श्रीमद्भगवद्गीतेच्या 18 व्या अध्यायाचे नाव मोक्ष संन्यास योग असे असून ह्यात 78 श्लोक आहेत.
अर्जुन उवाच
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्। त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन।।18.1।।
अर्जुन उवाच - हे महाबाहो ! हे हृषीकेश ! केशिनिषूदन ! संन्यासस्य त्यागस्य च तत्त्वम् पृथक् वेदितुम् इच्छामि।
अर्जुन उवाच -
हे महाबाहो ! महान बाहु पु. सं. ए. व.
हे हृषीकेश !
केशिनिषूदन !
केशी नामक असुराचा संहार करणारा
सूद् धातू हत्या करणे.
संन्यासस्य सन्न्यासाचे
सन्न्यास पु. ष. ए. व.
सं+नी+अस् धातू फेकणे /ठेवणे
सर्व काही टाकून दिलेला
त्यागस्य त्यागाचे त्याग पु. ष. ए. व.
च
तत्त्वम् तत्व नपु. प्र. ए. व.
पृथक् विश्लेषण अव्यय
वेदितुम् जाणणे विद् धातू माहीत करुन घेणे तुमुन् प्रत्यय
इच्छामि इच्छितो इष् धातू कर्तरी परस्मैपदी लट लकार उ. पु. ए. व.
आता पर्यंत श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला महाबाहो असे संबोधले आहे. ह्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना महाबाहो असे म्हटले आहे.
दुसरे संबोधन केशिनिषूदन’ असे म्हटले आहे. केशि असुर एका बेफाम घोड्याच्या रूपात असताना श्रीभगवानकृष्णांनी त्याची हत्या केली. अर्जुनाने हे संबोधन ह्यावेळी का वापरले असावे? असा विचार केला असता अर्जुनाच्या मानसिक स्थितीची तुलना बे-लगाम घोड्याशी करता येईल. अनेक विचारांचे काहूर आणि मनात येणारे असंख्य विचार बेफाम घोड्याप्रमाणे आहेत. ह्याच मनःस्थितीत अर्जुन श्रीभगवानकृष्णांना प्रश्न विचारत आहे.
तिसरे संबोधन आहे हृषिकेश म्हणजे इन्द्रियांचा स्वामी, हृषिका, म्हणजे "इंद्रिय"+ ईश.
इन्द्रियांवर ताबा असणे म्हणजे मनःशांती असणे.
हृषीकाणामीन्द्रियाणामीशः हृषिकेशः.
ह्या श्लोकात संन्यास आणि त्याग असे दोन शब्द आले आहेत. साधारणतः दोन्ही चा अर्थ एकच. मग दोन्ही मध्ये फरक तर असणारच. अर्जुनाला नेमका हाच प्रश्न पडला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
अर्जुन म्हणाला
हे महाबाहो!
हे केशिनिषूदन! हे हृषिकेश
मला सन्न्यास आणि त्याग ह्यामधील तात्विक दृष्ट्या पृथक्करण जाणून घेण्याची इच्छा आहे.
------------------------------------------------------
श्री भगवानुवाच
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः।सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः।।18.2।।
श्रीभगवानुवाच - कवयः काम्यानाम् कर्मणाम् न्यासम् संन्यासं विदुः। विचक्षणाः सर्व-कर्म-फल-त्यागम् त्यागम् प्राहुः।
श्रीभगवानुवाच -
कवयः विद्वान कवि पु. प्र. ब. व.
काम्यानाम् आशेने काम्य नपु. ष. ब. व.
कम् धातू इच्छा करणे
कर्मणाम् कर्मांच्या कर्मन् नपु. ष. ब. व.
न्यासम् त्याग न्यास पु. द्वि. ए. व.
नी+अस् धातू त्याग करणे
संन्यासं सन्न्यास पु. द्वि. ए. व.
विदुः जाणतात विद् धातू माहीत करुन घेणे कर्तरी परस्मैपदी लट लकार प्र.पु.ब.व.
विचक्षणाः अनुभवाचे बोल विचक्षण पु. प्र. ब. व.
वि+चक्ष धातू स्पष्ट बोलणे
सर्व-कर्म-फल-त्यागम्
सर्व कर्मांच्या फलांचा त्याग
त्यागम् पु. द्वि. ए. व.
प्राहुः म्हणतात प्र+ब्रू धातू बोलणे कर्तरी परस्मैपदी लट लकार प्र.पु.ब.व.
आतापर्यंत च्या श्लोकात संन्यास आणि त्याग हे शब्द बरेचदा वाचले आता त्याचा नेमका अर्थ ह्या श्लोकात सांगितला आहे. काही जण प्रेमापोटी त्याग करतात, म्हणजे ती गोष्ट खरेतर मनापासून हवी असते पण आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी ते त्या गोष्टीवर पाणी सोडतात. संन्यास मात्र स्वेच्छेने घेतला जातो.
गीते मध्ये अनेक त्यागाचा उल्लेख आला आहे.
अध्याय 6 श्लोक 2 नकारात्मक विचारांचा त्याग
अध्याय 12 श्लोक 11 कर्मफलांचा त्याग
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्वाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्य-न्यानि संयाति नवानि देही।।2.22
ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून नवीन कपडे वापरतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो.
षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता। निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता।।
वैभव आणि उन्नति प्राप्त करायची असेल तर सहा दोषांचा त्याग केला पाहिजे अती झोप, डुलकी , भीती, क्रोध, आळस, कामातील मंदपणा.
त्याग दोन प्रकारचे सांगितले आहेत.
फल्गु वैराग्य (फल्गु नदीवरून आलेला शब्द) आणि युक्त वैराग्य.
सर्व भौतिक सुखांचा त्याग करणे म्हणजे फल्गु वैराग्य कारण ह्यांच्या मुळे अध्यात्मिक प्रगती मध्ये अडथळा निर्माण होतो.
पण सर्व गोष्टींना ईश्वराच्या मानून, त्याचा उपयोग स्वतःसाठी न करता ईश्वराच्या सेवेसाठी वापरणे म्हणजे युक्त वैराग्य.
संन्यास म्हणजे केवळ घरादाराचा त्याग करून, रानावनात रहायचे, इतका सीमित अर्थ नसून त्याला आत्मज्ञान होणे अभिप्रेत आहे.
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। ज्ञानेश्वरी 5.20 ।।
गीतेच्या 5 व्या अध्यायातील 20 व्या श्लोकात ब्रहमविद्, ब्रह्मस्थित असे शब्द वापरले आहेत.
काम्यकर्म हा शब्द नीट समजून घ्यायला हवा. धन, स्त्री, पुत्र प्राप्ती किंवा रोग संकट मुक्ती वगैरे हेतू मनात ठेवून केलेले यज्ञ दान आणि तप म्हणजे काम्यकर्म.
आता ह्या श्लोकात नेमके काय म्हटले आहे ते वाचू.
श्रीभगवान असे म्हणतात की
काही विद्वानांच्या मते काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास आणि काही अनुभवी (विचारवंत) च्या मते सर्व कर्मांच्या फलांचा त्याग करण्याला त्याग असे म्हणतात.
---------------------------------------------------------
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः। यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे।।18.3।।
एके मनीषिणः कर्म दोषवत् त्याज्यम् इति प्राहुः। अपरे च यज्ञ-दान-तपः-कर्म न त्याज्यम् इति ।
एके एक पु. प्र. ब. व.
मनीषिणः बुद्धिमान पुरूष मनीषिन् पु. प्र. ब. व.
मन् धातू+ईश् धातू
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
दोषवत् दोषयुक्त दोषवत् नपु. प्र. ए. व.
त्याज्यम् त्याग करण्यायोग्य त्यज् धातू ण्यत् प्रत्यय पु. द्वि. ए. व.
इति म्हणून अव्यय
प्राहुः म्हणतात प्र+ब्रू धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ब. व.
अपरे अन्य अपर पु. प्र. ब. व.
च सुद्धा अव्यय
यज्ञ-दान-तपः-कर्म
यज्ञदान तपस् कर्मन् नपु. द्वि. ए. व.
न अव्यय
त्याज्यम् त्याग करण्यायोग्य त्यज् धातू ण्यत् प्रत्यय पु. द्वि. ए. व.
इति म्हणून अव्यय
आधीच्या श्लोकात काम्यकर्म म्हणजे काय ते आपण समजून घेतले.
आधीच्या आणि ह्या श्लोकात एकूण चार प्रकारचे विकल्प सांगितले आहेत.
1. काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास
2. सर्व कर्मे दोषयुक्त असे म्हणून सोडून दिली पाहिजेत.
3. सर्व कर्मांच्या फलांचा त्याग केला पाहिजे.
4. यज्ञ तप आणि दान ही कर्मे केली पाहिजेत
यामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्ही चे विचार प्रवाह येथे दिसतात.
जेव्हा यज्ञ केला पाहिजे असे म्हटले जाते तेव्हा सहाजिकच यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशु बळींचा विचार मनात येतो. कदाचित पुढे ह्या संबंधी काही लिहिले असावे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
काही बुद्धिमान असे म्हणतात की सर्वच कर्मे दोषयुक्त असल्याने त्यांचा त्याग करावा आणि इतर जण असे म्हणतात की यज्ञ दान आणि तप ही कर्मे त्याज्य नाहीत.
----------------------------------------------------------
निश्चयं श्रृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम।त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः।।18.4।।
हे पुरुष-व्याघ्र! हे भरतसत्तम! तत्र त्यागे मे निश्चयम् शृणु। हि त्यागः त्रिविधः सम्प्रकीर्तितः ।
हे पुरुष-व्याघ्र!
हे भरतसत्तम! भरत वंशातील जे सत आहेत त्यातील तम, उत्कृष्ट
तत्र त्याबद्दल अव्यय
त्यागे त्याग पु. स. ए. व.
मे माझे अस्मद् ष. ए. व.
निश्चयम् निश्चित निश्चय पु. द्वि. ए. व.
शृणु ऐक श्रु धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
हि अव्यय
त्यागः त्याग पु. प्र. ए. व.
त्रिविधः तीन प्रकारचे त्रिविध पु. प्र. ए. व.
सम्प्रकीर्तितः घोषित केले आहेत
सम+प्र +कृत् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
कोणत्या कर्मांचा त्याग करावा आणि कोणती कर्म करणे सोडू नये हे आपण आधीच्या श्लोकात वाचले. त्याग आणि संन्यास ह्या शब्दांमध्ये असलेला 2र्या श्लोकात फरक समजावून घेतला.
प्रापणात् सर्वकामानां परित्यागो विशिष्यते ।मनुस्मृती 2.95
सर्व कामनांच्या प्राप्तीपेक्षा त्यांच्या त्यागात आनंद आहे.
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमानशुः ॥
अवधूतोपनिषद्। 6।।
कर्म, वंशवृद्धी किंवा धन ह्यांच्या प्राप्ती पेक्षा त्यांच्या त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती होते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की
हे भरतसत्तम्! त्याग ह्या विषयी तू माझे मत ऐक. हे पुरूष श्रेष्ठ! त्याग तीन प्रकारचे आहेत असे म्हटले गेले आहे.
------------------------------------------------------------
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्। यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्।।18.5।।
यज्ञ-दान-तपः-कर्म न त्याज्यम्, तत् कार्यम् एव। यज्ञः दानम् तपः एव च मनीषिणाम् पावनानि
यज्ञ-दान-तपः-कर्म यज्ञ दान तपस् कर्मन् नपु. प्र. ए. व.
न अव्यय
त्याज्यम्, त्याग करण्याजोगे त्यज् धातू ण्यत् प्रत्यय पु. द्वि. ए. व.
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
कार्यम् कार्य नपु. प्र. ए. व.
एव अव्यय
यज्ञः यज्ञ पु. प्र. ए. व.
दानम् दान नपु. प्र. ए. व.
तपः तप नपु. प्र. ए. व.
एव आणि
च सुद्धा
मनीषिणाम् बुद्धिमान मनीषिन् पु. ष. ब. व.
पावनानि चित्तशुद्धी करणारी पावन नपु. प्र. ब. व.
पू धातू पवित्र होणे, शुद्ध होणे.
आधीच्या अध्यायात यज्ञ दान आणि तप ह्यांचे तीन प्रकार (सात्विक, राजसी, तामसी) अगदी विस्ताराने वाचले. त्या सर्वाची उजळणी केली की ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी सांगितलेले त्यांचे यज्ञ तप आणि दान यावरील मत अजून चांगले समजते.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
यज्ञ तप आणि दान रूपी कर्म त्याज्य नसून ते कर्तव्य आहे. यज्ञ तप आणि दान ही कर्मे बुद्धिमान लोकांची चित्त शुद्धी करतात.
-----------------------------------------------------------
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च। कर्तव्यानीति मे पार्थ निश्िचतं मतमुत्तमम्।।18.6।।
हे पार्थ! एतानि कर्माणि अपि तु सङ्गम् फलानि च त्यक्त्वा कर्तव्यानि इति, मे निश्चितम् उत्तमम् मतम्
हे पार्थ!
एतानि ही एतद् नपु. द्वि. ब. व.
कर्माणि कर्मे नपु द्वि. ब. व.
अपि तु नक्कीच
सङ्गम् (आसक्ती) मेळ सडःग पु. द्वि. ब. व.
फलानि फल नपु. द्वि. ब. व.
च सुद्धा अव्यय
त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
कर्तव्यानि केले पाहिजे कृ धातू तव्यत प्रत्यय नपु. प्र. ब. व.
इति, असे अव्यय
मे माझे अस्मद् ष. ए. व.
निश्चितम् ठाम निश्चित नपु. प्र. ए. व.
उत्तमम् उत्तम नपु. प्र. ए. व.
मतम् मत नपु. प्र. ए. व.
आतापर्यंतच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी विद्वान आणि बुद्धीमान लोकांची कर्म करण्याबाबत चार मतप्रवाह आपण वाचले.
1. काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास
2. सर्व कर्मे दोषयुक्त असे म्हणून सोडून दिली पाहिजेत.
3. सर्व कर्मांच्या फलांचा त्याग केला पाहिजे.
4. यज्ञ तप आणि दान ही कर्मे केली पाहिजेत.
आता श्रीभगवानकृष्ण स्वतः चे मत सांगत आहेत.
एक प्रकारे ते निस्वार्थी होण्यास सांगत आहेत. जसे आई आपल्या बाळाचे निःस्वार्थ भावनेने संगोपन करते. धरती माता आपल्याला धान्य आणि पाणी उपलब्ध करून देते त्याच्या परतफेडीची कधीच अपेक्षा न ठेवता.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे सांगत आहेत की
हे पार्थ! ही सर्व कर्मे, त्याच्या प्रती आसक्ती आणि त्यांच्या फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजे हे माझे ठाम असे उत्तम असे मत आहे.
----------------------------------------------------------
नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते। मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः।।18.7।।
नियतस्य कर्मणः संन्यासः तु न उपपद्यते। मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः।
नियतस्य निर्ध8नियत नपु. ष. ए. व.
कर्मणः कर्मांचा कर्मन् नपु. ष. ए. व.
संन्यासः संन्यास पु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
न अव्यय
उपपद्यते उचित आहे उप+पद् धातू कर्तरी आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
मोहात् मोह पु. पं. ए. व.
तस्य त्याचा तद् पु. ष. ए. वह
परित्यागः परित्याग पु. प्र. ए. व.
तामसः तामस पु. प्र. ए. व.
परिकीर्तितः म्हटले आहे परि+कृ धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
आधीच्या श्लोकात कोणत्याही कर्माप्रती आसक्ती ठेवू नये असे सांगितले होते पण जर आसक्ती असेलच तर त्याचे वर्णन आता श्रीभगवानकृष्ण करत आहेत. ते वाचण्यापूर्वी, आपल्या तत्वज्ञानात कर्मा विषयी काय म्हटले आहे ते पाहू.
कर्म चे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत.
1. विहित कर्म
2.निषिद्ध कर्म
1. विहित कर्म- याचे चार प्रकार आहेत
अ. नित्य कर्म, रोज घडणारी, स्वच्छता, पूजाअर्चा वगैरे
ब. नैमित्तिक कर्म, काही प्रयोजन असेल तर, म्हणजे एखादा उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम वगैरे.
क. काम्य कर्म काही अपेक्षा ठेवून केलेले कार्य जसे धन प्राप्ति
ड. प्रायश्चित कर्म
2. निषिद्ध कर्म - जे शास्त्रात निषिद्ध मानले जाते असे, चोरी, हिंसा वगैरे.
योगसूत्रात, महर्षि पतंजलिंनी कैवल्यपादातील सातव्या सूत्रात कर्म चे प्रकार सांगितले आहेत.
कर्माशुक्लाकृष्णं योगिनस्त्रिविधमितरेषाम्
म्हणजे
1. शुक्लकर्म (श्रेष्ठ कर्म)
2.कृष्णकर्म (कूकर्म)
3.शुक्लकृष्णकर्म (चांगले आणि वाईट कर्म)
आणि
4.अशुक्लाकृष्णकर्म (चांगले ही नाही आणि वाईटही नाही.)
असे कर्म चे चार प्रकार आहेत.
वेदान्त नुसार कर्म चे तीन प्रकार सांगितले आहेत. 1.संचित कर्म, (पूर्व जन्मी केलेले कर्म)
2.प्रारब्ध कर्म (चालू जन्मी करत असलेले कर्म)
3. क्रियमान कर्म (भविष्यात केले जाणारे कर्म)
आता श्रीमद्भगवद्गीतेत कर्म बद्दल काय सांगितले आहे ते पाहू.
श्रीमद्भगवद्गीतेच्या अनुसार तीन प्रकार चे कर्म सांगितले आहेत.
1.कर्म, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
2.अकर्म, कर्म चा अभाव
3. विकर्म विपरीत कर्म
श्रीमद्भगवद्गीतेतील कर्म विषयक महत्वाचे श्लोक.
न हि कश्िचत्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्। कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः।।3.5।।
कोणताही पुरुष क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, निसर्ग नियमानुसार त्याच्या कडून ते करवून घेतले जाते.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्।।2.50।।
बुद्धिवादी पुरुष या जगात पुण्य आणि पाप अशा दोन्ही कर्मांचा त्याग करतो म्हणून तू योग चा पाठपुरावा कर, त्यातच कर्म कुशलता आहे.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।
हे कौन्तेय ! तू जे कर्म करतोस, खातोस, पितोस, हवन करतोस,दान करतोस तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।5.10।।
जो पुरुष सर्व कर्म ब्रह्म ला अर्पण करतात आसक्ति चा त्याग करतात, तो पुरुष कमळाच्या पानांप्रमाणे पापांपासून अलिप्त असतात. ह्या श्लोकात नियत कर्म असा शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ नियमानुसार आचरण करण्यासारखी कर्म असा घेता येईल.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
नियत कर्मांचा कधीच त्याग करू नये. मोहवश होऊन जर आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्याला तामसी त्याग असे म्हटले जाते.
---------------------------------------------------------
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्। स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्।।18.8।।
दुःखम् एव इति यत् कर्म काय-क्लेश-भयात् त्यजेत्, सः राजसम् त्यागम् कृत्वा त्याग-फलम् न लभेत् एव ।
दुःखम् दुःख नपु. प्र. ए. व.
एव सुद्धा अव्यय
इति म्हणून अव्यय
यत् जो यत् नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
काय-क्लेश-भयात् शारीरिक पीडेच्या भयाने
काय क्लेश भय नपु. पं ए. व.
त्यजेत्, त्याग करतो त्यज् धातू कर्तरी विधिलिडः प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
राजसम् राजस पु. द्वि. ए. व.
त्यागम् त्याग पु. द्वि. ए. व.
कृत्वा करून कृ धातू क्त्वा प्रत्यय
त्याग-फलम् त्यागफल नपु. द्वि. ए. व.
न अव्यय
लभेत् प्राप्त होते लभ् धातू कर्तरी विधिलिडः प्र. पु. ए. व.
एव अव्यय
आधीच्या श्लोकात आपण तामसी त्याग म्हणजे काय ते वाचले, आता ह्या श्लोकात राजसी त्याग बद्दल लिहिले आहे. आळसामुळे कर्मांचा त्याग करण्याला तामसी त्याग म्हणतात हे आपण वाचले. नियत कर्म करताना बरेच नियम पाळावे लागतात. काही जणांना हे फारसे रूचत नाही. मग त्यांना अशी कर्मे दुःखदायक वाटू लागतात आणि म्हणून ते अशा कर्मांचा त्याग करतात, ह्याला राजसी त्याग असे म्हणतात. 17 व्या अध्यायातील राजसी प्रकारचे यज्ञ तप आणि दान ह्याबद्दल च्या माहितीचा संदर्भ घेतला की ह्या श्लोकात नेमके काय सांगितले आहे ते समजते.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जो मनुष्य कर्मांना दुःखदायक समजून, शारीरिक कष्टांच्या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याला राजसी त्याग असे म्हणतात. अशा त्याग केलेल्या कर्माचे त्याला कसलेही फळ मिळत नाही.
--------------------------------------------------------
कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन। सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः।।18.9।।
हे अर्जुन ! कार्यम् इति एव यत् नियतम् कर्म, सङ्गम् फलम् च त्यक्त्वा क्रियते, सः त्यागः एव सात्त्विकः मतः।
हे अर्जुन !
कार्यम् कर्तव्य कार्य नपु. प्र. ए. व.
इति असे अव्यय
एव सुद्धा अव्यय
यत् जो यद् नपु. प्र. ए. व.
नियतम् शास्त्र विहित, नियत नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
सङ्गम् संगत, सडःग पु. द्वि. ए. व.
फलम् फल नपु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
क्रियते केले जाते कृ धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
त्यागः त्याग पु. प्र. ए. व.
एव अव्यय
सात्त्विकः सात्विक पु. प्र. ए. व.
मतः मानले जाते मन् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
14 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकापासून तीन पैकी ज्या गुणाचे प्राबल्य असते, त्या गुणाचा व्यक्तीमत्वावर दिसून येणार्या परीणामांचे वर्णन केले आहे. सात्त्विक गुणांचा संबंध ज्ञान वर्धनाशी आहे. 17 व्या अध्यायातील त्रिगुणांचे विश्लेषण आणि 14 व्या अध्यायातील श्लोक एकत्रितपणे वाचल्यास हा श्लोक सहज समजतो.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
कर्म हे कर्तव्यच आहे असे समजून, नियत कर्म, आसक्ती आणि त्याच्या श्रेयाचा त्याग करून केले जाते, त्याला सात्त्विक त्याग असे म्हणतात.
------------------------------------------------------------
न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते। त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः।।18.10।।
सत्त्व-समाविष्टः छिन्न-संशयः मेधावी त्यागी अकुशलम् कर्म न द्वेष्टि, कुशले न अनुषज्जते।
सत्त्व-समाविष्टः सद्गुणी पुरूष
सत्त्व +सम+आ+विष् धातू व्यापणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
छिन्न-संशयः संशयरहीत छिन्न-संशय पु. प्र. ए. व.
छिद् धातू भिन्न करणे
मेधावी बुद्धिमान मेधाविन् पु. प्र. ए. व.
त्यागी त्यागिन् पु. प्र. ए. व.
अकुशलम् न कुशल नपु. द्वि. ए. व.
कुश पवित्र गवत.
कुश् धातू आलिंगन देणे
कर्म कर्मन् नपु द्वि. ए. व.
न
द्वेष्टि, द्विष् धातू शत्रूता करणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
कुशले यथार्थ कुशल नपु. स. ए. व.
न अव्यय
अनुषज्जते आसक्त होणे अनु+सञ्ज् धातू कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
हा श्लोक वाचताना आधीच्या अनेक श्लोकांची आठवण होते आहे.
12 व्या अध्यायातील 18, 19 व्या श्लोकात प्रिय भक्ताचे लक्षण सांगताना समतेचा भाव ठेवण्यास सांगितले आहे.
5व्या अध्यायात सूर्याचे समदर्शीत्व (चांगली आणि वाईट जागा असा भेदभाव न करता) सांगताना कर्म आणि अकर्म ह्यातील फरक समजावून सांगितला आहे. सूर्य स्वतःच प्रकाशमान असल्याने, प्रकाश देणे हे काही सूर्याचे कर्म नव्हे. (वाईट जागेवर प्रकाश पडणे) ते त्याचे अकर्म सुध्दा असू शकते. पण सूर्याला त्याचे काय?
अशाच अर्थाचा श्लोक 4थ्या अध्यायातील 18 व्या श्लोकात सांगितला आहे.
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः। स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्।।4.18।।
जो मनुष्य कर्मात, अकर्म पाहतो आणि अकर्मात, कर्म पाहतो तो बुद्धिमान् आहे, योगी आहे आणि सम्पूर्ण कर्म करणारा आहे.
त्यानंतर पुढील श्लोकात ज्ञानी पंडित कोणाला म्हणायचे ते सांगितले आहे.
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः।।4.19।।
ज्याची समस्त कर्मे, कामना आणि संकल्प रहित आहेत अशा कर्मांचे भस्म करून टाकलेल्या, तावूनसुलाखून निघालेल्या ज्ञानरूपी पुरुषाला ज्ञानी पण्डित म्हणतात.
असा ज्ञानी पुरूष पूर्णपणे भगवंताशी एकरूप झाला आहे.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते।।3.17।।
(आत्मिक उन्नती झाल्यामुळे) परन्तु जो मनुष्य स्वतःमध्येच रमतो,स्वतःमुळेच तृप्त असतो, सन्तुष्ट होतो, त्याच्यासाठी काहीच कर्तव्य करायचे रहात नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जो पुरुष अशुभ कर्मांचा द्वेष (वाईट भावना सुद्धा नाही) करत नाही आणि शुभ कर्मांची त्याला आसक्ती नसते, असा सद्गुणी संपन्न पुरूष निःसंशय बुद्धीमान आणि त्यागी आहे.
-------------------------------------------------------------
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः। यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते।।18.11।।
हि देह-भृता अशेषतः कर्माणि त्यक्तुम् न शक्यम्, यः कर्म-फल-त्यागी सः तु त्यागी इति अभिधीयते।
हि नक्कीच अव्यय
देह-भृता देहभृत पु. तृ. ए. व.
