गीतेच्या 7व्या अध्यायाचे नाव आहे ज्ञान विज्ञान योग. ह्यामध्ये एकूण 30
श्लोक आहेत.
श्री भगवानुवाच
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु।।7.1।।
श्रीभगवानुवाच - हे पार्थ! मयि आसक्त-मनाः मत् आश्रयः योगम् युञ्जन्,
यथा
समग्रम् माम् असंशयम् ज्ञास्यसि, तत् शृणु।
श्री भगवान म्हणाले
( हे) पार्थ
मयि आसक्त-मनाः आ +सञ्ज्
धातू जवळीक असणे
माझ्या मनाच्या जवळ असलेला
मत् आश्रयः श्रि धातू माझ्या पंखाखाली असलेला
योगम् युञ्जन् योगाचा
अभ्यास करणारा
( असा तू)
ज्ञास्यसि ज्ञा धातू लृट
लकार (तुला) समजेल
कसे समजेल?
असंशयं निःसंशय, (मनात कोणताही किंतू राहणार नाही)
काय समजेल?
यथा समग्रम् (मी) पूर्णपणे
तत् श्रृणु ते तू नीट ऐक.
म्हणजे मीच तुला माझ्याबद्दल सांगणार आहे ते तू नीट ऐक.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते।।7.2।।
अहम् ते इदम् सविज्ञानम् ज्ञानम् अशेषतः वक्ष्यामि यत् ज्ञात्वा
इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम् न अवशिष्यते।
अहम् मी
वक्ष्यामि वच् धातू बोलणे, मी सांगेन
ते सः तुझ्या बरोबर (तुला)
इदम् हे
न भूयः अन्यत् आणखी काहीच नाही
विज्ञानम्
ज्ञानम्
अशेषतः पूर्णपणे
यत् ज्ञात्वा जाणून
घेतल्यानंतर
इह इहलोक
अन्यत् अजून काही
ज्ञातव्यम् जाणून घेण्यासारखे
न अवशिष्यते काहीही शिल्लक राहणार नाही.
आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो, जे प्रयोगशाळेत
कधीही सिद्ध करता येते तो विज्ञानाचा अर्थ इथे अपेक्षित नाही. सध्याच्या
काळाप्रमाणे आपण त्याला ज्ञान , आत्मज्ञान, अंतःप्रेरणा असे
म्हणू शकतो.
ह्या शब्दांचा नक्की फरक कसा करायचा?
जे ज्ञान आपल्याला उपजत असते ती अंतःप्रेरणा.
जे ज्ञान आपल्याला उपजत असते ती अंतःप्रेरणा.
ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, आपण जे आत्मसात करतो ते ज्ञान
आणि ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो ते आत्मज्ञान. अगदी साधे उदाहरण
द्यायचे झाले तर साखर गोड असते हे ज्ञान आपल्याला असते पण गोडवा म्हणजे काय ते
आपल्याला साखर खाल्यानंतरच समजते ते झाले आत्मज्ञान.
भक्तियोगेन मनसि सम्यक् प्रणिहितेऽमले ।
अपश्यत्पुरुषं पूर्णं मायां च तदपाश्रयम् ॥ श्रीमद्भागवत 1.7.4
असे म्हणतात की वेद व्यासांनी श्रीमद्भागवत लिहिण्याआधी भक्तिमार्ग
अवलंबला, स्वतः दैवी
अनुभव घेतला आणि मग लिहायला सुरुवात केली. ते फक्त आपल्या ज्ञानावर विसंबून राहीले
नाहीत.
श्रीभगवान अर्जुनाला म्हणतात मी तुला विस्तृत, व्यापक असे ज्ञान आणि विज्ञान काहीही
बाकी न ठेवता सांगेन जे ऐकल्यावर ह्या इहलोकात आणखी काही जाणून घेण्यासारखे शिल्लक
राहणार नाही
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनुष्याणां सहस्रेषु कश्िचद्यतति सिद्धये।
यततामपि सिद्धानां कश्िचन्मां वेत्ति तत्त्वतः।।7.3।।
मनुष्याणाम् सहस्रेषु कश्चित् सिद्धये यतति; यतताम्
सिद्धानाम् अपि कश्चित् माम् तत्त्वतः वेत्ति ।
गुरू आपल्या शिष्यांची निवड करुन त्याची योग्यता पारखून त्याला ज्ञान
देत असत.
योग्य व्यक्तिलाच ज्ञान द्यावे असे संकेत आहेत. इतके करुनही शिष्य
ज्ञानी होईलच असे खात्रीने सांगता येत नाही.
हे अगदी आजच्या काळात विशेषतः संगीत क्षेत्रात दिसून येते. एखादा
विद्वान कलाकाराचा शिष्य गुरु इतकाच विद्वान असण्याची उदाहरणे फारच कमी दिसतात.
असे काहीसे श्रीभगवान सांगत आहेत.
सहस्रेषु मनुष्याणाम् सहस्र
माणसांमध्ये
कश्चित् कोणीतरी एखादा
सिद्धये सिद्ध धातू साद्ध्य करणे
यतति; यत् धातू प्रयत्न करतो
यतताम् सिद्धानाम् अपि कश्चित् त्या क्वचित अशा पूर्णत्वास
जाण्यासाठी प्रयत्न केलेल्या पैकी
माम् तत्त्वतः माझी तत्वे
वेत्ति विद् धातू जाणतो
थोडक्यात फार कमी जण मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यातील
काहींनाच माझी तत्वे समजतात
(प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच महाभुते, पाच तन्मात्रा या पंचवीसांना तत्वे
म्हणतात)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च।
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।।7.4।।
भूमिः, आपः, अनलः, वायुः, खम्, मनः, बुद्धिः अहंकारः च इति इयम् मे अष्टधा भिन्ना प्रकृतिः एव ।
आधुनिक शास्त्राप्रमाणे जरी तुम्ही अगदी स्थिर बसलेले असला तरी
तुम्हाला पृथ्वी स्वतः बरोबर सूर्याच्या भोवती फिरवत असते म्हणजेच कोणतीही गोष्ट
इथे स्थिर नाही.
वस्तूमान आणि ऊर्जा ह्याचे सूत्र आईनस्टाईन ने सांगितले, आधुनिक
शास्त्राप्रमाणे आपल्या प्रकृतिचे 118 घटक आहेत. त्यानंतर आली क्वांटम
थियरी. ज्यामधे आईनस्टाईन चा विचार सूक्ष्म कणांच्या साह्याने मांडला गेला.
श्रीभगवानांनी 5000 वर्षापूर्वी हेच ह्या श्लोकात
सांगितले.
तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाशः संभूतः | आकाशात वायु:|
वायो:अग्निः
| अग्ने: आपः | अद्भ्यः पृथिवी | तैत्तिरीय
उपनिषद्
आत्मतत्त्व' पासून आकाश आकाशापासून वायु;
वायु पासून अग्नि;
अग्नि पासून जल उत्पन्न
झाले.
आणि जळापासून पृथ्वी निर्माण झाली.
भूमिः पृथ्वी
आपः जल
अनलः, अग्नि
वायुः, वायु
खम्, आकाश
मनः, बुद्धिः
अहंकारः च इति इयम् मे ह्या सर्व माझ्याच
अष्टधा भिन्ना आठ भिन्न
प्रकृतिः एव । प्रकृति आहेत
पुरुष आणि प्रकृती
प्रकृतीला मूलप्रकृती,
अहेतुमत्, प्रधान, अव्यक्त अशीही नावे आहेत.
