक्षर '' आपल्या अंतःकरणातून उत्पन्न होते आणि ते विष्णू शी संबंध दर्शविते. '' आपल्या कंठातून उत्पन्न होऊन शिवा शी संबंध दर्शविते.

 "ओम ख़म ब्रह्म " यजुर्वेद ४० / १७ - ओम सर्वत्र व्याप्त परम ब्रह्म आहे.

ॐ चा जप करणे फारच उपयुक्त.

आणि हिमालयाची महती काय वर्णावी? शुद्ध आणि पवित्र पाण्याचा स्त्रोत, विविध प्राणी पशुपक्षी वनस्पती आणि खनिजे आणि ह्या सर्वांच्या पलिकडे महान तपस्वीं मुळे निर्माण झालेल्या अध्यात्मिक शक्तिंचे वलय.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सर्व महान ऋषीं मध्ये मी भृगु ऋषी आहे. तर पुन्हा पुन्हा उच्चारण केल्या जाणाऱ्या मंत्रामधले ॐ अक्षर मी आहे. सर्व यज्ञांमधे जप मी आहे आणि स्थिर गोष्टीमधला सर्वात ऊंच असणारा हिमालय मी आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।

गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः।।10.26।।

सर्व-वृक्षाणाम्‌ अश्वत्थः, देवर्षीणाम्‌ च नारदः, गन्धर्वाणाम्‌ चित्ररथः, सिद्धानाम्‌ कपिलः मुनिः ।

 

सर्व-वृक्षाणाम्‌ सर्व वृक्षात

सर्वे वृक्षाः

अश्वत्थः, वड

देवर्षीणाम्‌ देवऋषींमधे

देवानाम् ऋषिः

च नारदः, नारद

गन्धर्वाणाम्‌ गन्धर्व

चित्ररथः,

सिद्धानाम्‌ सिद्ध पुरुष

कपिलः मुनिः ।

पर्यावरण शास्त्राप्रमाणे देशी झाडे लावणे हितकारक. त्यातही वड पिंपळ आंबा चिंच (आणि इतर अनेक) हि महत्वाची झाडे.

वडाच्या झाडाचा उल्लेख आधीच्या अध्यायात सुद्धा आला आहे.

कोलकाता मध्ये असलेले सर्वात जुने वडाचे झाड 250 वर्षांपेक्षा जास्त जुने 5 एकर जागेत स्थित आहे. त्याच्या असंख्य फांद्या आणि त्यावर उगवणारी असंख्य फळे खारीसारखे आणि इतर प्राणी आणि पक्ष्यांना अन्न पुरवतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा वृक्ष. बोधीवृक्षाखालीच राजपुत्र सिद्धार्थ चा बुद्ध झाला.

 

ऊर्ध्वमूलोऽवाक्शाख एषोऽश्वत्थः सनातनः ।

तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते ।

तस्मिंल्लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन । एतद्वैतत् ॥ १ ॥कथा उपनिषद् 2.3.1

ज्याची मूळे वरच्या दिशेला आणि फांद्या जमिनीकडे आहेत असा सनातन वड, तेजःपुंज, अमर्त्य एकमेव ब्रह्म, ज्याच्या आश्रयाने समस्त जीव राहतात, त्याच्या पलीकडे काहीच नाही. हाच तो वृक्ष ज्याच्या शोधात तू आहेस.

 

नारदमुनींना कळलाव्या असे ओळखले जाते. पण ते तितकेसे खरे नाही. हिंदू शास्त्रानुसार ब्रह्मा च्या सात मानसपुत्रां पैकी एक, त्यांना देवर्षि म्हटले आहे.

वायु पुराणात देवर्षि कोणाला म्हणायचे ह्याचे वर्णन केले आहे. असे ऋषी ज्यांना देवलोकांत मानाचे स्थान आहे. अतिशय ज्ञानी, सत्यवचनी आणि कठोर तपस्येने प्राप्त झालेल्या बळाने, भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारे, सर्व लोकांत संचार करु शकणारे. श्रीनारदमुनींना आत्मज्ञानी, सत्यवचनी, जितेन्द्रिय, तपस्वी, कुशल वीणावादक असेच ओळखले जाते. महाभारतातील सभापर्व च्या पाचव्या अध्यायात नारदमुनींचे वर्णन केले आहे. नारद पुराणात जवळपास २२,००० श्लोक आहेत. नारदसंहितेत ज्योतिषशास्त्रातील  स्कन्ध-सिद्धांत, होरा और संहिता ह्यांचे विस्तृत विवेचन आहे. शिवाय नारद-पांचरात्र, नारद-भक्तिसूत्र, नारद-स्मृती असे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महाभारतात गंधर्व आणि अप्सरा यांचा उल्लेख येतो.

ऋग्वेदातील 8. 77. 5 आणि

1.162. 2 येथे गंधर्वांसंबंधी दोन व्याख्या सापडतात.

1.'गानुदकं धारयतीति गंधवोमेघ'

2.  'गवां रश्मीनां धर्तारं सूर्य।'

 

गंधर्व नावाची जमात संगीत आणि नृत्य कलांमध्ये पारंगत समजली जाते. देवतांना हे सोमरस पुरवित असत.

गंधर्व ह्या शब्दाचा उपयोग निरनिराळ्या संदर्भात केलेला दिसतो जसे यक्ष, राक्षस, पिशाच, सिद्ध, चारण, नाग, किंन्नर वगैरे.

अर्जुन आणि चित्ररथाची कथा सर्वश्रुत आहेच.

 

गीतेच्या दुसर्‍या अध्यायाचे नावच मुळी सांख्ययोग असे आहे. सांख्ययोग म्हणजे कपिल मुनी. आपल्याला कल्प ह्या शब्दाचा अर्थ चांगला माहीत आहे. प्रत्येक कल्प मध्ये कपिल जन्माला येतात आणि आणि जन्मापासूनच त्यांना सर्व सिदधी प्राप्त झालेल्या असतात. श्रीमद्भागवताच्या अनुसार श्रीविष्णूंच्या 24 अवतारांपैकी 5वा अवतार कपिल मुनींचा. कपिलवस्तु नगरीत गौतम बुद्धाचा जन्म झाला होता.

8व्या शतकातील जैन ग्रं्न्थ 'भगवदज्जुकीयम्‌' मध्ये सांख्य चा असा उल्लेख केला आहे.

 

अष्टौ प्रकृतय:, षोडश विकारा:, आत्मा, पंचावयवा:, त्रैगुण्यम, मन:, संचर:, प्रतिसंचरश्च,

(आठ प्रकृती, सोळा विकार, आत्मा, पाचअवयव, तीन गुण, मन, सृष्टि और प्रलय) म्हणजेच सांख्यशास्त्र.

कपिल मुनींचे काही महत्त्वाचे ग्रंथ

'सांख्य सूत्र', 'तत्व-समास', 'व्यास प्रभाकर', 'कपिल गीता', 'कपिल पंचराम', 'कपिल स्तोभ' आणि 'कपिल स्मृति'.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की

सर्व वृक्षांमधे मी अश्वत्थ, सर्व देवऋषींमधे नारद, गन्धर्वगणातील चित्ररथ, आणि सर्व सिद्ध पुरुषातील श्रेष्ठ कपिल मुनी.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्।

ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्।।10.27।।

अश्वानाम्‌ अमृत-उद्भवम्‌ उच्चैःश्रवसम्‌, गजेन्द्राणाम्‌ ऐरावतम्‌, नराणाम्‌ नराधिपम्‌ च माम्‌ विद्धि ।

 

अश्वानाम्‌

अश्व घोडा

अमृत-उद्भवम्‌. अमृतातून निर्माण झालेला

उच्चैःश्रवसम्‌, विशेष नाम

गजेन्द्राणाम्‌ हत्ती मधील

ऐरावतम्‌,

नराणाम्‌ नरांमधील

नराधिपम्‌  राजा

नरः+अधिप

अधि +पा धातू पालन करणे

माम्‌

विद्धि

विद् धातू जाणणे

 

उच्चैःश्रवा नावाचा घोडा चौदा रत्नापैकी एक, समुद्र मन्थन करत असताना मिळाला. पौराणिक कथेनुसार हा घोडा पांढर्‍या रंगाचा आणि सात मुखे असलेला असा घोड़ा होता जो इन्द्राला को प्राप्त झाला. काही ठिकाणी तो बलि राजाला प्राप्त झाला असेही म्हणतात. अश्वा मधला श्रेष्ठ, अतिशय वेगवान, सर्वांना ऐकू जाईल असा जो अमृता पासून निर्माण झाला.