भृ धातू पोषण करणे
अशेषतः पूर्णपणे
शिष् धातू शिल्लक ठेवणे
कर्माणि सर्व कर्मांचा कर्मन् नपु. द्वि. ब. व.
त्यक्तुम् त्याग करून त्यज् धातू तुमून प्रत्यय
न अव्यय
शक्यम्, शक्य आहे
शक् धातू यत् प्रत्यय नपु. प्र. ए. व.
यः जो यद् पु. प्र. ए. व.
कर्म-फल-त्यागी कर्मफळ त्यागलेला
कर्मन् फल त्यागिन् पु. प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
त्यागी त्यागिन् पु. प्र. ए. व.
इति अव्यय
अभिधीयते म्हटले जाते अभि+धा धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
हा श्लोक समजून घेण्यासाठी आधीच्या काही श्लोकांची उजळणी करूया.
न हि कश्िचत्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः।।3.5।।
कोणताही पुरुष क्षणमात्र सुद्धा कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही कारण प्रकृती च्या अंमलाखाली आपल्या कडून कर्म करून घेतली जातात.
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते। न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।
कर्मयोगीने जर कर्म करण्याचा आरम्भच केला नाही (प्रत्यक्ष कृती) तर त्याला कर्मा पासून मुक्ति मिळाली असे नाही.
आणि जर ज्ञानी माणसाने (ज्याने ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारला आहे असा) कर्म करायचे सोडून दिले म्हणून त्याची लक्ष्य पूर्ती होणार नाही. (त्याला ज्ञान प्राप्त करावेच लागेल).
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते।।4.23।।
सर्व भौतिक सुखापासून लांब गेलेला, ज्याचे चित्त, ज्ञान संपन्न झाले आहे, त्याचे जगणे आता फक्त ईश्वरासाठीच आहे, आता त्याच्याकडे करण्यासाठी कर्म उरलेले नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
कारण देहधारी पुरूषाला कर्मांचा संपूर्णपणे त्याग करणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळांचा त्याग करतो, त्यालाच त्यागी पुरूष असे म्हटले जाते.
----------------------------------------------------------
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्।।18.12।।
अत्यागिनाम् कर्मणः इष्टम्,अनिष्टम्, मिश्रम् च त्रिविधम् फलम् प्रेत्य भवति, संन्यासिनाम् तु क्वचित् न।
अत्यागिनाम् (कर्मफलांचा)त्याग न करणार्यांचे
न त्यागिन् पु. ष. ब. व.
कर्मणः कर्माचे कर्मन् नपु. ष. ए. व.
इष्टम्, चांगले इष् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
अनिष्टम्, वाईट अन+इष्टम् इष् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
मिश्रम् मिश्र पु. द्वि . ए. व.
च सुद्धा अव्यय
त्रिविधम् त्रिविध नपु. प्र. ए. व.
फलम् फल नपु. प्र. ए. व.
प्रेत्य मृत्यू पश्चात प्र+ई धातू ल्यप प्रत्यय
भवति होते भू धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
संन्यासिनाम् संन्यासिन् पु. ष. ब. व.
तु परन्तु अव्यय
क्वचित् कोणत्याही वेळी अव्यय
न अव्यय
पेराल तसे उगवेल ह्या उक्तीप्रमाणे आपण केलेल्या कर्माची तीन प्रकारची फळे मिळतात. चांगली, वाईट आणि मिश्र. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. आणि आपल्या कर्माची फळे आपण पुढील जन्मी भोगतो, असे आपल्याला सांगितले जाते.
8 व्या अध्यायातील श्लोकात मृत्यू, मृत्युसमयी असलेली आपल्या मनाची अवस्था आणि पुनर्जन्म ह्यावर भाष्य केले आहे.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।।8.5।।
जो पुरुष अंतीम काळात माझेच स्मरण करत शरीराचा त्याग करतो ,तो साक्षात मलाच निःसंशय प्राप्त करत असतो.
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।।8.6।।
शरीरातून प्राण बाहेर जात असताना मनात जे विचार चालू असतात, त्याच प्रकारच्या परीणामस्वरूप पुढील जन्म प्राप्त होतो.
ज्या व्यक्तीने पूर्णपणे संन्यास घेतला आहे, त्याच्या मनात ना कर्मा बद्दल आसक्ती आहे ना कर्मफळाची पर्वा आहे त्या व्यक्तीची मृत्यू समयीची मानसिक स्थिती संपूर्णपणे विरक्तीची असावी. म्हणजे वरील श्लोकात म्हटल्याप्रमाणे त्याच्या साठी कोणतेच कर्म शिल्लक नाही. त्याला मुक्ती मिळाल्यासारखेच असावे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
कर्म फळांचा त्याग न करणार्या व्यक्तीला मृत्यू नंतर चांगले, वाईट आणि मिश्र असे कर्माचे फळ मिळते, मात्र संन्यासी व्यक्तीला कदापि नाही.
-----------------------------------------------------------
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे। सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।18.13।।
हे महाबाहो ! सर्व-कर्मणाम् सिद्धये कृत-अन्ते साङ्ख्ये प्रोक्तानि एतानि पञ्च कारणानि मे निबोध।
हे महाबाहो !
सर्व-कर्मणाम् सर्व कर्मांच्या सर्व कर्मन् नपु. ष. ब. व.
सिद्धये सिद्धीसाठी सिद्धी स्त्री. च. ए. व.
कृत-अन्ते कर्माचा अंत कृत अन्त पु. स. ए. व.
साङ्ख्ये साडःख्य नपु. स. ए. व.
प्रोक्तानि म्हटले गेले आहे प्र+वच् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ब. व.
एतानि ही एतद् नपु. द्वि. ब. व.
पञ्च पाच पञ्चन् द्वि. ब. व.
कारणानि हेतू कारण नपु. द्वि. ब. व.
मे माझ्या कडून अस्मद् ष. ए. व.
निबोध समजून घे बोध होणे नि+बुध् धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
आधीच्या श्लोक वाचल्यावर सहाजिकच मनात प्रश्न येतो, एखाद्या कर्माचे फळ मिळणार नाही म्हणजे नक्की काय? त्याचेच उत्तर ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण देणार आहेत. ह्या श्लोकात नेहमीप्रमाणे श्रुणु असे न म्हणता, निबोध असा शब्द वापरला आहे. म्हणजे हा श्लोक लक्षपूर्वक वाचायला हवा. आजच्या काळाप्रमाणे हा व्यवस्थापनातील एक पाठ असू शकतो.
आपल्या अवतीभवती काही गोष्टी सहजतेने घडत असतात, त्याचे श्रेय कोणी कोणाकडून घेत नाही, जसे पाऊस पडतो, नदी वाहते. पण जेथे माणसाच्या कर्तृत्वाचा संबंध असतो तेथे कर्म फळाचा मुद्दा उपस्थित होतो.
येथे भगवंत साडःख्य दर्शन च्या आधारे कर्म सिद्धी बाबत सांगत आहेत.
एकीकडे अर्जुनाला महाबाहो असे संबोधून फक्त शक्तीमान असणे पुरेसे नाही, कारण कोणतीही कृती घडण्यासाठी पाच गोष्टी आवश्यक आहेत असे सांगण्याचा सुद्धा उद्देश असावा. त्याचे विवेचन पुढील श्लोकात.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे महाबाहो! समस्त कर्मांच्या सिद्धी साठी पाच आवश्यक घटक, जे साडःख्य दर्शनात सांगितले गेले आहेत ते तू माझ्याकडून नीट समजून घे.
-----------------------------------------------------------
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।
अत्र अधिष्ठानम्, तथा कर्ता, पृथक्-विधम् करणम् च, विविधाः पृथक् चेष्टाः च, दैवम् एव च पञ्चमम्।
अत्र येथे
अधिष्ठानम्, आश्रय अधिष्ठान नपु. प्र. ए. व.
अधि+स्था धातू
तथा तसेच अव्यय
कर्ता कर्तृ पु. प्र. ए. व.
पृथक्-विधम् निरनिराळे प्रकार
पृथकविध पु. द्वि . ए. व.
करणम् कारणे करण नपु. प्र. ए. व.
च, सुद्धा
विविधाः नानाप्रकार विविधा स्त्री. प्र. ब. व.
पृथक् वेगवेगळे अव्यय
चेष्टाः प्रयत्न चेष्टा स्त्री प्र. ब. व.
च, सुद्धा
दैवम् दैव नपु. प्र. ए. व.
एव अव्यय
च सुद्धा अव्यय
पञ्चमम् पाचवा पञ्चम् नपु. प्र. ए. व.
ह्या श्लोकातील अधिष्ठान, कर्ता, करण, चेष्टा आणि दैव ह्या महत्वाच्या शब्दांचे अर्थ समजावून घ्यायला हवेत.
एखादे कार्य सिद्धीस नेण्यासाठी काही किमान घटकांची आवश्यकता असते. जसे एखादे काम मशीन च्या साह्याने करायचे असेल तर ते मशीन, त्याची विविध अंगे आणि त्याला लागणारी ऊर्जा. एक छोटासा भाग जरी मशीनमध्ये निकामी झाला तर अपेक्षित काम होऊ शकत नाही. येथे तर माणसाकडून केल्या जाणाऱ्या कर्माचा विचार मांडला आहे.
अधिष्ठान म्हणजे ज्यावर दुसरी कोणती वस्तू आधारलेली असते ती वस्तू.
कोणत्याही गोष्टीचा आधार भक्कम असावा लागतो.
अधिष्ठानम् शब्द शरीरासाठी वापरला आहे. शरीराशिवाय आत्म्याला अस्तित्व नाही. अधिष्ठान म्हणजे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, ज्ञान इत्यादी अभिव्यक्तींचा आश्रय-शरीर.
आपले मन, त्यापासून निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या इच्छा आकांक्षा आणि एखादी कृती करण्याचा घेतलेला निर्णय, ही सर्व कर्त्याची कामे आहेत.
शरीरात असलेली 5 कर्मेन्द्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धि, अहंकार अशी एकूण 13 करणं. आत्म्याच्या स्फूर्तीनेच ही सर्व कामे करतात. तसा आत्मा मुक्त आहे.
आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वत:। कस्तं मदामदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति।कठोपनिषद् ।1.21।।
शांत बसलेला तो दूरची यात्रा करतो. झोपलेला असतो पण सर्वत्र संचार असतो. माझ्याशिवाय त्याला कोण जाणतो, जो आनंदित असतो आणि नसतो सुद्धा.
एष हि द्रष्ट स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः।
स परेऽक्षर आत्मनि संप्रतिष्ठते ॥प्रश्नोपनिषद् 4.9।।
हा आत्माच आहे जो बघू शकतो, स्पर्श करतो, ऐकू शकतो, अनुभव करू शकतो, चव समजते, विचार करून समजून घेऊ शकतो, म्हणून आत्म्याला ज्ञाता आणि कर्मांचा कर्ता असे म्हणतात.
आपल्या कर्मेन्द्रियांकरवी घडणाऱ्या निरनिराळ्या कृती म्हणजेच चेष्टा. हाताच्या साह्याने आपण असंख्य कामे करत असतो.
ह्या सर्वांचा उल्लेख झाल्यानंतर दैव हा घटक सांगितला आहे. दोन पराक्रमी योद्धे जीवावर उदार होऊन लढतात पण एकच जिंकणार असतो आणि दुसरा हरणार असतो. हेच ते दैव..
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। 15.15।।
सर्व प्राण्यांच्या हृदयात मी वसलेला आहे. माझ्या मुळेच स्मृती, ज्ञान आणि अपोहन शक्य आहे.
कर्णाच्या रथाचे चाक ऐनवेळी जमिनीत रुतून घात झाला.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
(१३व्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) समस्त कर्मांच्या सिद्धी साठी आवश्यक असे पाच घटक अधिष्ठान, कर्ता, विविध करणं, निरनिराळ्या चेष्टा आणि दैव हे आहेत.
----------------------------------------------------------
शरीरवाङ्मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः। न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः।।18.15।।
नरः शरीर-वाक्-मनोभिः न्याय्यम् वा विपरीतं वा यत् कर्म प्रारभते, तस्य एते पञ्च हेतवः ।
नरः मनुष्य नर पु. प्र. ए. व.
शरीर-वाक्-मनोभिः शरीर वाणी आणि मनाने शरीर-वाक् मनस् नपु. तृ. ब. व.
न्याय्यम् न्याय्य पु. द्वि. ए. व.
वा अथवा अव्यय
विपरीतं विपरीत नपु. द्वि. ए. व.
वा अथवा अव्यय
यत् जो यद् नपु द्वि. ए. व.
कर्म कर्मन् नपु. द्वि. ए. व.
प्रारभते आरंभ होतो प्र+आ+रभ् धातू प्रसन्न होणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
तस्य त्यांची तद् पु. ष. ए. व.
एते ही एतद् पु. प्र. ब. व.
पञ्च पाच पञ्चन् प्र. ए. व.
हेतवः कारणे हेतु पु. प्र. ब. व.
17 व्या अध्यायातील 14,15,16 व्या श्लोकात आपण शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप म्हणजे काय ते वाचले. त्यातून बोध घेण्यासारखे हेच की आदर्श वर्तणूक जी न्याय्य आहे त्याचे आचरण करावे. त्यानंतर च्या श्लोकात सात्त्विक राजस आणि तामसी तप म्हणजे काय ते सुद्धा सांगितले. म्हणजे माणूस आदर्श वर्तणूकीपासून कसा फारकत घेत जातो, त्याचे वर्णन केले. हे असे का घडते? ते, पुढील श्लोकात सांगितले आहे.
न्यायिक आणि विपरीत कर्म ह्यातील फरक नीट समजून घ्यायला हवा. एखाद्या माणसाचा खून करणे हा गुन्हा आहे पण शत्रू ला मारणाऱ्या सैनिकासाठी ती अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणजेच एकच कर्म वेगवेगळय़ा परिस्थितीत, विचारांत, दृष्टिकोनात पूर्णपणे विरुद्ध टोकाचे भाव-परिणाम निर्माण करते.
गीते मध्ये स्वतः च्या धर्माचे योग्य पद्धतीने आचरण म्हणजे कर्म असा अर्थ अभिप्रेत आहे. कर्मफलाची अपेक्षा ठेवू नये असे गीतेत वारंवार सांगितले आहेच.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
मनुष्य, शरीर वाणी आणि मनाने शास्त्रविहित अथवा शास्त्रविरुद्ध ज्या काही कर्मांचा आरम्भ करतो, त्याची पाच कारणे असतात.
------------------------------------------------------------
तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः। पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः।।18.16।।
तत्र एवम् सति यः तु अकृत-बुद्धित्वात् केवलम् आत्मानम् कर्तारम् पश्यति, सः दुर्मतिः न पश्यति।
तत्र तेथे अव्यय
एवम् असे अव्यय
सति असताना सत् नपु. स. ए. व.
यः तो तद् पु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
अकृत-बुद्धित्वात् बुद्धि नसल्याने
न कृत बुद्धित्व नपु. पं. ए. व.
कृ धातू करणे
बुध् धातू जाणणे
केवलम् केवळ केवल नपु. द्वि. ए. व.
आत्मानम् स्वतःला आत्मन् पु. द्वि. ए. व.
कर्तारम् कर्ता कर्तृ पु. द्वि. ए. व.
पश्यति, पाहतो दृश् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
दुर्मतिः मूर्ख दुर् मति पु. प्र. ए. व.
न अव्यय
पश्यति पाहतो दृश् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
14 व्या श्लोकात, कार्य सिद्धिस नेण्यासाठी आवश्यक असणारे 5 घटक पाहिले. त्यांच्या कडे कानाडोळा करून फक्त आत्म्यामुळेच कार्य सिद्धीस नेले जाते असे म्हणणे योग्य नाही. शिवाय प्रत्येक आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे.
यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते। केनोपनिषद् 1.4।।
"ब्रह्म चे वर्णन केवळ वाणीने करता येत नाही. तर त्याच्या प्रेरणेने वाणी उमटते."
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम्॥ केनोपनिषद् 1.5।।
"ब्रह्म ला मन आणि बुद्धि ने जाणून घेता येत नाही, तर त्याच्याच शक्तिने मन आणि बुद्धि कार्य करतात. "
यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति॥ केनोपनिषद् 1.6।।
ब्रह्म ला डोळ्यांनी पाहता येत नाही, त्याच्यामुळे दृष्टी प्राप्त होते.
यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम्। केनोपनिषद् 1.7।।
"ब्रह्म ला कानांनी ऐकणार तरी कसे? त्याच्याच शक्तीने श्रवणशक्ती प्राप्त होते. "
यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते। केनोपनिषद् 1.8।।
"ब्रह्म प्राणशक्ति ने क्रियाशील होत नाही, त्याच्या प्रेरणेने प्राण शक्ति कार्यरत होते. "
हे सर्व जो जाणत नाही त्याला मूर्ख आणि मंदबुद्धी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
(कार्य सिद्धिस नेण्यासाठी 5 आवश्यक घटक) असे असताना जो पुरुष केवळ आत्म्याला (स्वतः ला) कर्ता मानतो तो बुद्धीहीन, बुद्धिभ्रष्ट (परमात्म्याचे अस्तित्व) समजू शकत नाही.
----------------------------------------------------------
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते। हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते।।18.17।।
यस्य अहङ्कृतः भावः न, यस्य बुद्धिः न लिप्यते, सः इमान् लोकान् हत्वा अपि न हन्ति, न निबध्यते।
यस्य ज्याला यद् पु. ष. ए. व.
अहङ्कृतः अहंकाराचे अहङ्कृत पु. प्र. ए. व.
भावः स्वभाव भाव पु. प्र. ए. व.
न, अव्यय
यस्य ज्याची यद् पु. ष. ए. व.
बुद्धिः बुद्धि स्त्री प्र. ए. व.
न अव्यय
लिप्यते, आच्छादित लिप् धातू कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
इमान् या इदम पु. द्वि. ब. व.
लोकान् जगात लोक पु. द्वि. ब. व.
हत्वा मारून हन् धातू क्त्वा प्रत्यय
अपि सुद्धा अव्यय
न अव्यय
हन्ति, ठार मारतो हन् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
न अव्यय
निबध्यते बंधनयुक्त नि+बन्ध् धातू बांधणे कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
कर्म सिद्धीस नेण्यासाठी आवश्यक असणार्या 5 घटकांपैकी कर्ता हा घटक, पण तो सर्वस्व नाही. आत्म्याकडून कर्म करवून घेणारा परमात्माच आहे.
आता दुसर्या अध्यायातील 20 आणि 21 वा श्लोक पुन्हा वाचायला हवे.
न जायते म्रियते वा कदाचि
न्नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे।।2.20।।
हा आत्मा कधी जन्म घेत नाही कधी मरत नाही. हा पुन्हा उत्पन्न होत नाही. तर जन्मरहित, चिरकाल राहणारा शाश्वत आणि अनादि आहे. शरीर नाशवंत आहे पण आत्मा नाही.
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्।।2.21।।
हे पार्थ ! जो पुरुष ह्या आत्म्याचे अविनाशी, शाश्वत अव्ययस्वरूप जाणतो, तो कसे काय दुसर्यांना मारेल किंवा मारून घेईल?
आतापर्यंत समजून घेतलेल्या गीतेच्या श्लोकात सर्व काही घडवून आणणारा परमात्माच आहे आणि आपण फक्त निमित्त आहोत हे चांगलेच मनात ठसले आहे. आपण जर काही करतच नाही तर त्याचा कसला आलाय अहंकार? तो तर बुद्धिभ्रम.
ह्याच अध्यायातील 12 वा श्लोक अशाच आशयाचा आहे. जो पूर्णपणे परमात्म्याला शरण गेला आहे, तो कर्म बंधनातून मुक्त झाला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ज्या व्यक्तीकडे अहंकार भाव नाही आहे, ज्याची बुद्धि (मोह माया अभिमान ह्यात) गुरफटून गेलेली नाही, त्या व्यक्तीचा ह्या जगातील लोकांना मारून सुद्धा, त्याच्या कडून हत्या होत नाही, आणि ते पापाचे धनी सुद्धा होत नाहीत.
----------------------------------------------------------
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना। करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः।।18.18।।
ज्ञानम्, ज्ञेयम्, परिज्ञाता त्रिविधा कर्म-चोदना । कर्ता, करणम्, कर्म इति त्रिविधः कर्म-सङ्ग्रहः ।
ज्ञानम्, ज्ञान नपु. प्र. ए. व.
ज्ञेयम्, जाणून घेण्याजोगे ज्ञा धातू यत् प्रत्यय नपु. प्र. ए. व.
परिज्ञाता जाणणारा परिज्ञातृ पु. प्र. ए. व.
त्रिविधा तीन प्रकार त्रिविधा स्त्री. प्र. ए. व.
कर्म-चोदना कर्म प्रेरणा कर्म-चोदना स्त्री. प्र. ए. व.
चुद् धातू प्रेरणा देणे
कर्ता, कर्तृ पु. प्र. ए. व.
करणम्, कर्मेन्द्रिय करण नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु प्र. ए. व.
इति अव्यय
त्रिविधः तीन प्रकारचे त्रिविध पु. प्र. ए. व.
कर्म-सङ्ग्रहः कर्म संचय कर्म-सङ्ग्रह पु. प्र. ए. व.
14 व्या श्लोकात आपण कर्म सिद्धीस आवश्यक 5 घटक पाहिले. आता ह्या श्लोकात 'कर्म' ह्यावर विस्ताराने सांगितले आहे.
कर्माला प्रेरणादायी असणारे तीन घटक म्हणजे त्रिपुटी.
त्रिपुटी, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानातील ही एक संज्ञा आहे.
एकमेकांशी संबंधित असलेल्या तीन गोष्टींचा समुच्चय म्हणजे त्रिपुटी.
त्रिपुटी अनेक आहेत.
ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान
कर्म, कर्ता, क्रिया
ध्येय, ध्याता, ध्यान
दृश्य, द्रष्टा, दर्शन
भोग्य, भोक्ता, भोग
परमेश्वर, आत्मा, जगत
ब्रह्म, माया, जीव
तुकारामांच्या अभंगात त्रिपुटी चा उल्लेख आहे.
सांडिली त्रिपुटी | दीप उजळला घटीं ||
आधीच्या दोन श्लोकात कर्म सिद्धी चा अहंकार बाळगणाऱ्या व्यक्तीला निर्बुद्ध, मूर्ख असे संबोधले आहे तर अहंकारविरहीत व्यक्तीची प्रशंसा केली आहे.
कर्म घडण्यासाठी त्यामागे असणारे ज्ञान कर्म करण्यास प्रेरक ठरते. जसे शरीराला पाणी आवश्यक म्हणून आपल्याला तहान लागते हे ज्ञान, पाणी हे ज्ञेय आणि हे सर्व जाणणारा परिज्ञाता. त्यानंतर पाणी पिण्याची क्रिया घडते.
एकदा कर्म करायचे अथवा सोडून द्यायचे हे ज्ञानाच्या आधारावर पक्के ठरवले की त्यासंबंधी कृती करण्यास सुरुवात होते. त्यासाठी आवश्यक असतो तो कर्ता, तो वापरणार असणारी कर्मेन्द्रिये म्हणजे करणं आणि कृती ज्याला कर्म असे संबोधले आहे.
हा श्लोक वाचता वाचता सहज 6व्या अध्यायातील 3र्या श्लोकाची आठवण झाली. 3र्या अध्यायातील कर्मयोगा पासून 6व्या अध्यायातील आत्मसंयम योग.
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ 6.3
ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे
प्राप्त केलेली योगाची स्थिति टिकवून ठेवायची आहे.
एकदा का योगारूढस्य ही स्थिती प्राप्त झाली की दुसरे काहीच करायचे नाही.
शांती टिकवून ठेवायची.
कोणतीही कृती करायची नाही हेच ज्ञान आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता हे तीन प्रकार कर्म करण्यासाठी प्रेरणा देतात तर करण, कर्म, कर्ता हे त्रिविध कर्म संग्रह करतात.
--------------------------------------------------------------/
ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः। प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणु तान्यपि।।18.19।।
गुण-सङ्ख्याने ज्ञानम्, कर्म च कर्ता च गुण-भेदतः त्रिधा एव प्रोच्यते, तानि अपि यथावत् शृणु।
गुण-सङ्ख्याने गुणांची गणना गुण-सङ्ख्यान नपु. स. ए. व.
सम+ख्या धातू गणना करणे
ज्ञानम्, ज्ञान नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु प्र. ए. व.
च अव्यय
कर्ता कर्तृ पु. प्र. ए. व.
च अव्यय
गुण-भेदतः गुणांच्या विभिन्नतेनुसार अव्यय
त्रिधा तीन प्रकारे अव्यय
एव अव्यय
प्रोच्यते, म्हटले आहे प्र+वच् धातू कर्माणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
तानि ते सर्व तद् नपु. द्वि. ब. व.
अपि सुद्धा अव्यय
यथावत् जसे आहेत तसे अव्यय
शृणु ऐक श्रु धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
आतापर्यंत 17 व्या आणि 18 व्या अध्यायात आपण यज्ञ तप दान श्रद्धा आहार आणि त्याग ह्यांचे त्रिगुणात्मक विश्लेषण वाचले, आता ह्या श्लोकात ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्यांचा उल्लेख केला आहे.
14 व्या अध्यायात तीन गुणांचे सविस्तर वर्णन केले आहेच, त्याप्रमाणे सत्त्वगुणी माणसे विवेकी, रजोगुणी भौतिकवादी आणि तमोगुणी आळशी, प्रमाद उत्पन्न करणारी अशी असतात.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
गुणभेदानुसार, ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्यांचे गुणात्मक विश्लेषण केले गेले आहे, ते तू यथोचित माझ्याकडून ऐक.
------------------------------------------------------------
सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते। अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम्।।18.20।।
येन विभक्तेषु सर्व-भूतेषु, एकम् अव्ययम् अविभक्तम् भावम् ईक्षते, तत् ज्ञानम् सात्त्विकम् विद्धि।
येन ज्यामुळे यद् पु. तृ. ए. व.