प्रकृति च्या उत्पत्तीचे दुसरे कारण, हेतु नसल्यामुळे तिला अहेतुमत् म्हटले आहे.
इंद्रियांना न दिसणारी असल्यामुळे तिला अव्यक्त म्हटले आहे.
प्रकर्षेण करोति इति प्रकृति:’ अर्थात् जे (सृष्टीतील
पुरुषाव्यतिरिक्त सर्व अन्य तत्त्वांना) उत्पन्न करते, ते तत्त्व म्हणजे प्रकृती होय.
सांख्यदर्शनानुसार सत्त्व, रज
आणि तम हे त्रिगुण जेव्हा साम्यावस्थेत असतात, त्या अवस्थेलाच प्रकृती हे नाव आहे (सत्त्वरजस्तमसां साम्यावस्था
प्रकृति:| सांख्यसूत्र
१.६१)
पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाच स्थूल महाभूते ज्या सूक्ष्म तत्त्वांपासून
उत्पन्न होतात, त्यांना
तन्मात्र असे म्हणतात. गंधतन्मात्र,
रसतन्मात्र, रूपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र आणि शब्दतन्मात्र अशी
पाच तन्मात्रांची नावे आहेत. सांख्य-योग दर्शनांमध्ये मानलेल्या सत्कार्यवादाच्या
सिद्धांतानुसार महाभूते ही उत्पत्तीच्या आधीही त्यांच्या कारणांमध्ये म्हणजेच
तन्मात्रांमध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असतात व नंतर ती प्रकट होतात. तन्मात्र
हे महाभूतांचे पूर्वरूप आहे. तन्मात्र सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे ज्ञान
इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही.
अहंकार म्हणजे इगो असे जे आपण समजतो त्यापेक्षा त्याचा अर्थ इथे थोडा
वेगळा आहे.
आपला देश भारत, आपण
आपला तिरंगा अभिमानाने मिरवतो, आपले
राष्ट्रगीत आहे, म्हणजे
भारतीय म्हणुन ती आपली ओळख आहे. ह्याला अहंकार असे म्हणतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्।।7.5।।
इयम् हे महाबाहो! तु अपरा इतः अन्याम् जीव-भूताम् मे पराम्
प्रकृतिम् विद्धि, यया इदम् जगत् धार्यते।
मागील श्लोकात प्रकृति च्या निर्मीती बद्दल आपण वाचले
प्रत्येक कणाकणात ज्याला आपण अॅटम म्हणतो त्या अणूरेणूंमधे हालचाल
चालू असते.
वनस्पति सजीव असतात हे सुद्धा आता मान्य झाले आहे.
तरीसुद्धा प्रकृति आणि पुरुष ह्याचा उहापोह करणे आवश्यक आहे. द्वैत
आणि अद्वैत ह्याची चर्चा टाळून ह्या श्लोकात जीवात्मा वर भाष्य केले आहे.
प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच
महाभुते, पाच तन्मात्रा अशा पंचवीस तत्वांचा पूर्ण पसारा आहे.
इयम् हे महाबाहो! हे महाबाहो अर्जुन
पराम् श्रेष्ठ
अपरा कनिष्ठ
तु इतः ह्या सर्व ( प्रकृति)
तत्वाशिवाय
अन्याम् अन्य
जीव भूताम्
मे माझ्या
प्रकृतिम् प्रकृति
विद्धि, जाणणे
यया यद् ज्याप्रमाणे
इदम् हा
जगत् जीवलोक
धार्यते। ध्रु धातू स्थापन करणे
हे महाबाहो अर्जुन
(आधी
सांगितल्याप्रमाणे) प्रकृति ची आठ तत्व कनिष्ठ शक्तिची रूपे आहेत त्याच्याही पुढे
जाऊन श्रेष्ठ अशी जीवशक्ती आहे ज्यावर हा जीवलोक प्रस्थापित झाला आहे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय।
अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा।।7.6।।
सर्वाणि भूतानि एतत् योनीनि । अहम् कृत्स्नस्य जगतः प्रभवः तथा
प्रलयः इति उपधारय ।
मागील श्लोकात पुरुष प्रकृती, जीव सृष्टी
निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेली 25 तत्व ह्या सर्व गोष्टींची चर्चा केली.
उपधारय उप +धारय
धृ धातू धारण करणे
एतत् ह्या
योनीनि गर्भधारणेचा अवयव
यु धातू एकत्र येणे
सर्वाणि भूतानि सर्व जीवसृष्टी
अहम् मी
कृत्स्नस्य संपूर्ण
जगतः जगावर
प्रभवः प्र +भवः निर्माण होणे
तथा प्रलयः इति
प्र +लयः लयास जाणे
योनि ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला जो समजतो तोच
गर्भधारणा होण्याचा अवयव. गीतेचा अर्थ जाणून घेताना ह्यापेक्षा जास्त
अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
आपल्याला 84 लाख योनि, म्हणजे इतक्या
प्रकारचे जन्म हे माहीत आहे
पदम् पुराणातील श्लोकानुसार...
जलज नव लक्षाणी, स्थावर लक्ष विम्शति, कृमयो रूद्र संख्यक:।
पक्षिणाम दश लक्षणं,
त्रिन्शल लक्षानी पशव:, चतुर लक्षाणी मानव:।। -(78:5 पद्मपुराण)
1.पाण्यात राहणारे जीव-जंतु- 9 लाख
2. वनस्पति - 20 लाख
3.कीड़े-मकौड़े- 11 लाख
4.पक्षी- 10 लाख
5.पशु- 30 लाख
6.देवता-दैत्य-दानव-मनुष्य - 4 लाख
एकूण 84 लाख
प्रत्येक प्राण्याचे स्वतः चे वैशिष्ट्य आहे म्हणजे त्याचा आकार वजन
रंग काम करण्याची क्षमता इ. आता हे सर्व कशामुळे ठरते? आधुनिक जगात ह्यालाच जेनेटिक्स
म्हणतात.
आपटेंच्या डिक्शनरी प्रमाणे योनि म्हणजे आरंभ कींवा स्रोत. 84 लाख
जीवांचा स्रोत म्हणजे योनि. गर्भधारणेची प्रक्रिया काही एकदाच घडत नाही. पुन्हा
पुन्हा निर्मिती करणारी ती योनि
इथे मनुस्मृति तल्या श्लोकाचा उल्लेख करावासा वाटतो
एषा धर्मस्य वो योनिः समासेन प्रकीर्तिता ।
सम्भवश्चास्य सर्वस्य वर्णधर्मान्निबोधत ॥ २५ ॥
चातुर्वर्ण्याचा उल्लेख आपण 4 थ्या अध्यायात वाचला आहेच.
जेनेटिक्स ची कल्पना ह्या सर्व श्लोकातून अगदीच स्पष्ट होते.
मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् |
सम्भव: सर्वभूतानां ततो भवति भारत ।14.3।।
महत् तत्व म्हणजे ब्रह्मन् पासून सर्व सृष्टि निर्माण झाली आहे.
