क्षणाचा आनंद आणि.....
मी फक्त शास्त्रीय वस्तुस्थिति सांगणार आहे.
जेव्हा आपण फटाके उडवतो तेव्हा त्याच्या धूरा मध्ये प्रामुख्याने सल्फर, कार्बन शिवाय binders stabilizers oxidizers coloring agents जसे sulphide, barium, nitrate, aluminum, copper, lithium strontium असतात जे हवेत मिसळले जातात.
त्याच बरोबर फटका फुटताना त्याचा आवाज होतो जो 125 decibels पर्यंत जाऊ शकतो (आपण 85 decibels पर्यंत गोंगाट सहन करू शकतो)
असे हवेत मिसळल्या जाणार्या केमिकल्स ना सरसकट PM 2.5 (ज्याचा आकार 2.5 micron पेक्षा लहान) आणि PM 10 असे मोजतात.
PM 2.5 हे पेट्रोल डीजल लाकूड जळणे ह्यामुळे सुद्धा वाढते.
PM 10 हे कंस्ट्रक्शन, शेतातील भुस्सा, कचरा जाळणे कारखान्यात उडणारी धूळ ह्यामुळे वाढते.
Average PM10 and PM2.5 concentrations on Diwali day were 645 µg/m3 and 483 µg/m3 respectively हे दिल्लीतले 2020 मधल्या दिवाळी नंतरचे आकडे आहेत.
The WHO guideline stipulates that PM2. 5 not exceed 10 μg/m3 annual mean, or 25 μg/m3 24-hour mean; and that PM10 not exceed 20 μg/m3 annual mean, or 50 μg/m3 24-hour mean. For ozone (O3), the guidelines suggest values no higher than 100 μg/m3 for an 8-hour mean.
हे WHO नी सांगितलेले आकडे आहेत.
हवेत असे विष मिसळत जातेच त्याशिवाय ते जमिनीवर आणि पाण्यात सुद्धा पोहोचू शकतात..
खूप प्रमाणात PM 2.5 निर्माण झाला तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून.
आणि अर्थात विषारी वायू चे long term hazards आहेतच.
अति आवाजामुळे लोकांना anxiety (अस्वस्थता भीती)stress झोप न येणे असा त्रास होऊ शकतो . पाळीव प्राणी पक्षी घाबरून जाऊ शकतात..
क्षणाचा आनंद आणि...
दिवाळीत उडवले जाणारे कुठे तयार होतात हे नक्कीच माहीत असायला हवे.
आगपेटी च्या काड्या तयार करण्याची सुरवात साधारण 1920 च्या काळात कोलकाता मध्ये झाली. त्यावेळी चेन्नई मधील कोणी उद्योजक भावंडांनी हे तंत्र शिकून घेतले आणि चेन्नई मध्ये काडेपेटी तयार होऊ लागल्या.
पुढील 20 वर्षात फटाके तयार करण्याची पद्धत विकसित झाली. 1940 साली सर्वात प्रथम Indian Explosives Rules च्या अंतर्गत अधिकृत फटाके तयार करण्याचा कारखाना सुरू झाला. 2 वर्षात आणखी दोन कारखाने सुरू झाले. 2000 मध्ये ह्यांची संख्या होती 450 आणि आजघडीला 1000 पेक्षा जास्त अधिकृत कारखाने अस्तित्वात आहेत. मी अधिकृत असे म्हटले म्हणजेच अनाधिकृत सुद्धा बरेच आहेत.
शिवकाशी मध्ये हा धंदा चांगलाच फोफावला कारण कोरडी हवा आणि अतिशय कमी पाऊस त्यामुळे शेती करणे अजिबात शक्य नाही. चेन्नई पासून साधारण 550 किमी अंतरावर असणारे शिवकाशी आता फटाके तयार करण्याचे मोठे केंद्र बनले आहे.
दुर्दैवाने ह्यात अभिमान वाटावा असे काहीच नाही कारण फटाक्यांचा निरुपयोगी गुण आणि त्यापेक्षा ही भयंकर असे कम करणारे बाल कामगार आणि त्यांचे प्रश्न.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे सर्व प्रकारची रसायने ही मुले हाताळतात, त्यापासून त्यांचे डोळे हात श्वसन मार्ग पूर्ण शरीर ह्यावर काय परिणाम होत असेल विचारच करवत नाही.
एक्सिडेंट विशेषत आगी लागण्याचा धोका सर्वात जास्त.
जवळ जवळ 3 लाख कामगार अधिकृत आणि तितकेच अनधिकृत कारखान्यात काम करतात, ह्यांचे नेमके भवितव्य काय?
क्षणाचा आनंद आणि..
भाग 4
जवळ जवळ 6000 कोटी चा बिझनेस, 8 लाख कर्मचारी जे फटाके तयार करतात ते भारता ची 90 टक्के गरज भागवतात. फक्त 5 टक्के फटाके एक्सपोर्ट केले जातात.
8लाख कामगारां पैकी दीड लाख कामगार मुले आहेत.
फटाके तयार करण्याचे काम 300 दिवस चालते आणि ते सर्व फटाके अक्षरशः एका रात्रीत जाळले जातात.
बाल कामगार विषयक कायदा अस्तित्वात येऊन खूप वर्ष झाली, आपण 'येथे बाल कामगार काम करत नाहीत' अशी पाटी बरेच ठिकाणी वाचतो पण इथे मात्र तो कायदा अस्तित्वात नाही असे दिसते..
पर्यावरण विषयक केलेल्या कामाचा मात्र काही प्रमाणात फायदा होताना दिसतो आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार barium nitrate च्या वापरावर बंदी आली जे सर्वात महत्वाचे केमिकल 60 टक्के वापरले जाते. म्हणजे अक्षरशः व्यवसाय बंद पडायची वेळ आली. ह्या निर्णयाविरुद्ध 2018 - 2019 मधे जोरदार आंदोलन झाले. शेवटी CSIR आणि NEERI च्या मदतीने green formula मिळाल्या नंतर परत उत्पादन सुरू झाले.
Green फटाके म्हणजे ज्या मध्ये lithium, barium lead, arsenic वापरले जात नाही. ह्यामुळे आवाज आणि धुराचे प्रमाण जवळ जवळ 30 टक्के कमी होते.
तरी सुद्धा आधीच्या लेखात दिलेल्या PM 2.5 आणि PM 10 चे हवेतील प्रमाण चिंता जनक आहेच.
एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसेल आणि आपण ती गोष्ट अज्ञानातून करत असू तर त्याला दोषी म्हणता येत नाही. (हे मी आपल्या रोजच्या व्यवहाराबाबत म्हणते आहे, कायदा असे मानत नाही बरका) त्यासाठी लिहीण्याचा हा प्रयत्न. सर्वांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
इति अनघा
उपयुक्त माहिती.
उत्तर द्याहटवा