विभक्तेषु विभागलेले वि+भज् धातू क्त प्रत्यय पु. स. ब. व.
सर्व-भूतेषु, सर्व जीवांमधे सर्व भूत नपु. स. ब. व.
एकम् एक पु. द्वि. ए. व.
अव्ययम् अविनाशी अव्यय पु. द्वि. ए. व.
वि+अय कमी होणे
अविभक्तम् अविभाजित न+वि+भज् धातू क्त प्रत्यय नपु. द्वि. ए. व.
भावम् भाव पु. द्वि. ए. व.
ईक्षते, पाहतो ईक्ष् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु. द्वि. ए. व.
सात्त्विकम् सात्त्विक नपु. द्वि. ए. व.
विद्धि जाण विद् धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
10 वा अध्याय म्हणजे विभूतियोग, ह्यामधे श्रीभगवानकृष्णांनी आपल्या अस्तित्वाचे सविस्तर वर्णन केले आहे.
7वा अध्याय म्हणजे ज्ञान-विज्ञानयोग ह्यामधील 25 व्या श्लोकात त्यांनी असे सांगितले आहे की मूर्ख आणि अज्ञानी लोकांसाठी मी कधी प्रकट होत नाही.
त्यानंतर 13 वा अध्याय म्हणजे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग, ह्यातील 27, 28 वा श्लोक महत्वाचा वाटतो.
27 व्या श्लोकात चर आणि अचर सृष्टि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच निर्माण झाली आहे असे सांगितले आहे.
तर 28 व्या श्लोकात ज्ञानी माणूस, नश्वर अशा सर्व जीवांमधे समभावाने स्थित असा अविनाशी परमात्मा पाहतो, असे म्हटले आहे.
वदन्ति तत्तत्त्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयम् । ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते ॥ ११ ॥
(श्रीमद्भागवतम्-1.2.11)
परम सत्य जाणणारे विद्वान अध्यात्मवादी (तत्त्वविद) ह्या अद्वैत तत्त्वाला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान् असे म्हणतात.
एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा (श्वेताश्वतरोपनिषद्-6.11)
"भगवान एकच आहेत, ते सर्वांच्या हृदयांत वास करतात. ते सर्वव्यापी आहेत आणि आत्म्याचे श्रेष्ठ आत्मा आहेत. "
भवान् हि सर्वभूतानामात्मा साक्षी स्वदृग् विभो
(श्रीमद्भागवतम्-10.86.31)
"भगवान सर्वांमध्ये साक्षी आणि स्वामींच्या रूपात वास करतात. "
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जे ज्ञान, समस्त जैववैविध्य जीवांमधे एकच अविभक्त अविनाशी रूप दाखवते ते ज्ञान सात्त्विक आहे हे तू जाणून घे.
----------------------------------------------------------
पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं नानाभावान्पृथग्विधान्। वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्।।18.21।।
यत् ज्ञानम् तु सर्वेषु भूतेषु पृथक्-विधान् नाना-भावान् पृथक्त्वेन वेत्ति, तत् ज्ञानम् राजसम् विद्धि।
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
सर्वेषु सर्व पु. स. ब. व.
भूतेषु जीव भूत पु. स. ब. व.
पृथक्-विधान् भिन्न-भिन्न पृथकविध पु. द्वि. ब. व.
नाना-भावान् वेगवेगळी रूपे नानाभाव पु. द्वि. ब. व.
पृथक्त्वेन विभागणी केल्याने पृथकत्व नपु. तृ. ए. व.
वेत्ति,जाणतो विद् धातू कर्तरी लट लकार प्र.पु. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु. द्वि. ए. व.
राजसम् राजस नपु. द्वि. ए. व.
विद्धि जाण विद् धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकात आता राजसी ज्ञानाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. भौतिक दृष्टीने हा एक चांगला गुण मानायला हरकत नाही. डार्विन च्या उत्क्रांती चा सिद्धान्त ह्याच गुणाचा परीपाक असावा. गीतेत सांगितल्याप्रमाणे 84 लक्ष योनी अस्तित्वात आहेत. जैवविविधतेच्या संकल्पनेप्रमाणे साधारण इतक्याच प्रकारचे जीव अस्तित्वात असावेत.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे ज्ञान समस्त जीवांचे विश्लेषण करून, प्रत्येकाचे स्वभाव आणि प्रकृती वैशिष्ट्य दाखवून देतात ते राजस ज्ञान होय, हे तू जाण.
---------------------------------------------------------------
यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम्। अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम्।।18.22।।
यत् तु एकस्मिन् कार्ये सक्तम् कृत्स्नवत् अतत्त्वार्थवत् च अहैतुकम् अल्पम्, तत् तामसम् उदाहृतम् ।
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
एकस्मिन् एकच एक नपु. स. ए. व.
कार्ये कार्यात कार्य नपु. स. ए. व.
सक्तम् आसक्त सक्त नपु. प्र. ए. व.
कृत्स्नवत् सर्वस्व मानून कृत्स्नवत् नपु. प्र. ए. व.
अतत्त्वार्थवत् तथ्य जाणून न घेता
न तत्त्वार्थवत् अव्यय
च सुद्धा अव्यय
अहैतुकम् कारण नसताना न हैतुक नपु. प्र. ए. व.
अल्पम्, तुच्छ अल्प नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
तामसम् तामस नपु. द्वि. ए. व.
उदाहृतम् म्हटले आहे उत+आ+हृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
हा श्लोक वाचला की हत्ती आणि सात आंधळे ह्या गोष्टीची आठवण होते. खरेतर जन्माच्या वेळी आपण सर्वच जण अज्ञानी असतो. हळूहळू आपल्यावर संस्कार घडत जातात. माणूस प्रगल्भ होत जातो. मात्र असे संस्कारी होण्याचा वेग प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळा असतो. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. असे संस्कारीपण प्रत्येक जन्मी वाढत जात असावे. म्हणूनच आपल्याला सद्गुणी आणि दुर्गुणी माणसे दिसतात. तेराव्या अध्यायात दैवीसम्पदा आणि आसुरी सम्पदा याबद्दल विस्ताराने वाचले आहेच.
ज्ञानामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते, तार्किकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता वाढते. सुरवातीला आपण आत्मकेंद्री असतो, फक्त स्वतःपुरता विचार करत असतो, हळूहळू आपण समाजाचा विचार करू लागतो, त्याही पुढे जाऊन आपण परमात्म्याचा विचार करू लागतो. थोडक्यात सात आंधळ्यांसारखी आपली स्थिती न राहता आपले ज्ञान क्रमाने राजसी आणि सात्विक होऊ लागते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे ज्ञान माणसाला एकाच कार्यात (शरीरात) आसक्त करतात, तेच त्याचे सर्वस्व असते (आत्मकेंद्री) ते (ज्ञान) अल्प, तथ्यरहीत आणि हेतूरहीत असे तामस ज्ञान असते.
-------------------------------------------------------------
नियतं सङ्गरहितमरागद्वेषतः कृतम्। अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते।।18.23।।
यत् कर्म नियतम् सङ्ग-रहितम् अफल-प्रेप्सुना अराग-द्वेषतः कृतम्, तत् सात्त्विकम् उच्यते।
यत् जे यद् नपु. द्वि. ए. व.
कर्म कर्मन् नपु द्वि. ए. व.
नियतम् नेमून दिलेले नियत नपु द्वि. ए. व.
सङ्ग-रहितम् आसक्ती रहित सङ्ग-रहित नपु. द्वि. ए. व.
अफल-प्रेप्सुना फल प्राप्तीची अपेक्षा न करणारा न फल प्रेप्स पु. तृ ए. व.
प्र +इप्सु, आप धातू प्राप्त करणे
अराग-द्वेषतः राग व द्वेष न ठेवता अव्यय
कृतम्, केले जाते कृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
सात्त्विकम् सात्त्विक नपु. द्वि. ए. व.
उच्यते म्हटले जाते वच् धातू कर्मणि लट लकार प्र. पु. ए. व.
19 व्या श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे गुणात्मक विश्लेषण केले आहे, त्यापैकी आपण ज्ञानाचे गुणात्मक विश्लेषण वाचले आता ह्या श्लोकात कर्म चे गुणात्मक विश्लेषण वाचणार आहोत.
16 व्या अध्यायातील 24 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी
अर्जुनाला शास्त्रात सांगितलेल्या तत्वांना प्रमाण मानून चांगले कर्म आणि निषिद्ध कर्म ह्यातील फरक समजून घेऊन कर्म करण्यास सांगितले आहे.
17 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकात सात्विक यज्ञ म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधीवत यज्ञ करणे हेच कर्तव्य आहे अशी मानसिकता ठेवून त्याच्या श्रेयाची अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ, असे म्हटले आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे कर्म शास्त्रोक्त पद्धतीने, नियमानुसार केलेले, आसक्ती रहीत, कर्मफल प्राप्तीची अपेक्षा न ठेवता, कर्म करीत असताना त्यामागे कोणताही राग, द्वेष न बाळगता केले असेल तर ते सात्त्विक कर्म म्हटले जाते.
------------------------------------------------------------
यत्तु कामेप्सुना कर्म साहङ्कारेण वा पुनः।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम्।।18.24।।
यत् कर्म तु बहुल-आयासम्, पुनः काम-ईप्सुना, साहङ्कारेण वा क्रियते, तत् राजसम् उदाहृतम् ।
यत् जे यद् नपु. द्वि. ए. व.
कर्म कर्मन् नपु. द्वि. ए. व.
तु परन्तु अव्यय
बहुल-आयासम्, परीश्रमपूर्वक बहुलायास पु. द्वि. ए. व.
यस् धातू प्रयास करणे
पुनः अव्यय
काम-ईप्सुना, कर्म फलाची इच्छा असणाऱ्या
काम-ईप्सु पु. तृ. ए. व.
साहङ्कारेण अहंकारासहित स अहडःकार पु. तृ. ए. व.
वा अव्यय
क्रियते केले जाते कृ. धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
राजसम् राजस नपु. द्वि. ए. व.
उदाहृतम् म्हटले जाते उत् +आ+हृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
आता ह्या श्लोकात राजस कर्म म्हणजे काय ते सांगितले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे कर्म परीश्रमपूर्वक, त्यामागे अहंकाराची भावना ठेवून आणि कर्म फलाची अपेक्षा बाळगून केले जाते ते रजोगुणी कर्म असे म्हटले जाते.
----------------------------------------------------------
अनुबन्धं क्षयं हिंसामनपवेक्ष्य च पौरुषम्। मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते।।18.25।।
यत् कर्म अनुबन्धम् क्षयम् हिंसाम् पौरुषम् च अनपेक्ष्य मोहात् आरभ्यते, तत् तामसम् उच्यते।
यत् जो यद् नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
अनुबन्धम् बंधनकारक अनुबन्ध पु. द्वि. ए. व.
क्षयम् नाश होणारे क्षय पु. द्वि. ए. व.
हिंसाम् हिंसा स्त्री. द्वि. ए. व.
पौरुषम् सामर्थ्य पौरूष नपु. द्वि. ए. व.
च अव्यय
अनपेक्ष्य परीणामांचा विचार न करता
न अप ईक्ष्य ल्यप प्रत्यय
मोहात् मोह पु. पं. ए. व.
आरभ्यते, आरंभले जाते आ+रभ् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
तामसम् तामस नपु. द्वि. ए. व.
उच्यते म्हटले जाते वच् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
ह्या श्लोकात तामसी कर्म म्हणजे काय ते सांगितले आहे. आपल्या रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त असा सल्लाच ठरू शकेल असा श्लोक. कोणतेही कर्म करण्याआधी त्यासाठी लागणारा वेळ, पैसा, श्रम आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेणे आवश्यक असते. जर हे ठोकताळे माहीत नसतील तर तो सर्वच गोष्टींचा अपव्यय ठरतो. केवळ स्वतःच्या हौसेपोटी साधनसंपत्ती वाया घालवणे योग्य नाही.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे कर्म त्याचे परिणाम जाणून न घेता, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ मोहापायी केले जाते त्याला तामसी कर्म असे म्हटले जाते.
----------------------------------------------------------
मुक्तसङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते।।18.26।।
मुक्त-सङ्गः, अनहं-वादी, धृति-उत्साह-समन्वितः, सिद्धि-असिद्ध्योः निर्विकारः कर्ता सात्त्विकः उच्यते।
मुक्त-सङ्गः, आसक्ती रहीत मुक्त-सङ्ग पु. प्र. ए. व.
अनहं-वादी, अहंकार रहीत न अहंवादीन् पु. प्र. ए. व. धृति-उत्साह-समन्वितः, निर्धार उत्साहाने युक्त
धृति-उत्साह-समन्वित पु. प्र. ए. व.
धृ धातू धारण करणे
उत् +सह धातू संतुष्ट होणे
सम+अन्व+इ धातू जाणे
सिद्धि-असिद्ध्योः यश आणि अपयश सिद्धि-असिद्धि स्त्री स. द्वि. व.
निर्विकारः निर्विकार पु. प्र. ए. व.
न अस्ति विकार कृ धातू करणे
कर्ता कर्तृ पु. प्र. ए. व.
सात्त्विकः सात्त्विक पु. प्र. ए. व.
उच्यते म्हटले जाते वच् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात आपण ज्ञान आणि कर्म यांचे गुणात्मक विश्लेषण वाचले, आता इथून पुढच्या तीन श्लोकात कर्ता चे गुणात्मक विश्लेषण सांगितले आहे.
17 व्या अध्यायात सात्त्विक तामसी आणि राजसी गुणांचे विस्ताराने विवेचन वाचले.
सात्त्विक कर्ता चे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जो कर्ता आसक्ती रहीत, अहंकार रहीत, धैर्य आणि उत्साहाने परीपूर्ण पण यश अपयशाचा परीणाम होऊ न देणारा असा असतो त्याला सात्त्विक कर्ता असे म्हटले जाते.
------------------------------------------------------------
रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः।।18.27।।
रागी, कर्म-फल-प्रेप्सुः, लुब्धः, अशुचिः, हिंसात्मकः, हर्ष-शोक-अन्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः।
रागी, आसक्त रागिन् पु. प्र. ए. व.
रञ्ज धातू प्रलोभन असणे
कर्म-फल-प्रेप्सुः, कर्म फलाची अपेक्षा करणारा कर्मन् फल प्रेप्सु पु. प्र. ए. व.
प्र +इप्सु आप धातू
लुब्धः, लोभी लुब्ध पु. प्र. ए. व.
लुभ् धातू लोभ करणे
अशुचिः, अपवित्र अशुचि पु. प्र. ए. व.
हिंसात्मकः, हिंसा आत्मक पु. प्र. व. हिंस् धातू हर्ष-शोक-अन्वितः हर्ष आणि शोक युक्त हर्ष-शोक-अन्वित पु. प्र. ए. व.
कर्ता कर्तृ पु. प्र.. व.
राजसः राजस पु. प्र. ए. व.
परिकीर्तितः परि+कॄत् धातू प्रसिद्ध होणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
रजोगुणी व्यक्तिंना भौतिक सुखाची विशेष आस असते. आपली गरज आणि इच्छा ह्यामधे ते फारसा फरक करू शकत नाहीत.
कितीही सुख मिळाले तरी समाधान नसेल, तर अशा व्यक्तींना लोभी म्हटले जाते. आपल्या स्वार्थासाठी ते अनैतिक गोष्टी सुद्धा करू शकतात. अशा व्यक्ती मग इरेला पेटतात आणि मानसिक संतुलन बिघडवून घेतात. अती राग आणि अती लोभापायी ते इतरांना त्रासदायक ठरू शकतात.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ज्या व्यक्तीमधे प्रचंड आसक्ती असते, कर्म फलाची अपेक्षा असते, जे लोभी असतात, (आपल्या स्वार्थासाठी) अती हर्ष आणि अती शोक करणारे, अपवित्र, हिंसात्मक कृती करणारे लोक राजसी प्रवृत्ती चे मानले जातात.
---------------------------------------------------------
अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः। विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते।।18.28।।
अयुक्तः, प्राकृतः, स्तब्धः, शठः, नैष्कृतिकः, अलसः, विषादी, दीर्घ-सूत्री च कर्ता तामसः उच्यते ।
अयुक्तः, अनुशासनहीन
न युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
प्राकृतः, असभ्य प्राकृत पु. प्र. ए. व.
प्र+आ+कृ धातू
स्तब्धः, हट्टी स्तब्ध पु. प्र. ए. व.
शठः, धूर्त शठ पु. प्र. ए. व.
नैष्कृतिकः, नीच (कामे बिघडणारा) निः+कृत नैष्कृतिक पु. प्र. ए. व.
अलसः, आळशी अलस पु. प्र. ए. व.
लस् धातू कौशल्य असणे
विषादी, निराश विषादिन् पु. प्र. ए. व.
वि+सद् धातू थकणे
दीर्घ-सूत्री चालढकल करणारा कर्तव्यानां दीर्घप्रसारणः
दीर्घसूत्रीन् पु. प्र. ए. व.
च सुद्धा अव्यय
कर्ता कर्तृ पु. प्र. ए. व.
तामसः तामस पु. प्र. ए. व.
उच्यते म्हटले जाते वच् धातू कर्मणि लटलकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
ह्याच अध्यायातील 22 आणि 25 वा श्लोकात अनुक्रमे तामसी ज्ञान आणि तामसी कर्म यांचे वर्णन केले आहे. केवळ आत्मकेंद्रीत ज्ञान, संभाव्य परिणामांचा विचार न करता स्वतःच्या लहरीने कर्म करणारा, तामसी कर्ता कसा असू शकतो ह्याचे वर्णन करणारा हा श्लोक. ह्या श्लोकात वापरलेला प्राकृत हा शब्द चपखल वाटतो. अतिशय नैसर्गिक, कोणतेही संस्कार न झालेली व्यक्ती ज्याची ज्ञानाची कवाडे उघडलेलीच नाहीत, त्याला कोणते कर्म करावे आणि ते कसे चांगल्या पद्धतीने करावे हे माहीत नसेल तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना केवळ मनःस्तापच वाट्याला येणार. त्यासाठीच नैष्कृतिक असे म्हटले आहे.
अशा तामसी व्यक्तीचे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जो कर्ता (काम करण्यास) अयोग्य, असभ्य, हठवादी, धूर्त, दुसर्यांच्या कामात अडथळा निर्माण करणारा, आळशी, निरूत्साही, कामात चालढकल करणारा असा असतो त्याला तामसी कर्ता असे म्हटले जाते.
------------------------------------------------------------
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं श्रृणु।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय।।18.29।।
हे धनञ्जय ! बुद्धेः धृतेः एव च गुणतः त्रिविधम् भेदम् अशेषेण पृथक्त्वेन प्रोच्यमानम् शृणु।
हे धनञ्जय !
बुद्धेः बुद्धि स्त्री. ष. ए. व.
बुध् धातू जाणणे
धृतेः निर्धार धृति स्त्री. ष. ए. व.
धृ धातू धारण करणे
एव सुद्धा
च आणि
गुणतः गुणांनुसार अव्यय
त्रिविधम् तीन प्रकारचे त्रिविध नपु. द्वि. ए. व.
भेदम् फरक भेद पु. द्वि. ए. व.
अशेषेण तपशीलवार अशेष पु. तृ ए. व.
पृथक्त्वेन निरनिराळे पृथक्त्व नपु. तृ. ए. व.
प्रोच्यमानम् सांगितल्या प्रमाणे
प्र +वच् धातू यक प्रत्यय नपु. प्र. ए. व.
शृणु ऐक श्रु धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
आता ह्या श्लोकात आणखी नवीन माहिती मिळणार आहे. बुद्धि आणि धैर्य ह्या दोन शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा.
आपल्याकडे असलेल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला चांगले काय वाईट काय ह्यामधील फरक समजेल सुद्धा. पण वाईट गोष्टींच्या वार्याला सुद्धा उभे रहायचे नाही असा दृढनिश्चय आपण धृति मुळे अमलात आणू शकतो.
‘आत्मा’ - शब्दे ब्रह्म, देह, मन, यत्न, धृति ।बुद्धि, स्वभाव , - एइ सात अर्थ - प्राप्ति ॥मध्य लीला 24.11 ॥
“आत्मा शब्दाचे सात भिन्न अर्थ आहेत. परम सत्य, शरीर, मन, प्रयत्न, दृढ़ता, बुद्धि आणि स्वभाव. ”
शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयम: ।
तितिक्षा दु:खसम्मर्षो जिह्वोपस्थजयो धृति: ॥ भागवतपुराण 11.19.36 ॥
बुद्धि च्या जोरावर माझी भक्ती करणे हे मानसिक सन्तुलन (शम) दर्शविते. इन्द्रियांचा पूर्ण संयम म्हणजेच आत्मसंयम (दम). सहिष्णुता चा अर्थ आहे धैर्यपूर्वक दुख सहन करणे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे धनञ्जय! माझ्याकडून पूर्णतः सांगितले गेलेले, बुद्धि आणि धृति यांचे तीन प्रकारचे गुणात्मक विश्लेषण ऐक.
-----------------------------------------------------------
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये। बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी।।18.30।।
हे पार्थ ! या बुद्धिः प्रवृत्तिम् निवृत्तिम् च कार्य-अकार्ये भय-अभये च बन्धम् मोक्षम् च वेत्ति, सा सात्त्विकी ।
हे पार्थ !
या जी यद स्त्री प्र. ए. व.
बुद्धिः बुद्धि स्त्री प्र. ए. व.
प्रवृत्तिम् नैसर्गिक कृती प्रवृत्ति स्त्री द्वि. ए. व.
निवृत्तिम् कृती न करणे निवृत्ति स्त्री द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
कार्य-अकार्ये कार्य अकार्य नपु. स. ए. व.
भय-अभये भय अभय नपु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
बन्धम् बन्ध पु. द्वि. ए. व.
मोक्षम् मोक्ष पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
वेत्ति, जाणते विद् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सा ती तद् स्त्री प्र. ए. व.
सात्त्विकी सात्त्विकी स्त्री. प्र. ए. व.
ह्या श्लोकात सात्त्विक बुद्धि ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
येथे प्रवृत्ति-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बन्ध-मोक्ष असे द्वयी शब्द आले आहेत.
वृत् धातू म्हणजे आरंभ करणे, व्यापून टाकणे. गीतेच्या 16 व्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांचे वर्णन करताना 7व्या श्लोकात आसुरी व्यक्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाहीत असे म्हटले आहे. त्यावेळी आपण ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले.
म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं नेघें मती।अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी। ज्ञानेश्वरी .12-121।।
प्रवृत्ती आणि निवृत्ती चा अट्टाहास करत बसू नये, फक्त अखंडपणे तू माझे चिंतन कर.
राजा जनक मध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती एकाच वेळी दिसून येत होत्या, असे म्हणता येईल.
16 व्या अध्यायातील 24 व्या श्लोकात शास्त्रीय तत्त्वांवर आधारित नियमानुसार केली जाणारी कर्मे आणि निषिद्ध कर्म ह्यातील फरक समजून घ्यायला सांगितला आहे.
उभे सत्यानृते त्यक्त्वा शोकानन्दौ
प्रियाप्रिये ।भयाभयं च संत्यज्य स प्रशान्तो निरामयः ।। महाभारत :शांती पर्व 276.11॥
विद्वानांचे लक्षण ह्या श्लोकात सांगताना असे म्हटले आहे की सत्य-असत्य, हर्ष-शोक, प्रिय-अप्रिय, भय-अभय अशा सर्व द्वन्द्वांचा त्याग करून अत्यन्त शान्त आणि निर्वि कार होतात. ॥ ११ ॥
मन एवं मनुष्याणां कारणं
बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासंगो मुक्त्यै निर्विषयं मनः ॥अमृतबिन्दु उपनिषद्
” आपले मन, मनुष्याच्या बन्धन आणि मोक्षाचे कारण आहे. मनाच्या मोह मायेपायी ते बन्धनात अडकते आणि मनाच्या विरक्तीमुळेच मोक्ष प्राप्ती होते. ” जे मन निरन्तर कृष्णभक्ती मध्ये रममाण असते, तेच परम मुक्ती चे कारण आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे पार्थ जी बुद्धि प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बन्ध-मोक्ष ह्यामधील फरक समजू शकते ती बुद्धी सात्त्विकी.
-----------------------------------------------------------
यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी।।18.31।।
हे पार्थ ! यया धर्मम् अधर्मम् च, कार्यम् अकार्यम् च, अयथावत् एव प्रजानाति, सा च बुद्धिः राजसी ।
हे पार्थ !
यया जी यद् स्त्री. द्वि. ए. व.
धर्मम् धर्म पु. द्वि. ए. व.
अधर्मम् अधर्म पु. द्वि. ए. व.
च, अव्यय
कार्यम् कार्य नपु. द्वि. ए. व.
अकार्यम् अकार्य नपु. द्वि. ए. व.
च, अव्यय
अयथावत् अपूर्णतः
न यथावत अव्यय
एव सुद्धा अव्यय
प्रजानाति, जाणते प्र+ज्ञा धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सा ती तद् स्त्री. प्र. ए. व.
च अव्यय
बुद्धिः बुद्धि स्त्री. प्र. ए. व.
राजसी राजसी स्त्री. प्र. ए. व.
आतापर्यंत आपण यज्ञ दान आणि तप तसेच ज्ञान कर्ता आणि कर्म यांचे राजसी विश्लेषण वाचले. हे असे सर्व राजसी पद्धतीने घडत असताना त्यामागे असणारी राजसी बुद्धी चे वर्णन करणारा हा श्लोक. ह्या अध्यायातील 27 वा श्लोक ह्या श्लोकाबरोबर वाचला की अर्थ चांगला लक्षात येईल.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे पार्थ! ज्या बुद्धीनुसार मनुष्य (शास्त्रात नमूद केल्याप्रमाणे) धर्म-अधर्म, कर्तव्य-अकर्तव्य पूर्णतः जाणत नाही अशी बुद्धी रजोगुणी होय.