प्रकृती च्या उत्पत्ती बददल बोलत आहोत म्हणून ऋग्वेदातील हा श्लोक
सांगून टाकते
नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |
किमावरीव: कुहकस्यशर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं ||
सृष्टी से पहले सत् नहीं था, असत् भी नहीं
अन्तरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था
छिपा था क्या? कहाँ? किसने ढका था?
उस पल तो, अगम अतल जल भी कहाँ था?
(हे ऐकल्यासारखे वाटत असेल)
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥ ऋग्वेद 10
- 121-1
हिरण्यगर्भः चा शाब्दिक अर्थ सोन्याचे अंडे
आपल्या सृष्टिला जन्माला घालणारे. सूर्याला उद्देशून असे म्हटले आहे.
ह्या अंड्यापासून आकाश आणि पृथ्वी निर्माण झाली. ईश्वरी शक्तिमूळे
आकाश पाणी अवकाश सर्वांची निर्मीती झाली.
भू धातू म्हणजे होणे
ह्याला उपसर्ग आणि प्रत्यय लागले कि बरेच शब्द तयार होतात जसे
उत् +भव उद्भव निर्माण होणे
सम् +भव सम्भव शक्यता असणे
प्र +भव प्रभाव
वि +भव पालन करणे
अनु +भव अनुभव
परा +भव पराभव
आता ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा
भौतिक आणि जीवशक्ती मूळे ही सृष्टी निर्माण झाली, त्या निर्मिती प्रक्रियेची सुरवात
माझ्या पासून झाली आणि त्याची विल्हेवाट सुद्धा मीच लावतो.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------मत्तः
परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव।।7.7।।
हे धनञ्जय! मत्तः परतरं अन्यत् किञ्चित् न अस्ति। इदम् सर्वम्
सूत्रे मणिगणाः इव मयि प्रोतम्।
हे धनञ्जय!
किञ्चित् न अन्यत् अस्ति। अन्य काहीही असत नाही
अस् धातू असणे
मत्तः परतरं माझ्या पेक्षा
श्रेष्ठ
पर परतर परम (श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम)
इदम् सर्वम् हे सर्व
सूत्रे मयि मीच तो धागा
मणिगणाः
इव
प्रोतम् प्र +उत वर जाणे (ओतप्रोत, तुडुंब भरून
जाणे)
आधीच्या 3,4 श्लोकांचा अर्थ नीट समजावून
घेतल्यानंतर ह्या श्लोकात त्याचा निष्कर्ष सांगितला आहे.
ह्या सृष्टिला निर्माण करणारा मीच, ह्या सृष्टिचे
संगोपन करणारा मीच आणि त्याचा नायनाट करणाराही मीच. (नायनाट हा शब्द वापरताना
पृथ्वीवर घडणारे उत्पात, हिमयुग, माणसाची,
इतर
जीव सृष्टीची उत्क्रांती सर्व काही मनात येते)
इन्द्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्बुध्देरात्मा महान् परः ।।
महतः परमव्यक्तमव्यक्तात् पुरुषः परः ।
पुरषान्न परं किंचित्न्सा काष्ठा सा परा गतिः ।।
(कठोपनिषद् 1/3/10-11)
श्रीभगवान असे म्हणतात की माझ्याशिवाय इतर काहीही श्रेष्ठ नाही.
सगळ्याची सुरवात माझ्यापाशी होते आणि शेवट सुद्धा. जसे एखाद्या हारा मधे मणी
गुंफलेले असतात, त्या
मण्यांचे विशिष्ट स्थान ठरलेले असते तसेच सर्व गोष्टी माझ्यापाशी गुंफलेल्या असतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------रसोऽहमप्सु
कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः।
प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु।।7.8।।
हे कौन्तेय! अहम् अप्सु रसः, शशि-सूर्ययोः
प्रभा, सर्व-वेदेषु प्रणवः, खे शब्दः, नृषु पौरुषम्
अस्मि।
हे कौन्तेय!
अहम् अप्सु रसः, मी पाण्यातील रस
अप म्हणजे पाणी
शशि-सूर्ययोः प्रभा, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश
सर्व-वेदेषु प्रणवः,
खे शब्दः, खम म्हणजे आकाश
नृषु पौरुषम् अस्मि। नृ म्हणजे नर
आपण आपल्या सोयीसाठी क्लोरिन चे पाणी पितो पण खरे पाणी तेच ज्यात
जीवजंतू राहू शकतात. हिमालयातून प्रभवणारी गंगा सर्वांनाच जीवंत ठेवते प्राणी
पशुपक्षी आणि वनस्पतीना सुद्धा.
सूर्यप्रकाशामुळे वनस्पती वाढतात आणि आपल्याला अन्न मिळते ही
सूर्याची शक्ति मीच.
सूर्याने दिवसभर निर्माण केलेली उष्णता कमी करण्याचे काम चंद्राचे.
रात्रीच्या शांततेत झोपणे हे सुद्धा तितकेच आवश्यक. ही शीतलता देणारा मीच.
ओम शब्द साक्षात शिवा च्या मुखातून निर्माण झाला. ॐ’ असे ह्याचे
अदभूत चिन्ह, ह्याच्या
उच्चारणाने आपल्या शरीरात उर्जा निर्माण होते. ओम म्हणजेच प्रणव तो मीच आहे
प्रकर्षेणनूयते स्तूयते अनेन इति, नौति स्तौति इति वा प्रणव:।
आपले शब्द उच्चारण हे तीन सप्तकात विभागले गेले आहे. मंद्र मध्य आणि
तार. दोन स्वरांच्या मध्ये विशिष्ट अंतर ठरलेले असते. जसे 'सा' नंतर 'रे' जे ध्वनीलहरी च्या माध्यमातून मोजता
येते. केवळ हवेच्या अस्तित्वामुळे आपल्याला ध्वनी ऐकू येतात. हवा आणि लहरी दोन्ही
डोळ्यांना दिसत नाहीत. पण तिथे मीच असतो.
आणि सर्वात महत्त्वाचे नर जात जी इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे.
त्याला बुद्धि आहे सर्जनशीलता आहे हे पौरुषत्व म्हणजेच मी.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------पुण्यो
गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु।।7.9।।
पृथिव्याम् च पुण्यः गन्धः, विभावसौ तेजः च अस्मि; सर्व-भूतेषु
जीवनम्, तपस्विषु तपः च अस्मि।
पृथिव्याम् च पुण्यः गन्धः, पृथ्वीवरचा पवित्र गंध
विभावसौ तेजः च अग्नी चे तेज
विभावस म्हणजे अग्नी
अस्मि; मीच
सर्व-भूतेषु जीवनम्, सर्व सजीवांची जगण्याची प्रेरणा
तपस्विषु तपः तपस्व्यांमधील
तप
च अस्मि।
8 व्या श्लोकात श्रीभगवान आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे
त्याच्या पुढे..
सजीव सृष्टि व भोवतालची परिस्थिती ही त्या, त्या विशिष्ट
वातावरणामुळे तयार झालेली असते, जसे रेताड वाळवंटात राहणारे प्राणी आणि
पक्षी हे घनदाट जंगलात राहणाऱ्या पशुपक्षांपेक्षा वेगळे असतात.दोन्ही ठिकाणची झाडे
वेगळी असतात आणि त्यांचा एकमेकांशी चांगला समन्वय असतो. म्हणूनच नारळाचे झाड
हिमालयात वाढू शकत नाही.