गजेन्द्र म्हणजे श्रेष्ठ हत्ती. ऐरावत हत्ती सुद्धा समुद्र मंथनातून मिळाला. पांढर्‍या रंगाचा, चार सूळे असलेला हा हत्ती ऐश्वर्याचे प्रतिक आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की,

मी सर्व घोड्यांमधील उच्चैःश्रवस् आहे. गजेंद्रातील ऐरावत आणि नरांमधील (श्रेष्ठ) राजा आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्।

प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः।।10.28।।

अहम्‌ आयुधानाम्‌ वज्रम्‌, धेनूनाम्‌ कामधुक्‌ अस्मि, प्रजनः कन्दर्पः अस्मि, सर्पाणाम्‌ वासुकिः च अस्मि।

 

अहम्‌ मी

आयुधानाम्‌ शस्त्रांमध्ये

वज्रम्‌, वज्र

धेनूनाम्‌ धेनु दुभती गाय

कामधुक्‌ कामदुह् इच्छा पूर्ति करणारी

दुह् धातू दोहन करणे

अस्मि,

प्रजनः प्रजन पूर्वज

जन् धातू उत्पन्न करणे

कन्दर्पः कन्दर्प

दृप धातू अभिमान असणे

कं दर्पयामि

अस्मि,

सर्पाणाम्‌ सर्पामधे

वासुकिः 

च अस्मि।

वज्र म्हणजे अती कठोर, हिरा, वीज. दधीचि ऋषींच्या हाडापासून तयार झालेले हे शस्त्र त्यांच्या अध्यात्मिक शक्ती मुळे अतिशय प्रखर, कठोर.

हिंदू, बौद्ध व जैन मतांनुसार वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानले जाते. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत याला अविभाज्य स्थान आहे. वज्रासन माणसाचे शरीर सुदृढ बनवते.

कामदेवाचे दुसरे नाव कंदर्प. ब्रह्मदेवाचे हे पुत्र, एकदा ब्रह्मदेवाला विचारते झाले कां दारपयामि? म्हणजे मी कोणत्या गोष्टीचा गर्व करू? म्हणून ब्रह्मदेवांनी त्याचे नाव कंदर्प असे ठेवले.

तुलसीदासांनी श्रीरामांचे असे वर्णन केले आहे

कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।

पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।

कामधेनु सुद्धा समुद्र मंथनातून प्रकट झाली जिला ऋषिंनी ठेवून घेतली.

कश्यप ऋषी आणि कद्रु चा दुसरा पुत्र वासुकी, पहिला शेषनाग.

कद्रु पासून नागवंशाची सुरवात झाली. समुद्रमंथनाच्या वेळी पर्वतांना बांधण्यासाठी वासुकी चा दोरी म्हणून उपयोग करण्यात आला. वासुकी श्रीशंकरांच्या बोटाच्या भोवती वेटोळे करून बसलेला असतो. शिवाच्या धनुष्याचा दोरी म्हणजे वासुकी.

म्हणूनच श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगतात की

मी सर्व शस्त्रांमध्ये वज्र, इच्छा पूर्ण करणारी कामधेनु, पूर्वजांमधील प्रेमाचे प्रतीक असणारे, प्रजननाचे स्वामी कामदेव आणि सर्पांमधील वासुकी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।

पितृ़णामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्।।10.29।।

अहम्‌ नागानाम्‌ अनन्तः, यादसाम्‌ च वरुणः अस्मि, अहम्‌ पितॄणाम्‌ अर्यमा,संयमताम्‌ यमः च अस्मि ।

 

अहम्‌ मी

नागानाम्‌ नागांमधे

अनन्तः, अनंत

यादसाम्‌ यादस् जलचरांचा स्वामी

वरुणः वरूण देवता

वृ धातू आच्छादन करणे पसंत करणे

वृण धातू आनंदी होणे

अस्मि, आहे

अहम्‌ मी

पितॄणाम्‌ पितृ पिता

पा धातू रक्षण करणे

पितर म्हणजे पूर्वज

अर्यमा. अर्यमन्

संयमताम्‌ समस्त नियमांचा नियामक

सम +यम

यमः

च अस्मि ।

कश्मीर मधील अनंतनाग हे ठिकाण आपल्याला माहीत आहे. इतरही कश्मिर मधील काही ठिकाणांची नावे कमरू, कोकरनाग, वेरीनाग, नारानाग, कौसरनाग वगैरे अशी आहेत. आधीच्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी कद्रू च्या गर्भातून नाग वंशाची उत्पत्ति झाली त्यातील  प्रमुख 8 नाग - अनंत (शेष), वासुकि, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख और कुलिक. अनंतनाग ही नागवंशियांची राजधानी होती.

नाग ह्या शब्दाचा संस्कृत मधे अर्थ क्रमशः पर्वत, फणधारी सर्प आणि सिंदूर. ह्या तीनही गोष्टींना नाग संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.

योगाभ्यासाने कुण्डलिनी शक्ति जागृत करणे शक्य आहे जी सर्पाच्या रूपात दर्शविली आहे. महादेवांच्या गळ्यात सर्प असतोच.

दुसरा उल्लेख आहे वरुणदेवाचा.

ऋग्वेदात इन्द्र वरूण आणि सूर्य ह्या महत्वाच्या देवता आहेत.

प्र नूनं ब्रह्मणस्पतिर्मन्त्रं वदत्युक्थ्यम्। यस्मिन्निन्द्रो वरूणो मित्रो अर्यमा देवा ओकांसि चक्रिरे।। ..ऋग्वेद १/४०/५

जे मंत्र ब्रह्मणस्पती म्हणतात तेथे वरूण मित्र आणि अर्यमा वास करतात.

पाणी तिन्ही  म्हणजे बर्फ पाणी आणि वाफ ह्या स्वरूपात उपलब्ध आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यातच निर्माण झाली, त्यानंतर ती जमिनीवर पसरली. हे वेदिक काळात माहीत असावे म्हणूनच ऋग्वेदात वरूणदेवतेला महत्त्वाचे स्थान आहे. पाण्याचा अंश प्रत्येक सजीव गोष्टीत असतोच.

वरुणदेवाला नैतिकतेचा महान पुरस्कर्ता मानले गेले आहे. तो  ऋत (सत्य) चा पुरस्कर्ता आहे. बर्‍याच सूक्तांमधे वस्र्णदेवतेच्या प्रति उदात्त भक्तिभावना प्रकट केली आहे. पापक्षालन करणारा वरूणदेव ऋग्वेदात महत्त्वाचा देव आहे. ऋग्वेद च्या सातव्या मंडलात वस्र्णदेवासाठी सुंदर प्रार्थना गीत लिहीले आहे.

मात्र पुराणकाळात वरूणदेवाचे महत्त्व जलदेवता इतकेच उरले.

अर्यमन/अर्यमा नावाची प्राचीन देवता आहे जिचा उल्लेख ऋग्वेदात सापडतो. ह्याला अदिती चा तिसरा पुत्र मानतात.

वैशाख महिन्यातील सूर्याला अर्यमा असेही म्हणतात.

ते नू॒नं नो॒ऽयमू॒तये॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ।

नयि॑ष्ठा उ नो ने॒षणि॒ पर्षि॑ष्ठा उ नः प॒र्षण्यति॒ द्विषः॑ ॥10.126.3

वरूण, मित्र अर्यमा तुम्ही नक्कीच आमचे रक्षण कराल, पाप करण्यापासून परावृत्त कराल, शत्रू पासून रक्षण कराल.

 

आपल्या पुराणकथांनुसार पितरांचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक आपले मानव पितर आणि दुसरे दिव्य पितर, जे मृत्यू नंतर कर्मानुसार आत्म्याला गती देतात. यांचा स्वामी यम. ह्याशिवाय काव्यवाडनल सोम आणि अर्यमा असे इतर सदस्य आहेत. अर्यमा चा साधारण अर्थ साथी, सहयोगी. हे विषमता न करणारे, न्यायप्रिय असे मानले जातात. काही जाणकारांच्या मते अर्यमा वरून आर्य म्हणजे ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत असे..

आता ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

मी सर्व नागांमधील अनन्त आहे. सर्व जलचरांचा स्वामी वरूणदेव आहे आणि समस्त पितरांमधील अर्यमा आणि कठोर नियामक असा यम आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्।

मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्।।10.30।।

अहम्‌ दैत्यानाम्‌ प्रह्लादः, कलयताम्‌ च कालः अस्मि, अहम्‌ मृगाणाम्‌ च मृगेन्द्रः, पक्षिणाम्‌ च वैनतेयः ।

 

अहम्‌ मी

दैत्यानाम्‌ राक्षसांमधे

दित्याः पुत्राः

प्रह्लादः,

कलयताम्‌

कल शतृ प्रत्यय ष बव

कल धातू जाणे, मोजणे

कालः काल

अस्मि, आहे

अहम्‌ मी

मृगाणाम्‌ मृग जंगली प्राण्यातील

(मृ धातू मरणे

मृ +ग मरणाकडे जाणे

मृगया शिकार)

मृगेन्द्रः, मृगाणां इन्द्रः सिंह

पक्षिणाम्‌ पक्षीन्

वैनतेयः विनतायाः पुत्रः गरूड

राक्षस म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अक्राळविक्राळ रुपे येतात. पण असे राक्षस अस्तित्वात नाहीत. रक्ष धातू म्हणजे रक्षण करणे, त्यापासून राक्षस असे म्हटले तर राक्षस म्हणजे पुरेशी शक्ती असलेले पण आपल्या बळाचा गैरवापर करणारे असा घेता येईल. थोडक्यात दुर्जन. हिरण्यकशिपु राक्षसाचा पुत्र पण अंगी सज्जनांचे गुण असणारा श्रीविष्णूंचा निस्सीम भक्त, प्रल्हाद

प्रल्हादाच्या गोष्टीतून आपण काय शिकायचे? आयुष्यात कितीही अडथळे आले, अगदी सर्वात जवळच्या व्यक्तीने सुद्धा आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला तरी, स्वतः चा आत्मविश्वास जराही कमी होऊ न देता आपले लक्ष्य गाठण्यासाठी वाटेल ती दिव्य करायचे, आणि हे सर्व एकला चलो रे. कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता. दुर्जन आजूबाजूला असणारच आपण आपली सज्जनता सोडायची नाही.