---------------------------------------------------------------अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसाऽऽवृता।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी।।18.32।।
हे पार्थ ! या बुद्धिः तमसा आवृता अधर्मम् धर्मम् इति, सर्व-अर्थान् विपरीतान् च मन्यते, सा तामसी ।
हे पार्थ !
या जी यद् स्त्री. प्र. ए. व.
बुद्धिः बुद्धि स्त्री प्र. ए. व.
तमसा भ्रमाने (अंधःकाराने) तमस् नपु. तृ. ए. व.
आवृता आच्छादलेली आ+वृ धातू घेरणे क्त प्रत्यय स्त्री. प्र. ए. व.
अधर्मम् अधर्म पु. द्वि. ए. व.
धर्मम् धर्म पु. द्वि. ए. व.
इति अव्यय
सर्व-अर्थान् सर्वअर्थ पु. द्वि. ए. व.
विपरीतान् विपरीत पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
मन्यते, मानली जाते मन् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सा ती तद् स्त्री. प्र. ए. व.
तामसी तामसी स्त्री. प्र. ए. व.
तामसी व्यक्तीचा आळशीपणा हा गुण प्रामुख्याने सांगितला आहे. म्हणजे शारीरिक आळस आणि ज्ञान मिळवण्याचा सुद्धा आळस. आधीच्या श्लोकात राजसी बुद्धी बद्दल सांगताना धर्म-अधर्म ह्यामधील फरक राजसी व्यक्तींना समजत नाही असे म्हटले आहे.
ह्या श्लोकात सुद्धा धर्म-अधर्म चा असाच उल्लेख आहे, त्याचा तामसी वृत्तीच्या अंगाने फरक समजून घ्यायला हवा.
केवळ अज्ञानापोटी तामसी व्यक्तींना चांगले आणि वाईट ह्यामधील फरक समजत नाही.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
अंधःकाराने आच्छादित बुद्धि धर्म आणि अधर्म ह्यामधील फरक न जाणता सर्वच गोष्टींना विपरीत स्वरूपात मानते ती तामसी बुद्धी होय.
------------------------------------------------------------
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी।।18.33।।
हे पार्थ! यया अव्यभिचारिण्या धृत्या योगेन मनः-प्राण-इन्द्रिय-क्रियाः धारयते, सा धृतिः सात्त्विकी
हे पार्थ!
यया ज्या यद् स्त्री. तृ ए. व.
अव्यभिचारिण्या निरंतर
न व्यभिचारिणी स्त्री. तृ. ए. व.
वि + अभि + चर धातू
धृत्या निर्धार धृति स्त्री. तृ. ए. व.
योगेन योगाने योग पु. तृ. ए. व.
मनः-प्राण-इन्द्रिय-क्रियाः मनस् प्राण इन्द्रिय क्रिया स्त्री. द्वि. ब. व.
धारयते, धारण करतो धृ धातू कर्तरी आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
सा ती तद् स्त्री प्र. ए. व.
धृतिः धृति स्त्री. प्र. ए. व.
सात्त्विकी सात्त्विकी स्त्री. प्र. ए. व.
आता ह्या श्लोकापासून धृती ह्या गुणाचे विश्लेषण सांगायला सुरुवात केली आहे. मन अहंकार आणि बुद्धि ही व्यक्तिमत्त्वातून प्रकट होणारी वैशिष्ट्ये.
अध्यवसायो बुद्धिर्धर्मो ज्ञानं विराग ऐश्वर्यम्। सात्त्विकमेतद्रूपं तामसमस्माद्विपर्यस्तम् ||सांख्यकारिका 23।।
अध्यवसाय म्हणजे निश्चय करण्याचे कार्य बुद्धीचे आहे. किंबहुना हा बुद्धीचा गुण आहे. धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य ही सात्त्विक बुद्धीची चार लक्षणे आहेत. याउलट अधर्म, अज्ञान, अवैराग्य आणि अनैश्वर्य ही चार लक्षणे रजोगुण-तमोगुणांनी युक्त अशा बुद्धीची आहेत.
अव्यभिचारी हा शब्द गीतेच्या 13 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकात आणि 14 व्या अध्यायातील 26 व्या श्लोकात आलेला आहे. त्यावेळी आपण त्याचा अर्थ समजून घेतला.
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥ज्ञानेश्वरी 14.381॥
अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो.
अव्यभिचारी म्हणजे परमेश्वराची पूर्ण श्रद्धेने भक्ती करणारा.
श्रीमद्भगवद्गीते मध्ये जरी सर्व योगाचे विवेचन केले असले तरी भक्तीयोग हा जास्त अधोरेखीत करून सांगितला आहे.
मयि चानन्ययोगेन भक्ितरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।13.11।।
एकांतवासाचा सर्वात जास्त सदुपयोग म्हणजे परमेश्वराच्या भक्ती मध्ये रममाण होणे.
क्षेत्र संबंधी वैशिष्ट्ये सांगताना श्रीभगवानकृष्ण म्हणतात, माझी निरंतर अनन्य साधारण भक्ती, एकांतवासाची ओढ आणि सामान्य लोकांपासून विलगीकरण.
मां च योऽव्यभिचारेण भक्ितयोगेन सेवते। स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते।।14.26।।
जो मनुष्य एकरूप होऊन माझी भक्ती मार्गाने सेवा करतो तो सर्व गुणांना पार करून ब्रह्मभाव प्राप्त करतो.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जी व्यक्ती निश्चयाने मन, प्राण, इन्द्रियांद्वारे निष्ठापूर्वक (भक्ती) योग करतात अशी बुद्धी सात्त्विक होय.
-------------------------------------------------------------
यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन। प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी।।18.34।।
हे पार्थ! हे अर्जुन! फल-आकाङ्क्षी यया धृत्या तु प्रसङ्गेन धर्म-काम-अर्थान् धारयते सा धृतिः राजसी ।
हे पार्थ!
हे अर्जुन!
फल-आकाङ्क्षी फलाची अपेक्षा ठेवणारा फल-आकाङ्क्षिन् पु. प्र. ए. व.
यया जी यद् स्त्री. तृ. ए. व.
धृत्या धृति स्त्री. तृ. ए. व.
तु परन्तु अव्यय
प्रसङ्गेन प्रसङ्ग पु. तृ. ए. व.
धर्म-काम-अर्थान् धर्म-काम-अर्थ पु. द्वि. ब. व.
धारयते धृ धातू कर्तरी आत्मनेपदी णिच लट लकार प्र. पु. ए. व.
सा तद् स्त्री. प्र. ए. व.
धृतिः धृति स्त्री. प्र. ए. व.
राजसी राजसी स्त्री. प्र. ए. व.
धर्म, काम, अर्थ ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुरूषार्थाची लक्षणे आहेत. अतिशय निर्धारपूर्वक ती साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते. असे करत असताना सहाजिकच त्या कृतीबद्दल आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. केलेल्या कर्माचे यथार्थ फळ मिळावे अशी सुप्त इच्छा असते. ह्याचेच वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की
हे पार्थ! हे अर्जुन! केलेल्या कर्माचे श्रेय मिळावे अशी अपेक्षा ठेवणारा, धर्म, काम आणि अर्थ संबंधित कार्य अतिशय आसक्ती पूर्वक करणार्या ची धृती ही राजसी मानली जाते.
------------------------------------------------------------
यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च। न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी।।18.35।।
हे पार्थ ! दुर्मेधाः यया स्वप्नम्, भयम्, शोकम्, विषादम्, मदम् च न एव विमुञ्चति, सा धृतिः तामसी।
हे पार्थ !
दुर्मेधाः दुर्बुद्धी दुर मेधस् पु. प्र. ए. व.
यया जी यद् स्त्री. तृ. ए. व.
स्वप्नम्, स्वप्न नपु. द्वि. ए. व.
भयम्, भय नपु. द्वि. ए. व.
शोकम्, शोक पु. द्वि. ए. व.
विषादम्, खिन्नता विषाद पु. द्वि. ए. व.
मदम् मोह मद पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
न
एव
विमुञ्चति, त्याग करणे वि+मुच् धातू मुक्त करणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सा ती तद् स्त्री. प्र. ए. व.
धृतिः धृति स्त्री. प्र. ए. व.
तामसी तामसी स्त्री. प्र. ए. व.
ह्या श्लोकाचा अर्थ बर्याच मानसिक आणि सामाजिक प्रश्नांचा आधार घेऊन सांगता येईल. जसे आपल्या मनात असणार्या अनेक समजूती, त्यातून निर्माण होणारे भय, त्यासाठी केले जाणारे अघोरी उपाय, अगदी एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकणे, नरबळी देणे. खजिन्याचा शोध, एखाद्या आजाराशी भूतबाधेचा संबंध जोडणे. ह्या सर्व गोष्टींना शास्त्रीय आधार कसलाच नाही. कधीकधी सुशिक्षित लोक सुद्धा अशा समजूतींच्या प्रभावाखाली दिसतात. कदाचित ते मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेत असावेत. म्हणजे बुद्धी आणि शिक्षणाचा काहीच संबंध नाही. म्हणून ही तामसी धृती.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे पार्थ! दुष्ट बुद्धी व्यक्ती ज्या धारणेने स्वप्न, भय, शोक, खिन्नता, मोह यांचा त्याग करत नाहीत ती धृती तामसी होय.
----------------------------------------------------------
सुखं त्विदानीं त्रिविधं श्रृणु मे भरतर्षभ। अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति।।18.36।।
हे भरतर्षभ ! इदानीम् त्रिविधम् सुखम् तु मे शृणु, यत्र अभ्यासात् रमते, दुःखान्तम् निगच्छति च ।
हे भरतर्षभ !
इदानीम् आता अव्यय
त्रिविधम् तीन प्रकारचे त्रिविध नपु. द्वि. ए. व.
सुखम् सुख नपु. द्वि. ए. व.
तु परन्तु अव्यय
मे माझ्याकडून अस्मद पं. ए. व.
शृणु, ऐक श्रु धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
यत्र अव्यय
अभ्यासात् अभ्यासात अभ्यास पु. पं ए. व.
रमते, रममाण होणे रम् धातू कर्तरी आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
दुःखान्तम् दुःख अन्त पु. द्वि. ए. व.
निगच्छति प्राप्त करतो नि+गम् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
च सुद्धा अव्यय
आतापर्यंत आपण यज्ञ, दान, तप, कर्ता, कर्म, ज्ञान, बुद्धि आणि धृति यांचे गुणात्मक विश्लेषण वाचले.
आता यापुढील श्लोकात सुखाची व्याख्या आणि त्याचे त्रिगुणात्मक विश्लेषण वाचायला मिळणार आहे.
दुःखाचा अन्त म्हणजे सुख अशी साधी सोपी व्याख्या महर्षी व्यासांनी सांगितली आहे. छोटे बाळ रडते म्हणजे त्याला काही दुःख होत असते. आईने जवळ घेतले की त्याच्या दुःखाचा अन्त होतो.
कस्यैकान्तं सुखम् उपनतं
दु:खम् एकान्ततो वा ।
नीचैर् गच्छति उपरि च
दशा चक्रनेमिक्रमेण ।।
जीवनात कोणाला आधी सुख मिळते तर कोणाला आधी दुःख. सुख मिळाल्यानंतर दुःख मिळते तर कधी दुःखानंतर सुख. सुखदुःखाची अशी दशा, एखाद्या चक्रासारखी वर खाली होत असते.
सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते यथान्धकारादिव दीपदर्शनम्।
दुःखाचा अनुभव मिळाल्यानंतर सुखाचा अनुभव चांगला वाटतो जसे घनघोर अंधारातून जात असताना दिव्याचा प्रकाश सुखकारक असतो.
ये केचिद् दु:खिता लोके
सर्वे ते स्वसुखेच्छया।
ये केचित् सुखिता लोके
सर्वे तेऽन्यसुखेच्छया॥
जे लोक दुःखी असतात ते स्वतःच्याच सुखाच्या अपेक्षांमुळे. जे लोक सुखी असतात ते दुसर्यांनी सुखी व्हावे या इच्छेमुळे. (म्हणजेच जे स्वार्थी आहेत ते दुःखी आहेत.)
ह्या श्लोकात अभ्यासात रमणाऱ्यांच्या दुःखाचा अंत होतो असे म्हटले आहे. त्याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा.
गुण वैशिष्ट्याप्रमाणे, व्यक्तींच्या सुखाच्या कल्पना निरनिराळ्या आहेत.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे भरतर्षभ! आता तू सुखाचे त्रिविध विश्लेषण माझ्याकडून ऐक,ज्याच्या अभ्यासात लोक रमतात आणि त्यांच्या दुःखांचा अन्त होतो.
----------------------------------------------------------
यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम्। तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम्।।18.37।।
यत् तत् अग्रे विषम् इव, परिणामे अमृत-उपमम् तत् आत्म-बुद्धि-प्रसादजम् सुखम् सात्त्विकम् प्रोक्तम्
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
अग्रे आरंभी अग्र नपु. स. ए. व.
विषम् विष विष नपु. प्र. ए. व.
इव, अव्यय
परिणामे शेवटी परिणाम पु. स. ए. व.
अमृत-उपमम् अमृततुल्य अमृत उपम नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
आत्म-बुद्धि-प्रसादजम् आत्म्यामधे बुद्धि च्या प्रसन्नतेने उत्पन्न झालेले आत्मन् बुद्धि प्रसाद ज नपु. द्वि. ए. व.
सुखम् सुख नपु. द्वि. ए. व.
सात्त्विकम् सात्त्विक नपु. द्वि. ए. व.
प्रोक्तम् म्हटले आहे प्र+वच् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
आयुष्य आपल्याला दोन मार्गाने जीवन जगण्याची संधी देते. श्रेय आणि प्रेय.
प्रेय मार्ग, सर्वांना प्रिय असा मार्ग, सुख कामना मोह माया आशा इच्छा यांची पूर्तता करतो. श्रेय मार्ग मात्र कठीण, परमात्म्याकडे आपल्याला घेऊन जातो.
ह्याचे वर्णन कठोपनिषदात पहिल्या अध्यायातील दुसर्या वल्ली पहिल्या दोन श्लोकात यमराजाने नचिकेताला केले आहे.
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्शेमाद्वृणीते ॥ कठोपनिषद् 1.2.2
श्रेय आणि प्रेय माणसासमोर असतात, धैर्यशील व्यक्ती विवेक बुद्धीने श्रेय मार्ग अवलंबतो तर मन्दबुद्धि प्रेय मार्ग.
काही गोष्टी सुरवातीला अतिशय कठीण, अप्रिय वाटल्या तरी त्याचे परीणाम चांगले असतात. जसे आवळ्याची चव सुरवातीला तुरट पण पाणी प्यायलानंतर गोड लागते. कडुलिंबाची पाने चवीला कडू पण अत्यंत फायदेशीर. सात्त्विक सुखाचेही तसेच आहे. सुरुवातीला सत्त्व पाहणारी कठोर तपस्या, आत्मसंयम, नंतर मधुर फळ देते.
ह्या श्लोकात आत्मबुद्धीच्या प्रसन्नतेने निर्माण झालेले सुख असे म्हटले आहे. म्हणजे सुरवातीचा मार्ग खडतर असला तरी तो आत्म्याला प्रसन्न करणारा आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे सुख प्रारंभी विषसमान भासते मात्र त्याचे परीणाम अमृता सारखे असतात, त्याला आत्मबुद्धीला प्रसन्न करणारे असे सात्त्विक सुख म्हटले जाते.
-----------------------------------------------------------
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्। परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्।।18.38।।
यत् सुखम् विषय-इन्द्रिय-संयोगात् तत् अग्रे अमृत-उपमम्, परिणामे विषम् इव तत् राजसम् स्मृतम्
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
सुखम् सुख नपु. प्र. ए. व. विषय-इन्द्रिय-संयोगात् विषय-इन्द्रियांच्या संयोगाने विषय-इन्द्रिय संयोग पु. पं. ए. व.
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
अग्रे आरंभी अग्र नपु. स. ए. व.
अमृत-उपमम्, अमृतासमान अमृत उपम नपु. द्वि. ए. व.
परिणामे शेवटी परिणाम पु. स. ए. व.
विषम् विष नपु. द्वि. ए. व.
इव प्रमाणे अव्यय
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
राजसम् राजस नपु. प्र. ए. व.
स्मृतम् मानले जाते स्मृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
आता ह्या श्लोकात राजसी सुखाचे वर्णन केले आहे. आपल्या सुखाच्या मर्यादित कल्पना खरे तर आपले नुकसान करत असतात. दिव्य आनंदाचा मार्ग भोग नाही तर शिस्त, त्याग आणि तपस्या आहे. म्हणूनच गोड पदार्थ खाताना चांगले लागतात पण शरीराला आजार देतात. व्यसने करताना आनंद मिळतो असे वाटते पण त्याने आपले नुकसानच होते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे सुख आपल्या इन्द्रियांना आनंद देणार्या गोष्टींविषयी असते ते सुरवातीला अमृतासमान आणि परीणाम विषसमान असते त्याला राजसी सुख मानले जाते.
---------------------------------------------------------
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्।।18.39।।
यत् सुखम् अग्रे अनुबन्धे च आत्मनः मोहनम् च निद्रा-आलस्य-प्रमाद-उत्थम्, तत् तामसम् उदाहृतम्।
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
सुखम् सुख नपु. प्र. ए. व.
अग्रे आरंभी अग्र नपु. स. ए. व.
अनुबन्धे नंतरही अनु+.बन्ध् धातू बांधणे
अनुबन्ध पु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
आत्मनः आत्म्याच्या आत्मन् पु. द्वि. ब. व.
मोहनम् मोहमयी मोहन पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय निद्रा-आलस्य-प्रमाद-उत्थम्, निद्रा आळस अपराध उत्पन्न करणारे निद्रा-आलस्य-प्रमाद-उत्थ नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
तामसम् तामस नपु. प्र. ए. व.
उदाहृतम् म्हटले जाते उत्+आ+हृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तामसी व्यक्तीच्या सुखाच्या कल्पना त्याच्या व्यक्तीमत्वाला साजेशा असणार.
अनुबन्ध म्हणजे शेवट पर्यंत जडलेला मोह. एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्यापूर्वी आणि नंतरही जर मोह आवरत नसेल तर त्या व्यक्तीला लोभी म्हणावे लागेल. पण यांची कर्म मात्र झोप आळस आणि निष्काळजीपणा यांच्या अंमलाखाली घडतात.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे सुख निद्रा आळस आणा अपराध यांच्या प्रभावातून निर्माण होऊन सुरवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या पाशात जखडून ठेवते ते तामसी सुख असे म्हटले जाते.
---------------------------------------------------------------
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः। सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्ित्रभिर्गुणैः।।18.40।।
पृथिव्याम् पुनः दिवि वा देवेषु वा तत् सत्त्वम् न अस्ति यत् प्रकृतिजैः एभिः त्रिभिः गुणैः मुक्तम् स्यात् ।
पृथिव्याम् पृथ्वीवर पृथिवी स्त्री. स. ए. व.
पुनः पुन्हा अव्यय
दिवि देवी दिव स्त्री. स. ए. व.
वा अव्यय
देवेषु देवतांमधे देव पु. स. ब. व.
वा अव्यय
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
सत्त्वम् अस्तित्व सत्त्व नपु. प्र. ए. व.
न अव्यय
अस्ति आहे अस् धातू कर्तरी लट लकार प्र पु. ए. व.
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
प्रकृतिजैः प्रकृतीपासून निर्माण झालेले प्रकृति ज नपु. तृ. ब. व.
एभिः यांच्या पासून इदम् नपु. तृ. ब. व.
त्रिभिः त्रि नपु. तृ. ब. व.
गुणैः गुण पु. तृ. ब. व.
मुक्तम् मुच् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
स्यात् आहेत अस् धातू कर्तरी विधीलिंग प्र. पु. ए. व.
निरनिराळ्या वैशिष्टय़ांचे त्रिगुणात्मक विश्लेषण करून झाल्यावर श्रीभगवानकृष्ण एक सत्य आपल्या समोर मांडत आहेत. 13 व्या अध्यायातील 20 आणि 21 व्या श्लोकात सजीवांच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेले पुरूष आणि प्रकृती ह्या बद्दल जाणून घेतले. त्यापैकी प्रकृती पासून त्रिगुण निर्माण झाले हे सुद्धा आपण समजून घेतले. थोडा बारकाईने विचार केला असता आपल्या देवदेवतांचे सुद्धा स्वभावविशेष आहेत जसे श्रीशंकर भगवानांना आपण भोलेनाथ म्हणतो. गणपतीला ज्ञानाची देवता मानतो. महिषासुरमर्दिनी, दुर्गा, शारदा अशी कितीतरी देवींची रूपे. नवदुर्गांची नऊ रूपे निरनिराळ्या शक्तींची प्रतिके आहेत.
श्वेताश्वतरोपनिषदातील 4थ्या अध्यायातील 5व्या श्लोकात मायाशक्तीचे वर्णन करताना तीला तिरंगी म्हटले आहे.
अजामेकां लोहितशुक्लकृष्णां बह्वीः प्रजाः सृजमानां सरूपाः।
अजो ह्येको जुषमाणोऽनुशेते जहात्येनां भुक्तभोगामजोऽन्यः॥ श्वेताश्वतरोपनिषद् 4.5।।
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ह्या पृथ्वीवर आणि (स्वर्गात रहाणार्या) देवदेवतांमधे असे कोणीच अस्तित्वात नाही जे त्रिगुणांपासून मुक्त आहेत.
----------------------------------------------------------
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप। कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः।।18.41।।
हे परन्तप ! ब्राह्मण-क्षत्रिय-विशाम् शूद्राणाम् च कर्माणि स्वभाव-प्रभवैः गुणैः प्रविभक्तानि ।
हे परन्तप ! ब्राह्मण-क्षत्रिय-विशाम् ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य ब्राह्मण-क्षत्रिय-विश पु. ष. ब. व.
शूद्राणाम् शूद्रांची शूद्र पु. ष. ब. व.
च सुद्धा अव्यय
कर्माणि कर्मे कर्म नपु. द्वि. ब. व.
स्वभाव-प्रभवैः स्वभावावरचा प्रभाव स्वभाव-प्रभव पु. तृ ब. व.
गुणैः गुण पु. तृ. ब. व.
प्रविभक्तानि विभाजित केले आहे
प्र+वि+भज् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ब. व.
हा श्लोक जातीभेद आणि सामाजिक असमानता हे मुद्दे बाजूला ठेवून वाचला पाहिजे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कधीच एका माणसाने दुसर्या माणसाला वाईट वागणूक द्यावी असे म्हटलेले नाही. उलट सर्व मानवी वैशिष्ट्यांचे त्रिगुणात्मक वर्गीकरण करून चांगली आणि वाईट वर्तणूक ह्यातील फरक दाखवून दिला आहे.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
।।4.13 ।।
गुण आणि कर्म यांच्या वर्गीकरणानुसार चातुर्वर्ण मीच निर्माण केले आहेत.
खरे तर सर्व सृष्टीच भगवंतांनी निर्माण केली आहे आणि प्रत्येक जीवाला काही ना काही काही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जसे कावळे आणि गिधाडे मृत शरीरे खाऊन आपली उपजीविका करतात आणि स्वच्छता राखतात. हे सर्व विज्ञानाने सिद्ध झाले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे परन्तप! ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे आपल्या कर्म आणि स्वभावाच्या वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण केले आहे.
---------------------------------------------------------------
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च। ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्।।18.42।।
शमः, दमः, तपः, शौचम्, क्षान्तिः,आर्जवम्, आस्तिक्यम् ज्ञानम्, विज्ञानम्, एव च स्वभावजम् ब्रह्म-कर्म।।
शमः, शांती शम पु प्र. ए. व.
दमः, संयम दम पु प्र. ए. व.
तपः, तप पु प्र. ए. व.
शौचम्, पावित्र्य शौच नपु प्र. ए. व.
क्षान्तिः, सहनशीलता क्षान्ति स्त्री. प्र. ए. व.
आर्जवम्, प्रामाणिकपणा आर्जव नपु प्र. ए. व.
आस्तिक्यम् धार्मिक आस्तिक्य नपु प्र. ए. व.
ज्ञानम्, ज्ञान नपु प्र. ए. व.
विज्ञानम्, विज्ञान नपु प्र. ए. व.
एव सुद्धा अव्यय
च सुद्धा अव्यय
स्वभावजम् स्वभावातून उत्पन्न झालेले
स्वभाव ज नपु प्र. ए. व.
जन् धातू जन्म होणे
ब्रह्म-कर्म ब्राह्मणाचे कर्म ब्रह्म-कर्मन् नपु प्र. ए. व.
आता इथून पुढच्या श्लोकात चातुर्वर्णाची कर्म आणि स्वभावानुसार वैशिष्ट्ये वाचायला मिळणार आहेत. हे सर्व सांगण्याचे कारणच हे की चातुर्वर्ण्य हा जन्माने ठरत नव्हता तर कर्माने आणि स्वभावानुसार.
गीतेच्या 17.14 श्लोकात ब्राह्मणासाठी द्विज शब्द वापरला आहे. द्विज म्हणजे ज्याचा दुसर्यांदा जन्म झाला आहे असा.
जन्मना जायते शूद्र: कर्मणा द्विज उच्यते। मनुस्मृति ।
जन्माने सर्व शूद्र असतात पण कर्माने ते द्विज म्हणून ओळखले जातात.
द्विज म्हणजे संस्कारीत व्यक्ति. थोडक्यात लहान मूल गुरूगृही राहून ज्ञान प्राप्त करतो हा त्याचा दुसरा जन्म.
दुर्योधनाने द्रोणाचार्यांना पहिल्या अध्यायातील 7 व्या श्लोकात द्विजोत्तम असे म्हटले आहे.
तडागकृत् वृक्षरोपी इष्टयज्ञश्च यो द्विजः ।एते स्वर्गे महीयन्ते ये चान्ये सत्यवादिनः ॥(महाभारत, अनुशासन पर्व, अध्याय 58, श्लोक 32)
तलाव खोदणारे , वृक्षरोपण करणारे , आणि यज्ञाचे अनुष्ठान करणारे द्विज यांना स्वर्गप्राप्ती होते.