म्हणजे पृथ्वीवरच्या ह्या वातावरणातील गंध मीच आहे.
अग्नी मधिल प्रकाशाची ज्योत पण मीच आहे. सर्व सजीवांची जगण्याची
प्रेरणा आणि तपस्वी लोकांमध्ये तपस्या करण्याचे सामर्थ्य सुद्धा मीच आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।।7.10।।
हे पार्थ! माम् सर्व-भूतानाम् सनातनम् बीजम् विद्धि, अहम्
बुद्धिमताम् बुद्धिः, तेजस्विनाम् तेजः अस्मि।
हे पार्थ! अर्जुना
माम् माझ्यात
सर्व-भूतानाम् सर्व जीवितांचे
सनातनम् बीजम् शाश्वत बीज
विद्धि, लक्षात
घे
अहम् मी
बुद्धिमताम् बुद्धिः,
बुद्धिवानांची
बुद्धि
तेजस्विनाम् तेजः उज्ज्वल भव्य मधील शक्ति
अस्मि आहे
मी कोण आहे हे पुढे सांगत असताना
श्रीभगवान असे म्हणतात की
मी सर्व जीवितांचे शाश्वत असे बीज आहे.
सनातन म्हणजे शाश्वत.
सत्य नेहमीच शाश्वत असते.
ईश्वर सत्य आहे
मोक्ष सत्य आहे
अनादि अनंत ज्याचा आरंभ नाही अंत नाही असे सत्य.
असे सत्य सांगणारा सनातन धर्म.
प्रत्येक गोष्टीची कशापासून तरी सुरवात होत असते. जसे ढग निर्माण
होतात म्हणून पाऊस पडतो. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होतात. हे
चक्र न थांबणारे आहे.
पुढे भगवान श्रीकृष्ण
म्हणतात विद्वानांची बुद्धि म्हणजे मी आहे. जसे एखादा शास्त्रज्ञ खूप महत्वाचा शोध
लावतो ज्याचा सर्वांनाच फायदा होतो. तेजस्वी पुरूषांमधले तेज पण मीच आहे
जसे तुलसीदास म्हणतात
न मैं किया न करि सकू,
साहिब करता मोर।
करत करावत आप है, तुलसी तुलसी शोर ।।
बलं बलवतां चाहं
कामरागविवर्जितम्।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ।।7.11।।
हे भरतर्षभ! अहम् बलवताम् काम-राग-विवर्जितम् बलम् भूतेषु
धर्म-अविरुद्धः, कामः च अस्मि।
हे भरतर्षभ!
च सुद्धा
अहम्. मी
बलवताम् बलवानांमधला
काम-राग-
विवर्जितम् विवर्जित रहित
बलम् बलवान
भूतेषु भूत जीव
धर्म-अविरुद्धः, धर्माच्या
विरुद्ध नसणारा
कामः कामभावना
च आणि
अस्मि. आहे
अस् धातू असणे
गीतेच्या 3 र्या अध्यायातील 37 व्या श्लोकात काम आणि राग ह्या संबंधी
विस्ताराने सांगून झाले आहे.
आपल्या धर्मात चार आश्रम सांगितले आहेत. जसे बाल्यावस्था, गृहस्थाश्रम
वगैरे. पण हा काही सक्तीचा नियम नाही. धर्म ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा आपण सध्या
समजतो तसा नाही तर धर्म म्हणजे कर्तव्य. गीतेमध्ये गृहस्थाश्रमी ची कर्तव्ये मान्य
आहेत जसे वंशवृद्धी.
मोठा मासा छोट्या माशाला गिळून टाकतो हे माशांच्या जगातील नियम.
माणसांच्या जगात आपल्या शक्तिचा (ज्ञानाचा)
वंचितांना मदत करण्यासाठी वापर करणे अपेक्षित आहे. आपल्या शक्तिचा
उपयोग दुसर्यांच्या कमजोर परिस्थिती चा
गैरफायदा घेण्यासाठी करणे चूक आहे
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की
जे (काम-राग-विवर्जितम्)
स्वतः च्या स्वार्थासाठी आपल्या शक्ति चा वापर करत नाहीत अशा बलवान लोकांमध्ये
असणारी शक्ति मी आहे. (आपण म्हणतोच ना काही माणसांमधेच देव दिसतो.) आणि मीच ती
कामशक्ति सुद्धा आहे ज्याचा वापर कुकर्म करण्यासाठी होत नाही तर फक्त वंशवृद्धी
साठी होतो जे धर्माच्या विरुद्ध नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये।
मत्त एवेति तान्विद्धि नत्वहं तेषु ते मयि।।7.12।।
ये च एव भावाः सात्त्विकाः ये राजसाः तामसाः च, तान्
मत्तः एव इति विद्धि, तेषु अहं न ते तु मयि ।
ये जे
च आणि
एव नक्की
भावाः भावरूप
सात्त्विकाः सात्विक
ये राजसाः राजस
तामसाः च, तामस
तान् तद् त्यांचे
मत्तः अस्मद् माझ्या कडून
एव नक्की
इति म्हणून
विद्धि, लक्षात घे
विद् धातू जाणतो
तेषु तद् त्यांच्यात
अहं मी
न
ते युष्मद् ते
तु पण
मयि अस्मद् माझ्यात
ह्या श्लोकात सगुण आणि निर्गुण ह्या संकल्पना विषयी भाष्य केले आहे
असे वाटते. परमात्मा हा सगुण आहे आणि तो त्रिगुणात अवताररुपाने साकारलेला आहे.
त्याच वेळी तो निर्गुण म्हणजे निराकार सुद्धा आहे. आपल्यामध्ये असणारे अंतःकरण,
मन,
बुद्धि,
भावना,
विचार,
वासना
हे सर्व निराकार आहे.
श्रीभगवानांनी असेही म्हटले आहे की ते सर्व भूतांचे सनातन बीज आहेत, आणि त्यांनी असेही म्हटले आहे की सर्व
भूतांना आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार जगू द्यावे.
म्हणजेच ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
तीनही प्रकारचे गुण सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण माझ्याच मुळे निर्माण झाले. हे सर्व (गुण)
माझ्यामध्ये आहे पण मी ह्यांच्या मध्ये नाही हे तू लक्षात घे.
ऋग्वेदातील 1.164.20
श्लोक असाच अर्थ सांगतो
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परि षस्वजाते । तयोरन्यः
पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभि चाकशीति ॥ ऋग्वेद 1.164.20.
एकाच झाडावर दोन पक्षी (जीवात्मा, परमात्मा) बसले आहेत. एक जण फळे चाखत आहे आणि दुसरा त्याचा साक्षीदार
आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्।।7.13।।
एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः इदम् सर्वम् जगत् मोहितम्, एभ्यः
परम् अव्ययम् माम् न अभिजानाति ।
एभिः ह्या
त्रिभिः तीन
गुणमयैः गुणांमुळे निर्माण
भावैः नैसर्गिक प्रवृत्ती
इदम्. ह्या
सर्वम् जगत् सर्व जग
मोहितम्, भूरळ पडली आहे
एभ्यः ह्याच्या
परम् श्रेष्ठ
अव्ययम्. अविनाशी
माम् मला
न
अभिजानाति ।जाणून घेत नाही
7व्या अध्यायातील 3 र्या श्लोकात जे म्हटले आहे तेच थोडे
विस्ताराने इथे सांगितले आहे.