न निश्चिदार्थाद्विरमन्ति धीराः ॥असे भर्तृहरिंनी सुद्धा म्हटले आहे.

म्हणजे धैर्यवान माणसे आपले उद्दिष्ट साध्य होई पर्यंत विश्रांती घेत नाहीत.

जो नक्की जातो, तो काळ (आठवणी जायला वेळ लागतो) काळ मोजता येतो. वेदकाळापासून कालगणना पृथ्वीच्या गतीवरून केली जाते, सूर्योदय, सूर्यास्त आणि एक वर्ष. काल प्रवाही आहे. निसटून जातो तो काळ. प्रत्येक क्षण हा गतकाळात तात्काळ विलीन होतो. आणि भावी क्षण, आताचा क्षण होतो. म्हणूनच काळाचे आपण प्रकार पाडले. ह्या भूत आणि वर्तमान क्षणांची बेरीज म्हणजे आपले वय. एकाच काळातील व्यक्ती पर आणि अपर (लहान मोठे) असतात, वृद्ध आणि तरुण असतात. भारतीय तत्वज्ञानात कालसंकल्पने विषयी महर्षि कणाद यांनी वैशेषिक दर्शनात विचार मांडले आहेत.

असा हा काळ कधी सुरू झाला आणि कधी संपणार, काहीच माहित नाही. म्हणून तो अनादी अनंत आहे. म्हणूनच म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

प्राण्यांच्या जगात राज्याभिषेक, मंत्रीमंडळ, श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नसते. प्रत्येक जण आपापल्या अंगभूत गुणांनुसार आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत असतो.

न अभिषेको, न संस्कार; सिंहस्या क्रियाते वणे

विक्रमार्जिता सत्वस्य स्वयंमेव मृगेंद्रता।।

जंगलात सिंहाचा कोणी राज्याभिषेक करत नाही, त्याचे कर्तृत्वच असे असते की तो आपोआपच राजा ठरतो.

 

अतिशय बुद्धिमान आणि शक्तीशाली असे गरूड पक्षाचे वर्णन केले जाते. कश्यप ऋषी आणि विनता हा पुत्र श्रीविष्णूंचे वाहन असून विनायक, गरुत्मत्, तार्क्ष्य, वैनतेय, नागान्तक, विष्णुरथ, खगेश्वर, सुपर्ण और पन्नगाशन अशी गरूडाची इतर नावे आहेत.

हा विशालकाय पक्षी आपल्या चोचीने हत्ती सुद्धा उचलू शकतो असे मानतात. ह्यांच्या पंखात प्रचंड ताकद असते, उडत असताना सामवेदाच्या ऋचा ऐकू आल्याचा भास होतो असे म्हणतात. हिन्दू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मात सुद्धा गरूडाचे महत्त्व आहे. जातक कथांमधे गरूड़ाचा बरेचदा उल्लेख आढळतो.

जसे तो जिवंत हत्तीला उचलू शकतो तसेच गरूड पुराणानुसार तो आत्म्याला सुद्धा मुक्त करून त्याच्या निर्धारित स्थानी पोहोचवतो.

आता ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की दैत्यांमधला प्रल्हाद मी आहे. कालगणनेतील काळ मीच. जंगली प्राण्यांचा राजा सिंह विनता चा पुत्र गरूड सुद्धा मीच.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्।

झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी।।10.31।।

अहम्‌ पवताम्‌ पवनः, शस्त्र-भृताम्‌ रामः अस्मि, झषाणाम्‌ मकरः अस्मि, स्रोतसाम्‌ च जाह्नवी अस्मि।

 

अहम्‌ मी

पवताम्‌ पवत् पावन करणार्‍या मधे

पू धातू पवित्र करणे, पावन करणे

पवनः, वारा

शस्त्र-भृताम्‌ शस्त्रधारीं मधे

शस्त्रान् बिभर्ति

भृ धातू भरण, पोषण करणे

रामः

रा धातू देणे

अस्मि,.

झषाणाम्‌ जलचरांमधे

झष् जलचर

मकरः मगर

अस्मि,

स्रोतसाम्‌ वाहणाऱ्या नद्यांमधे

स्त्रोतस् उगम

च जाह्नवी गंगा

अस्मि।

धर्मग्रंथात उल्लेख केलेला वायुदेव म्हणजे पवन. आपल्या जगण्यासाठी अती आवश्यक असा प्राणवायू, अग्नी पेटवण्यासाठी साठी सुद्धा अती आवश्यक,त्याशिवाय पाण्याने भरलेले ढग वाहून आणणारा म्हणजे खर्या अर्थाने आपले आयुष्य तारून नेणारा असा हा पवन.

श्रीरामांचे विविध गुण आपण जाणतोच.  आधीच्या श्लोकात इतक्या सर्व महर्षि आणि देवतांची महती कथन केल्यानंतर आता श्रीभगवानकृष्णांनी शस्त्रधारी रामाचे नाव घेतले आहे.

गंगा नदीच्या उत्पत्ती ची कथा सर्वजण जाणतात. विष्णू च्या घामाच्या थेंबापासून ब्रह्मा ने निर्माण केलेली गंगा शिवाच्या जटांमधून वाहते. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्पर्शाने पावन झालेली गंगा अतिशय पवित्र मानली जाते. नाद करणारी ती नदी. लोकार्थाने, जीवनदायिनी अशा नदीच्या नावामागे गंगा असा शब्द जोडलेला दिसतो जसे वैनगंगा, पंचगंगा, गोदावरीगंगा वगैरे. जाहनू नावाच्या ऋषींनी गंगेचे जल पिऊन टाकले होते, जिला देवतांच्या विनंतीवरून मुक्त केले गेले. म्हणून गंगेला जान्हवी हे नाव आहे. नर्मदा नदी गंगे पेक्षाही ही आधीची. दोघींचे वाहन मगर. मगर पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकते. मगरीच्या अस्तित्वाचा एक जबरदस्त धाक आहे. निरनिराळ्या वातावरणात सहज राहू शकणारी मगर उत्तम शिकारी आहे. मकरासन मात्र आपले शारीरिक व मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सजीवांना तारून नेणार्या वायूंमधला पवन मी, सर्व शस्त्रधारींमधला राम, जलचरांमधे मगर आणि जीवनदायिनी स्त्रोतांमधे गंगा नदी पण मीच.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन।

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्।।10.32।।

हे अर्जुन! अहम्‌ एव सर्गाणाम्‌ आदिः अन्तः मध्यम्‌ च, अहम्‌ विद्यानाम्‌ अध्यात्म-विद्या, प्रवदताम्‌ च वादः ।

 

हे अर्जुन!

अहम्‌ मी

एव

सर्गाणाम्‌ सर्ग सृष्टि

सृज धातू रचना करणे, उत्पन्न करणे

आदिः आदि

अन्तः अंत

मध्यम्‌ च,

अहम्‌ मी

विद्यानाम्‌ विद्यांमधे

अध्यात्म-विद्या, अध्यात्मं एव विद्या

प्रवदताम्‌ तर्कांमधे

प्र +वद्

वादः वाद

 

ह्या श्लोकात वाद हा शब्द वापरला आहे. वाद हा प्रत्यय म्हणून वापरला जातो. वाद म्हणजे विचारधारा. जसे राष्ट्रवाद.

न्यायदर्शन (6 वैदिक दर्शन पैकी एक) मध्ये 'वाद ' हा न्यायाच्या १६ पदार्थांपैकी एक आहे.

 

'प्रमाण-प्रमेय-संशय-प्रयोजन-दृष्टान्त-सिद्धान्तावयव-तर्क-निर्णय-वाद-जल्प-वितण्डाहेत्वाभास-च्छल-जाति-निग्रहस्थानानाम्तत्त्वज्ञानात् निःश्रेयसाधिगमः ॥'

वाद ह्या शब्दाचा दुसरा अर्थ उक्ति, कथन.

जल्प, वितंड, वाद असे आपापली बाजू मांडण्याचे विविध प्रकार आहेत.

ज्या चर्चा औचित्य, न्याय सत्य सोडून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पुढे रेटल्या जातात ते जल्प.

वितंड म्हणजे हुज्जत घालणे.

अजिबात सत्य विचारात न घेता कपटी मनोवृत्तीने दुसर्‍यांचा मताचा विरोध करणे म्हणजे वितंड.

वाद मात्र तर्कावर आधारित असते. ज्ञानाचे आदान-प्रदान आणि त्यातून निघणारा सुवर्णमध्य.

'अध्यात्म 'चा अर्थ 8व्या अध्यायातील 3 र्या श्लोकात आपण पाहिला. स्वभावोऽध्यात्ममुच्यते’ ।

‘स्वभाव’ला ‘अध्यात्म’ म्हणतात.

शंकराचार्यजींच्या भाष्यानुसार

‘ब्रह्मणः प्रतिदेहं अन्तरात्मभावः स्वभावः ।’

प्रत्येक शरिरामध्ये ‘ब्रह्म’चे (परमात्म्याचे) अंतरात्मारूपाने अस्तित्व, हा ‘स्वभाव’ आहे.

 

अध्यात्म अधि +आत्मन् (आद्य+आत्मन्). अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आपल्या स्वतःमध्ये बघणे.

विष्णु पुराणात 14 विद्या संबंधी उल्लेख आला आहे.

अग्नि वेदाश्चत्वारो मीमांसा न्याय विस्तरः। पुराणं धर्मशास्त्रं च विद्या ह्याताश्चर्तुदश ।।विभूति योग आयुर्वेदा धनुर्वेदो गान्धर्वश्चैव ते त्रयः।अर्थशास्त्रं चतुर्थं तु विद्या ह्यष्टादशैव ताः।।

(विष्णु पुराण-3.6.27.28)

"शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्ति, ज्योतिष आणि छंद, हे सहा वेदांग, ऋग, यजुर, साम, अथर्व हे चार वेद मीमांसा, न्याय, धर्म शास्त्र आणि पुराणे ह्याशिवाय आयुर्वेद, धनुर्विद्या, गान्धर्व आणि अर्थशास्त्र हे सर्व मिळून 18 विद्या असे म्हणतात.

20 व्या श्लोकात. सर्व जीवांचा आरंभ, मध्य आणि अंत मीच आहे असे श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहे.

आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की ते ह्या सृष्टीचे सुद्धा सृजक, पालक आणि संहारक आहेत. मी सृष्टीचा आदी, मध्य आणि अन्त आहे. सर्व विद्यांमधे अध्यात्म आणि सर्व तर्कांमधे तात्विक वाद आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च।

अहमेवाक्षयः कालो धाताऽहं विश्वतोमुखः।।10.33।।

अक्षराणाम्‌ अकारः अस्मि, सामासिकस्य च द्वन्द्वः अहम्‌, अक्षयः कालः, विश्वतोमुखः, धाता अहम्‌ एव ।

 

अक्षराणाम्‌ अक्षरांमध्ये

अकारः अकार

अस्मि,

सामासिकस्य सामासिक समासांमधे

च द्वन्द्वः द्वंद्व समास

अहम्‌,

अक्षयः शाश्वत

अ+क्षय

कालः,

विश्वतोमुखः सर्व मान्य

विश्र्वतः मुखानि यस्य सः

धाता धातृ

धा धातू धारण करणे

अहम्‌ एव ।मीच

आपल्या बाराखडी  (बहुतेक सर्व भाषांमध्ये) तील '' हे पहिले अक्षर आणि महत्त्वाचा स्वर. '' ह्या स्वराचा वापर जास्तीत जास्त वेळा झाला आहे.

व्यंजनांपासून सुरू होणाऱ्या शब्दांचे नकारार्थी शब्द '' पासून सुरवात होतात. (ह्या श्लोकात अ+क्षर)

ज्ञानेश्वरांनी ॐ ह्या शब्दाची फोड अ उ म अशी केली आहे. त्यांना त्यामध्ये गणपतीचे रूप दिसले.

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल।

मकार महामंडल | मस्तकाकारे ॥ज्ञानदेवी चिंतन।। १९ ॥

 

‘रागद्वेषौ’, ‘प्रमादमोहौ’, ‘कार्याकार्यें ह्या सारखे कितीतरी शब्द गीतेत वाचायला मिळतात. असे जोडशब्द जेथे दोन्ही शब्दांना सारखेच महत्त्व आहे तोच द्वंद्व समास. द्वंद्व समास समानता दर्शवितो. ह्या मधून श्रीभगवानकृष्णांना काय सुचवायचे आहे? जशा एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू सारख्याच महत्त्वाच्या तसेच प्रत्येक वेळी कोणत्याही गोष्टीची दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे कारण ती सुद्धा तितकीच महत्वाची.

आत्मा आणि अनात्मा. अनात्मवाद गोतम बुदधांनी सांगितला.

रागलोभ दोन्ही भावना सारख्याच महत्त्वाच्या. अगदी संत, महर्षी सुद्धा कधी कधी रागवत असत.

आधीच्या श्लोकात निसटून जाणारा, पुढे पुढे जाणारा काळ ह्या बद्दल वाचले आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अक्षय काला बद्दल सांगत आहेत. म्हणजे कधीही न संपणारा म्हणजेच सर्वांना सामावून घेणारा.

माणसे येत जात राहणार पण काळ मात्र पुढे पुढे जात राहणार.

11 व्या अध्यायातील 32 व्या श्लोकात अक्षय काला संबंधी अधिक विवेचन येणार आहे.

संस्कृत साहित्यात काही गोष्टी सूत्र स्वरूपात लिहून ठेवल्या आहेत, सूत्र लिहीण्याचे स्वतः चे असे काही नियम आहेत जसे कमीत कमी शब्दांत वर्णन करायचे. म्हणजे असे शब्द वापरायचे की ज्याचा अर्थ सर्वांसाठी एकच असेल. त्याच्या अर्थांच्या निरनिराळ्या छटा नसतील. वेगवेगळी मते कोणाची नसतील. जसे ऋत म्हणजे अंतिम सत्य त्यात जरा सुद्धा फरक नाही. सत्य मात्र सापेक्ष असू शकते. मला असे वाटले, पण त्याला तसे वाटले, दोन्हीही सत्यच.

म्हणून श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की, मी अक्षरांमध्ये '', समासांमधे द्वंद्व समास, शाश्वत असा काळ, सृष्टिला धारण करणारा सर्वमान्य असा (ब्रह्मा) आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम्।

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा।।10.34।।

अहम्‌ सर्व-हरः मृत्युः, भविष्यताम्‌ उद्भवः च, नारीणाम्‌ कीर्तिः श्रीः वाक्‌ स्मृतिः मेधा धृतिः च क्षमा च।

 

अहम्‌ मी

सर्व-हरः सर्वांचा नाश करणारा

सर्वान् हरति

मृत्युः,

भविष्यताम्‌ भविष्यत् होणारा

उद्भवः उत्पन्न होणारा

,

भू धातू होणे

नारीणाम्‌ नारी स्त्री ष बव

कीर्तिः किर्ति

श्रीः वैभव

वाक्‌ वाच् वाणी

स्मृतिः स्मृती

मेधा बुद्धि

धृतिः साहस

क्षमा च।

सृष्टिच्या उत्पत्ती संबंधी माहिती आपण आधीच्या अध्यायांमधे वाचली आहे. आता श्रीभगवानकृष्ण मृत्यू संबंधी भाष्य करत आहेत. सर्वांनाच नामोहरम करणारा मृत्यू हा शाश्वत आहे. प्रत्येक सजीव गोष्टीचा अंत म्हणजे मृत्यू. सजीवतेचा नाश म्हणजे मृत्यू.  जीवविज्ञान, वैद्यकशास्त्र, विधी वा कायदा, समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र इ. नुसार मृत्यूबद्दल निरनिराळे विचार मांडले आहेत. ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम  यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे.

मात्र शरीर नश्वर आहे ह्या बद्दल सर्वांचे एकमत आहे..

आतापर्यंतच्या श्लोकात आपण पुरुषप्रधान विशेषणे वाचली. आता ह्या श्लोकात स्त्रीप्रधान विशेषणे पाहणार आहोत. स्त्री आणि पुरूष ही दोन रुपे जरी शारीरिक पातळीवर निरनिराळी असली तरी आत्मा हा एकच आहे. आत्म्याचा उल्लेख कधीच स्त्री किंवा पुरुष असा केलेला नाही हे फार महत्त्वाचे आहे. उलट काही महापुरुषांचे वर्णन आपण अशा स्त्रीप्रधान विशेषांनी करतो जसे ज्ञानेश्वर माऊली.

ज्या मनुस्मृति वर टीका केली जाते त्यामध्ये दिलेला श्लोक महत्त्वाचा ठरतो.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।५६।।

मनुस्मृति अध्याय ३, श्लोक ५६-६०) जेथे नारीचा सन्मान होतो तेथे देवता वास करतात आणि जेथे अपमान होतो तेथे सर्व कर्मे निष्फळ होतात.

ह्या श्लोकात सात स्त्रीप्रधान गुणांचा उल्लेख केला आहे.

प्रजापति दक्षाच्या 24 कन्यांपैकी 5 कन्यांची नावे कीर्ति, मेधा, धृति, स्मृती आणि क्षमा.

श्री हे महर्षि भृगुंच्या मुलीचे नाव आणि वाक् ब्रह्मदेवांची मुलगी. ह्या सात जणी त्या त्या गुणांच्या देवता आहेत.

आपण स्वतः ची करतो ती प्रसिद्धी मात्र आपल्या मागे (आपल्या गुणांमुळे, कर्मामुळे) राहते ती कीर्ति.

कॄ किरति   पसरणे

श्री धातू शिजवणे.

धन यश वैभव म्हणजे श्री म्हणजेच लक्ष्मी आणि सरस्वती.

आपण एखाद्याचा उल्लेख करताना नावापुढे श्री(श्रीयुत) लावतो म्हणजेच त्याचे वैभव गृहीत धरतो. स्त्रीयांच्या नावामागे श्री हा प्रत्यय लागतो जसे धनश्री, यशश्री वगैरे.

वाक् म्हणजे वाणी चार प्रकारच्या असतात परा, पश्यंती,मध्यमा आणि वैखरी हे आपल्याला माहीत आहेच.

किर्ति, श्री, वाक् हे तीन गुण आपल्या बाह्य व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात.

स्मृती म्हणजे आठवण. आपल्या सर्व इन्द्रियांनी गोळा केलेली माहिती आपण आपल्या मेंदूत साठवून ठेवतो ती स्मृती. योगदर्शनात स्मृती ही एक वृत्ती सांगितली आहे. म्हणजे जी गोष्ट नक्की अस्तित्वात असते, जी पाहिलेली असते, अनुभवलेली असते ती स्मृती. ह्या वरुन स्मृती ग्रंथांचे महत्त्व लक्षात येईल.

वायुपुराणामध्ये स्मृतीची व्याख्या आहे, 'वर्तमानानि-अतीतानि तथैव अनागतानि-अपि। स्मरते सर्वकार्याणि तेनासौ स्मृतिरुच्यते।।' भूतकाळात घडलेली, चालू काळात घडत असलेली आणि भविष्यकाळात घडणारी सर्व कार्ये ज्यामुळे स्मरली जातात ती स्मृती.

मेधा म्हणजे बुद्धि असा सर्वसाधारण अर्थ आहे.

मेध् धातू माहीत असणे.

आल्फ्रेड बिनेट (१९०५) ह्यांनी बुद्धिमत्तेची प्रथम व्याख्या सांगितली ती अशी निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. मनसस्तु परा बुद्धि:। असे गीतेत 3.42 मध्ये म्हटले आहेच.

यजुर्वेदाच्या ३२व्या अध्यायात मेधासूक्त दिले आहे.

धृती म्हणजे धाडस, दृढता

धा धातू धारण करणे.

धृत्यय धरयते मनः प्रणेंद्रिय क्रियाः। योगेनव्यभिचारिन्य धृतिः सा पार्थ सात्विकी '। (18.33)

आपल्या मनाचा जर दृढ निश्चय नसेल तर कोणतेही काम साध्य करणे कठीण. छोट्या छोट्या गोष्टींमुळे मन विचलित करून घेणारे, कोणतेच काम नीट करू शकत नाही.

क्षम् धातू सहन करणे, माफ करणे.

क्षम पासून क्षमा आणि क्षमता.

ज्याची प्रत्युत्तर देण्याची क्षमता असते तो माफ करतो ती क्षमा. दुबळी माणसे गपचूप ऐकून घेतात ती क्षमा नव्हे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की सर्वांना हरविणारा मृत्यू आणि निर्माण करणारा मीच. तसेच नारींमधे कीर्ति, श्री, वाक्, स्मृती, मेधा, धृति आणि क्षमा सुद्धा मीच.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।10.35।।

तथा साम्नाम्‌ अहम्‌ बृहत्‌-साम, छन्दसाम्‌ गायत्री, अहम्‌ मासानाम्‌ मार्गशीर्षः, ऋतूनाम्‌ कुसुमाकरः ।

 

तथा आणि

साम्नाम्‌ सामन् मन्त्रांमधील

अहम्‌ मी

बृहत्‌-साम, बृहत्साम

छन्दसाम्‌ छन्दस्

गायत्री, गायत्री

अहम्‌ मी

मासानाम्‌ मास

मार्गशीर्षः,

ऋतूनाम्‌ ऋतु मधील

कुसुमाकरः वसंतऋतू

ह्या श्लोकातील बृहत्साम शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. श्रीभगवानकृष्णांनी आधीच, ते वेदांतील सामवेद आहेत असे म्हटले आहे.

सामवेद हा चार वेदांतील एक, यातील ऋचा गायच्या असतात.

साम शब्दाचा दुसरा अर्थ सामोपचाराने बोलणे, तडजोड.

सामवेदात बरीच सुमधूर  गीते आहेत , ज्यांना ‘साम’ असे म्हणतात. रथन्तरसाम, वार्षसाम, बृहत्साम, सेतुसाम, वीङ्कसाम, कल्माषसाम, आज्यदोहसाम, ज्येष्ठसाम इत्यादि. हि विशिष्ट पारंपरिक वैदिक पद्धतीने गायली  जातात.

दर्शनमीमांसा मधे 'ज्योतिष्टोमेन स्वर्गकामो यजेत।’ असे म्हटले आहे. ज्योतिष्टोम म्हणजेच सोमयाग. स्वर्ग प्राप्ती साठी ज्योतिष्टोम यज्ञ सांगितला आहे. त्या प्रकरणात दिलेला हा श्लोक

यदि रथन्तरसामा सोम: स्याद् ऐन्द्रवायवाग्रान् ग्रहान् गृöीयात्। यदि बृहत्सामा, शुक्राग्रान्। यदि जगत् सामा, आग्रयणाग्रान्।’

सोमयाग करतेवेळी सोमरस निरनिराळ्या पात्रात काढून ठेवतात ज्यांना ग्रह म्हणतात. ज्यांची नावे पुढीलप्रमाणे

उपांशुग्रह, अन्तर्याम ग्रह, ऐन्द्रवायव, मैत्रावरुण, आश्विन, शुक्र, मन्थी, आग्रयण, उक्थ्य, ध्रुव, ऋतुग्रह, वैश्वदेव.

ह्या पात्रातूंन रस घेऊन आहुती देत असताना विविध सामगान केले जाते. काही मंत्र रथंतर, काही बृहत्साम तर काही जगत साम असतात. जेव्हा बृहत्साम मंत्र म्हणतात त्यावेळी शुक्र ग्रह पात्रातील रस घेतला जातो.

 

अक्षर, त्यांची संख्या, मात्रा, गणना, यति (विराम) आणि गती ह्या सर्वांचा छंद होतो.

यास्क यांनी निरूक्त ग्रंथात छंदाचे वर्णन छन्दांसि छादनात् असे केले आहे.

छद् धातू आवरण, आच्छादन करणे.

ऋग्वेदातील श्लोक 3.62.10 आणि त्याच्या सुरवातीला ॐ भूर्भुवः स्वः हे यजुर्वेदातील शब्द मिळून गायत्री मंत्र तयार होतो.

गायत्री हे एका छंदाचे सुद्धा नाव आहे. ऋग्वेदात एकूण सात छंद  आहेत. - गायत्री, उष्णिक्, अनुष्टुप्, बृहती, विराट, त्रिष्टुप् आणि जगती। गायत्री छन्दात आठ-आठ अक्षरांचे तीन भाग आहेत.

माहिती म्हणून सांगते. वाल्मिकी रामायणात एकूण चोवीस हजार श्लोक आहेत त्यातील प्रत्येक एक हजाराव्या श्लोकातील पहिल्या अक्षराची सुरवात गायत्री मंत्राच्या एक एक अक्षराने होते.

 

चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात.

मार्गशीर्ष महिन्यात गीता जयंती तर असतेच शिवाय दत्त जयंती सुद्धा असते. हेमन्त ऋतु च्या अन्तर्गत दोन महीने येतात - मार्गशीर्ष आणि पौष.

वैदिक काळात मार्गशीर्ष हाच महिना नवीन वर्षाची सुरुवात मानत असत. मार्ग दाखवणारा.

 

वसंत ऋतु चे वर्णन भल्याभल्या कवींनी करून ठेवले आहे.

महर्षि वाल्मीकि - अयं वसन्त: सौमित्रे नाना विहग नन्दिता।

कालिदासांचे 'ऋतु संहार'

द्रुमा सपुष्पा: सलिलं सपदमंस्त्रीय: पवन: सुगंधि:।

सुखा प्रदोषा: दिवासश्च रम्या:सर्वप्रियं चारुतरे वतन्ते॥

माघाचे शिशुपाल वध - नव पलाश पलाशवनं पुर: स्फुट पराग परागत पंवानम्

मृदुलावांत लतांत मलोकयत् स सुरभि-सुरभि सुमनोमरै: ।

वसंत ऋतु म्हणजे विविध रंगी फुलेच फुले.

होळी सणाच्या नंतर येणारा हा ऋतू, निसर्गातील रंगबेरंगी फुलांमुळे डोळ्यांना सुखावणारी रंगपंचमी. (रंगपंचमीचा हाच अर्थ अभिप्रेत असावा.)

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की मी सर्व मंत्रातील बृहत्साम, छंदांमधे गायत्री, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आणि सर्व ऋतूमध्ये वसंतऋतू आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।

जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्।।10.36।।

अहम्‌ छलयताम्‌ द्यूतम्‌, तेजस्विनाम्‌ तेजः अस्मि, अहम्‌ व्यवसायः, जयः अस्मि, सत्त्ववताम्‌ सत्त्वम्‌ अस्मि ।

 

अहम्‌ मी

छलयताम्‌ डावपेचात (जुगारामधे)

छल नपु शतृ पु ष बव

द्यूतम्‌,द्यूत नपु प्र एव

तेजस्विनाम्‌ तेजस्विन्

तेजः तेजस्

अस्मि, आहे

अहम्‌

व्यवसायः,

जयः

अस्मि,

सत्त्ववताम्‌ सत्ववत् सत्व +मतुप ष बव

सत्त्वम्‌

अस्मि ।

द्यूत हा खेळ आपल्याला महाभारतामुळे माहीत आहेच.

सध्याच्या काळात व्यसनांमुळे आयुष्याची धूळधाण झालेल्या गोष्टी म्हणजे दारू, चरस गांजा सारखे पदार्थ आणि सट्टा बाजार.

त्यापैकी सट्टा बाजार हा प्रकार द्यूत खेळासारखा. म्हणजे दोन्हीचे परीणाम सारखेच.

ऋग्वेदाच्या 10 वे मंडल, सूक्त 34, श्लोक 1-14 मध्ये ह्या सर्व गोष्टींचे विस्तृत वर्णन अगदी जसेच्या तसे आढळून येते. त्यापैकी तेरावा श्लोक.

अक्षैर्मा दीव्यः कृषिमित्कृषस्व वित्ते रमस्व बहु मन्यमानः । तत्र गावः कितव तत्र जाया तन्मे वि चष्टे सवितायमर्यः॥१३॥

हे द्यूतक्रीड़क, कधीही जुगार खेळू नकोस. शेती सारखा उत्पादनाचा व्यवसाय कर आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाने सुखी हो. ह्यातून तुला पत्नी आणि गो प्राप्ती सुद्धा होईल.

पाणिनी च्या अष्टाध्यायी ग्रंथात अक्ष आणि शलाका असा उल्लेख फाशांसाठी केला आहे. तैत्तिरीय ब्राह्मण आणि अष्टाध्यायी वरून असे म्हणता येईल की ह्या फाशांची संख्या 5 होती ज्यांची नावे अक्षराज, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. पतंजलींनी अक्ष-धूर्त असा शब्द प्रयोग केला आहे. कौटिल्यांनी राजाला चार व्यसनापासून लांब रहावे असे सांगितले आहे त्या गोष्टी म्हणजे शिकार, मद्यपान, (पर)स्त्री, आणि द्यूत.

द्यु धातू शत्रू वर आक्रमण करणे.

म्हणजे द्यूत क्रीड़ा प्रकार राजनीतिचाच एक भाग असावा.

कारण चौदाव्या श्लोकात तसेच वर्णन केले आहे.

मित्रं कृणुध्वं खलु मृळता नो मा नो घोरेण चरताभि धृष्णु । नि वो नु मन्युर्विशतामरातिरन्यो बभ्रूणां प्रसितौ न्वस्तु॥ऋग्वेद. 10.34.१४॥

हे अक्ष (फासा) आम्हाला मित्ररूप मानून कृपादृष्टी ठेव. त्रासदायक उग्र क्रोधी स्वभावाचा प्रहार करू नये, ते सर्व आमच्या शत्रू ला प्राप्त होवो आणि ते त्यातच अडकून पडो.

युद्धाला शेवटचा पर्याय समजत असावेत, जे महाभारतात ठळकपणे दिसून येते.

उठसूट लोकांना मारणे ही संस्कृती नव्हती. आता श्रीकृष्णाने द्यूताला विभूतिं का म्हटले आहे ते मनाला भावते.

तेजस्विनामहम् हा शब्द 7व्या अध्यायातील 10 व्या श्लोकात सुद्धा येऊन गेला आहे. त्यावेळी संदर्भ निराळा होता. एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास असेल तर त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. तसेच व्यायाम आणि खेळांमूळे आत्मविश्वास वाढतो. हा आत्मविश्वास आपले व्यक्तीमत्व दर्शवितो. डोळ्यात चमक येते. कठोर तपस्या केलेल्या योगी च्या चेहर्‍यावर तेज असते.

बिनु तप तेज कि कर बिस्तारा।जिमि बिनु तेज न रूप गोसाई । तुलसीदास.

(तप केल्याशिवाय तेज पसरेल का?

हे गोसाईं! तेज नसेल तर रूप सुद्धा नसेल)

तिज् धातू तीक्ष्ण करणे

तिज +अस =तेजस

कठोर परिश्रम, प्रयास, दृढ संकल्प आणि त्यातून निर्माण झालेली गुणवत्ता, त्यामुळे मिळालेले यश म्हणजे जय.

व्यवसाय =वि-अव-सि धातू बांधून घेणे

व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते।2.44,

सम्यग्व्यवसितो हि सः।9.30

हे आधी सांगून झाले आहेच.

सत्त्व म्हणजे पवित्र. सांख्य दर्शनात सांगितलेल्या तीन गुणांपैकी एक.

सत्त्व पासून सात्विक, सत्वर

व्यवसाय, जय आणि सत्त्व ह्या तिन्हीचा एकत्रित अर्थ असाही घेता येईल की प्रयत्नपूर्वक, निष्ठेने, निश्चयाने केलेले काम चोख, अतिशय पवित्र, शुद्ध, कसदार तर असतेच आणि तेच विजय मिळवून देते.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की डावपेचात मी द्यूत आहे, प्रखर तेज, दृढ निश्चय, विजय आणि सत्त्व मीच आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः।

मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः।।10.37।।

वृष्णीनाम्‌ वासुदेवः, पाण्डवानाम्‌ धनञ्जयः, मुनीनाम्‌ व्यासः, कवीनाम्‌ उशना कविः अपि अहम्‌ ।

 

वृष्णीनाम्‌ वृष्णी पु ष. ब. व.

वासुदेवः, वसुदेवस्य अपत्यं पुमान् प्र. ए. व.

पाण्डवानाम्‌ पाण्डव

धनञ्जयः, धनञ्जय

मुनीनाम्‌ मुनी

व्यासः,

कवीनाम्‌ कवी

उशना उशनस्

कविः

अपि अहम्‌ ।

राजा वृष्णी यदुकुलातील श्रेष्ठ यदुचे पुत्र. ह्यांच्या नावावरून यादवांची वृष्णी शाखा निर्माण झाली. वृष्णी वरून वैष्णव. श्रीकृष्णाचा जन्म ह्याच शाखेत झाला. व्यासांनी लिहिलेल्या श्री हरिवंश पुराणात ह्या संबंधी माहिती मिळते. महाभारतातील हरिवंश पर्व म्हणजेच हरिवंशपुराण.

वृष् धातू पराक्रम करणे, प्रजनन करणे.

अंधक हे वृष्णींचे बंधू.

पाणिनि नी अष्टाध्यायी (IV.1.114, VI.2.34) ग्रंथात अंधक आणि वृष्णींचा उल्लेख केला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात वृष्णींचा उल्लेख आहे. महाभारतातील द्रोण पर्वात 141.15) वृष्णि और अंधक ह्यांच्या बद्दल लिहिले आहे.

'यादवा: कुकुरा भोजा: सर्वे चान्धकवृष्णय: त्वय्यासक्ता: महाबाहो लोकालोकेश्वराश्च ये।'

धनञ्जय म्हणजे अर्जुन.

राजसूय यज्ञ करतेवेळी अर्जुनाने बरीच राज्ये जिंकून बरेच धन गोळा केले म्हणून त्याचे नाव धनंजय असे पडले.

व्यास ऋषीं बददल एक पूर्ण लेख लिहावा लागेल.

महाभारत, अठरा पुराणे, ब्रह्मसूत्र, मीमांसा सारखे अद्वितीय वैदिक साहित्याचे  रचयिता, महर्षि वेद व्यास जींचा जन्म आषाढ़ातील पौर्णिमेला झाला. त्यांना ‘कृष्ण द्वैपायन ' असे सुद्धा म्हणतात.

व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।

नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।

व्यास विष्णुंचे रूप आहेत आणि विष्णु हेच व्यास आहेत. अशा वसिष्ठ-मुनिंच्या वंशाला मी नमन करतो.

नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तम:. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत।।’’

आदि पुरुष नारायण, नरांमधील उत्तम नर ऋषि, विद्येची देवी सरस्वती आणि महामुनि वेद व्यास ह्यांना नमस्कार करूनच महाभारत या महाकाव्याचा अभ्यास केला पाहिजे.

उशना ह्या शब्दाचे दोन वेगवेगळे संदर्भ सापडतात.

ऋग्वेदात 10.49.3, 10.22.6, 10.40.7, 10.99.9 ह्या सूक्तांमधे  उशना ऋषीं संबंधी काव्य आहे. सामवेदात सुद्धा ऋषि उशना ह्यांचे काव्य सापडते.

मात्र पुराणांत उशना ऋषि म्हणजे शुक्र.

वैदिक साहित्याप्रमाणे उशना शब्दाचा अर्थ कामना

उशन् , उशती हे शब्द बरेचदा वापरले गेले आहेत.

वैदिक साहित्याप्रमाणे शास्त्रीय सिद्धान्त जाणणारे, ज्ञानी म्हणजेच कवी.

मराठी मध्ये कवी म्हणजे कविता करणारा, संस्कृत मधे ह्याचा व्यापक अर्थ आहे. शब्दावाचून कळले सारे... हे तर कवी ला  लागू होते.

कु धातू शब्द बोलणे, गुणगुणणे

ईशावास्योपनिषद च्या 8 व्या श्लोकात कवीचे वर्णन केले आहे.

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरं शुद्धमपापविद्धम्‌।कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतोऽर्थान्‌ व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः ॥

उशना ऋषींचा उल्लेख भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात 35 प्रकरणात सापडतो. उशना हे असुरांचे गुरू मानले जातात जे असुरांवर चांगले संस्कार करीत.

(नाठाळ विद्यार्थ्यांना शिकवणे जास्त अवघड, श्रीकृष्णाने त्यांना आपली विभूती म्हटले आहे हे विशेष नोंद घेण्याजोगे) शुक्राचार्यांचा सुद्धा असाच उल्लेख आहे. त्यांची शुक्रनीति प्रसिद्ध आहे. संजीवनी विद्या त्यांना माहीत होती.

आता अर्थ अगदीच सोपा आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की मी वृष्णी कुळातील वासुदेव आहे. पाण्डवातील धनंजय, ऋषीं मध्ये व्यास आणि कवींमध्ये उशना कवी आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्।।10.38।।

अहम्‌ दमयताम्‌ दण्डः अस्मि, जिगीषताम्‌ नीतिः अस्मि। गुह्यानाम्‌ मौनम्‌ अस्मि, ज्ञानवताम्‌ ज्ञानम्‌ एव च।

 

अहम्‌ मी

दमयताम्‌ दम शतृ प्रत्यय नियंत्रण करू शकणारा

दम धातू शांत करणे

दण्डः दण्ड धातू शासन करणे

अस्मि,

जिगीषताम्‌ जिगीषत् इच्छार्थक कृदन्त

जि धातू उत्कर्ष करणे, जिंकणे

नीतिः नीति स्त्री.

नी धातू प्राप्त करणे

अस्मि।

गुह्यानाम्‌ गुह्य नपु ष बव

गुह् धातू झाकून ठेवणे

मौनम्‌ मौन

अस्मि,

ज्ञानवताम्‌ ज्ञान मतुप

ज्ञा धातू समजून घेणे

ज्ञानम्‌ एव च।

ह्या श्लोकात पहिल्या विभूति चे नाव दम असे आहे. दुर्जनांना सन्मार्गावर आणण्यासाठी दण्डनीति चा वापर आवश्यक आहे.  पद्मपुराणात धर्मसर्वस्व असा शब्द वापरला आहे.

श्रूयतां धर्मसर्वस्वं श्रुत्वा चाप्यवधार्यताम्।

आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत्।। (पद्मपुराण-19.357,358 )

(अर्थ: धर्मसर्वस्व काय आहे? , ऐका आणि त्याचे अनुकरण करा. जे आचरण स्वतः साठी प्रतिकूल आहे, तसे आचरण दूसर्यांच्या बाबतीत नाही केले पाहिजे.)

मनुस्मृति मधे (6.92) धर्माची दहा लक्षणे सांगितली आहेत. धृतिः   क्षमा   दमोऽस्तये   शौचमिन्द्रिय   निग्रहः।

धीर्विद्या   सत्यमक्रोधो   दशकं   धर्म   लक्षणाम।।

धैर्य, क्षमा, संयम, अस्तेय (चोरी न करणे), शौच (पवित्र), इन्द्रिय निग्रहता, बुद्धि, विद्या, सत्य, अक्रोध. ही धर्माची दहा लक्षणे आहेत.

अहिंसा सत्‍यमस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह:।

दानं दमो दया शान्‍ति: सर्वेषां धर्मसाधनम्‌।। (याज्ञवल्क्य स्मृति १.१२२)

श्रीमद्भागवतात तीस लक्षणे सांगितली आहेत.

महाभारतातील शांतिपर्व मध्ये दणडनीति संबंधी बरेच श्लोक आहेत.

विभज्य दण्ड: कर्त्तव्योयो धर्मेण न यदृच्छया।

न्याय- अन्याय याचा विचार करुनच दण्ड दिला पाहिजे आपल्या मर्जीने नाही. शांतिपर्व महाभारत 122. 40.

तस्यसर्वाणि भूतानि स्थावराणि चराणि च ।

भयाद्भोगायकल्पन्ते स्वधर्मान्न चलन्ति च ॥ मनुस्मृति 7.22

शासनाच्या भयाने सर्वजण सुखासमाधानाने जगू शकतात नाहीतर बलवान व्यक्ति दुर्बलांची संपत्ती लुटुन नेईल.

अपि स्वल्पवधेनैव प्रायश्चित्तं विधीयते।

अल्प शासनाने सुद्धा प्रायश्चित होऊ शकते. शांतिपर्व 267. 12

म्हणजे येथे पश्चाताप होणै महत्वाचे असे सुचवले आहे.

पद्मपुराणातील श्लोक पुरेसा बोलका आहे.

न राज्यं न च राजासीत न दण्डो न च दाण्डिकः।

स्वयमेव प्रजाः सर्वा रक्षन्ति स्म परस्परम ॥ शांती पर्व 56.13.33

पूर्वी न राज्य होते, ना राजा, न दण्ड, ना दण्डी. सर्व लोकच धर्मानुसार एकमेकांचे रक्षण करत होते.

हे सर्व श्लोक वाचले की असा अर्थ काढता येईल की राजाने सुशासन प्रस्थापित करण्यासाठी दणडनीति चा वापर करणे हा एक प्रकार, पण प्रत्येकाने धर्मानुसार आचरण करणे आणि वेळप्रसंगी आपल्या दुःष्कर्मांचा पश्चात्ताप करणे सुद्धा अपेक्षित आहेच.

ह्यानंतर जिगीषा हा शब्दप्रयोग केला आहे. जिंकण्याची इच्छा, पण कोणाला जिंकायचे? भारतीय तत्त्वज्ञानानुसार स्वतःवर विजय मिळवणे सर्वात अवघड आणि तेच अपेक्षित आहे.

उप व एषे नमसा जिगीषोषासानक्ता सुदुघेव धेनुः । समाने अहन्विमिमानो अर्कं विषुरूपे पयसि सस्मिन्नूधन्॥1।।186।।4॥ ऋग्वेद

वाचकलुप्तोपमालङ्कार वापरून ह्या श्लोकात असे सांगितले आहे की जे रात्रंदिवस सतर्क राहून विद्या-अविद्या ह्यातील फरक समजून , सर्व वेळ कार्यमग्न राहून, गायींसारख्या प्राण्यांचे रक्षण करतात, दुष्टांवर विजय मिळवितात ते जणू दुधातील तुपाचा अंश असतात ॥ ४ ॥

जिंकण्याची इच्छा तर आहेच पण नीतीनियमानुसार. म्हणजेच कपटाला काहीच स्थान नाही. धर्म आपल्याला नीति शिकवतो. चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये फरक करायला शिकवतो.

महाभारतात कृष्णनीति, विदुरनीति सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये कुल धर्म, स्वधर्म, राजधर्म, विश्व धर्म व आत्म धर्म असे विविध पैलू पहावयास मिळतात..

नाना शास्त्रोद्धृतं वक्ष्ये राजनीति समुच्चयम्

सर्वबीजमिदं शास्त्रं चाणक्यं सारसंग्रहम्॥ चाणक्यनीति ।

नाना प्रकारच्या शास्त्रांनी युक्त अशी राजनीति ही  समस्त शास्त्रांचे मूळ तत्त्वांवर आधारित आहे.

नीतिनियमानुसार आचरण ही जणू काही ईश्वरी आज्ञाच असे बहुतेक सर्व धर्मात मानले जाते.

महाजनो येन गतस्य पंथः ।असे मूल्य-आचरणाचे सर्वसाधारण स्वरूप असले तरी जेव्हा दोन असामान्य व्यक्तिंच्या आचरणात भिन्नता दिसून येते त्यावेळी आपल्या सद्विवेक बुद्धिनुसार आचरण करावे हे धर्मराजाने यक्षाला दिलेले उत्तर आपले आचरण करावे.

राजविद्याराजगुह्य योग असे 9व्या अध्यायाचे नाव आहे आणि त्यात गुह्य झान ह्याबद्दल बरेच वाचले आहे. गीतेच्या 18 व्या अध्यायातील 63,68 श्लोकात गुह्य ज्ञान असा उल्लेख आहे.

वेदान्ते परमं गुह्यं पुराकल्पे प्रचोदितम्‌।

नाप्रशान्ताय दातव्यं नापुत्रायाशिष्याय वा पुनः॥6.21 श्र्वेताश्र्वेतरोपनिषद्

वेदान्तातील हे ज्ञान पुरातन काळापासून प्रचलित आहे आणि ते अशांत मन असलेले, निपुत्रिक आणि ज्याचा कोणी शिष्य नाही अशांना ते देऊ नये.

गुह +यत =गुह्य

अध्यात्मशास्त्रात आत्मज्ञान हेच गूढ ज्ञान आहे. ह्याची पवित्रता जपून ठेवण्यासाठी आंतरिक मौन बाळगणे आवश्यक आहे.

आता हे सर्व ज्याला उमगले तो ज्ञानीच.

म्हणूनच श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की शासन करू शकणार्‍यांमधला दमनकर्ता आहे. जिंकण्याची इच्छा असणाऱ्यांमधे असलेली नीतिमत्ता, गूढज्ञान राखून ठेवणारा मौनी आणि बुद्धिवान लोकांमधील विवेकी आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन।

न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम्।।10.39।।

हे अर्जुन! यत्‌ सर्व-भूतानाम्‌ बीजम्‌ तत्‌ अपि च अहम्‌। तत्‌ चर-अचरम्‌ भूतम्‌ न अस्ति यत्‌ मया विना स्यात्‌।

 

हे अर्जुन!

यत्‌ यद् जो

सर्व-भूतानाम्‌ सर्वानि भूतानि

बीजम्‌ बीज

वी धातू गर्भधारणा होणे

तत्‌ तद् तो

अपि सुद्धा

च आणि

अहम्‌ मी

तत्‌ तो

चर-अचरम्‌. चरं च अचरं च

भूतम्‌. भूत

न अस्ति

यत्‌ जो

मया माझ्या

विना  शिवाय

स्यात्‌।

अस् धातू असणे

7व्या अध्यायातील 10 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी मी सर्व जीवांचे शाश्वत असे बीज आहे असे म्हटले आहे. तर 9व्या अध्यायातील 18 व्या श्लोकात मी अव्यय (कधीही न संपणारे) असे बीज आहे असे म्हटले आहे. आता परत श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात मी सर्व भूतांचे बीज आहे असे म्हणतात. आधीच्या श्लोकात इतक्या सर्व विभूतिंचे वर्णन करून झाल्यावर आता श्रीभगवानकृष्णांना नक्की काय म्हणायचे असावे?

बीज म्हणजे मूळ.

ह्या सृष्टीमध्ये काहीही निर्जीव नाही हे आता सिद्ध झाले आहे. काही गोष्टी स्थिर आहेत जसे झाडे, डोंगर तर काही हालचाल करू शकणारे जसे प्राणी.

वेद ह्या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. वेदांना अपौरुषेय म्हटले आहे.  म्हणजे हे कोणा एका पुरुषाने लिहिलेले वाङ्मय नाही.

वेदोऽखिलो धर्ममूलम् । असे मनुस्मृति मधे म्हटले आहेच. वेद सर्व धर्माचे मूळ आहे.

सर्वज्ञानमायो ही सां। 2.7 मनुस्मृति। वेद सर्व ज्ञानाचे प्रतिक आहे.

श्रुतिः स्मृतिश्‍च विप्राणां नयने द्वे प्रकीर्तिते। काणःस्यादेकिन्होऽपि द्वाभ्यमंन्धः प्रकीर्तित।351। अत्रिस्मृति।

श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहेत. एक नसेल तर माणूस बहिरा होईल आणि दोन्ही नसतील तर तो आंधळा होईल.

 

अग्निवायुरविभ्यस्तु त्र्यं ब्रह्म सनातनम… दुदोह यज्ञ सिध्यार्थमृग्यु: समलक्षणम्॥ 1.23 मनुस्मृति

परमात्म्याने अग्नी वायु अंगिरा आणि आदित्य ना ज्ञान दिले जे ब्रह्मा ला प्राप्त झाले ज्यामुळे वेद निर्मिती झाली.

म्हणूनच ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की सर्व जीवांचे मूळ बीज मीच आहे. माझ्याशिवाय सर्व चर अचर सजीवांना अस्तित्वच नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप।

एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया।।10.40।।

हे परन्तप! मम दिव्यानाम्‌ विभूतीनाम्‌ अन्तः न अस्ति, मया विभूतेः एषः विस्तरः तु उद्देशतः प्रोक्तः।

 

हे परन्तप! परान् तापयति

मम माझे

दिव्यानाम्‌ दिव्या तेजस्वी

विभूतीनाम्‌ विभूति ऐश्वर्य

अन्तः अन्त

न अस्ति,

मया माझ्या कडून

विभूतेः

एषः हे सर्व

विस्तरः

वि +स्तृ धातू पसरणे

तु परन्तु

उद्देशतः उद्देशक सारांश

उत् +दिश्

प्रोक्तः। सांगितले

प्र +वच्

ह्या अध्यायातील 19 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला आपल्या दिव्य शक्तींचे अनेक स्तर आहेत असे सांगितले आहेच. आपल्या निरनिराळ्या जवळ जवळ 82 विभूतिं ची झलक त्यांनी 20 - 39 श्लोकात दाखवून दिली. आता जणू समारोपाची  वेळ आली आहे.

म्हणूनच ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

हे परन्तप माझ्या विभूति अन्तहीन आहेत. आतापर्यंत मी जे काही सांगितले ते सर्व फक्त एक झलक आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा।

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम्।।10.41।।

यत्‌ यत्‌ एव विभूतिमत्‌ श्रीमत्‌ वा ऊर्जितम्‌ सत्त्वम्‌, तत्‌ तत्‌ मम तेजः अंश-सम्भवम्‌ (इति) त्वम्‌ अवगच्छ।

 

यत्‌ यत्‌. यद् प्र एव जे जे

एव नक्कीच

विभूतिमत्‌ विभूति मतुप प्रत्यय

ऐश्वर्य

वि +भू धातू

श्रीमत्‌ श्री. (स्त्री)

वा अथवा

ऊर्जितम्‌. उर्जित शक्तीशाली

ऊर्ज धातू पराक्रमी असणे

सत्त्वम्‌, सत्त्व

तत्‌ तत्‌. ते ते

मम अस्मद् माझे

तेजः

तेज् धातू रक्षण करणे

अंश

सम्भवम्‌ (इति)

सम् +भव

तेजसः अंशः सम्भवः

त्वम्‌ युष्मद् प्र एव, तू

अवगच्छ  जाणून घे.

अव+गम

नुसता श्वास चालू असणे म्हणजे सजीव. पण सजीवता असण्यासाठी इतर बर्‍याच गोष्टींची आवश्यकता असते जसे गतीमानता, पराक्रमी वृत्ती, आत्मविश्वास, डोळ्यांत चमक आणि संवेदनशीलता.

ह्या श्लोकाचा अर्थ लिहीताना नकळत सावरकरांच्या ह्या गीताची आठवण होते.

जे जे उत्तम उदात्त उन्नत... आपल्या डोळ्यांना विद्युत शक्ती दिसत कधीच नाही पण तिच्या असण्याने आपले पाणी गरम होते, दूरदर्शन पाहता येतो, फ्रीज मध्ये ठेवलेल्या गोष्टी थंड होतात. पंखे चालल्याने हवा खेळती राहते, रोषणाई करता येते .. सर्व काही शक्य करता येते विद्युत शक्ती च्या साह्याने.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असेच काहीसे म्हणत आहेत.

जे जे ऐश्वर्य युक्त, सौंदर्ययुक्त, शक्तीशाली प्रखर असे आहे ते सर्व माझेच तेज, माझी शक्ती, माझ्याच सत्तेचा अंश आहे असे समज.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन।

विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्।।10.42।।

अथवा हे अर्जुन ! एतेन बहुना ज्ञातेन तव किम् ‌? अहम्‌ इदम्‌ कृत्स्नम्‌ जगत्‌ एक-अंशेन विष्टभ्य स्थितः ।

 

अथवा किंवा

हे अर्जुन !

एतेन एतद् ह्या

एतेन बहुना ह्या निरनिराळ्या प्रकारे

ज्ञातेन  समजून घेऊन

ज्ञा धातू क्त प्रत्यय तृ एव

तव तुझे

युष्मद् ष एव

किम् ‌?

अहम्‌ मी

इदम्‌ हे

कृत्स्नम्‌ संपूर्ण

जगत्‌ जग

एक-अंशेन एकः अंशः

विष्टभ्य व्यापून टाकले

वि +स्तम्भ् धातू अडथळा निर्माण करणे ल्यप प्रत्यय

स्थितः स्थिर होणे

स्था धातू क्त प्रत्यय

ह्या श्लोकाची सुरवातच अथवा ह्या शब्दाने झाली आहे म्हणजे ह्या श्लोकाला आधीच्या श्लोकाशी जोडून घ्यावे लागेल.

 

देखरावा मातहि निज अद्भुत रूप अखंड।

रोम रोम प्रति लागे कोटि कोटि ब्रह्मंड॥श्रीरामचरितमानस 1।।201

माता कौसल्येला रामचंद्रांनी आपल्या अद्भूत रूपाचे दर्शन दिले. रोमारोमात कोटी कोटी ब्रह्मांडाचे रूप दिसून आले.

एतावानस्य महिमातो ज्यायाढ्त्श्च पूरुषः । पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥10।।90।।3॥ऋग्वेद

तो पुरूष महान आहे आणि ह्या जगात तो स्वतःला एक चौथाई च दर्शवितो. उरलेला तीन चौथाई तो दुसर्‍या जगात असतो.

यस्यायुतायुतांशांशे विश्वशक्तिरियं स्थिता ।परब्रह्मस्वरूपं यत्प्रणमामस्तमव्ययम् ॥1953 ॥ विष्णुपुराण

दहाहजार अंशातील दहाहजाराव्या अंशात ह्या विश्व रचनेची स्थिति असलेल्या परब्रह्मस्वरूपाला नमस्कार असो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की हे अर्जुना इतके सर्व माझ्याबद्दल जाणून घेऊन काय करायचे? इतकेच समजून घे की माझा एक अंशाने ह्या सृष्टीला व्यापून टाकले आहे.

========================== 🙏🙏🙏🙏=============================