हे सर्व समजून घेऊन चातुर्वर्ण्याचा अभ्यास करायला हवा.
ह्या श्लोकात शम दम तप शौच क्षान्ती आर्जव आस्तिक्य ज्ञान विज्ञान अशी गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत. ह्यापैकी शम क्षान्ती आस्तिक्य आणि विज्ञान हे शब्द 16 व्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकात आलेले नाहीत.
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते।योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते।।6.3।।
ह्या श्लोकाप्रमाणे शम म्हणजे शांती असा अर्थ घेतला तर त्यासंबंधी माहिती आपण 16 व्या अध्यायातील 2 र्या श्लोकात वाचलेली आहे.
शम चा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे. शम म्हणजे स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे. (दम म्हणजे बाह्येंद्रियांचा निग्रह)
क्षम् धातू म्हणजे सहन करणे. क्षमा हा गुण 16 व्या अध्यायातील 3र्या श्लोकात सांगितला आहे.
आस्तिक्य चा अर्थ आहे विश्वास,आपल्या धर्मग्रंथावर विश्वास, ईश्वरावर विश्वास.
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ ज्ञानेश्वरी 2.132॥
ज्ञान म्हणजे शास्त्राचा अभ्यास. परोक्षज्ञान. विज्ञान म्हणजे अनुभूत साक्षात्कार.
आधीच्या श्लोकात आपण कर्म आणि स्वभावाचे वर्गीकरण म्हणजे चातुर्वर्ण असे वाचले. ह्या श्लोकात ब्रह्मकर्म स्वभावजम् असे म्हटले असले तरी फक्त व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
शम, दम, तप, शौच, क्षान्ति, आर्जव, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्य ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.
-------------------------------------------------------------
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम्।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्।।18.43।।
शौर्यम्, तेजः, धृतिः, दाक्ष्यम्, युद्धे अपलायनम्, दानम् च, ईश्वर-भावः अपि च स्वभावजम् क्षात्रम् कर्म ।
शौर्यम्, शौर्य नपु. प्र. ए. व.
शूर धातू शौर्यस्य भावः
तेजः, तेजस नपु. प्र. ए. व.
धृतिः, धृति स्त्री. प्र. ए. व.
दाक्ष्यम्, दाक्ष्य नपु. प्र. ए. व. दक्ष् धातू सावध असणे
युद्धे युद्ध नपु. स. ए. व.
अपलायनम्, न पलायन नपु. प्र. ए. व.
दानम् नपु. प्र. ए. व.
च,
ईश्वर-भावः ईश्वर-भाव पु. प्र. ए. व.
अपि आणि अव्यय
च सुद्धा अव्यय
स्वभावजम् स्वभाव ज नपु. प्र. ए. व.
क्षात्रम् क्षात्र नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
. "क्षतात् त्रायत इति" क्षत्रिय, त्रै धातू रक्षण करणे. क्षत्रियाची स्वाभाविक प्रवृत्ती, दुसर्यांचे रक्षण करण्याची आहे.
ह्या श्लोकात क्षत्रियांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यामधील तेज, धृती आणि दान ह्या वैशिष्ट्यांबद्दल 16 व्या अध्यायात आपण वाचले आहे.
धर्मपालन हे कर्तव्य समजून स्वतःच्या जीवावर उदार होऊन लढण्याची तयारी असणारे अंगात शौर्यं पूरेपूर बाणलेले असे क्षत्रिय युद्धभूमी पासून कधीच पलायन करत नाहीत.
वीरो न दोषं परित्यजन्ति दृढे च युद्धे समर्पिते।अधर्मं न त्यजन्ति ते वीरा धर्मे ययुरन्विताः॥
शूरवीरांवर दोषींचा त्याग आणि युद्धात समर्पित होण्याचा दोष लागत नाही. ते धर्मानुसार अधर्माचा नाश करतात.
शोकः शौर्यपकर्षणः ॥
शोकाने मनुष्याचे शौर्य नष्ट होते.
दाक्ष्यं कुटुम्बभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ॥ भागवतपुराण 12.2.6 ॥
जो व्यक्ति परिवाराचे पालन-पोषण करतो, तो दक्ष. धर्माचे अनुसरण मात्र यश मिळवण्यासाठी केले जाते.
लोकांचे रक्षण करायचे, त्यांचे पालनपोषण करायचे पण मनात अहंकार नाही येऊ द्यायचा. म्हणजेच सर्वशक्तिमान अद्वितीय, सर्वव्यापक ईश्वराचे प्रभुत्व मान्य करायचे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
शौर्य, तेज, धृति, दक्षता, युद्धापासून पलायन न करणे, दान, ईश्वर भाव हे सर्व क्षत्रियाचे स्वाभाविक कर्म आहे.
---------------------------------------------------------------
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम्।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्।।18.44।।
कृषि-गौरक्ष्य-वाणिज्यम् स्वभावजम् वैश्य-कर्म । परिचर्या-आत्मकम् शूद्रस्य अपि स्वभावजम् कर्म ।।
कृषि-गौरक्ष्य-वाणिज्यम् शेती गोपालन क्रय विक्रय कृषि-गौरक्ष्य-वाणिज्य नपु. प्र. ए. व.
कृष् धातू शेती करणे
वण धातू+णिच्+इन्.
स्वभावजम् स्व भाव ज नपु. प्र. ए. व.
वैश्य-कर्म वैश्य कर्मन् नपु. प्र. ए. व.
परिचर्या-आत्मकम् परिचर्य आत्मक नपु. प्र. ए. व.
परि+चर धातू +श, यक्ष, सेवा करणे
शूद्रस्य शूद्र पु. ष. ए. व.
शुच् धातु+ रक् प्रत्यय
अपि सुद्धा अव्यय
स्वभावजम् स्व भाव ज नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
आता ह्या श्लोकात वैश्य आणि शूद्र व्यक्तिंच्या कर्माचे वर्णन केले आहे.
ते वाचले की असे वाटते की आपल्या समाजाचा डोलारा ह्यांच्या जीवावर तर उभारला गेला आहे.
वैश्य-कर्मींसाठी कृषी, गोपालन आणि व्यापार असे महत्वपूर्ण व्यवसाय सांगितले आहेत.
आणि शूद्र कर्मींचे वर्णन सेवाकर्मी असे केले आहे.
42,43 आणि 44 व्या श्लोकांचा एकत्रित विचार करता ब्राह्मण हे ज्ञानी असतात असे म्हटले तर त्या काळातील समाजाची धोरणात्मक व्यवस्था ते पहात असावेत तर क्षत्रिय सुरक्षेची जबाबदारी घेत होते. कृषी म्हणजे अन्नाचे उत्पादन, गोपालन (गोधन निर्माण करणे) आणि व्यापार, ह्यामधे राजाला अर्थसहाय्य करणे हे सुद्धा आलेच. अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे काम वैश्य करत होते. आता उरलेली कामे शूद्र करीत होते म्हणजे नक्की कोणती कामे? ह्याचा विचार करावयास हवा. ह्या श्लोकात परीचर्या म्हणजे सेवा करणे असा शब्द वापरला आहे. म्हणजे आजच्या काळाप्रमाणे 'सेवा उद्योग.' शेतीसाठी अवजारे बनवणे, शस्त्रे तयार करणे, घरबांधणी वगैरे. याचाच अर्थ, अशी मूलभूत सुविधा पुरवली जाणारी कामे शूद्रांची असावीत. सर्व प्रकारच्या कारागीरांचा ह्यात समावेश होऊ शकतो.
शूद्र म्हणजे ब्रह्माचे पाय, हे प्रतिकात्मक मानले तर शूद्रांनी निर्माण केलेल्या पायावर सर्व सामाजिक व्यवस्था उभी राहिली होती असे म्हणता येईल.
येथे पराशर ऋषींचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी रचलेला कृषीविषयक ग्रंथ 'कृषि पराशर', म्हणजे ज्ञानी व्यक्तिने संशोधन करायचे, वैश्यांनी ते संशोधन राबवायचे आणि शूद्रांनी त्यासाठी आवश्यक सेवा द्यायची, अशी साधारण व्यवस्था असावी.
श्रीमद्भागवतम् मधील खालील श्लोकातून समाज व्यवस्थेची स्पष्ट कल्पना समजते.
यस्य यल्लक्षणं प्रोक्तं पुंसो वर्णाभिव्यञ्जकम् ।
यदन्यत्रापि दृश्येत तत्तेनैव विनिर्दिशेत् ॥ श्रीमद्भागवतम् 7.11.35 ॥
जर कोणी व्यक्तीमध्ये काही (तो जसा ओळखला जातो त्यापेक्षा) वेगळ्या प्रकारचे गुण दिसून आले तर त्याला त्या गुणांनुसार ओळखले गेले पाहिजे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
कृषि, गौपालन आणि व्यापार हे वैश्याचे स्वाभाविक कर्म आहेत, शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहेत परिचर्या म्हणजे सेवा करणे.
---------------------------------------------------------------
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु।।18.45।।
स्वे स्वे कर्मणि अभिरतः नरः संसिद्धिम् लभते। स्वकर्म-निरतः यथा सिद्धिम् विन्दति, तत् शृणु
स्वे स्वे आपापल्या स्व नपु. स. ए. व.
कर्मणि कामात कर्मन् नपु. स. ए. व.
अभिरतः तत्परतेने अभि+रम् धातू रमणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
नरः मनुष्य नर पु. प्र. ए. व.
संसिद्धिम् विशेष सफलता संसिद्धि स्त्री. द्वि. ए. व.
सिध् धातू संपन्न होणे
लभते प्राप्त होते लभ् धातू लाभ होणे कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
स्वकर्म-निरतः स्वतः च्या कामात तल्लीन
स्व कर्मन् निरत पु. प्र. ए. व.
यथा जसे अव्यय
सिद्धिम् पूर्णता सिद्धि स्त्री. द्वि. ए. व.
सिध् धातू सिद्ध होणे
विन्दति, प्राप्त करतो विद् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
तत् ते तद् नपु द्वि. ए. व.
शृणु ऐक श्रु धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
सिद्धि ह्या शब्दाचे दोन अर्थ प्रचलित आहेत. एक म्हणजे अलौकिक चमत्कार.
पतंजली योगसूत्रात ह्याचा उल्लेख केला आहे.
निरनिराळ्या सिद्धी प्राप्त होणे, समाधी मार्गावरील अडथळे आहेत.
ते समाधावुपसर्गा व्युत्थाने सिद्धयः || पतंजली योगसूत्र 3.37 ||
ह्या शक्ती समाधी प्रक्रियेत बाधा आणतात मात्र सामान्य दशेत ती एक क्षमता आहे.
सिद्धि चा दुसरा अर्थ आहे कार्यपूर्ती. ह्याचा उल्लेख गीतेच्या अनेक श्लोकात वाचायला मिळतो.
जसे
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्। यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन।।6.43।।
हे कुरुवंशी! ह्या जन्मी ते पूर्वजन्मीचे ज्ञान पुन्हा जागृत करून योग मधे परीपूर्णता आणण्यासाठी अधिक परिश्रम करतात.
4थ्या अध्यायातील 12 व्या आणि 38 व्या श्लोकातही कार्यपूर्ती असाच अर्थ सांगितला आहे.
12 व्या अध्यायातील 10 वा श्लोक वाचल्यावर पुरेशी स्पष्टता येते
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव। मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि।।12.10।।
जर तू अभ्यास करण्यास असमर्थ असशील तर कर्म परायण हो. अशाप्रकारे माझ्यासाठी सर्व कर्मे करून तुला सिद्धी प्राप्त होईल.
ह्या अध्यायातील 7 व्या श्लोकात कर्म च्या निरनिराळ्या प्रकारांची माहिती आपण वाचली.
5व्या अध्यायातील 10व्या श्लोकात नियत कर्मांचा त्याग करू नये असे म्हटले आहे.
ह्या अध्यायातील 36 व्या श्लोकात सुखाच्या अभ्यासात लोक रमतात आणि त्यांच्या दुःखांचा अन्त होतो असे म्हटले आहे.
आता ह्या श्लोकात अभिरत असा शब्द वापरला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
आपापले स्वाभाविक कर्म तत्परतेने करून माणूस त्यात विशेष सफलता प्राप्त करू शकतो. स्वतःचे कर्म आत्मियतेने करून मनुष्य सिद्धी कशी प्राप्त करून घेतो ते तू माझ्याकडून ऐक.
--------------------------------------------------------------
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्। स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः।।18.46।।
यतः भूतानाम् प्रवृत्तिः येन इदम् सर्वम् ततम् तम् स्वकर्मणा अभ्यर्च्य मानवः सिद्धिम् विन्दति।
यतः ज्यांच्यापासून अव्यय
भूतानाम् जीवांचा भूत पु. ष. ब. व.
प्रवृत्तिः उद्भव प्रवृत्ति स्त्री प्र. ए. व.
प्र + वृत् + क्तिन् प्रत्यय
येन ज्याने यद् पु. तृ. ए. व.
इदम् हे इदम् नपु. प्र. ए. व.
सर्वम् सर्व नपु. प्र. ए. व.
ततम् व्यापलेले तत नपु. प्र. ए. व.
तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व.
स्वकर्मणा स्वकर्मणा द्वारे
स्व कर्मन् नपु. तृ. ए. व.
अभ्यर्च्य पूजन करून अभि+अर्च ल्यप प्रत्यय
मानवः मनुष्य मानव पु. प्र. ए. व.
सिद्धिम् सिद्धि स्त्री द्वि. ए. व.
विन्दति प्राप्त करतो विद् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात सिद्धी ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. ह्या श्लोकात स्वकर्माचे पालन केल्याने सिद्धी प्राप्त होते असे म्हटले आहे, ह्याचा अर्थ परमात्म्याची प्राप्ती होते असा म्हणायला हरकत नाही.
ह्या श्लोकाचा 13 व्या अध्यायातील 30 व्या श्लोकाशी अर्थ जोडून घेता येईल.
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः।
यः पश्यति तथाऽऽत्मानमकर्तारं स पश्यति।।13.30।।
जो शरीराची सर्व कर्मे प्राकृत शक्ती द्वाराच संपन्न होत असतात आणि आत्मा प्रत्यक्ष काहीच करत नाही, हे पाहतो (हे जाणतो) तोच पाहतो (जाणतो)
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ज्याच्यामुळे सर्व जीवांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व विश्व व्यापून टाकले आहे, त्याची स्वकर्माने पूजा करून मनुष्य सिद्धि प्राप्त करतो.
-------------------------------------------------------------
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्।।18.47।।
स्वनुष्ठितात् पर-धर्मात् विगुणः स्वधर्मः श्रेयान् स्वभाव-नियतम् कर्म कुर्वन् किल्बिषम् न आप्नोति।
स्वनुष्ठितात् चांगल्या प्रकारे कृतीत आणलेले
स्व +अनु+स्था धातू
अनुष्ठित पु. पं. ए. व.
पर-धर्मात् परधर्मपेक्षा परधर्म पु. पं. ए. व.
विगुणः सदोष विगुण पु. प्र. ए. व.
स्वधर्मः स्वतः चे कर्म
स्वधर्म पु. प्र. ए. व.
श्रेयान् श्रेयस्कर
श्रेयस् पु. प्र. ए. व.
स्वभाव-नियतम् स्वभावाला अनुसरून
स्वभावनियत नपु. द्वि. ए. व.
कर्म कर्मन् नपु. द्वि. ए. व.
कुर्वन् केल्याने कृ धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
किल्बिषम् पाप किल्बिषम् नपु. द्वि. ए. व.
किल् धातू + बुक् + टिषच्, किल् + ब् + इष
न अव्यय
आप्नोति प्राप्त करतो आप धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
ह्या श्लोकासारखाच अर्थ असणारा, आपण 3र्या अध्यायातील 35 वा श्लोक वाचला आहे.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।3.35।।
दुसऱ्याचे नियत कर्म आपल्या नियत कर्मापेक्षा चांगले आहे असे वाटले तरी तसे करणे हे भीतीदायक आहे आणि स्वतःचे कर्म करत मृत्यू मिळणे, कल्याणकारी आहे.
3र्या अध्यायातील 4 थ्या श्लोकात असे म्हटले आहे की
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते। न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।
कर्मयोगीने जर कर्म करण्याचा आरम्भच केला नाही तर त्याला निष्कर्माचा अनुभव प्राप्त होणार नाही आणि ज्ञानयोगी ने आपल्या कर्मांचा त्याग केला तर त्याला सिद्धि प्राप्त होणार नाही.
म्हणून कर्म करणे अत्यावश्यकच आहे.
ह्या श्लोकात आपलेच कर्म केले असता पाप लागत नाही असा उल्लेख केला आहे.
ह्याचा अर्थ असा समजून घ्यायचा की एखाद्या योद्ध्याने अहिंसेच्या मार्गाने जाऊ नये. येथे योद्धा हा त्याच्या स्वाभाविक लढाऊ वृत्तीला अनुसार योद्धा झाला आहे असे गृहीत धरले आहे.
तावत् कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता ।
मत्कथाश्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते ॥ भागवतपुराण 11.20. 9॥
जोपर्यंत परमेश्वराच्या लीला चे श्रवण-कीर्तन, स्मरण करून आपल्या मनात परमेश्वराची भक्ति करण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण आपले विहीत कर्म करत राहिले पाहिजे. "
ह्या श्लोकातील कुर्वन्नाप्नोति ह्या शब्दाची संधी
कुर्वन् न आप्नोति आणि
कुर्वन आप्नोति, अशा दोन्ही प्रकारे अर्थानुसार सोडवता येईल.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
चांगल्या प्रकारे अनुष्ठित केलेल्या दुसर्याच्या कर्मापेक्षा स्वतःचे सदोष कर्म श्रेष्ठ आहे, आपले स्वाभाविक कर्म केल्याने पाप लागत नाही.
-------------------------------------------------------
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।।18.48।।
हे कौन्तेय! सदोषम् अपि सहजम् कर्म न त्यजेत्, हि धूमेन अग्निः इव सर्वारम्भाः दोषेण आवृताः ।
हे कौन्तेय!
सदोषम् सदोष नपु. द्वि. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
सहजम् सहज नपु. द्वि. ए. व.
कर्म कर्मन् नपु. द्वि. ए. व.
न अव्यय
त्यजेत्, त्यागले पाहिजे
त्यज् धातू कर्तरी विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.
हि कारणकी अव्यय
धूमेन धूम पु. तृ. ए. व.
अग्निः अग्नि पु. प्र. ए. व.
इव अव्यय
सर्वारम्भाः सर्व आरम्भ पु. प्र. ब. व.
दोषेण दोष पु. तृ. ए. व.
आवृताः आ+वृत् धातू क्त प्रत्यय स्त्री. प्र. ब. व.
विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर कोणतेही काम करत असताना त्यापासून प्रदूषण निर्माण होतेच. पण आपल्या गरजा भागवण्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात, जसे अन्न शिजवणे. ह्या श्लोकात अग्नि चे उदाहरण दिले आहे. अग्नी प्रज्वलित करत असताना धूर निर्माण होतो.
गीतेमध्ये दैवीगुणांचे वर्णन करताना अहिंसा हा गुण सांगितला आहे. पण 100 टक्के अहिंसा पालन करणे कोणालाच शक्य नाही. गौतम बुद्धांनी अहिंसा पालन करण्यास सांगितले. जैन धर्मिय अहिंसेचे कसोशीने पालन करण्याच्या प्रयत्नात कंदमुळे सुद्धा खात नाहीत. पण जमिन नांगरणी करताना सुद्धा हिंसा घडतेच. थोडक्यात सर्व कर्मांची दुसरी वाईट बाजू आहेच.
ह्या श्लोकात 'सहज कर्म' असा शब्द वापरला आहे. म्हणजे आपला जो स्वभाव आहे त्याप्रमाणे कर्म करायचे.
आताच्या काळात ह्याचा अर्थ कसा लावायचा? आधी म्हटल्याप्रमाणे जर प्रत्येक कृतीनंतर प्रदूषण अनिवार्य असेल तर आवश्यक तेवढे कर्म करून अनावश्यक प्रदूषण टाळायचे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे कौन्तेय! आपल्या कर्मात काही दोष असले तरी, स्वाभाविक कर्म टाळू नये. कारण सर्व कर्मे दोषांनी लपेटलेली असतात, जसे धूरा खाली अग्नी.
---------------------------------------------------------------
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः। नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति।।18.49।।
सर्वत्र असक्त-बुद्धिः विगत-स्पृहः जित-आत्मा, संन्यासेन परमाम् नैष्कर्म्य-सिद्धिम् अधिगच्छति।
सर्वत्र अव्यय
असक्त-बुद्धिः आसक्ती रहित बुद्धि
अ सक्त बुद्धि स्त्री. प्र. ए. व.
विगत-स्पृहः निस्पृह
विगत स्पृह पु. प्र. ए. व.
जित-आत्मा, संयमी
जित आत्मन् पु. प्र. ए. व.
संन्यासेन संन्यासाने
संन्यास पु. तृ. ए. व.
सन्यास सम+नी +आस धातू ठेवणे
सम+न्यास
सम्यक नितांत
परमाम् श्रेष्ठ
परमा स्त्री द्वि. ए. व.
नैष्कर्म्य-सिद्धिम् निष्कर्म सिद्धि
नैष्कर्म्य सिद्धि स्त्री. द्वि. ए. व.
अधिगच्छति प्राप्त होतो अधि गच्छति गम धातू जाणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात सदोष असले तरी आपले सहज कर्म करत राहिले पाहिजे असे सांगून झाल्यावर ह्या श्लोकात नैष्कर्म्य सिद्धि प्राप्त करण्याची गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत.
नैः कर्मः, नैष्कर्म्य चा अर्थ निष्क्रियता असा असला तरी तो आत्म्याच्या पातळीवर समजून घ्यायला हवा. कारण आत्मा क्रियाशून्य आहे,हे आपण पूर्वी वाचले आहे. पुरुषाने आपण प्रकृतिपेक्षा भिन्न आहोत हे ज्ञान प्राप्त करून प्रकृतीचा त्याग करावा, असे सांख्य दर्शन सांगते. संन्यास चा नेमका हाच अर्थ अभिप्रेत आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
सर्वत्र आसक्ती रहीत अशी बुद्धी, कामना रहीत, संयमी (शरीरावर विजय मिळवलेला) (असा संन्यासी ) संन्यासाद्वारे निष्काम सिद्धिस प्राप्त होतो.
---------------------------------------------------------------
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा।।18.50।।
हे कौन्तेय! सिद्धिम् प्राप्तः यथा ब्रह्म आप्नोति, तथा समासेन एव मे निबोध, या ज्ञानस्य परा निष्ठा
हे कौन्तेय!
सिद्धिम् सिद्धि सिद्धि स्त्री. प्र. ए. व.
प्राप्तः प्राप्त करून प्र +आप् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
यथा ज्या प्रमाणे अव्यय
ब्रह्म ब्रह्म ब्रह्मन् नपु. द्वि. ए. व.
आप्नोति, प्राप्त करतो आप धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
तथा तसे अव्यय
समासेन संक्षिप्त, सम+आस
एव सुद्धा अव्यय
मे माझ्याकडून अस्मद पं. ए. व.
निबोध, नीट समजून घे नि+बुध् धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
या जी यद् स्त्री. प्र. ए. व.
ज्ञानस्य ज्ञानाची ज्ञान नपु. ष. ए. व.
परा दिव्य परा स्त्री. प्र. ए. व.
निष्ठा अवस्था निष्ठा स्त्री. प्र. ए. व.
सिद्धि ह्या शब्दाचा अर्थ आपण 45 व्या श्लोकात समजून घेतला. सिद्धि प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी संन्यासाची गुणवत्ता आपण आधीच्या श्लोकात माहीत करून घेतली. ह्या श्लोकात सिद्धी ह्या शब्दाचा अर्थ अंतःकरण शुद्धी असा घेता येईल जी संन्यासी गुणवत्तेमुळे झाली आहे.
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये निष्ठा हा शब्द 3र्या अध्यायात वापरला आहे.
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ। ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।3.3।।
दोन प्रकारच्या निष्ठा माझ्या द्वारा सांगितल्या आहेत.
ज्ञानी लोकांची ज्ञानयोगाशी आणि योगींची कर्मयोगाशी.
स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुण: परिकीर्तित:। श्रीमद्भागवतम् 11.20.26 ॥
अशी मान्यता आहे की योगींची आपापल्या आध्यात्मिक स्थिति वर निष्ठापूर्वक टिकून राहणे हाच मोठा गुण आहे.
निष्ठा म्हणजे निर्धारपूर्वक कर्माचे पालन.
या वेदबाह्याः स्मृतयो याश्च काश्च कुदृष्टयः ।
सर्वास्ता निष्फलाः प्रेत्य तमोनिष्ठा हि ताः स्मृताः ॥ मनुस्मृति 12.95. ॥
ज्या स्मृति वेदांच्या विरोधात स्वार्थी लोकांनी सांगितल्या, त्या निष्फळ आहेत आणि ते सर्व तमोगुणयुक्त आहेत.
ह्या श्लोकात ज्ञान निष्ठा असा शब्द वापरला आहे. ब्रह्मप्राप्ती म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा. ज्याचा अधिकार अंतःकरणाच्या शुद्धिने मिळाला. 'अजि मी ब्रह्म पाहिले' ह्या संत अमृतरायांच्या ओळींची येथे आठवण होते.
अंतःकरणाच्या शुद्धिपासून ब्रह्मप्राप्ती पर्यंत चा प्रवास श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला सांगू इच्छितात म्हणून ह्या श्लोकात ते असे म्हणतात की
हे कौन्तेय! सिद्ध पुरुषाला ब्रह्माची प्राप्ती कशी होते जी ज्ञानाची पराकाष्ठा असते, ते तू माझ्याकडून संक्षेपाने जाणून घे.