तीन गुणांमुळे निर्माण होणार्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार
निरनिराळ्या स्वभावाची, निरनिराळ्या प्रकृती ची माणसे दिसून येतात. आणि ते स्वतःच्या
अस्तित्वातच गुंतुन पडलेले असतात. गुणमय म्हणजे त्रिगुणांमुळे निर्माण झालेली माया,
मा ह्याचा अर्थ नाही. या
म्हणजे ही.
जी (जिचे अस्तित्व) नाही ती माया.
स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या लोकांच्या ह्या जगात, (जे नश्वर आहे) त्याही पलीकडे जाऊन माझे
अविनाशी अस्तित्व समजून घेत नाहीत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।।7.14।।
एषा हि मम दैवी गुणमयी दुरत्यया माया । ये माम् एव प्रपद्यन्ते,
ते
एताम् मायाम् तरन्ति।
एषा एतद् हि
हि. नक्कीच
मम. माझे
दैवी
गुणमयी नैसर्गिक वृत्ती
दुरत्यया. जाण्यासाठी कठीण
दुः +अती +अय
अय म्हणजे जाणे
माया दैवी शक्ति
ये जो
माम् माझे
एव फक्त
प्रपद्यन्ते प्र +पद पोहोचू शकणे
पद् धातू जाणे
ते
एताम् ह्या
मायाम्. माया
तरन्ति. तृ धातू तरून जातात
आधीच्या श्लोकात मायाजगात अडकून पडल्याने त्या पलिकडेचे जग दिसत नाही
असे म्हटले जरी असले तरी ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की त्रिगुणातून
निर्माण झालेले माया ही सुद्धा दैवी शक्ति आहे. आपला सर्वसाधारण समज असा असतो की
केवळ अज्ञानामुळे आपण या मायावी जगाचा मोह पडतो. आणि आपले अज्ञान दूर झाले कि
आपल्याला परम सत्याचा अनुभव येतो. पण इथे वेगळा अर्थ अपेक्षित आहे. हि मायाच
आपल्या मनाची कसोटी घेऊ शकते. भगवानांनी आपल्याला दिलेले हे आव्हान च जणू.
दुरत्यया हा शब्द इथे वापरला आहे. जो कठोपनिषद् मधे पण सापडतो.
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥
कठोपनिषद् 1.3
जो भगवानांना शरण गेला, त्याने या मायावी जगावर सहज विजय मिळविला. नाहीतर ह्या आव्हानास पार
करणे अत्यंत अवघड.
अशाच अर्थाचा श्लोक श्वेताश्वतरोपनिषद् मधे पण सापडतो.
मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम्।
(श्वेताश्वतरोपनिषद्-4.10)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः।।7.15।।
मायया अपहृत-ज्ञानाः आसुरम् भावम् आश्रिताः दुष्कृतिनः नर-अधमाः
मूढाः माम् न प्रपद्यन्ते।
मायया (माया) मायामुळे
अपहृत अपहरण झालेले
ज्ञानाः ज्ञान
आसुरम् भावम्. आसुरी स्वभावाचे
आश्रिताः आश्रय घेणारे
श्रि धातू आश्रय घेणे
दुष्कृतिनः दुष्कर्म करणारे
नर-अधमाः नराधम
मूढाः अज्ञानी
माम् (अस्मद्) मी
न प्रपद्यन्ते। पोहोचू शकत नाही
आधीचा श्लोक समजून घेतल्यानंतर आता हा श्लोक सहज समजतो.
जर दैवी शक्ती असलेली माया ही आपली कसोटी घेण्याचे साधन असेल तर
ज्याला ही परीक्षा पार करण्याचे ज्ञान आहे तो तरून जाईल पण ज्याचे ज्ञान ह्या
मायावी शक्तिमुळे हरवून गेले आहे, (सर्वच ज्ञानी माणसे प्रभूला शरण जात
नाहीत, कारण त्यांचा अहंकार मध्ये येतो) म्हणजे ज्ञान आहे पण ज्याला ग्रहण
लागले आहे त्यामुळे वागणे असूरी,
दुष्कर्म करणारे, हीन
प्रवृत्ती असणारे मला शरण येत नाहीत, माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.
अशाच अर्थाचा एक श्लोक
आलस्य ही मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः।
नास्त्युद्यमसमो बन्धुः कृत्वा यं नावसीदति ।।
आळशीपणा हा शरीरात असलेला मोठा शत्रू आहे. कर्म माणसाचा चांगला मित्र
आहे जो त्याचे अधःपतन रोखतो..
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।।7.16।।
हे भरतर्षभ अर्जुन! आर्तः, अर्थार्थी, जिज्ञासुः,
ज्ञानी
च चतुः-विधाः सुकृतिनः जनाः माम् भजन्ते ।
हे भरतर्षभ अर्जुन!
आर्तः, आर्त
अर्थार्थी, अर्थार्थिन्,
चांगले
आयुष्य जगू इच्छित
जिज्ञासुः, उत्सुकता
असणारा.
ज्ञानी च आणि ज्ञानी
चतुः-विधाः चार प्रकारचे, (वैविध्य)
विध् धातू उल्लेख करणे
सुकृतिनः जनाः सुकृतिन्
चांगले काम करणारे लोक
माम् मला
भजन्ते भज् धातू भक्ति करणे
15 वा श्लोक वाचल्यानंतर सहाजिकच प्रश्न असा येतो की मग भगवानांपर्यंत
कोण पोहोचू शकतो?
भगवंतांनी चार प्रकारच्या लोकांचा उल्लेख केला आहे. ह्या चारही प्रकारचे
लोक सुकृतिन् (सत्कृत्य करणारे) असणे आवश्यक आहे
त्यातील पहिला प्रकार म्हणजे
1.आर्त.. येथे द्रौपदीची उपमा देण्याचा मोह आवरत नाही.
वस्त्रहरणाच्या वेळी तिने कृष्णाचा ज्या आर्ततेने धावा केला असेल
त्याची कल्पना करवत नाही.
2. ज्ञान प्राप्ती साठी आसूसलेले जिज्ञासू ज्यांना अध्यात्मिक गोष्टी
जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या मनाची कवाडे कायम उघडी असतात आणि ते
सर्वांना गुरू करायला तयार असतात.
3. अर्थार्थी इथे ध्रुव बाळाचे उदाहरण लागू पडू शकेल. राजा असलेल्या
पित्याच्या मांडीवर बसता आले नाही म्हणून अढळपद मिळवायचा निश्चय केला. आणि हे
स्थान त्याला भक्तीमार्गानेच मिळवायचे होते. म्हणजेच त्याने कोणताही आडमार्ग
पत्करला नाही.
4. ज्ञानी माणसांना सर्वच गोष्टीत ईश्वराचा अंश दिसत असतो. त्यांच्या
मनात फक्त परमात्म्याचाच विचार असतो.
असे चार प्रकारचे लोक माझी भक्ती करतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तेषां
ज्ञानी नित्ययुक्त एकभक्ितर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।।7.17।।
तेषाम् नित्य-युक्तः एक-भक्तिः ज्ञानी विशिष्यते। हि ज्ञानिनः अहम्
अत्यर्थम् प्रियः, सः च मम प्रियः।
तेषाम् त्यांचे
तद् षष्ठी ब. व.
नित्य-युक्तः निश्चल, पूर्णपणे सामावलेला
एक-भक्तिः अनन्य भक्ति
ज्ञानी
विशिष्यते वि शेष
(सर्वांपासून) बाजूला करणे
वि +शिष्
ज्ञानिनः ज्ञानी ना
हि साठी
अहम् मी
अत्यर्थम् अती अर्थम्, अमूल्य
प्रियः,
सः (ज्ञानी) च तोच
मम प्रियः। मला आवडतो
तेषां हा शब्द आधीच्या श्लोकातील चार प्रकारच्या लोकांना उद्देशून
वापरला आहे. (आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी)
ह्या (चार प्रकारच्या लोकांमध्ये) मी ज्ञानी लोकांना श्रेष्ठ (विशेष)
मानतो जे त्यांच्या अनन्यसाधारण भक्तीने माझ्यात पूर्णपणे सामावून गेले आहेत. अशा
ज्ञानी लोकांना मी अतिशय प्रिय असतो आणि मला ते खूप प्रिय असतात.
सर्वश्रेष्ठ लोकांनाच गुणांची पारख असते अशा अर्थाचा एक श्लोक खालील
प्रमाणे
गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणो, बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल: ।
पिको( कोकीळ) वसन्तस्य गुणं न वायस: (कावळा) करी(हत्ती) च सिंहस्य
बलं न मूषक: ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्।।7.18।।
एते सर्वे उदाराः एव, ज्ञानी तु मे आत्मा एव मतम् । हि
युक्त-आत्मा सः अनुत्तमाम् गतिम् माम् एव आस्थितः।
एते सर्वे हे सर्व
उदाराः उत्कर्ष होणे
उत्+ऋ वर जाणे, संपादन करणे
एव,
ज्ञानी
तु
मे माझा
आत्मा
एव मतम् ।
हि युक्त-आत्मा
सः अनुत्तमाम्
गतिम्
माम् एव
आस्थितः।आस्था असलेला आ+स्थित स्थिरावलेला
17 व्या श्लोकात ज्ञानी माणसे मला प्रिय आहेत, अमूल्य आहेत असे कृष्णाने सांगितले
त्यामुळे सहाजिकच प्रश्न असा मनात येतो की मग बाकीच्या लोकांचे(जे सत्कृत्य करतात
) काय?
श्रीभगवानकृष्ण म्हणतात,
तसे तर सर्वच (भक्त) श्रेष्ठ आहेत, पण ज्ञानी हे माझ्या आत्म्यासारखेच आहेत असे मी मानतो. कारण ते
पूर्णपणे माझ्यात सामावलेले आणि त्यांच्या साठी परम लक्ष्य सुध्दा मीच आहे
ह्याच अर्थाचे आणखी श्लोक
गीत्वा च मम नामानि विचरेन्मम सन्निधौ।
इति ब्रवीमि ते सत्यं क्रीतोहं तस्य
चार्जुन ।।
(आदि पुराण-1.2.231)
(जे माझी भक्ती करतात ते माझ्या जवळच असतात)
साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहम्।
मदन्यत्ते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि।।श्रीमद्भागवत (9.4.68)
भक्त गण नेहमी माझ्या हृदयात वास करतात आणि मी भक्तांच्या. भक्तांना
माझ्या शिवाय दुसरे काही सुचत नाही आणि मीही त्यांना कधी विसरत नाही.
न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शङ्कर: ।
न च सङ्कर्षणो न श्रीर्नैवात्मा च यथा भवान् ॥ १५ ॥ भागवत 11.14. 15
ब्रह्मा, शिवा
, सडःकर्षण, लक्ष्मी आणि माझ्या पेक्षा ही तू मला
प्रिय आहेस.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------बहूनां
जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः।।7.19।।
बहूनाम् जन्मनाम् अन्ते ज्ञानवान् माम् प्रपद्यते 'सर्वम्
वासुदेवः' इति । सः महात्मा सुदुर्लभः।
बहूनाम् बरेच
जन्मनाम् जन्म
अन्ते अंत शेवटी
ज्ञानवान् ज्ञानी
माम् मला
प्रपद्यते शरण येतात
प्र +पद् धातू गाठणे.
'सर्वम् सर्व
वासुदेवः'
इति म्हणून
सः तो
महात्मा महान् आत्मा
सुदुर्लभः। सु दुः लभः अती दुर्लभः
ज्ञानाचा सागर इतका प्रचंड
मोठा आहे की पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे.
संत ज्ञानेश्वर हे अगदी चपखल उदाहरण आहे ह्याचे. त्यांनी पूर्वीच्या
अनेक जन्मात ज्ञान प्राप्त करून ज्ञानेश्वरी लिहीली, नाहीतर 15
व्या वर्षी हे केवळ अशक्यच.
ह्या अध्यायाचे नावच ज्ञान विज्ञान योग असे आहे. असा ज्ञानी शेवटी
श्रीभगवंतांच्या चरणी लीन होणार हे सहाजिकच आहे.
जानें बिन होइ न परतीती।
बिनु परतीती होइ नहिं प्रीती ।।रामचरितमानस
परतीती म्हणजे श्रद्धा.
श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे ब्रीदवाक्य.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की अनेक जन्मांमधे ज्ञानप्राप्ती
झाल्यावर जो मला शरण येतो आणि (ज्याला) सर्वव्यापी कृष्णाचे ज्ञान होते असा महान
आत्मा खूपच दुर्लभ असा असतो.
त्याही पुढे जाऊन श्रीभगवान असे म्हणतात की ज्यांची असे ज्ञान
प्राप्त करण्या प्रती श्रद्धा नाही ते जीवन-मृत्यु च्या चक्रात अडकून पडतात.
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि। 9. 3।
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया।।7.20।।
तैः तैः कामैः हृत-ज्ञानाः स्वया प्रकृत्या नियताः तम् तम् नियमम्
आस्थाय अन्य-देवताः प्रपद्यन्ते।
तैः तैः निरनिराळ्या
कामैः कामना
हृत- ह्रृ धातू हरण होणे
ज्ञानाः ज्ञान
स्वया स्वतः
प्रकृत्या नैसर्गिक प्रवृत्ती
नियताः संचालन
तम् तम् त्या त्या
नियमम् नियम
आस्थाय आ+स्था आश्रय घेणे
अवलंबून राहणे
अन्य-देवताः इतर देवता
प्रपद्यन्ते। शरण येतात
प्र +पद् धातू
आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन हा श्लोक समजून घेता येईल.
जसे बेडकाला त्याचे डबके हेच जग वाटत असते.
Bird's eye view आणि worm's view म्हणजे व्यापक
दृष्टि आणि संकुचित दृष्टि.
आपण ज्या जगात राहतो, आपले जेवढे ज्ञान असते, त्या
जगातील श्रेष्ठ गोष्टीवर आपली श्रद्धा असते. कधी कधी प्रलोभनांमूळे आपले ज्ञान
झाक…
[9:16 AM, 11/30/2021] Anagha Happy Conversation: यो
यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्।।7.21।।
यः यः भक्तः याम् याम् तनुम् श्रद्धया अर्चितुम् इच्छति, तस्य
तस्य ताम् एव श्रद्धाम् अहम् अचलम् विदधामि।
यः यः भक्तः जो जो भक्त
याम् याम् त्या त्या
तनुम् स्वरूपात
तनू शरीर
श्रद्धया भक्ति
अर्चितुम् अर्च् धातू पूजा करणे
इच्छति, इच्छा असते
तस्य तस्य त्याचे
ताम् ते
एव सुद्धा
श्रद्धाम् श्रद्धा
अहम् मी
अचलम् निश्चल
विदधामि। प्रदान करणे
वि +धा धातू धारण करणे
त्याच्या मर्जी शिवाय गवताचे पाते सुध्दा हलू शकत नाही असे म्हणतात
पण तरी सुद्धा भगवंतांचे असे काही म्हणणे नाही कि सर्वांनी कृष्णाचीच भक्ती केली
पाहिजे. अगदी कर्मयोगी वर सुद्धा त्याची कृपादृष्टी असतेच.
सनातन धर्मात निरनिराळ्या प्रकारचे पंथ आहेत, प्रत्येकाची
श्रद्धास्थाने वेगवेगळी आहेत जसे
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
आकाशातून पडणारा पाऊस समुद्राला जाऊन मिळतो, त्याच प्रमाणे कोणत्याही देवतेला पूजले
तरी तो नमस्कार श्रीहरि (श्रीकृष्ण) ला पोहोचतो.
असाच अजून एक श्लोक
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखाः द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति।।11.28।।
थोडक्यात जो जो भक्त आपल्या श्रदधेनुसार ज्या ज्या प्रारूपात भक्ति
करू इच्छितो त्या त्या ठिकाणी माझी कृपादृष्टी असते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते।
लभते च ततः कामान्मयैव विहितान् हि तान्।।7.22।।
सः तया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम् ईहते, ततः च मया एव
विहितान् तान् कामान् हि लभते ।
सः तो
तया त्याच्या
श्रद्धया युक्तः श्रदधेनुसार
तस्य त्याची
आराधनम् आराधना
ईहते ईह धातू प्रयत्न करणे
, ततः च त्याची सुद्धा
मया एव माझ्याच कडून
विहितान् वि+हित मंजूर करणे
तान् त्या
कामान् कामना
हि नक्कीच
लभते । प्राप्त होते
21 व्या श्लोका चा अर्थ समजून घेतल्यानंतर 22 वा श्लोक सहज
समजतो.
आता श्री भगवान असे म्हणतात की
जो (भक्त) आपापल्या
श्रदधेनुसार देवतांची आराधना करतो आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी
प्रयत्न करतो, ते सर्व लाभ त्याला माझ्याच मूळे प्राप्त झालेले असतात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि।।7.23।।
तेषाम् अल्प-मेधसाम् तु तत् फलम् अन्तवत् भवति; देव-यजः
देवान् यान्ति, मत् भक्ताः माम् अपि यान्ति।
तेषाम् त्यांचे
अल्प-मेधसाम् अल्प बुध्दी असलेले
मेधा बुद्धि
तु परन्तु
तत् ते
फलम् फळ
अन्तवत् नाशवन्त
भवति;. भू धातू होणे
देव-यजः देवांना पूजणारे
देवान् इष्ट देव
यान्ति, जातात
या धातू जाणे
मत् भक्ताः माझे भक्त
माम् अपि यान्ति। माझ्या कडे येतात.
सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातील आशा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी
ते त्या त्या देवतांचे पूजन करतात आणि त्यांना त्याचे तात्पुरते फळही मिळते.
(तात्पुरत्या गरजा भागतात)
देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात (कृपादृष्टी होते)
मला पूजणारे मला प्राप्त होतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अव्यक्तं व्यक्ितमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्।।7.24।।
अबुद्धयः मम अनुत्तमम् अव्ययम् परम् भावम् अजानन्तः अव्यक्तम्
माम् व्यक्तिम् आपन्नम् मन्यन्ते।
अबुद्धयः कमी बुद्धि असलेला
मम माझे
अनुत्तमम् सर्वोत्तम
अव्ययम् व्यय होत नाही असा
परम् भावम् श्रेष्ठ भाव
अजानन्तः अजाण
अव्यक्तम् व्यक्त न झालेला
माम् मी
व्यक्तिम् व्यक्ति
आपन्नम् साध्य केलेला
मन्यन्ते मन् धातू समजणे,
जाणणे
श्रीकृष्णाची विविध रुपे आपण पहातो अगदी बालपणीच्या खट्याळ
कृष्णापासून ते अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण.
4 थ्या अध्यायातील 5व्या आणि 6व्या श्लोकात
ईश्वराच्या निराकार आणि साकार रुपाची चर्चा करून झाली आहे.
त्याच संदर्भात श्रीभगवान असे म्हणतात की
बुद्धिहीन माणसे माझे निराकार अविनाशी श्रेष्ठ भावरुप न जाणून घेता
माझे त्यांच्या समोर प्रकट झालेल्या मानवी रुपातच मला बघतात
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------नाहं
प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्।।7.25।।
योग-माया-समावृतः अहम् सर्वस्य प्रकाशः न। अयम् मूढः लोकः अजम्
अव्ययम् माम् न अभिजानाति।
योग-माया-
समावृतः
सम् + आ + वृ धातू आच्छादन करणे
अहम् मी
सर्वस्य सर्वांचे
प्रकाशः न।
अयम् ह्या
मूढः लोकः मूर्ख लोक
अजम् अज न जायते जन्म न
झालेला
जन् धातू उत्पन्न होणे
अव्ययम् अविनाशी
माम् मला
न अभिजानाति जाणत नाहीत.
मायाजवनिकाच्छन्नमज्ञाधोक्षजमव्ययम् ।
न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा ॥ १९ ॥
श्रीमद् भागवतात (1.8.19)कुंतीच्या तोंडी असे म्हटले आहे की
परमेश्वर योग आणि माया च्या पडद्याआड झाकून गेले आहेत.
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् |
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये || ईशोपनिषद 15
सत्य झाकून गेले आहे चमकत्या झाकणाने, सूर्यदेवा! सत्या चे दर्शन होण्यासाठी तू ते झाकण हटव.
आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन श्रीभगवान पुढे असे म्हणतात की
मी माझे अस्तित्व सर्वांना जाणवून देत
नाही कारण ते योग माया ह्या मध्येच गुरफटून गेलेले असल्याने मूर्ख (अज्ञानी)
लोकांसाठी मी जन्म न झालेला, अविनाशी
असा माहीतच नाही आहे.
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन।।7.26।।
हे अर्जुन! समतीतानि वर्तमानानि च भविष्याणि भूतानि च अहम् वेद।
माम् तु न कश्चन वेद ।
हे अर्जुन! अर्जुना
समतीतानि सम अतीत संपूर्ण भूतकाळ
अतीत म्हणजे गत मृत
वर्तमानानि वर्तमान काळ
च भविष्याणि भविष्यकाळ सुद्धा
भूतानि च जिवित सुध्दा
अहम् मी
वेद विद् धातू जाणतो
माम् मला
तु परन्तु
न कश्चन कोणीही नाही
वेद जाणत.
यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः। मुंडकोपनिषद्-1.1.9
भगवान सर्वज्ञ आहेत सर्व काही जाणतात.
नैषा तर्केण मतिरापनेया
कठोपनिषद्-1.2.9
आपल्या बौद्धिक तर्काच्या पलिकडे भगवान आहेत.
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह।
तैत्तिरीयोपनिषद्-2.9.1
आपले मन आणि आवाज भगवानांपर्यंत पोहोचत नाही.
ह्या 26 व्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की
मी भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणतो. सर्व जीवीतांना जाणतो (मी
सर्वज्ञ आहे) पण मला कोणीही ओळखत (जाणत) नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परन्तप।।7.27।।
हे परन्तप भारत ! सर्गे इच्छा-द्वेष-समुत्थेन द्वन्द्व-मोहेन
सर्व-भूतानि सम्मोहम् यान्ति ।
हे परन्तप भारत !
सर्गे निर्मिती
सृज धातू रचना करणे
इच्छा-द्वेष
-समुत्थेन समुत्थ उभारून आलेला
द्वन्द्व- दूहेरी
मोहेन मोहाने
सर्व-भूतानि सर्व जीव
सम्मोहम् संभ्रम
यान्ति प्राप्त करणे
या धातू जाणे
द्वन्द्व ह्या शब्दाभोवती सर्व श्लोकाचा अर्थ सामावलेला आहे.
मराठीतील द्वन्द्व-समास म्हणजे दुहेरी शब्द जे दोन्हीही सारखेच
महत्त्वाचे आहेत.
ह्या श्लोकात भावनिक द्वन्द्वाबदद्ल विचार मांडला आहे. विश्वाच्या
निर्मिती पासून आपल्या जन्मापासून हे द्वन्द्व सुरू होते.
जन्म झाला की मृत्यु अटळ आहेच पण तो आवश्यक सुद्धा आहे.
दुःख आहे म्हणून सुखाची आपल्याला ओढ लागते.
हिंसा नको वाटते म्हणून अहिंसेचा मार्ग पत्करावासा वाटतो.
एखादी गोष्ट आपल्याला आवडते किंवा अजिबात आवडत नाही ह्यामागे असतात
आपल्या इच्छा किंवा अनिच्छा (द्वेष)
राग-लोभ, सत्य-असत्य
अशा कितीतरी दुहेरी भूमिका असतात ज्यामुळे सर्व जीवितांच्या मनामध्ये संभ्रम
निर्माण झालेला असतो.
(ह्या अशा द्वन्द्व पासून मुक्ति म्हणजेच आपण आपल्या मनावर मिळवलेला
ताबा. सुवर्णमध्य.)
यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धस्तु य: पुमान् ।
न निर्विण्णो नातिसक्तो भक्तियोगोऽस्य सिद्धिद: श्रीमद्भागवतम्
॥11.20. 8 ॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------येषां
त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः।।7.28।।
येषाम् पुण्य-कर्मणाम् तु पापम् जनानाम् अन्तगतम्, ते
द्वन्द्व-मोह-निर्मुक्ताः दृढ-व्रताः माम् भजन्ते ।
येषाम् यद् ज्याचे
पुण्य-कर्मणाम् पुण्यकर्म
पुण्यकर्मन् ष. ब. व.
तु परन्तु
पापम् पाप
जनानाम् लोकांचे
अन्तगतम्, अन्त गत पूर्ण विनाश
ते तद् ते (सर्व)
द्वन्द्व-मोह- निर्मुक्ताः
द्वन्द्व मोहापासून मुक्त
दृढ-व्रताः वृत धातू वृत्ती
निश्चयी वर्तन
माम् मला
भजन्ते भज् धातू पूजतात
पुण्य कर्म करत राहिल्याने ज्या व्यक्तींची पापे नष्ट होतात, ते
मोहाच्या द्वंद्वातून सुद्धा मुक्त होतात. असे लोक दृढ निश्चयाने माझी पूजा करतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्।।7.29।।
ये माम् आश्रित्य जरा-मरण-मोक्षाय यतन्ति, ते तत्
विदुः ब्रह्म, कृत्स्नम् अध्यात्मम्, अखिलम्
कर्म च ।
ये जो
माम् माझ्या
आश्रित्य आश्रयाला येणे
श्रि धातू सेवा करणे
जरा-मरण-मोक्षाय वार्धक्य मृत्यू पासून मोक्ष साठी
यतन्ति, प्रयत्न
करतात
यत् धातू प्रयत्न करणे
ते तो
तत् त्याचे
विदुः जाणतात
ब्रह्म, ब्रह्म
कृत्स्नम् सर्वकाही
अध्यात्मम्, अध्यात्म
अखिलम् समस्त संपूर्ण
कर्म च । कर्म सुद्धा
आतापर्यंतच्या बर्याच श्लोका मध्ये ज्ञानी माणसे ज्ञान प्राप्त करुन
परमेश्वराला शरण जातात असे आपण वाचले आहे.
ह्या अध्यायातील 16 व्या श्लोकात 4 प्रकारच्या
भक्तांचे वर्णन सुद्धा आपण वाचले आहे.
सर्व प्रकारच्या साधने चे लक्ष्य मोक्ष मिळवणे हेच आहे.
ज्ञानी माणसांनी आपल्या मनावर इतका ताबा मिळवला आहे की त्यांना
त्यांच्या वार्धक्याचा सुद्धा त्रास जाणवत नाही. (कोणतेही शारीरिक कष्ट त्यांच्या
मनाला पीड़ा उत्पन्न करू शकत नाही)
ते स्वतः च ब्रह्म झाले आहेत.
अहम् ब्रह्मास्मि.
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन ।
यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम्।
(कठोपनिषद्-1.2.23)
ईश्वराला अध्यात्मिक उपदेश, बुद्धि आणि इतर ज्ञानाने प्राप्त करता येत नाही. जेव्हा परमेश्वराची
आपल्यावर कृपादृष्टी होते तेच भाग्यवान आत्मा ईश्वराचा अनुभव घेतात.
म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की
जे माझ्या आश्रयाला येतात ते वार्धक्य आणि मृत्यू (पुनर्जन्म) मुक्ति
मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी ब्रह्म, अध्यात्म आणि समस्त कर्म पूर्णपणे जाणलेले असते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।7.30।।
साधिभूत-अधिदैवम् साधियज्ञम् च माम् विदुः युक्त-चेतसः च ये
प्रयाण-काले अपि विदुः ते माम् विदुः।
धी धातू धारण करणे
साधिभूत आत्मा (सर्व भूतांवर) हुकुमत असणारा
स अधिभूत
अधिदैवम् देवतांवर हुकुमत असणारा, श्रेष्ठ
साधियज्ञम् यज्ञकर्मांवर
हुकुमत असणारा
स अधियज्ञम्
च सुद्धा
माम् विदुः मला जाणतात
युक्त-चेतसः प्रबुद्ध
च
ये जे
प्रयाण-काले शेवटच्या काळात.
अपि सुद्धा
विदुः जाणतात
ते माम् विदुः। ते मला जाणतात
आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन श्रीभगवान असे म्हणतात की
जे ज्ञानी आहेत (ज्यांना माझे अस्तित्व जाणवले आहे, प्रबुद्ध
झाले आहेत)
त्यांना माझे जीवसृष्टी वरचे अधिपत्य, सर्व देवतांवर
चे अधिपत्य, सर्व यज्ञकर्मांवरचे अधिपत्य माहीत झाले ते अगदी शेवटच्या क्षणी
सुद्धा ते माझाच विचार करत असतात. माझ्यातच सामावलेले असतात.
.----------------------------------------------- 🙏🙏🙏🙏--------------------------------------------------