----------------------------------------------------
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्याऽऽत्मानं नियम्य च।
शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च।।18.51।।
विशुद्धया बुद्ध्या युक्तः, धृत्या आत्मानम् नियम्य च, शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा, राग-द्वेषौ व्युदस्य च।
विशुद्धया शुद्ध विशुद्ध स्त्री तृ. ए. व.
बुद्ध्या बुद्धि स्त्री तृ. ए. व.
युक्तः, युज् धातू क्त प्रत्यय पु प्र. ए. व.
धृत्या निश्चयाने धृति स्त्री तृ. ए. व.
आत्मानम् आत्मा आत्मन् पु. द्वि. ए. व.
नियम्य नियमानुसार नि+यम ल्यप प्रत्यय
च,
शब्दादीन् शब्द आदि पु. द्वि. ब. व.
विषयान् विषय पु. द्वि. ब. व.
त्यक्त्वा, त्यागून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
राग-द्वेषौ राग-द्वेष पु. द्वि. द्वि. व.
व्युदस्य भिरकावून देणे वि+उत् +अस् धातू फेकणे ल्यबन्त
च अव्यय
इथून पुढिल तीन श्लोकात ब्रह्म स्वरूप होण्यासाठी आवश्यक अशी पूर्वतयारी, म्हणजे आवश्यक गुण कोणते आहेत त्याची उजळणी होणार आहे. उजळणी होत आहे असे म्हणण्याचे कारण हे सर्व निरनिराळ्या श्लोकात पूर्वी सांगून झाले आहे.
विशुद्ध बुद्धि अर्थात सात्त्विक बुद्धि म्हणजे काय ते आपण 18.30 मध्ये वाचले. सात्त्विक दृढता बद्द्ल आपण 18.33 मध्ये वाचले. शारीरिक वाचिक आणि मानसिक तप ह्याबद्दल आपण 17 व्या अध्यायातील 14,15,16 ह्या श्लोकात वाचले.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
विशुद्ध बुद्धि ने युक्त, निर्धाराने आत्मसंयम करून, शब्द आदि विषयांचा त्याग करून राग-द्वेषाला भिरकावून देणारा (ब्रह्मावस्था प्राप्त करतो)
-----------------------------------------------
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः।।18.52।।
विविक्त-सेवी, लघु-आशी, यत-वाक्-काय-मानसः, नित्यम् ध्यान-योग-परः, वैराग्यम् समुपाश्रितः
विविक्त-सेवी, एकांतवासी विविक्तसेविन् पु. प्र. ए. व.
वि+विच् धातू वेगळे होणे
लघु-आशी, मित आहारी लघ्वाशिन् पु. प्र. ए. व.
अश् धातू भोजन करणे
यत संयमित
वाक्-काय-मानसः, वाचा शरीर आणि मन
यत वाच् काय मानस पु. प्र. ए. व.
नित्यम् नित्य नपु. प्र. ए. व.
ध्यान-योग-परः, समाधिस्थ ध्यान-योग-पर पु. प्र. ए. व.
ध्यै धातू ध्यान करणे
वैराग्यम् वैराग्य नपु. द्वि. ए. व.
समुपाश्रितः आश्रय घेऊन सम+उप+श्रि धातू आश्रय घेणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
ब्रह्मावस्था प्राप्त करण्यासाठी पुढे सांगताना एकांतात राहणे हा एक गुण सांगितला आहे.
एकांत आणि एकटेपणा ह्यातील फरक आपल्याला माहीत असला पाहिजे. एकटे वाटणे हि मानसिक स्थिति आहे, जी भीती दर्शवते,परावलंबित्व दर्शवते.
एकांत हि मौन साधना आहे. चिंतनशील सृजनशील आहे.
हिमालयातील एखाद्या गुहेत एकटे राहणे हे तीव्र आत्मिक बल दर्शवते.
भोजनाचे तीन प्रकार सांगितले आहेत.
मित म्हणजे कमी खाणे, हित म्हणजे हितकारक खाणे
ऋत भोजन म्हणजे ऋतु अनुसार.
6व्या अध्यायातील 16 व्या श्लोकात शरीरनिर्वाहाच्या गरजेपुरते भोजन करावे असे म्हटले आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
एकांतवासी, मिताहारी, शरीर, वाणी आणि मनावर कायम नियंत्रण असणारा, ध्यान योगाचा सदैव अभ्यास करणारा वैराग्याची कास धरलेला (ब्रह्मावस्था प्राप्त करतो)
-----------------------------------------------------
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते।।18.53।।
अहङ्कारम् बलम् दर्पम् कामम् क्रोधम् च परिग्रहम् विमुच्य, निर्ममः, शान्तः, ब्रह्म-भूयाय कल्पते
अहङ्कारम् अहङ्कार पु. द्वि. ए. व.
बलम् बल नपु. द्वि. ए. व.
बल् धातू बलयुक्त असणे
दर्पम् दर्प पु. द्वि. ए. व.
दृप् धातू गर्व करणे
कामम् काम पु. द्वि. ए. व.
कम् धातू इच्छा असणे
क्रोधम् क्रोध पु. द्वि. ए. व.
क्रुध् धातू क्रोध करणे
च सुद्धा अव्यय
परिग्रहम् संग्रह परिग्रह पु. द्वि. ए. व.
परि+ग्रह धातू ग्रहण करणे
विमुच्य, मुक्त होऊन वि+मुच् धातू सोडून देणे ल्यप प्रत्यय
निर्ममः, ममतारहित निर+मम पु. प्र. ए. व.
शान्तः, शान्त पु. प्र. ए. व.
ब्रह्म-भूयाय ब्रह्मभूय नपु. च. ए. व.
भू धातू असणे
कल्पते योग्यता होणे
कृप् धातू कल्पना करणे कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
16 व्या अध्यायातील 18 व्या श्लोकात अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध ह्या आसुरी गुणांचे वर्णन वाचताना त्या गुणांचे अर्थ आपण समजावून घेतले आहेत.
आधीच्या श्लोकात ब्रह्मावस्था प्राप्त करण्यासाठी एकांतवास आणि निरंतर ध्यान साधना आवश्यक आहे असे म्हटले आहे. ह्या सर्वांचा परीणाम म्हणजे आपल्या मधील अहंकार नष्ट होतो, बळाची घमेंड रहात नाही, काम आणि क्रोधाचा त्याग होतो. हे सांगताना संत ज्ञानेश्वरांनी पिकलेल्या फळाची उपमा दिली आहे. जसे वृक्ष फळाला धरून ठेवत नाही तसेच आपल्या मध्ये परीपक्वता आली कि काम, क्रोध मत्सर अहंकार सर्व काही आपोआप गळून पडते. त्यापुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की ही प्रक्रिया हळूहळू घडत असते,जसे बी पेरल्यानंतर लगेच झाड उंच होत नाही. कर्मयोग करता करता आपली बुद्धी शुद्ध होते आणि ज्ञानाची प्राप्ती होते. त्यानंतर व्यक्ती परमेश्वराशी एकरूप होण्याच्या योग्यतेचा होतो.
परिग्रह म्हणजे ग्रहण करणे, संचय करणे.
अपरिग्रह म्हणजे फक्त जरूरीपुरत्या गोष्टी बाळगणे. जैन तत्त्वज्ञानाप्रमाणे दोन प्रकारचे परिग्रह आहेत.
1. आभ्यन्तर परिग्रह चौदा प्रकारचे आहेत.
मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रति, अरित, शोक, भय, जुगुप्सा (ग्लानि), स्त्री वेद, पुरूषवेद और नपुंसकवेद
2. बाह्य परिग्रह दहाप्रकार चे आहेत.
क्षेत्र (जमिन), वास्तु (निर्मित भवन), धन (चांदी, सोना, मुद्रा), धान्य, द्विपद (मनुष्य, पक्षी), चतुष्पद (पशु), यान (सवारी), शय्यासन, कुप्य, भांड.
अष्टांग योग नुसार अपरिग्रह, पाच यम पैकी एक.
अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥पतंजली योगसूत्र 2.30॥
अहिंसा, यथार्थ ज्ञान, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह -हे पाच यम आहेत.
त्यापुढे जाऊन पतंजली ऋषी असे म्हणतात की
अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथासंबोधः॥39॥
अपरिग्रह अंगी बाणल्यानंतर त्या व्यक्तीला भूत, वर्तमान आणि भविष्यातील ज्ञान प्राप्त होते. आता ह्याचा अर्थ कसा लावायचा?
कोणत्याही गोष्टीचा संग्रह करायचा नाही म्हणजे आपली त्यामध्ये असणारी लालसा, मोह, वासना यांची संपुष्टी. महर्षींच्या मते हेच दुर्गुण आपल्या स्मृतींमध्ये बाधक ठरतात. जेव्हा हे दुर्गुण नष्ट होतात त्यावेळी आपल्याला सर्व गोष्टींचे स्मरण होऊ लागते.
6व्या अध्यायातील 10 व्या श्लोकात अपरिग्रह चा उल्लेख आहे.
निर्मम म्हणजे ममतारहित म्हणजे स्वतःवर प्रेम नसणे ह्याचा उहापोह 12 व्या अध्यायातील 14 व्या श्लोकात विस्ताराने आपण वाचला आहे.
शांती म्हणजे फक्त संघर्ष समाप्ती नाही तर आपल्या विचारांची शुद्धता, निरर्थक विचारांची समाप्ती.
ब्रह्मभूय’- अर्थात आत्मबोध. 14 व्या अध्यायातील 26 व्या श्लोकात आपण विस्तारने ह्याबद्दल वाचले आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
अहंकार, बळ, दर्प, काम, क्रोध आणि संग्रही वृत्ती चा त्याग करून, स्वतःवर (फाजील) प्रेम न करता ममत्वभावरहित, शान्त पुरुष ब्रह्म प्राप्ति साठी योग्य ठरतो.
-------------------------------------------------------
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्।।18.54।।
ब्रह्म-भूतः प्रसन्न-आत्मा न शोचति, न काङ्क्षति, सर्वेषु भूतेषु समः पराम् मत्-भक्तिम् लभते
ब्रह्म-भूतः ब्रह्मावस्थ ब्रह्मभूत पु. प्र. ए. व.
प्रसन्न-आत्मा प्रसन्न आत्मन् पु. प्र. ए. व.
न अव्यय
शोचति, शोक करतो शुच् धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
न अव्यय
काङ्क्षति, आकांक्षा करतो काड्ःक्ष धातू इच्छा करणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
सर्वेषु सर्व सर्व पु. स. ब. व.
भूतेषु जीव भूत पु. स. ब. व.
समः समभाव सम पु. प्र. ए. व.
पराम् दिव्य परा स्त्री. द्वि. ए. व.
मत्-भक्तिम् माझी भक्ती अस्मद् भक्ति स्त्री. द्वि. ए. व.
लभते प्राप्त करतो
लभ् धातू कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
आत्मबोध झालेला साधक, पण अजून मुक्ती मिळालेली नाही असा, त्याची वर्तणूक कशी असेल त्याचे वर्णन ह्या श्लोकात दिले आहे. आणि त्यापुढे जाऊन एक विचार मांडला आहे की अशा अवस्थेतील योगी माझा श्रेष्ठ भक्त असतो आणि माझे आशिर्वाद मिळवतो.
अशाच अर्थाचा श्लोक
आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रन्था अप्युरुक्रमे। कुर्वन्त्यहैतुकी भक्तिमित्थम्भूतगुणो हरिः।।
श्रीमद्भागवतम् -।। 1.7.10।।
ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे, सर्व भौतिक बंधनातून मुक्त झाले आहेत असे (आत्म्यात रमलेले) आत्माराम, परमेश्वराची निर्व्याज भक्ती करतात.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
आत्मबोध झालेला प्रसन्न असा आत्मा कसल्या इच्छा ठेवत नाही, शोक करत नाही आणि समस्त जीवांकडे समतेच्या दृष्टीने पाहतो तो माझी दिव्य भक्ती प्राप्त करतो.
--------------------------------------------------------------
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्।।18.55।।
भक्त्या माम् तत्त्वतः अभिजानाति यः यावान् च अस्मि, ततः तत्त्वतः ज्ञात्वा तत्-अनन्तरम् माम् विशते।
भक्त्या भक्तीने भक्ति स्त्री तृ ए. व.
माम् मला अस्मद द्वि. ए. व.
तत्त्वतः अव्यय
अभिजानाति जाणून घेतो अभि+ज्ञा धातू जाणणे कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
यः तो तद् पु. प्र. ए. व.
यावान् जितका यावत पु. प्र. ए. व.
च सुद्धा अव्यय
अस्मि, आहे अस् धातू कर्तरी लट लकार उ. पु. ए. व.
ततः त्यानंतर अव्यय
तत्त्वतः अव्यय
ज्ञात्वा जाणून ज्ञा धातू क्त्वा प्रत्यय
तत्-अनन्तरम् त्यानंतर अव्यय
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
विशते प्रवेश करतो
विश् धातू कर्तरी लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात आत्मबोध झालेला, श्रीभगवानकृष्णांच्या दिव्य भक्तीस योग्य ठरतो असे आपण वाचले.
काम्योपासनायार्थयत्यनुदिनं किञ्चितफलम् स्वेप्सितं
केचित स्वर्गम्थापवर्गमपरे योगादिज्ञादिभिः अस्माकं यदुनंदना नागरीयुगलाधानार्थिंणं
किं लोकेन दमेन किं नृपतिना स्वर्गापावगीश्च किं।। प्रबोध सुधाकर 250।।
काही जण सुखासाठी, स्वर्गलोकाच्या प्राप्ती साठी पुण्य कर्म करतात, ज्ञानमार्ग किंवा अष्टांग योग च्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती करू इच्छितात. मी मात्र यदुनाथांच्या चरणी तल्लीन झालो आहे. मला असे सुख, राज्य, स्वर्ग प्राप्ती यांचे काय सोयरसुतक?
मी ब्रह्म आहे असा अहंकार सुद्धा आपल्या मनात ठेवायचा नाहीये.
अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
समाधीवस्थेचे सुद्धा चार प्रकार आहेत.
1. सालोक्य : परमात्म्याचे दर्शन होणे.
2. सामीप्य : परमात्म्याच्या निकट असल्याचा अनुभव येणे.
3. सारूप्य : परमात्म्यासारखे बनण्याचा प्रयत्न.
4. सायुज्य : परमात्म्याशी तदाकार होणे.
केवळ परमेश्वराची भक्ति आणि त्यातच तल्लीन असलेल्या साधकाला स्वतः च ब्रह्म असण्याचा साक्षात्कार होतो त्या अवस्थेचे यथार्थ वर्णन आदी शंकराचार्यांनी अशा प्रकारे केले आहे.
मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहम्न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे ।न च व्योम भूमिर्न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम् ॥1॥
अर्थात मी मन, बुद्धी, अहंकार किंवा स्मृति नाही. मी कान, नाक, जिव्हा, नेत्र नाही. मी आकाश, भूमी, तेज किंवा वायू देखील नाही. मी एक चैतन्य रूप आनंद आहे, मी शिव आहे, मीच शिव आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
त्या दिव्य भक्ती द्वारे मला जे तत्त्वतः माझी व्यापकता जाणतात, तसे तत्त्वतः जाणून घेतल्यानंतर ते माझ्यात प्रविष्ट होतात.
----------------------------------------------------
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः।मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्।।18.56।।
मत्-व्यपाश्रयः सर्व-कर्माणि सदा कुर्वाणः अपि मत्-प्रसादात् शाश्वतम् अव्ययम् पदम् अवाप्नोति
मत्-व्यपाश्रयः माझ्या पंखाखाली
अस्मद् व्यपाश्रय पु. प्र. ए. व.
सर्व-कर्माणि सर्व कर्मे
सर्व कर्मन् नपु. द्वि. ब. व.
सदा सदैव
कुर्वाणः करत असता
कृ धातू शानच प्रत्यय पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
मत्-प्रसादात् माझ्या आशिर्वादाने
अस्मद् प्रसाद पं ए. व.
प्र+सद् धातू बसणे
शाश्वतम् शाश्वत नपु. द्वि. ए. व.
अव्ययम् अविनाशी अव्यय नपु. द्वि. ए. व.
पदम् पद नपु. द्वि. ए. व.
अवाप्नोति प्राप्त करतो अव+आप धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात ब्रह्मावस्थेचे ज्ञान म्हणजे ब्रह्मप्राप्ती हा विचार आपण पाहिला. आता ह्या श्लोकात कर्मयोग वर भाष्य केले आहे. येथे सर्व कर्माणि असा शब्द वापरल्याने भारतीय तत्त्वज्ञानाचे औदार्य दिसून येते. कारण सर्व कर्मे म्हणजे निषिद्ध कर्म सुद्धा.
अशी कर्मे करत असता परमेश्वराची भक्ति केली असता ईश्वर प्राप्ती होते, हे 9व्या अध्यायातील 30,31,32 व्या श्लोकात सुद्धा सांगून झाले आहे.
कर्मयोगीने आपली कर्मे करत राहिली पाहिजे, त्याचे श्रेय मात्र परमेश्वराला अर्पण करावे. कामात मिळालेल्या यशाबद्दल अहंकार असू नये. हे आपण बरेचदा वाचले.
असे केले असता सुद्धा शाश्वत, अविनाशी पद मिळवता येते असे ह्या श्लोकात सांगितले आहे.
पद म्हणजे अवस्था जी शाश्वत आहे.
जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नहीं।।संत कबीर।।
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
माझ्या आश्रयाखाली असणारा, निरंतर सर्व कर्मे करणारा, माझ्या आशिर्वादाने शाश्वत, अविनाशी पद प्राप्त करू शकतो.
---------------------------------------------------------------
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव।।18.57।।
सर्व-कर्माणि चेतसा मयि संन्यस्य, बुद्धि-योगम् उपाश्रित्य, मत्-परः सततम् मत्-चित्तः भव।
सर्व-कर्माणि सर्व कर्मे सर्व कर्मन् नपु. द्वि. ब. व.
चेतसा बुद्धि ने चेतस् नपु. तृ. ए. व.
मयि मला अस्मद् स. ए. व.
संन्यस्य, त्याग करून सम+नी+अस् धातू ल्यप प्रत्यय
बुद्धि-योगम् ज्ञान मार्ग बुद्धि योग पु. द्वि. ए. व.
उपाश्रित्य, आश्रय घेऊन उप+आ+श्रि धातू ल्यप प्रत्यय
मत्-परः माझ्या आशिर्वादाने अस्मद् पर पु. प्र. ए. व.
सततम् अव्यय
मत्-चित्तः माझाच विचार ठेवून अस्मद् चित्त पु. प्र. ए. व.
भव हो भू धातू कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकात बुद्धियोग असा शब्दप्रयोग केला आहे, म्हणजे ज्ञानाच्या साह्याने परमेश्वराला जोडून घेणे. हाच विचार 12 व्या अध्यायात मांडलेला आहे.
2र्या अध्यायातील अनेक श्लोकात आपण बुद्धियोग संबंधी वाचले आहे.
2.39 व्या श्लोकात सांख्ययोगातील आणि कर्मयोगातील समबुद्धि चा उल्लेख आहे. तर 2.49 व्या श्लोकात बुद्धियोगाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.
10 व्या अध्यायातील 10व्या श्लोकात बुद्धियोगाची क्षमता कोणाकडे असते त्याचे वर्णन केले आहे.
ह्या श्लोकात सारांशाने चार विचार सांगितले आहेत.
जसे,
सर्व कर्मांना स्वेच्छेने मला अर्पण कर.
स्वतः ला मला अर्पण कर.
बुद्धियोगाचा अंगिकार कर.
माझ्याशी मनाने एकरूप हो.
अर्थात संत तुकडोजी महाराजांच्या रचनेची आठवण येते.
तन मन धन सदा सुखी हो.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
माझ्या आश्रयाने, मनाने सर्व कर्मांचा संन्यास करून, माझ्या आशिर्वादाने कर्म करून, बुद्धियोगाच्या साह्याने माझ्या मनाशी एकरूप हो.
---------------------------------------------------------------
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि। अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि।।18.58।।
मत्-चित्तः त्वम् मत्-प्रसादात् सर्व-दुर्गाणि तरिष्यसि। अथ चेत् अहंकारात् न श्रोष्यसि, विनङ्क्ष्यसि
मत्-चित्तः माझ्या पाशी चित्त ठेवलेला
अस्मद् चित्त पु. प्र. ए. व.
त्वम् तू युष्मद् प्र. ए. व.
मत्-प्रसादात् माझ्या कृपेने अस्मद् प्रसाद पु. पं ए. व.
प्र+सद् धातू म्लान होणे
सर्व-दुर्गाणि सर्व संकटे सर्व दुर्ग नपु. द्वि. ब. व.
दुर+गम् धातू जाणे
तरिष्यसि तरून जाशील तॄ धातू तरणे कर्तरी लृट लकार म. पु. ए. व.
अथ अव्यय परन्तु
चेत् अव्यय जर
अहंकारात् अहंकाराने अहंकार पु. पं. ए. व.
न अव्यय
श्रोष्यसि, ऐकशील श्रु ऐकणे धातू कर्तरी लृट लकार म. पु. ए. व.
विनङ्क्ष्यसि नष्ट होशील वि+नश् धातू नाश होणे कर्तरी लृट लकार म. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल ते ह्या श्लोकात सांगितले आहे.
16 व्या अध्यायातील 20 व्या श्लोकात परमेश्वरावर अविश्वास दाखवण्याचा परिणाम नमूद केला आहे.
असुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि। मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्।।16.20।।
हे कुन्तीनन्दन ! त्या मूर्ख लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनी प्राप्त होते. अशा प्रकारे ते माझ्या पासून लांब आणखीन अधोगतीला जातात.
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि।।9.3।।
हे परन्तप! ज्या लोकांचा आपल्या धर्मावर श्रद्धा नसते, विश्वास नसतो, ते मला प्राप्त करू शकत नाहीत. आणि जन्म मृत्यू च्या मार्गावर ते परत परत चालत राहतात.
संपूर्ण गीतेत प्रथमच दरडावणीच्या सूरात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला विनङ्क्ष्यसि म्हणजे तू नष्ट होशील असे सांगत आहेत. असे शब्द अर्जुनाला उद्देशून आधी कधीच वाचले नव्हते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
कृष्णभावनामय असलेला तू, माझ्या कृपेने तू सहजच सर्व संकटे पार करून जाशील. पण जर अहंकारापोटी तू हे ऐकले नाहीस तर मात्र तू नष्ट होशील.
---------------------------------------------------------------
यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे। मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति।।18.59।।
यत् अहङ्कारम् आश्रित्य 'न योत्स्ये' इति मन्यसे, ते एषः व्यवसायः मिथ्या। प्रकृतिः त्वाम् नियोक्ष्यति
यत् जर यद् नपु द्वि. ए. व.
अहङ्कारम् अहंकाराच्या अहङ्कार पु. द्वि. ए. व.
आश्रित्य आधाराने आ+श्रि धातू सेवा करणे ल्यप प्रत्यय
'न योत्स्ये' युद्ध करणार नाही युध् धातू युद्ध करणे कर्तरी लृट लकार आत्मनेपदी उ. पु. ए. व.
इति अव्यय असे
मन्यसे, मानलेस मन् धातू मानणे कर्तरी लट लकार म. पु. ए. व.
ते तुझ्या युष्मद् ष. ए. व.
एषः हे सर्व एतद् पु. प्र. ए. व.
व्यवसायः निश्चित व्यवसाय पु. ए. व.
सो धातू मग्न असणे
मिथ्या मिथ्या मिथ्या स्त्री प्र. ए. व.
मिथ् धातू समजणे
प्रकृतिः प्रकृति स्त्री प्र. ए. व.
त्वाम् तू युष्मद् द्वि. ए. व.
नियोक्ष्यति नियुक्त होशील नि+युज् धातू जोडणे कर्तरी लृट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
हा श्लोक म्हणजे आपल्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेचा संदेश देणारा श्लोक वाटतो, जसे प्रत्येकाने आपले नियत कर्म ओळखून ते विनातक्रार करायचे आहे आणि त्याच्या श्रेयाची अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही. आधीच्या श्लोकात तर अर्जुनाला त्यांनी 'तू माझे ऐकले नाहीस तर नष्ट होशील' असे निक्षून सांगितले आहे.
युद्धभूमी वर स्वतः श्रीभगवानकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असतानाही अर्जुनाने युद्ध सुरू होण्यापूर्वी 'न योत्स्ये' असे म्हटल्यामुळे भगवंतांना गीता सांगणे भाग पडले. अर्जुनाने कृष्णाचे परमेश्वरी रूप ओळखलेच नव्हते. स्वतःच्या क्षत्रिय धर्माचा विसर पडून मी युद्ध करत नाही हे अर्जुनाने अहंकारापोटी म्हटले. युद्ध करावे हा प्रत्यक्ष भगवंतांचा आदेश आहे असे त्याला उमगलेच नाही. म्हणून तर श्रीभगवानकृष्णांना अर्जुनाला कर्मयोग सांगावा लागला. ह्या जगातील प्रत्येक गोष्टीचा 'कर्ता करविता' मीच आहे हे सांगावे लागले. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, सर्व कर्मे (तुझ्या कर्मा चा कर्ता तू नाहीस हे समजून) मलाच अर्पण कर असे सुद्धा त्यांनी अर्जुनाला सांगितले.
ह्या श्लोकात अर्जुनाचे 'न योत्स्ये' हे शब्द जणू काही श्रीभगवानकृष्णांनी त्याला परत घ्यायला लावले आहेत. प्रकृति पासून निर्माण झालेली माया, त्यापासून निर्माण झालेले त्रिगुण.
आपली चेतनाशक्ती मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी विभागली गेली आहे.
आदी शंकराचार्यानी मी शिव आहे असे सांगताना मी मन बुद्धि चित्त आणि अहंकार नाही असे म्हटले आहे.
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। निर्वाणषटकम् ।। 1 ।।
7व्या अध्यायातील 14 व्या श्लोकात गुणातीत होण्याचा मार्ग सांगितला आहे.
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥ कठोपनिषद् 1.3
जो भगवानांना शरण गेला, त्याने या मायावी जगावर सहज विजय मिळविला. नाहीतर ह्या आव्हानास पार करणे अत्यंत अवघड.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जर अहंकाराच्या छायेखाली तू 'मी युद्ध करणार नाही' असे म्हणत असशील, तर तो चुकीचा विचार आहे, तुझा उपजत स्वभावच तुला (कर्म करण्यास) प्रवृत्त करेल.
---------------------------------------------------------------
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा। कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत्।।18.60।।
हे कौन्तेय! यत् मोहात् कर्तुम् न इच्छसि, तत् अपि स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धः अवशः करिष्यसि
हे कौन्तेय!
यत् जे अव्यय
मोहात् मोहाने मोह पु. पं ए. व.
कर्तुम् करण्यासाठी कृ धातू तुमून प्रत्यय
न
इच्छसि, इच्छा केलीस इश् धातू कर्तरी लट लकार म.पु.ए.व.
तत् ते तद् नपु प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
स्वभावजेन स्वाभाविक स्वभाव +ज धातू नपु. तृ. ए. व.
स्वेन आपल्या स्व नपु. तृ. ए. व.
स्व सर्वनाम आणि विशेषण (कर्मणा)
कर्मणा कर्मे कर्मन् नपु. तृ. ए. व.
निबद्धः बन्धनकारक नि+बन्ध् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
अवशः इच्छेविरुद्ध न वशः पु. प्र. ए. व.
वश् धातू इच्छा करणे
करिष्यसि करशील कृ धातू कर्तरी लृट लकार म. पु. ए. व.
हा श्लोक काळानुरूप कसा समजून घ्यायचा असा विचार करत होते.
आपण आयुष्यात कायम दोन भूमिका निभावत असतो, एक व्यक्तीगत आयुष्य आणि दुसरे सामाजिक. भगवद्गीतेमधे आपण आपले कर्तव्य केलेच पाहिजे असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. एखादा सैनिक व्यक्तीगत आयुष्यात कसून अहिंसेचे पालन करत असेल पण युद्धभूमीवर शत्रू ला मारणे हेच त्याचे कर्तव्य होय. एकदा विवाहबंधनात अडकलेल्या व्यक्तीस, पत्नीच्या परवानगी शिवाय संन्यास घेणे शास्त्राला मान्य नाही. म्हणजेच बरेच वेळा व्यक्तीगत विचार, भावभावना बाजूला ठेवून आपल्याला आपले कर्म करावे लागते. थोडक्यात आपल्या कर्तव्यांपासून कितीही अडीअडचणी आल्या तरी फारकत घेऊ नये. हाच विचार ह्या श्लोकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे कौन्तेय! तू तुझ्या स्वाभाविक कर्मांनी बद्ध आहेस, मोहवशात (राग लोभ मत्सर) जी कर्मे तुला करू नये असे वाटते ती तू तुझ्या इच्छेविरुद्ध करशील.
---------------------------------------------------------------
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति। भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया।।18.61।।
हे अर्जुन! ईश्वरः मायया यन्त्र-आरूढानि सर्व-भूतानि भ्रामयन् सर्व-भूतानाम् हृत्-देशे तिष्ठति
हे अर्जुन!
ईश्वरः ईश्वर पु. प्र. ए. व.
मायया मायेच्या प्रभावाखाली माया स्त्री तृ. ए. व.
यन्त्र-आरूढानि यंत्रावर आ+रूह् धातू क्त प्रत्यय पु. द्वि. ब. व.
येन त्रायते तत यंत्रम्
सर्व-भूतानि सर्व जीव सर्वभूत नपु. द्वि. ब. व.
भ्रामयन् भ्रमण करविणारा भ्रम् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
सर्व-भूतानाम् सर्व जीवांच्या सर्व भूत पु. ष. ब. व.
हृत्-देशे. हृदयात हृददेश पु. स. ए. व.
तिष्ठति वास करतो स्था धातू कर्तरी लट लकार प्र. पु. ए. व.
देव कुठे असतो, दाखवा बरे असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी हा श्लोक.
ह्या श्लोकात यन्त्र हा शब्द वाचायला मिळतो. त्रै धातू म्हणजे रक्षण करणे, पालन करणे, पासून तयार झालेला हा शब्द.
त्या काळात वापरली जाणारी यन्त्र म्हणजे अर्थातच कुंभाराचे चाक, रथ, शस्त्रे, वगैरे.
येथे शरीराला यन्त्र असे संबोधले आहे. सर्व कारागीर, कलाकार आणि खेळाडूंसाठी हे यन्त्र खूप मौल्यवान असते. यन्त्र पूजा करणे ही आपली संस्कृती आहे.
7 व्या अध्यायात आपण माया म्हणजे काय, ह्याबद्दल वाचले. मा म्हणजे नको.
या धातू म्हणजे जाणे.
7 व्या अध्यायातील 14 व्या श्लोकात माया म्हणजे दैवी गुण असे म्हटले आहे. माया आपल्या मनाची कसोटी घेत असते. माया च्या माध्यमातून परमेश्वर आपली कसोटी पहात असतो.
परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात वसलेला आहे असे स्पष्ट म्हटले आहे म्हणजे दुसर्या जीवाचा अपमान, तिरस्कार करणे अप्रत्यक्षपणे परमेश्वराचाच अपमान असे म्हणायला हरकत नाही.
ह्या श्लोकातील भ्रामयन शब्द सुद्धा महत्वाचा, आपले शरीर जर यंत्र असेल त्याला चालवणारे इंजिन परमेश्वर आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे अर्जुन! समस्त जीवांवर स्वार होऊन, आपल्या मायेने जीवनप्रवास घडवून आणणारे सर्व सजीवांच्या हृदयातच वास करत असतात.
------------------------------------------------------------
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।।18.62।।
हे भारत ! सर्व-भावेन तम् एव शरणम् गच्छ। तत्-प्रसादात् पराम् शान्तिम् शाश्वतम् स्थानम् प्राप्स्यसि
हे भारत !
सर्व-भावेन सर्व प्रकारे
सर्व भाव पु. तृ. ए. व.
तम् त्याला तद् पु. द्वि. ए. व.
एव सुद्धा अव्यय
शरणम् शरण नपु. द्वि. ए. व.
गच्छ जा गम धातू जाणे कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
तत् प्रसादात् त्याच्या कृपेने तत प्रसाद पु. पं. ए. व.
पराम् श्रेष्ठ परा स्त्री. द्वि. ए. व.
शान्तिम् शान्ति स्त्री. द्वि. ए. व.
शाश्वतम् शाश्वत नपु. द्वि. ए. व.
स्थानम् स्थान नपु. द्वि. ए. व.
प्राप्स्यसि प्राप्त होईल प्र+आप धातू लृट लकार कर्तरी म. पु. ए. व.
परमेश्वराला शरण जावे असे आतापर्यंतच्या अनेक श्लोकात आपण वाचले आहे. शृ शीर्यते, नश्यते दुःखं अत्र इति शरणं अशी त्याची व्याख्या आहे. ह्याचा अर्थ जिथे दुःखाचा नाश केला जातो ते शरण. शरण जाणे म्हणजे कर्तव्यांपासून लांब जाणे नव्हे तर संपूर्ण समस्यांची पूर्ण जबाबदारी घेणे. आत्मनिर्भरता. शरणागती म्हणजे परमेश्वरावर पूर्ण विश्वास.
5व्या अध्यायातील 29 व्या श्लोकात परमेश्वर सर्व जगाचा चालक आहे असे सांगताना धुरा वाहणारा (बैल) असे म्हटले होते.
शहाणा बैल जोडलेल्या गाडी चा गाडीवान बैलावर विश्वास ठेवून निवांत झोपून जातो तसेच हा परमात्मा विश्वाचा बैल आहे. त्याला सर्वांबद्दल सहानुभूती आहे आणि तो आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणार आहे.
शरण जाणे, ह्याच्या सहा विविध छटा सांगितल्या आहेत.
1. परमेश्वराची इच्छा तीच आपली इच्छा. हे सांगताना वाळलेल्या पानाची उपमा दिली आहे. जसे वाळलेले पान, हवेच्या झोतानुसार हेलकावे घेत असते. पानाला स्वतःची अशी इच्छा नसते.
2. परमेश्वराच्या योजने विरूद्ध, इच्छा न ठेवणे. काही कारणाने आपल्याला दुःख झाले, अपयश आले, नुकसान झाले तर त्यावर फार विचार न करता पुढे जात राहणे.
3. परमेश्वर आपले रक्षण करतो ह्यावर दृढ विश्वास ठेवून आपण आपले कार्य करीत राहणे. मुंगी चे पोट ते केवढे, पण ती सतत कार्यमग्न असते. हत्तीचे पोट कितीतरी मोठे, त्याच्या पोटाची व्यवस्था पण परमेश्वराने केलेली आहे.
4. परमेश्वराप्रती कृतज्ञता भाव ठेवणे. आपल्या जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी परमेश्वराने निर्माण करून ठेवल्या आहेत. जसे श्वास घेण्यास हवा, पाणी, अन्न. त्यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे.
5. इदम् न मम. जे काही माझे म्हणून आहे ते सर्व मूलतः परमेश्वराचेच आहे असे मानणे
6. विनम्रता म्हणजे अहंकाराची समाप्ती. आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे भारत! तू सर्वार्थाने त्याला शरण जा, त्याच्या कृपेने तुला परम शांती आणि शाश्वत स्थान प्राप्त होईल.
---------------------------------------------------------
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु।।18.63।।
इति गुह्यात् गुह्यतरं ज्ञानम् मया ते आख्यातम्, एतत् अशेषेण विमृश्य, यथा इच्छसि तथा कुरु
इति असे अव्यय
गुह्यात् गोपनीय पेक्षा गुह्य नपु. पं ए. व.
गुह् धातू लपवणे
गुह्यतरं अधिक गोपनीय गुह्यतर नपु. द्वि. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु द्वि. ए. व.
मया माझ्याकडून अस्मद् तृ. ए. व.
ते तुला युष्मद् च. ए. व.
आख्यातम्, वर्णन करून सांगितले आहे
आ+ख्या धातू प्रख्यात करणे क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
एतत् त्याचा एतद् नपु. द्वि. ए. व.
अशेषेण पूर्णपणे न शेष अशेष पु. तृ. ए. व.
विमृश्य, विचार करून वि+मृश् धातू ल्यप प्रत्यय
यथा जसे अव्यय
इच्छसि इच्छा होईल इष् धातू कर्तरि लट लकार म.पु.ए.व.
तथा तसे अव्यय
कुरु कर कृ धातू कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकातील इति शब्द आधीच्या श्लोकाचा संदर्भ (शरणागती) दर्शवतो.
58 व्या श्लोकात तुझ्या अहंकारापोटी तू नष्ट होशील असे सांगणारे श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात व्यक्तीस्वातंत्र्य मांडताना दिसतात. ते असे म्हणतात की तुझी जशी इच्छा होईल तसे तू कर.
(तू तुझा निर्णय घे. मी सांगतो म्हणून नाही ) समुपदेशनाचा हा उत्कृष्ट पाठ आहे. आधी सर्व बाजू उलगडून दाखवायच्या आणि नंतर निर्णय त्या व्यक्तीवर सोडून द्यायचा.
रामचरितमानस मध्ये सुद्धा असेच म्हटल्याचे दिसते.
नहि अनीति नहि कछु प्रभुताई। सुनहु करहु जो तुम्हहि सोहाई।।
मी जो उपदेश दिला आहे तो दोषपूर्ण नाही, बंधनकारक सुद्धा नाही. तू नीट ऐकून, चिंतन करून, तुझ्या इच्छेप्रमाणे कृती कर.
9व्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकात आपण गुह्य ज्ञान म्हणजे काय ते विस्ताराने वाचले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
अशा प्रकारे समस्त गोपनीय ज्ञानापेक्षा अधिक गोपनीय ज्ञान माझ्याकडून तुला विस्तृतपणे सांगितले गेले आहे, त्याचा तू पूर्ण विचार करून तुला जसे वाटते तसे तू कर.
---------------------------------------------------------------
सर्वगुह्यतमं भूयः श्रृणु मे परमं वचः। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्।।18.64।।
सर्व-गुह्यतमम् परमम् वचः मे भूयः शृणु । मे दृढम् इष्टः असि, इति ततः ते हितम् वक्ष्यामि।
सर्व-गुह्यतमम् सर्वात गोपनीय
सर्व गुह्य तम नपु. द्वि. ए. व.
परमम् श्रेष्ठ परम नपु. द्वि. ए. व.
वचः वचन वचस् नपु. द्वि. ए. व.
मे माझे
अस्मद् ष. ए. व.
भूयः पुन्हा भूयस् नपु. द्वि. ए. व.
शृणु ऐक श्रु धातू
मे माझा अस्मद् ष. ए. व.
दृढम् अतिशय दृढ नपु. द्वि. ए. व.
धा धातू क्त प्रत्यय
इष्टः प्रिय इष् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
असि आहेस अस् धातू कर्तरि लट लकार म.पु.ए.व
इति म्हणून अव्यय
ततः म्हणून अव्यय
ते तुझ्या युष्मद् च. ए. व.
हितम् हिताचे हि धातू वृद्धि होणे
वक्ष्यामि सांगतो वच् धातू कर्तरि लृट लकार उ. पु. ए. व.
गुह्य ज्ञानाची चर्चा करत असताना 15 व्या अध्यायातील 20 व्या श्लोकाचा उल्लेख करायलाच हवा.
गुह्यतम ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर माणसे बुद्धिमान आणि कृतकृत्य होतात असे ह्या श्लोकात म्हटले आहे. आधीच्या श्लोकात अर्जुनाला स्वेच्छेने निर्णय घेण्यास सांगितले आहे.
श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचे विविध प्रकारचे नाते आहे. अर्थात अर्जुन, अतिशय लाडका आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
पुन्हा एकदा मी तुला सर्व गोपनीय मधील श्रेष्ठ असे वचन सांगतो, तू मला अतिशय प्रिय आहेस आणि तुझ्या हिताचीच गोष्ट मी तुला सांगेन.
--------------------------------------------------------
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु। मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे।।18.65।।
मत्-मनाः, मत्-भक्तः, मत्-याजी भव, माम् नमस्कुरु, माम् एव एष्यसि। सत्यम् ते प्रतिजाने, मे प्रियः असि
मत्-मनाः, माझ्या मनाशी एकरूप होऊन
मत मन पु. प्र. ब. व.
मत्-भक्तः, माझा भक्त अस्मद् भक्त पु. प्र. ए. व.
मत्-याजी माझा पूजक अस्मद् याजिन् पु. प्र. ए. व.
भव, हो भू धातू कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.
माम् मला
नमस्कुरु, नमस्कार कर
कुरु कृ धातू कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.
माम् माझ्या कडे
एव नक्की अव्यय
एष्यसि येशील
इ धातू जाणे कर्तरि लृट लकार म. पु. ए. व.
(ऐष्यसि आ+इ धातू येणे)
सत्यम् खरेच सत्य नपु. द्वि. ए. व.
ते तुला युष्मद् च. ए. व.
प्रतिजाने, प्रतिज्ञा करतो प्रति+ज्ञा धातू कर्तरि आत्मनेपदी (वैकल्पिक) लट लकार उ. पु. ए. व.
मे मला अस्मद् ष. ए. व.
प्रियः प्रिय पु. प्र. ए. व.
असि आहेस अस् धातू कर्तरि लट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकातील पहिली ओळ 9.34 व्या श्लोकातील पहिल्या ओळीप्रमाणेच आहे. 9.34 व्या श्लोकात माझी भक्ती केल्याने तू मला प्राप्त होशील असे श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. भागवतपुराणातील 9 वा स्कंद 4थ्या अध्यायातील 18-20 श्लोकात अंबरीष महाराजांनी केलेल्या कृष्णभक्तीचे विस्तृत वर्णन आहे.
आता 18.65 आणि 9.34 मध्ये फरक कसा सांगायचा? 18.61 व्या श्लोकात परमेश्वर सर्वांच्या हृदयांत वास करतात असे म्हटले आहे. मग श्रीभगवानकृष्णांची भक्ती करायची म्हणजे नक्की काय?
देव माझा मी देवाचा।
देव पाहावयासी गेलो। माझा मीच देव झालो।। तुका म्हणे धन्य झालो। आज विठ्ठला भेटलो।
देव वसे चित्ती। त्याची धरावी संगती। संत तुकडोजी महाराज।।
4थ्या अध्यायातील 8 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्वतःच्या कर्तव्याबद्दल भाष्य केले आहे. 'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे'। अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांचे हे कर्तव्य पार पाडायचे आहे असा अर्थ घेता येईल कारण आता श्रीमद्भगवद्गीतेचे फक्त 13 श्लोक उरले आहेत आणि युद्धाची सुरवात होणार आहे. नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही नववी सर्वात शेवटची पायरी, 'श्रीकृष्णम् शरणम मम' हे केवळ बाह्य वर्तन न राहता, पूर्णपणे भगवंताशी एकरूप होणे. भगवंतांच्या कार्यात आपण पूर्णपणे रममाण व्हायचे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती.
अर्जुनाची भगवंतांचे कार्य पूर्ण करण्यास कार्यक्षमता आहे हे श्रीभगवानकृष्णांना माहित आहेच, म्हणून ते सुद्धा प्रतिज्ञापूर्वक (सत्य वचन) तू मला प्रिय आहेस असे अर्जुनाला सांगत आहेत.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
मी तुला सत्यवचन सांगतो की तू मला प्रिय आहेस, तू माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझा पूजक हो, मला नमस्कार कर.
--------------------------------------------------------------
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।
सर्व-धर्मान् परित्यज्य एकम् माम् शरणम् व्रज, अहम् त्वा सर्व-पापेभ्यः मोक्षयिष्यामि, मा शुचः
सर्व-धर्मान् सर्व धर्म पु. द्वि. ब. व.
परित्यज्य त्याग करून परि+त्यज् ल्यप प्रत्यय
एकम् केवळ एक नपु. द्वि. ए. व.
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
शरणम् शरण नपु. द्वि. ए. व.
व्रज जा व्रज् धातू जाणे कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
त्वा तुला युष्मद् प्र. द्वि . व.
सर्व-पापेभ्यः सर्व पापांपासून सर्व पाप नपु. पं ब. व.
मोक्षयिष्यामि, मुक्त करेन मुच् धातू मुक्त करणे णिच् कर्तरि लृट लकार उ. पु. ए. व.
मा अव्यय नको
शुचः चिंता शुच् धातू कर्तरि लुडः लकार य. पु. ए. व.
(मा अव्यय लावल्याने लोट लकार होतो अर्थाप्रमाणे)
उदा 2.3, 2.47
ह्या श्लोकात सर्वधर्मान्परित्यज्य म्हणजे सर्व धर्मांचा त्याग कर असे म्हटले आहे. धृ धातू धारण करणे पासून तयार झालेला हा शब्द, त्याचा अर्थ आपण समजावून घेतला आहे. आता आधीच्या श्लोकांत धर्म ह्या बद्दल काय काय म्हटले आहे त्याचा परामर्श घेऊ.
4थ्या अध्यायातील 7 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धि होते तेव्हा मी अवतार घेतो.
ह्याच अध्यायातील 47 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की दुसर्याचे चांगले कर्म करण्यापेक्षा स्वतःचे सदोष कर्म श्रेष्ठ आहे. आपले स्वाभाविक कर्म केल्याने पाप लागत नाही.
मग धर्माचा त्याग करणे म्हणजे नक्की काय?
सर्वधर्म ह्या शब्दाचा अर्थ धर्म आणि अधर्म असा घ्यायला हरकत नाही. धर्म आणि अधर्म दोन्ही चा त्याग करावा कारण आता नैष्कर्म्य सांगायचे आहे.. ह्या श्लोकात मा शुचः असे म्हटले आहे. म्हणजे चिंता करू नकोस.
योगक्षेमं वहाम्यहम्।।9.22।।
योग म्हणजे अध्यात्मिक शक्ति. क्षेम म्हणजे परमानंदाची प्राप्ती.
जे लोक फक्त माझेच चिंतन करतात, फक्त माझीच भक्ती करतात अशा लोकांना मी परमात्म्याला जोडून घेण्यासाठी मदत करतो आणि त्यांचा सांभाळही करतो. असे 9व्या अध्यायात म्हटले आहेच. हा श्लोक समजून घेण्यासाठी ह्याच अध्यायातील 10-11 व्या श्लोकांचा अर्थ सुद्धा जोडून घेता येईल.
16 व्या अध्यायातील 5 व्या श्लोकात अर्जुनाला, युद्ध करणे हा दैवी गुण कसा? असा प्रश्न पडला होता त्यावेळी सुद्धा मा शुचः असे श्रीभगवानकृष्णांनी म्हटले होते.
आपण गीतेमध्ये कर्मयोग ज्ञानयोग भक्तीयोग जाणून घेतले. कोणताही मार्ग अवलंबला तरी परमेश्वराला शरण जाणे आवश्यक आहेच. 'एकम् माम् ' असाच अर्थ सूचित करतो.
शरणागती ह्या शब्दाचा अर्थ आपण 62 व्या श्लोकात समजून घेतला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये, मी तुला समस्त पापांतून मुक्त करेन तू चिंता करू नकोस.
----------------------------------------------------
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन। न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति।।18.67।।
कदाचन न अतपस्काय, न अभक्ताय, न च अशुश्रूषवे, न च (तस्मै) यः माम् अभ्यसूयति ते इदम् वाच्यम्
कदाचन कधीही अव्यय
न अव्यय
अतपस्काय, तप करत नाहीत
अतपस्क पु. च. ए. व.
न अव्यय
अभक्ताय, भक्त नाहीत
न भज् क्त प्रत्यय पु. च. ए. व.
न अव्यय
च सुद्धा अव्यय
अशुश्रूषवे, सेवाभाव नाही
न शुश्रूषु पु. च. ए. व.
शु +श्रु धातू ऐकणे
श्रोतुम इच्छा शुश्रूषा
न अव्यय
च (तस्मै) अव्यय
यः जो यद् पु. प्र. ए. व.
माम् माझा अस्मद् द्वि. ए. व.
अभ्यसूयति द्वेष करतो अभि+असूय धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
ते तू तद् पु. प्र. ब. व.
इदम् हे इदम् नपु. द्वि. ब. व.
वाच्यम् सांगावे वच् धातू ण्यत् प्रत्यय नपु. प्र. ए. व.
'गाढवासमोर वाचली गीता... ' ह्या म्हणीचा अर्थ सांगणारा हा श्लोक.
आताच्या काळात मुलांच्या वयाप्रमाणे आणि आधीच्या शिक्षणाप्रमाणे पुढील वर्गात प्रवेश दिला जातो.
पूर्वीच्या काळी गुरूजन, शिष्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला ज्ञान देत असत. स्वतः श्रीभगवानकृष्ण 64 दिवसात 64 कला सांदीपनि ऋषींच्या आश्रमात शिकले.
श्रीमद्भगवद्गीते सारखा महान ग्रंथ कोणाच्या हाती असू नये ह्याचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे.
तपस् शब्दापासून तयार झालेला शब्द तप. भारतीय तत्त्वज्ञानात ह्यावर बरेच चिंतन केलेले दिसून येते. 17 व्या अध्यायातील 14,15,16 आणि 17 व्या श्लोकात शारीरिक मानसिक आणि वाचिक अशा सात्त्विक तपाबद्दल आपण वाचले आहे.
श्रीभगवानकृष्णांनी त्यांना प्रिय असणाऱ्या भक्तांचे गुण निरनिराळ्या श्लोकात सांगितले आहेत. 12 व्या अध्यायातील 13-16 श्लोकात भक्ताचे अनेक गुण सांगितले आहेत.
श्रु धातू पासून तयार झालेला शब्द शुश्रुषा, म्हणजे ऐकून घेण्याची इच्छा आणि सेवा.
आधीच्या श्लोकात आपण गोपनीय ज्ञाना बद्दल वाचले आहे. हे ज्ञान ऐकून घेण्याची इच्छा असणे हीच एक पात्रता सांगितली आहे.
दुसर्यांच्या चुका, उणिवा शोधणे म्हणजे असूया. दुसर्यांचे चांगले गुण स्वीकारले की ती प्रेरणा असते, स्वीकारले नाही की ती असूया होते. बरेचदा अज्ञानापोटी सामान्य माणूस ज्ञानी व्यक्तीचा अनादर करतात. हे अगदी महाभारतात सुद्धा वाचायला मिळते. जसे दुर्योधनाला कृष्णशिष्टाई उमगलीच नाही. संपूर्ण गीता जसे अर्जुन ऐकतो आहे तसेच ती संजय आणि धृतराष्ट्र सुद्धा ऐकत आहे. तरीही धृतराष्ट्राला युद्ध थांबवावे असे वाटले नाही. अर्जुन श्रीभगवानकृष्णांना अनेक वर्षे जवळून ओळखत असूनही त्याला श्रीभगवानकृष्णांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.
अश्रद्दधाने विमुखेऽप्यशृण्वति यश् चोपदेशः शिवनामापराधः।
(पद्म पुराण)
" श्रद्धाविहीन श्रोता आणि परमेश्वराचा द्वेष करणार्यांना हा अलौकिक उपदेश देऊन त्यांना आपण दोषी का ठरवायचे?
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे ज्ञान अशा लोकांना कधीच सांगितले नाही पाहिजे, जो तप करत नाही, जो अभक्त आहे, ज्याच्या कडे सेवाभाव नाही आणि जो माझ्या मध्ये दोष पाहतो.
--------------------------------------------------------------
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति।
भक्ितं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः।।18.68।।
यः मयि पराम् भक्तिम् कृत्वा, इमम् परमम् गुह्यम् मत्-भक्तेषु अभिधास्यति, असंशयः माम् एव एष्यति
यः जो यद् पु. प्र. ए. व.
मयि माझ्यात अस्मद् स. ए. व.
पराम् दिव्य परा स्त्री. द्वि. ए. व.
भक्तिम् भक्ति स्त्री. द्वि. ए. व.
कृत्वा, करून कृ धातू क्त्वा प्रत्यय
इमम् हे इदम् पु. द्वि. ए. व.
परमम् श्रेष्ठ परम नपु. द्वि. ए. व.
गुह्यम् गोपनीय गुह्य नपु. द्वि. ए. व.
मत्-भक्तेषु माझ्या भक्तां मध्ये
अस्मद् भक्त पु. स. ब. व.
अभिधास्यति, सांगेल अभि+धा धातू कर्तरि लृट लकार प्र. पु. ए. व.
असंशयः निःसंशय न संशयः पु. प्र. ए. व.
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
एव सुद्धा अव्यय
एष्यति येतो इ धातू कर्तरि लृट लकार प्र. पु. ए. व.
हा श्लोक वाचून मला किती आनंद झाला आहे त्याचे वर्णन नाही करत. मला अशी भाषांतर लिहिण्याची बुद्धी झाली म्हणून मी परमेश्वराचे शतशः आभार मानते.
दान दिए धन न घटे, नदी घटे न नीर अपने हाथों देख लो यों क्या कहे कबीर ?
ज्ञान दिल्याने वाढते पण ते योग्य व्यक्तीलाच द्यावे असा विचार आधीच्या श्लोकात आपण वाचला. ज्ञान अमूल्य आहे, श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या ज्ञानाची किंमत करता येत नाही पण हे ज्ञान देणे सर्वाधिक पुण्य कर्म आहे असे ह्या श्लोकात म्हटले आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जो माझी श्रेष्ठ भक्ती करून, हे श्रेष्ठ गोपनीय ज्ञान माझ्या भक्तां पर्यंत पोहोचवेल तो निःसंशय मला प्राप्त होईल.
-----------------------------------------------------------
न च तस्मान्मनुष्येषु कश्िचन्मे प्रियकृत्तमः।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि।।18.69।।
तस्मात् मनुष्येषु न च कश्चित् मे प्रिय-कृत्तमः। तस्मात् भुवि मे प्रियतरः न च अन्यः भविता ।
तस्मात् त्याच्या पेक्षा तद् पु. पं. ए. व.
मनुष्येषु माणसांत मनुष्य पु. स. ब. व.
न अव्यय
च सुद्धा अव्यय
कश्चित् कोणीतरी कःचित् पु. प्र. ए. व.
मे मला अस्मद् ष. ए. व.
प्रिय-कृत्तमः प्रिय कार्य करणारा प्रिय-कृत्तम पु. प्र. ए. व.
तस्मात् त्याच्यापेक्षा तद् नपु. पं. ए. व.
भुवि भूतलावर भू स्त्री. स. ए. व.
मे मला अस्मद् ष. ए. व.
प्रियतरः अधिक प्रिय प्रिय तर पु. प्र. ए. व.
न अव्यय
च सुद्धा अव्यय
अन्यः अन्य पु. प्र. ए. व.
भविता होईल भू धातू कर्तरि लुट लकार प्र. पु. ए. व.
(आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
(भगवद्गीतेचे ज्ञान इतरांना सांगणारा) माझे प्रिय असे कार्य करणारा ह्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही, त्याच्यापेक्षा प्रिय असा, ह्या भूमंडलावर दुसरा कोणी नसेल.
--------------------------------------------
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः। ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः।।18.70।।
यः आवयोः इमम् धर्म्यम् संवादम् अध्येष्यते, तेन च अहम् ज्ञान-यज्ञेन इष्टः स्याम् इति मे मतिः
यः जो यद् पु. प्र. ए. व.
आवयोः आपल्या अस्मद् ष. द्वि. व.
इमम् हे इदम् पु. द्वि. ए. व.
धर्म्यम् पवित्र धर्म्य पु. द्वि. ए. व.
संवादम् संवाद पु. द्वि. ए. व.
अध्येष्यते, अधि+इ धातू पठन करणे कर्तरि आत्मनेपद लृट लकार प्र. पु. ए. व.
तेन त्याच्या कडून तद् पु. तृ. ए. व.
च सुद्धा अव्यय
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
ज्ञान-यज्ञेन ज्ञान यज्ञाने ज्ञान-यज्ञ पु. तृ. ए. व.
इष्टः पूजनीय इष् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
स्याम् असेल अस् धातू कर्तरि विधीलिःड लकार उ. पु. ए. व.
इति असे अव्यय
मतिः मत मति स्त्री प्र. ए. व.
7व्या अध्यायातील 15, 16 व्या श्लोकात अहंकारविरहीत ज्ञानी भक्तांचे वर्णन केले आहे.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते। एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्।।9.15।।
9व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात देव मानण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचे वर्णन केले आहे, जसे एकेश्वरवाद, बहुईश्वरवाद आणि सर्व विश्वच परमेश्वराचे आहे असे मानणारे.
यज्ञाचे अनेक प्रकार श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले. जसे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याययज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणायामयज्ञ इत्यादी. ज्ञान यज्ञ सर्व श्रेष्ठ आहे असे 4 थ्या अध्यायातील 33 व्या श्लोकात म्हटले आहे.
12 व्या अध्यायातील 8 व्या श्लोकात एक महत्वाचा संदेश दिला आहे जसे श्रीकृष्णाचे स्मरण करताना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देऊ नये. असे मन आणि बुद्धी दोन्ही पातळ्यांवर मला समर्पण केल्यास निःसंदेह तुला माझी प्राप्ति होईल.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जो पुरुष आपल्या दोघांच्या शास्त्रीय संवादाचे पठन करेल त्याच्या साठी तो पूजनीय ज्ञानयज्ञ असेल असे माझे मत आहे.
----------------------------------------------------
श्रद्धावाननसूयश्च श्रृणुयादपि यो नरः।सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम्।।18.71।।
यः नरः श्रद्धावान् अनसूयः अपि च शृणुयात् सः अपि मुक्तः पुण्य-कर्मणाम् शुभान् लोकान् प्राप्नुयात्
यः जो यद् पु. प्र. ए. व.
नरः मनुष्य नर पु. प्र. ए. व.
श्रद्धावान् श्रद्धावत् पु. प्र. ए. व.
अनसूयः असूया न करणारा न असूय ल्यप प्रत्यय पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
च सुद्धा अव्यय
शृणुयात् श्रवण करेल श्रु धातू कर्तरि विधीलिडः प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
मुक्तः मुक्त मुक्त मुच् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
पुण्य-कर्मणाम् पुण्यवान लोकांचे
पुण्य कर्मन् नपु. ष. ब. व.
शुभान् शुभ शुभ पु. द्वि. ब. व.
लोकान् जग लोक पु. द्वि. ब. व.
प्राप्नुयात् प्राप्त करेल
प्र +आप् धातू कर्तरि विधीलिडः प्र. पु. ए. व.
श्रीमद्भगवद्गीतेत एकूण 700 श्लोक आहेत. ते सर्व पाठ करणे, त्याचा अर्थ समजून घेणे, सर्वांनाच शक्य होईल असे नाही. एखाद्या पक्षाला विचारले, आकाश किती मोठे आहे? तर तो काय सांगणार? साधारण अशीच मनःस्थिती गीता वाचताना, सामान्य माणसाची असू शकते. आधीच्या श्लोकात ज्ञानयज्ञ असा उल्लेख आल्यानंतर सहाजिकच मनात प्रश्न येतो की ज्या लोकांची इतके गहन ज्ञान समजून घेण्याची पात्रता नाही, त्यांनी श्रीमद्भगवद्गीता वाचावी की नाही? त्याचे उत्तर ह्या श्लोकात मिळते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जो व्यक्ति (माझा) द्वेष रहीत, आणि पूर्ण श्रद्धेने श्रवणभक्ती करेल त्याची सुद्धा पापमुक्ती होऊन त्याला शुभ-लोकाची प्राप्ती होईल.
----------------------------------------------------------
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा।
कच्चिदज्ञानसंमोहः प्रनष्टस्ते धनञ्जय।।18.72।।
हे पार्थ ! कच्चित् एतत् त्वया एकाग्रेण चेतसा श्रुतम् ? हे धनञ्जय ! कच्चित् ते अज्ञान-सम्मोहः प्रनष्टः ?
हे पार्थ !
कच्चित् कत्+चित् अव्यय काहीतरी
कत् हे विशेषण असून तरतम भाव दर्शवते
एतत् हे एतद् नपु. द्वि. ए. व.
त्वया तुझ्याकडून युष्मद् तृ. ए. व.
एकाग्रेण एकाग्र पु. तृ ए. व.
चेतसा चित्त चेतस् नपु. तृ. ए. व.
श्रुतम् समजले (का) श्रु धातू ऐकणे, समजून घेणे क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
हे धनञ्जय !
कच्चित् कत्+चित् अव्यय
ते तुझे युष्मद् ष. ए. व.
अज्ञान-सम्मोहः अज्ञानामुळे निर्माण झालेला भ्रम
अ ज्ञान सम्मोह पु. प्र. ए. व.
सम+मुह् धातू मोहित करणे
प्रनष्टः नष्ट झाला (का) प्र+नश् धातू नाश होणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
हा श्लोक वाचला की एक नाट्यमय प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला विचारत आहेत, काय मग, इतका वेळ तू गीता ऐकलीस, काही समजले का? भगवंतांची गीता फक्त अर्जुन ऐकत नव्हता तर त्याच्या बरोबर संजय आणि धृतराष्ट्र सुद्धा ऐकत होते. म्हणजेच हा प्रश्न त्या दोघांना सुद्धा लागू होतो. अज्ञानापोटी निर्माण झालेला मोह नष्ट झाला का? असा दुसर्या ओळीतील प्रश्न सुद्धा दोघांना लागू होतोच.
धृतराष्ट्राला पुत्रप्रेमाच्या मोहा पुढे काहीच दिसत नव्हते तर अर्जुनाला नातेवाईक आणि गुरूजनांच्या आदरयुक्त प्रेमापोटी शत्रूच दिसत नव्हते. आपल्याच माणसांशी युद्ध कसे करायचे? असे अर्जुनाला वाटत होते.
2.63 मध्ये मोह आणि विनाश ह्याचा संबंध सांगितला आहे. क्रोधापायी विवेकबुद्धी नष्ट होते.
ह्या श्लोकात अज्ञान हे सम्मोहाचे कारण आहे असे म्हटले आहे.
अज्ञानामुळे तर्कशुद्ध विचार करता येत नाही.
7.27 मध्ये सम्मोहाचे आणखीन एक कारण सांगितले आहे ते म्हणजे इच्छा आणि द्वेष यामध्ये निर्माण झालेले द्वंद्व.
अर्जुनाला दोन्ही पक्षात आपलेच लोक दिसत होते. शत्रू कोणीच दिसत नव्हते. हाच तो सम्मोह. त्यामुळे ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला विचारलेला प्रश्न, काहितरी समजले का? हा सहज प्रश्न नाही तर सम्मोहाचे विश्लेषण आणि कदाचित धृतराष्ट्राला अप्रत्यक्षरीत्या मारलेला टोमणा आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे पार्थ! तुझ्या कडून हे एकाग्र चित्ताने ऐकून समजावून घेतले गेले का? हे धनञ्जय! अज्ञानामुळे निर्माण झालेला मोह नष्ट झाला का?
---------------------------------------------------------------
अर्जुन उवाच
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।18.73।।
अर्जुन उवाच - हे अच्युत ! त्वत् प्रसादात् मोहः नष्टः, मया स्मृतिः लब्धा, गत-सन्देहः स्थितः अस्मि, तव वचनम् करिष्ये।
अर्जुन उवाच - अर्जुन म्हणाला
हे अच्युत ! स्थिर, दृढ
अ च्यु धातू जाणे
त्वत्-प्रसादात् तुमच्या कृपेने त्वत्-प्रसाद पु. पं ए. व.
मोहः मोह पु. प्र. ए. व.
नष्टः, नश् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
मया माझ्या कडून
अस्मद् ष. ए. व.
स्मृतिः स्मृति स्त्री. प्र. ए. व.
लब्धा, प्राप्त झालेली लभ् धातू कर्मणि लुट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
गत-सन्देहः संदेह निघून गेले गत-सन्देह पु. प्र. ए. व.
स्थितः स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
अस्मि, आहे अस् धातू कर्तरि लट लकार उ. पु. ए. व.
तव तुमची युष्मद् ष. ए. व.
वचनम् आज्ञा वचन नपु. द्वि. ए. व.
करिष्ये करीन कृ धातू कर्तरि लृट लकार उ. पु. ए. व.
आता अर्जुन आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत आहे. त्याने अतिशय समर्पक असे विशेषण श्रीभगवानकृष्णांसाठी वापरले आहे. अच्युत म्हणजे शाश्वत.
ह्या श्लोकातील स्मृती शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा.
अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः।योगसूत्र 1.11
ज्या वस्तूंचा किंवा विषयांचा अनुभव (आधी) घेतला आहे, त्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंना विषय न करणारी वृत्ति म्हणजे स्मृति होय,” असे स्मृति वृत्तीचे लक्षण केले आहे.
संस्कारमात्रजन्यं ज्ञानं स्मृतिः। तर्कसंग्रह।
जे ज्ञान संस्काराने उत्पन्न होते त्याला स्मृति म्हणतात.
'गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती' - स्टाऊट.
ह्या श्लोकात अज्ञानामुळे निर्माण झालेला मोह नष्ट झाल्याने, ज्ञानावरचे मळभ दूर झाले आहे. सर्व काही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. 11 व्या अध्यायातील पहिल्या श्लोकाप्रमाणे श्रीभगवानकृष्णांनी गोपनीय अध्यात्मतत्व अर्जुनाला सांगितल्या मुळे त्याचा मोह नष्ट झाला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
अर्जुन म्हणाला, हे अच्युत! आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे, आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे. आता माझ्या मनात कसलाच संदेह नाही आणि मी आपल्या आज्ञेचे पालन करेन.
---------------------------------------------------------------
सञ्जय उवाच
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम्।।18.74।।
सञ्जय उवाच - इति अहम् वासुदेवस्य महात्मनः पार्थस्य च इमम् अद्भुतम् रोम-हर्षणम् संवादम् अश्रौषम्।
सञ्जय उवाच -संजय म्हणाला
इति अव्यय याप्रमाणे
अहम् मी अस्मद् प्र. ए. व
वासुदेवस्य वासुदेवांचा वासुदेव पु. ष. ए. व.
महात्मनः महान आत्म्याचा महत् आत्मनः पु. ष. ए. व.
पार्थस्य अर्जुनाचा पार्थ पु. ष. ए. व.
च सुद्धा अव्यय
इमम् हा इदम् पु. द्वि. ए. व.
अद्भुतम् अद्भुत अद्भुत पु. द्वि. ए. व.
रोम-हर्षणम् रोमहर्षक रोम-हर्षण पु. द्वि. ए. व.
संवादम् संवाद पु. द्वि. ए. व.
अश्रौषम् ऐकले
श्रु धातू लुडः लकार उ. पु. ए. व.
संजय हे धृतराष्ट्रांचे सल्लागार आणि सारथी होते. त्यांना वेदव्यासांमुळे दिव्य दृष्टि प्राप्त झाली होती म्हणून ते श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद ऐकू शकत होते, प्रत्यक्ष युद्धभूमी पाहू शकत होते. आताचा हा श्लोक बरेच पैलू उलगडून दाखवतो, जसे त्यांना असलेली मतप्रदर्शन करण्याची मुभा. ते धृतराष्ट्रांचे स्तुतीपाठक नक्कीच नव्हते, अगदी खुलेपणाने त्यांनी धृतराष्ट्रासमोर श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाचे कौतुक केले आहे. चांगला सल्लागार कसा असावा ह्याचे हे अगदी आदर्श उदाहरण. शिवाय असे करताना संजयाला कोणतेही दडपण नव्हते असे सुद्धा म्हणता येईल. प्रत्यक्ष भगवंतांच्या तोंडून गीता ऐकायला मिळाले हे संजयाचे किती मोठे भाग्य. नकळतच संजय आता श्रीभगवानकृष्णांचे भक्त झाले आहेत आणि आता स्वतःचे मतप्रदर्शन करत आहेत.
स्तम्भ स्वेदऽथ रोमाञ्चः स्वर भेदोऽथ वेपथुः
वैवर्ण्यमश्रु प्रलय इत्यष्टौ सात्त्विकाः स्मृताः।
भक्ति रसामृत सिंधु।2.3.16। ।दक्षिण विभाग। सात्त्विक भाव। 16।।
गहन भक्तीमुळे भक्तां मध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या अवस्थांचे वर्णन ह्या श्लोकात सांगितले आहे जसे स्तंभित होणे, घाम फुटणे, रोमांचित होणे, आवाज कापणे, शरीर थरथरणे, चेहर्याचा रंग बदलणे, अश्रुपात, आणि मूर्छा अशा आठ अवस्था आहेत.
ह्या श्लोकात संजय असे म्हणतात की
अशा प्रकारे मी भगवान वासुदेव आणि महात्मा अर्जुनाचा अद्भूत, रोमहर्षक असा संवाद ऐकला.
-------------------------------------------------------
व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम्।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम्।।18.75।।
व्यास-प्रसादात् अहम् एतत् परम् गुह्यम् योगम् स्वयम् कथयतः योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् श्रुतवान्।
व्यास-प्रसादात् व्यास-प्रसाद पु. पं. ए. व.
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
एतत् हे एतद् नपु. द्वि. ए. व.
परम् श्रेष्ठ पर नपु. द्वि. ए. व.
गुह्यम् गुह्य नपु. द्वि. ए. व.
योगम् योग पु. द्वि. ए. व.
स्वयम् अव्यय
कथयतः कथ् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
योगेश्वरात् योगेश्वर पु. पं. ए. व.
कृष्णात् कृष्ण पु. पं. ए. व.
साक्षात् प्रत्यक्ष अव्यय
स अक्ष, अक्षणा सह,
श्रुतवान् श्रु धातू क्तवतु प्रत्यय पु. प्र. ए. व.
श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाला एकेक योग चे नाव दिले आहे जसे 18 व्या अध्यायाचे नाव आहे 'मोक्ष संन्यास योग'.येथे संन्यास ह्या शब्दाचा अर्थ चातुर्वर्णातील चौथा आश्रम नव्हे. तर मोक्ष ह्या ध्यासाचा सुद्धा संन्यास घ्यायचा. मुळात मोक्ष मिळवायचा असतो की मिळतो? मागून मिळतो का?घोर तपश्चर्या करून मोक्ष मागणे उचित ठरेल का? ह्याच अध्यायातील 2र्या श्लोकात आपण संन्यास आणि त्याग ह्यामधील फरक समजून घेतला आहे. थोडक्यात 'करिष्ये वचनं तव' फक्त आपले कर्तव्य करत राहणे म्हणजे मोक्षसंन्यास योग.
योग+ईश्वर ह्या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द योगेश्वर, श्रीभगवानकृष्णांचे विशेषण आहे,ज्याचा उल्लेख ह्या श्लोकात संजयाने केला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
(संजय म्हणाले) महर्षी व्यासांच्या कृपेने मी हे श्रेष्ठ गोपनीय योग (ज्ञान) प्रत्यक्ष श्री योगेश्वर कृष्णांकडून ऐकले.
--------------------------------------------------
राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम्।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः।।18.76।।
हे राजन् ! केशव-अर्जुनयोः इमम् अद्भुतम् पुण्यम् च संवादम् संस्मृत्य संस्मृत्य मुहुः मुहुः हृष्यामि।
हे राजन् !
केशव-अर्जुनयोः केशव आणि अर्जुन
केशव-अर्जुन पु. ष. द्वि. व.
इमम् हा इदम् पु. द्वि. ए. व.
अद्भुतम् अद्भुत पु. द्वि. ए. व.
पुण्यम् पवित्र पु. द्वि. ए. व.
च
संवादम् संवाद पु. द्वि. ए. व.
संस्मृत्य सम+स्मृ धातू ल्यप प्रत्यय
संस्मृत्य स्मरून सम+स्मृ धातू ल्यप प्रत्यय
मुहुः पुन्हा अव्यय
मुहुः पुन्हा अव्यय
हृष्यामि हर्षित होत आहे
हृष् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
व्यास महर्षींनी संजयाला दिव्य दृष्टि दिली होती कारण त्यांची तशी पात्रता होती. संजयाने संपूर्ण गीता प्रत्यक्ष श्रीभगवानकृष्णांच्या तोंडून ऐकल्यानंतर सहाजिकच त्यांना परम गोपनीय ज्ञान प्राप्ती झाल्याचा परमानंद झाला आहे. तो व्यक्त करताना तो अजिबात कचरत नाहीये. धृतराष्ट्रांच्या राज्यात असे खुलेपणाने मत व्यक्त करण्याची मुभा होती असे सुद्धा म्हणता येईल.
ह्या श्लोकात संजय धृतराष्ट्रांना असे म्हणतात की
हे राजन! श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचे हे अद्भूत आणि पवित्र संवाद आठवून मी पुन्हा पुन्हा हर्षभरीत होत आहे.
--------------------------------------------------------
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः।
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः।।18.77।।
हे राजन् ! हरेः तत् अति-अद्भुतम् रूपम् च संस्मृत्य संस्मृत्य महान् मे विस्मयः, पुनः पुनः हृष्यामि च
हे राजन् !
हरेः श्रीभगवानकृष्णांचे भगवान हरि पु. ष. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
अति-अद्भुतम् अति-अद्भुत नपु. द्वि. ए. व.
रूपम् रूप नपु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
संस्मृत्य स्मरण करून सम+स्मृ धातू ल्यप प्रत्यय
संस्मृत्य स्मरण करून सम+स्मृ धातू ल्यप प्रत्यय
महान् महान महत् पु. प्र. ए. व.
मे मला अस्मद् ष. ए. व.
विस्मयः, आश्चर्य विस्मय पु. प्र. ए. व.
पुनः अव्यय
पुनः
हृष्यामि हर्षित होत आहे
हृष् धातू कर्तरि लट लकार उ. पु. ए. व.
च सुद्धा अव्यय
एखाद्या व्यक्तीची अचानक नव्याने चकीत करून टाकणारी ओळख झाली तर आपली मानसिक स्थिती कशी असेल, तीच परिस्थिती आता संजयाची आहे. संपूर्ण गीता ऐकून ते विलक्षण भारावून गेले आहेत.
‘देहभाव हारपला तुज पाहता विठ्ठला’। संत तुकाराम।
संजयाला काही क्षणापुरते तरी स्वतःचा विसर पडला असावा.
ते ह्या श्लोकात असे म्हणत आहेत की
हे राजन्! श्री हरीचे अती अद्भुत रूप आठवून आठवून, आवाक् होऊन मी पुन्हा पुन्हा हर्षित होत आहे.
-----------------------------------------------------
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।18.78।।
यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र धनुर्धरः पार्थः, तत्र श्रीः, विजयः, भूतिः, ध्रुवा नीतिः (च भवन्ति इति) मम मतिः ।
यत्र जेथे अव्यय
योगेश्वरः योग ईश्वर पु. प्र. ए. व.
कृष्णः कृष्ण पु. प्र. ए. व.
यत्र जेथे अव्यय
धनुर्धरः अर्जुन धनुष् धरः
धनुः धारयति इति
धन् धातू उत्पन्न करणे
धृ धातू धारण करणे
पार्थः, पार्थ पु. प्र. ए. व.
तत्र तेथे अव्यय
श्री, वैभव श्री स्त्री. प्र. ए. व.
विजयः, विजय पु. प्र. ए. व.
भूतिः सामर्थ्य भूति स्त्री. प्र. ए. व.
ध्रुवा निश्चित ध्रु धातू स्थैर्य असणे
नीतिः नीति स्त्री. प्र. ए. व.
नी नयति नीती
(च भवन्ति इति)
मम माझे अस्मद् ष. ए. व.
मतिः मत मति स्त्री. प्र. ए. व.
श्रीमद्भगवद्गीतेमधील शेवटचा श्लोक. संपूर्ण गीता ऐकल्यानंतर जी अनुभूती संजयांस मिळाली, त्यानंतर संजयाने दिलेली सर्वात पहिली प्रतिक्रिया. (आता युद्धाचा आरंभ होऊ घातला आहे. )
नीती म्हणजे आचरणाची पद्धत. ह्या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, जीवनशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या शास्त्रांशी नीतीचा घनिष्ट संबंध येतो. चाणक्य नीती विशेष प्रसिद्ध आहे.
“तस्मात् गीता नाम ब्रह्मविद्यामूले नीतिशास्रम्” ‘गीतार्थ-परामर्श', परमहंस श्रीकृष्णानंदस्वामी -म्हणून गीता म्हणजे ब्रह्मविद्येनें सिद्ध होणारें नीतिशास्र अर्थात् कर्तव्यधर्मशास्त्र होय,-असे म्हटले आहे.
येथे ध्रुव नीती हा शब्द वापरला आहे. धृव म्हणजे निश्चल. महाभारतातील युद्ध काळात कृष्ण नीती पुन्हा पुन्हा चर्चिली गेली. धृव नीती म्हणजे निश्चित यश मिळवून देणारी.
अर्जुनाचे आत्मघातकी निर्णय कृष्णनीती मुळे निभावून गेले.
ईश्वर: परम: कृष्ण: सच्चिदानंद विग्रह: ।
अनादिरादिर्गोविंद: सर्वकारणकारणम् ।।ब्रह्मसंहिता 5.1।।
श्री कृष्ण परम ईश्वर, सच्चिदानन्द आहेत. ते आदि पुरुष गोविन्द समस्त गोष्टींचे मूळ कारण आहेत.
"न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते" ।। श्वेताश्वतरोपनिषद् 6.8 ।। त्यांच्या तोडीचे कोणीही नाही, त्यांच्या पेक्षा मोठे कोणीही नाही.
ह्या श्लोकात संजय असे म्हणतात की
जेथे योगेश्वर श्रीभगवानकृष्ण आहेत, जेथे धनुर्धारी अर्जुन आहे तेथे वैभव, विजय, सामर्थ्य आणि धृव नीती आहे असे माझे मत आहे.
--------------------🙏🙏🙏🙏--------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा