श्रीमद्भगवद्गीता11 वा अध्याय
11व्या अध्यायाचे नाव विश्वरूपदर्शनयोगः
असे असून त्यामध्ये 55 श्लोक आहेत.
आधीच्या अध्यायात आपण श्रीभगवानकृष्णांच्या निरनिराळ्या विभूतिं बददल वाचले. आता त्यांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे अशी अर्जुनाची इच्छा आहे..
अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम।।11.1।।
अर्जुन उवाच - मत् अनुग्रहाय त्वया यत् परमम् गुह्यम् अध्यात्म-संज्ञितम् वचः उक्तम्, तेन मम अयम् मोहः विगतः ।
अर्जुन उवाच -
मत् माझ्यावर
अनुग्रहाय अनुकंपा करून
ग्रह धातू स्वीकार करणे
त्वया आपल्या कडून युष्मद् तृ
एव
यत् जे यद् प्र एव
परमम् श्रेष्ठ
गुह्यम् गोपनीय गुह्य
अध्यात्म- आत्मनि इति अध्यात्मं
संज्ञितम्
अध्यात्मं इति संज्ञितं अध्यात्मिक ज्ञान
वचः वचस् शब्द वच् धातू बोलणे
उक्तम्, सांगितले
तेन ते तद्
मम माझे
अयम् हे इदम
मोहः मोह मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे
विगतः दूर झाले वि +गम् धातू जाणे.
पहिल्या अध्यायात आपल्याच नातेवाईकांशी युद्ध करायचे ह्या कल्पनेने विचलित झालेला अर्जुन आता बराच अलिप्त होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. मोह म्हणजे आसक्ती. बुद्धि भ्रष्ट होणे. त्याच्यावरचा उतारा म्हणजे अनासक्ती..
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणत आहे की
माझा भ्रम आता पूर्णपणे नष्ट झाला आहे कारण सर्वोत्तम असे गूढ शास्त्र, अध्यात्मिक ज्ञान मला सांगून माझ्यावर कृपा केली आहे.
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्।।11.2।।
हि कमल-पत्र-अक्ष! मया त्वत्तः भूतानाम् भव-अप्ययौ विस्तरशः श्रुतौ ; अव्ययम् माहात्म्यम् अपि च।
हि हे
कमल-पत्र-अक्ष! कमळा सारखे डोळे असलेला
कमलपत्रे इव अक्षिणी, कमलस्य पत्रम्
मया माझ्या कडून अस्मद् तृ एव
त्वत्तः तुमच्या कडून त्वत् तस् प्रत्यय
भूतानाम् जीवितांचे भूत नपु ष बव
भव-अप्ययौ असणे आणि नसणे भवः च अप्यय च भव
अपि अयौ
भव भू धातू असणे अय धातू जाणे
विस्तरशः विस्तराने
श्रुतौ ; श्रुतः श्रु धातू ऐकणे
अव्ययम् न संपणारा न व्ययः
माहात्म्यम् महान आत्मा माहात्म्यः द्वि एव
अपि च सुद्धा
सातव्या अध्ययापासून दहाव्या अध्यायापर्यंत श्रीभगवानकृष्णांनी आपणच सर्व सृष्टिच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कारण आहे असे सांगितले. सर्व सजीवांमधे असणारे त्रिगुणात्मक भाव सुद्धा आपल्याच मुळे निर्माण झाले आहेत,हे सुद्धा अर्जुनाला सांगितले.
आता अर्जुन श्रीकृष्णाला पुढे म्हणतो की
हे कमलपत्राक्ष,
मी समस्त (सामान्य)
जीवितांचे ह्या लोकांतील येणे आणि जाणे तुमच्या कडून अतिशय विस्तारपूर्वक ऐकले आहे त्याच बरोबर आपल्या अविनाशी अस्तित्वाचे महात्म्य सुद्धा ऐकले आहे.
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम।।11.3।।
हे परमेश्वर! त्वम् आत्मानं यथा आत्थ, एतत् एवम्। हे पुरुषोत्तम! ते ऐश्वरम् रूपम् द्रष्टुम् इच्छामि।
हे परमेश्वर! परमः ईश्वरः
त्वम् आपण युष्मद् प्र एव
आत्मानं स्वतः चे
आत्मन् पु द्वि ए.व.
यथा ज्याप्रकारे
आत्थ, सांगितले ब्रू धातू बोलणे
एतत् हे एतद्
एवम् असे
हे
पुरुषोत्तम!
सर्व पुरूषांमधे उत्तम
पुरूषेषु उत्तमः
ते युष्मद् ष एव
ऐश्वरम् ऐश्वर
रूपम् रूप
द्रष्टुम् इच्छामि बघण्याची इच्छा
दृश् धातू इष् धातू
श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे एकमेकांशी अनेक प्रकारचे नाते आहे. दहाव्या अध्यायात आपण श्रीभगवानकृष्णांच्या विभूती बद्दल विस्ताराने वाचले. अर्जुन श्रीकृष्णाला परम म्हणजे श्रेष्ठ असे ईश्वर असे संबोधत आहे. ऐश्वर ह्या शब्दाचे बरेच अर्थ आहेत. ऐश्वर म्हणजे ईश्वरीय संपदा, विभूति, वैभव, संपत्ति, महिमा... सर्व विभूतिंचे वर्णन ऐकून अर्जुनाला आता ते सर्व प्रत्यक्ष पाहण्याची सहजसुलभ इच्छा निर्माण झाली आहे.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो की
हे परमेश्वर,
आपण जे स्वतः बद्दल वर्णन केले आहे ते अगदी तसेच आहे. हे सर्वोत्तम पुरूषा तुझे हे ऐश्वर्य मला प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे.
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम्।।11.4।।
हे प्रभो! मया तत् द्रष्टुम् शक्यम् इति यदि त्वम् मन्यसे, ततः हे
योगेश्वर अव्ययम् आत्मानम् मे दर्शय।
हे प्रभो!
मया माझ्या कडून अस्मद् तृ एव
तत् ते
द्रष्टुम् बघून दृश् धातू तुमुन्
पाहणे
शक्यम् शक्य आहे शक् धातू यत नपु द्वि
एव
इति म्हणून
यदि जर
त्वम् आपण
मन्यसे, समजून घेतोस मन्
धातू जाणणे
ततः नंतर
हे योगेश्वर योगिनां ईश्वरः
अव्ययम्
आत्मानम् आत्मन् स्वतःचे
मे मला
दर्शय दाखव दृश् धातू
योगेश्वर ह्या शब्दाचे अनेक अर्थ वाचायला मिळतात. जसे योग मध्ये निपुण, अलौकिक क्षमता
असलेला, जादूगार आणि शिवाचे एक विशेषण जे शैव दर्शन मधे उल्लेखले आहे.
भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, हठयोग, राजयोग ह्या सर्वांमधे निपुण
तो योगेश्वर.
हे सर्व अर्थ मनात ठेऊन हा श्लोक वाचला कि अर्थ आणखी भावतो. गीतेच्या 18 व्या
अध्यायातील 78 श्लोकात संजयाने म्हटले आहे की यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो
धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।18.78।
जेथे जेथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे तेथे वैभव, विजय, ऐश्वर्य,
उद्येश्य, नीतिमत्ता आहेच असे मी मानतो.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की
हे योगेश्वर, सर्व अप्रकट शक्तिंचे स्वामी
जर आपल्याला असे वाटत असेल की ह्या शक्ती मी बघायला लायक आहे तर कृपया आपले
अविनाशी विराट मला दिसावे.
श्री भगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः। नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च।।11.5।।
श्रीभगवानुवाच - हे पार्थ! अथ मे शतशः सहस्रशः च नाना-विधानि, नाना-वर्ण-आकृतीनि, दिव्यानि रूपाणि पश्य।
श्रीभगवानुवाच -
हे
पार्थ!
अथ आता
मे
माझे
शतशः
सहस्रशः
च
नाना-विधानि, अनेक प्रकार
नाना-वर्ण-आकृतीनि,
रंग आकृति
दिव्यानि दिव्य
रूपाणि रुप
पश्य।पहा
ह्या श्लोका पासून श्रीभगवानकृष्णांच्या बाह्य रूपाचे (सोळाव्या अध्यायात अंतर्भूत गुणांचे वर्णन आहे) वर्णन सुरू झाले आहे. त्यामुळे नानाविध नाना-वर्ण-आकृती असे शब्द वापरले आहेत. कृष्णाच्या प्रकट आणि अप्रकट विश्वरुपाचे वर्णन यापुढे वाचायला मिळेल.
विष्णु सहस्त्रनाम महात्म्य ह्या ग्रंथात, तसेच कर्मकांड प्रदीप ह्या ग्रंथात पुढील श्लोक वाचायला मिळतो.
ॐ नमो स्त्वनंताय सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादा क्षिशिरोरूहावहे।
सहस्त्र नाम्ने पुरूषाय शाश्वते, सहस्त्रकोटि युगधारिणे नमः॥
हे अनंत स्वरूप असलेल्या, हजारो पावले, डोळे, हृदये आणि हजारो भुजा, हजारो शाश्वत पुरूषांची नावे, सहस्त्रकोटि युगात धारण केलेल्या भगवानांना माझा नमस्कार.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे पार्थ माझी शेकडो हजारो विविध प्रकारची, रंगांची, आकृतींची दिव्य रूपे आता पहा.
पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्िवनौ मरुतस्तथा।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याऽश्चर्याणि भारत।।11.6।।
हे भारत! आदित्यान्, वसून्, रुद्रान्, अश्विनौ, मरुताः पश्य तथा बहूनि अदृष्ट-पूर्वाणि आश्चर्याणि पश्य ।
हे भारत! भरतवंशोद्भव
आदित्यान्, अदिती चे
पुत्र
वसून्, वसु
रुद्रान्, रूद्र
अश्विनौ, जुळे अश्विनीकुमार
मरुताः मरूत
पश्य पहा
तथा सुद्धा
बहूनि बरेच
अदृष्ट-पूर्वाणि पूर्वी न पाहिलेले
आश्चर्याणि आश्चर्ये
पश्य ।पहा
हा श्लोक म्हणजे 10 अध्यायाची छोटीशी उजळणी म्हणावी लागेल.
ह्या सर्व विभूतींचा उल्लेख आधीच करून झाला आहे पण
असे गृहीत धरले आहे की त्यांना प्रत्यक्ष कोणी पाहिलेले नाही.
आदिति चे 12 पुत्र धाता, मित्र, अर्यमा, शकरा, वरुण, अंश, भाग, विवस्वान्,
पूषा,
सविता,
त्वष्टा,
वामन.
आठ वसु, ध्रुव, सोम, आह, अनिला, अनला, प्रत्युष, प्रभास.
अकरा रुद्र हारा, बहुरूपा,
त्रयम्बका,
अपराजिता,
वृस्कपि,
शम्भू,
कपाड़ी,
रायवता,
मृगाव्याध सर्वा, कपाली.
जुळे अश्विनीकुमार
आणि
एकोणपन्नास मरुत (वरुण देव) सत्वज्योति, आदित्य, सत्यज्योति, त्रियगज्योति, सज्योति, ज्योतिषमान, हरित, रितजित, सत्यजीत,
सुषेण,
सेनजित,
सत्यमित्र,
अभिमित्र,
हरिमित्र,
कृत,
सत्य,
ध्रुव,
धर्ता,
विधारत,
विद्याराय,
ध्वांत,
धुनि,
उग्र,
भीम,
अभियू,
साक्षिप,
इद्रिक,
अन्यद्रिक,
याद्रिक,
प्रतिकृत,
रिक,
स्मृति,
समारभ,
इदरीक्ष,
पुरुष,
अन्यदृक्ष,
चेष्टा,
समित,
समीदृश,
प्रतिदृश,
मारुति,
सरता,
देव,
दिशा,
यजुह,
अनुद्रिक,
सम,
मानुष,
विष.
ह्या सर्वांना आणि आधी प्रकट न झालेल्या आश्चर्यांना तू माझ्यात पहा.
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम्।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि।।11.7।।
हे गुडाकेश! अद्य इह
मम देहे एकस्थम् सचर-अचरम् कृत्स्नम् जगत्, अन्यत् च यत् द्रष्टुम्
इच्छसि,
पश्य।
हे गुडाकेश! गुडाकायाः ईशः
अद्य आज
इह येथे
मम अस्मद् माझे
देहे देहात
एकस्थम् एकस्मिन स्थितम् एकत्रित स्थित असलेले
सचर-अचरम् चर आणि अचर
चरं च अचरं च
कृत्स्नम् संपूर्ण
जगत्,. जग
अन्यत् अन्य
च आणि
यत् यद् जो
द्रष्टुम् दृश् धातू तुमुन् पाहणे
इच्छसि इच्छितो,
इष् धातू
पश्य। पहा
विश्वरुप ह्या शब्दात दोन शब्द सामावले आहेत. विश्व आणि रूप. म्हणजेच सर्वसमावेशक. ह्या शब्दाचा आताच्या काळात अर्थ लावून पाहिला तर
माणसांचा एकमेकांमधे चालू असलेला भेदभाव किती निरर्थक आहे ते दिसून येईल. पण ते असो.
विश्वरूप दर्शन जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला घडविले तसे ते आणखी काहीजणांना सुद्धा घडले. ते भाग्यवान म्हणजे यशोदामाता, दुर्योधन,
नारद,
लक्ष्मीदेवी,
बली राजा आणि अर्थात संजय.
ह्या श्लोकात चर
आणि अचर अशा दोन्ही रूपांचे वर्णन केले आहे. आधीच्या श्लोकात अदृष्ट-पूर्वाणि असे म्हटले होते.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात
हे गुडाकेश,
समस्त चर अचर सहित ब्रह्मांडाचे माझ्यात एकवटलेले रूप तू पहा. ह्याशिवाय तुला अजूनही काही पहायची इच्छा असेल तर ते सुद्धा तू माझ्यात पहा.
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा।
दिव्यं ददामि ते
चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्।।11.8।।
अनेन माम् स्व-चक्षुषा तु
द्रष्टुम्
न एव शक्यसे, ते दिव्यम् चक्षुः ददामि, मे ऐश्वरम् योगम् पश्य।
अनेन ह्या
इदम नपु तृ
एव
माम् मला
अस्मद् द्वि एव
स्व-चक्षुषा स्वतः च्या डोळ्यांनी
स्वचक्षुस् नपु तृ एव
तु परन्तु
द्रष्टुम् दृश् धातू तुमुन् बघणे
न एव
शक्यसे, शक् धातू
ते युष्मद् च एव
दिव्यम् दिव्य
चक्षुः चक्षुस् दृष्टि
ददामि, देतो
दा उ पु
एव देणे
मे माझी
अस्मद् ष एव
ऐश्वरम् ऐश्वर आश्चर्य
योगम् योग
पश्य।पहा
श्रीकृष्ण कित्येकजणांना त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष भेटला पण किती जणांना परमेश्वराचे अस्तित्व जाणवले? काहिंना विश्वरूप दर्शन घडले. काही जण त्याच्या हातून मारले गेले (हे सुद्धा एक भाग्यच)
महाराजा परीक्षित, श्रीमद भागवतम (भागवत पुराण) 10.12.11 मधील श्री शुकदेव गोस्वामी यांचे विधान
इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या
दास्यं गतानां परदैवतेन ।
मायाश्रितानां नरदारकेण
साकं विजह्रु: कृतपुण्यपुञ्जा: ॥ ११ ॥
बालगोपालांसाठी कन्हैया, जे
ब्रह्मजोती मध्ये विलीन होऊ इच्छितात त्यांच्या साठी प्रकाशाचा उगम, जे
सर्वकाळ दास होऊ इच्छितात अशा भक्तांसाठी परमेश्वर, सामान्य लोकांसाठी सामान्य बालक. बालगोपालांचे ते महाभाग्यच ज्यांना पुरूषोत्तमांबरोबर असे राहता आले.
9 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांच्या अस्तित्वाबद्दल म्हटले आहेच की
अज्ञानी लोक त्यांचा मानवी अवतार समजू शकत नाहीत. अर्जुनाला सुद्धा त्यांचे विराट रूप पहायचे आहे पण ते
त्याला साध्या डोळ्यांनी शक्य नाही.
म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
पण तू तुझ्या डोळ्यांनी माझे दिव्य स्वरूप नाही बघू शकत. म्हणून मी
तुला दिव्य दृष्टि प्रदान करतो, आता तू माझे दिव्य ऐश्वर्य पहा.
सञ्जय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो
हरिः।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्।।11.9।।
सञ्जय उवाच - हे राजन् !
महा-योग-ईश्वरः हरिः एवम् उक्त्वा, ततः पार्थाय परमम् ऐश्वरम् रूपम् दर्शयामास।
सञ्जय
उवाच ब्रू धातू बोलणे
हे राजन् !
महा-योग-ईश्वरः
महायोगिनां ईश्वरः, महायोगिन्
हरिः हरि
एवम् ह्या प्रकारे
उक्त्वा, सांगून ब्रू धातू क्त्वा
ततः नंतर
पार्थाय अर्जुनाला पृथायाः अपत्यं पुमान्
परमम् परम
ऐश्वरम् ऐश्वर
रूपम् रूप
दर्शयामास दाखवले दृश् धातू दाखवणे णिच्
महाभारतातील संजय ह्या व्यक्तीबद्दल
आपल्याला इतकेच माहीत आहे की तो व्यासांचा शिष्य होता आणि धृतराष्ट्राचा सल्लागार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला असणारी दिव्य दृष्टि ज्यामुळे तो लांबवर घडणाऱ्या
घटना पाहू शकत होता. त्यामुळेच त्याला भगवद्गीता सुद्धा प्रत्यक्ष सांगितलेली पाहता
आली आणि अर्जुना बरोबरच विश्वरूप दर्शन सुद्धा झाले.
ह्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला
असे सांगत आहे की (आधीच्या श्लोकाच्या पुढे)
हे राजन
असे सांगून योगाचे स्वामी महा-योगेश्वर श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रेष्ठ दिव्य विश्वरूप
दाखवले.
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम्।।11.10।।
अनेक-वक्त्र-नयनम्, अनेक-अद्भुत-दर्शनम्,
अनेक-दिव्य-आभरणम्, दिव्य-अनेक-उद्यत-आयुधम्।
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम्।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं
विश्वतोमुखम्।।11.11।।
दिव्य-माल्य-अम्बर-धरम्,
दिव्य-गन्ध-अनुलेपनम्, सर्व-आश्चर्यमयम्, विश्वतोमुखम् अनन्तम्, देवम् ।
अनेक-वक्त्र अनेक मुख
वच् धातू बोलणे बोलण्याचा
अवयव
नयनम्, डोळे
वक्त्रम् च नयनम् च
अनेक-अद्भुत-दर्शनम्,
अद्भुतं दर्शनम् अनेक-दिव्य-
आभरणम्, आभूषण
दिव्यानि आभरणानि
दिव्य-अनेक
उद्यत तत्पर (सरसावलेली)
उद् +यत् धातू प्रयत्न करणे
आयुधम् शस्त्रे
दिव्य-माल्य-अम्बर-धरम्,
माल्यं माला अम्बर वस्त्र माल्यं च अम्बरम् च धारयति
दिव्य-गन्ध-अनुलेपनम्,गन्धस्य
अनुलेपनम्
सर्व-आश्चर्यमयम्, सर्वाश्चमय
विश्वतोमुखम् विश्वतः मुखानि
अनन्तम्, अनन्त
देवम् देव
ह्या श्लोकात अनेक हा शब्द
वापरला आहे. म्हणजे निश्चित आकडा माहीत नाही. अमर्याद.
ह्या दोन श्लोकात अर्जुनाला
श्रीकृष्णाचे विराट रूप कसे दिसले ह्याचे वर्णन आहे. आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी
अर्जुनाला दिव्य दृष्टि प्रदान केली असा उल्लेख आहे. आजच्या आधुनिक काळात हे कसे समजून
घ्यायचे असा प्रश्न पडतो. अशा वेळी मला पतंजलींच्या योगसूत्रातील श्लोकांचा उल्लेख
करावासा वाटतो. योगश्चित्तवृत्तिनिरोधः ॥१.२॥पतंजली योगसूत्र हा श्लोक आपल्याला माहीत
आहेच. ह्यातील वृत्तीं बद्दल सांगताना पतंजली ऋषींनी त्याचे पाच प्रकार सांगितले आहेत.
प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः
॥ १.६ पतंजली योगसूत्र
त्या म्हणजे प्रमाण, विपर्य
विकल्प निद्रा आणि स्मृती.
ह्यामध्ये विकल्प शब्दाचा
अर्थ आहे कल्पनाशक्ती.
त्याचे वर्णन पतंजलींनी 9व्या
श्लोकात केले आहे.
शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो
विकल्पः ॥ १.९ ॥ पतंजली योगसूत्र.
मानसशास्त्रात कल्पनाशक्ती
वर बरीच पुस्तके सापडतात.
जेव्हा एखादे दृश्य माध्यम
अस्तित्वात नसते, किंवा उपलब्ध नसते त्यावेळी सांगितलेली गोष्ट म्हणजे आपली कल्पनाशक्ति.
केवळ शब्द आणि विचार करण्याची क्षमता ह्यावर आपली कल्पनाशक्ति भरारी घेऊ शकते. त्यातून
बर्याच अस्तित्वात नसलेल्या गोष्टी निर्माण होऊ शकतात जसे नागमणी, उडणारा घोडा वगैरे.
जोपर्यंत संजया कडे असणारी
आणि अर्जुनाला प्राप्त झालेली दिव्यदृष्टी ह्याचा शास्त्रीय उलगडा होत नाही तोपर्यंत
कल्पनाशक्ती ह्या संकल्पनेचा आधार घेण्यास हरकत नाही.
आता ह्या श्लोकाचा अर्थ पाहू.
अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांची अनेक मुखे आणि नेत्र असलेले असे अनेक दिव्य आभूषण
धारण केलेले, दिव्य परजलेली शस्त्रे असे अद्भूत रूप, दिव्य माला आणि वस्त्र धारण केलेले
असे त्याबरोबर दिव्य असा गंधाचा लेप, सर्व विश्वाकडे मुख असलेले, सर्व आश्चर्यांनी
युक्त असे अमर्याद विराट दैवी रूप पाहिले.
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य
महात्मनः।।11.12।।
यदि दिवि सूर्य-सहस्रस्य भाः
युगपत् उत्थिता स्यात्, सा तस्य महात्मनः भासः सदृशी भवेत् ।
यदि जर
दिवि दिव आकाश दिव् धातू चमकणे
सूर्य-सहस्रस्य सूर्याणां
सहस्त्रं हजार सूर्यांचे
भाः भास प्रकाश भा धातू प्रकाशणे
भा करोति इति भास्करः
युगपत् युगपद एकाचवेळी
उत्थिता उत्थित उदय उद् +स्था
स्यात्, अस् धातू असणे
सा तद् स्त्री ती
तस्य तद् पु. ष एव त्याचा
महात्मनः महात्मन् महान पुरूष
भासः भास् प्र बव तेज
सदृशी (वि) स्त्री. सारखे
दिसणारे
भवेत् होवो
भू धातू होणे
आता ह्या श्लोकात अर्जुनाला
श्रीकृष्णाचे विराट रूप कसे दिसले त्याचे वर्णन संजयाने धृतराष्ट्राला आपल्या शब्दात
सांगितले आहे. कदाचित संजयाने अर्जुनाचे विस्फारलेले डोळे पाहिले असावेत. संजयाने विराट
रूपाचे वर्णन करताना सूर्यसहस्रस्य असा शब्द वापरला आहे.
महाभारताच्या शांतिपर्व 12.323.35 मधे असाच एक श्लोक वाचायला मिळतो.
अथ सूर्यसहस्रस्य प्रभां युगपदुत्थिताम्
।
सहसा दृष्टवन्तः स्म पुनरेव
बृहस्पते ॥ ३५ ॥
ह्या श्लोकात संजय असे वर्णन करत आहे की जर आकाशात हजार सूर्य एकाचवेळी उदयास आले
तर त्यातून उत्पन्न होणाऱा प्रकाश हा परमात्म्याच्या तेजाप्रमाणे दिसेल.
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा।
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा।।11.13।।
तदा पाण्डवः तत्र देव-देवस्य
शरीरे अनेकधा प्रविभक्तम् कृत्स्नम् जगत्, एकस्थम् अपश्यत् ।
तदा तेव्हा
पाण्डवः पण्डोः अपत्यं पुमान्
तत्र तेथे
देव-देवस्य देवदेवः देवांचा
देव देवानाम् देवः
शरीरे शरीर
अनेकधा अनेक
प्रविभक्तम् विभाजित प्र +विभक्त भजणे ह्या क्रियेपासून दूर गेलेला
प्र+वि+भज् धातू भजणे
कृत्स्नम् विशेषण समस्त
जगत्, जग
एकस्थम् एकस्थः एकाच ठिकाणी
एकस्मिन तिष्ठति
अपश्यत् पाहिले दृश् धातू पाहणे
यशोदामाता ने कृष्णाचे रूप
त्याच्या आ वासलेल्या तोंडामध्ये पाहिले होते. तसेच काहीसे आता अर्जुनाच्या बाबतीत
घडत आहे. भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ समजून घेत असताना दर वेळी अशीच जाणिव होते कि
प्रत्येक शब्द किती विचार करून वापरला आहे. जसे ह्या श्लोकात 'एकस्थम्' एकाच ठिकाणी
एकवटलेले. ह्यातून एकात्मतेचा संदेश मिळतो. सर्व ब्रह्मांडाचे केंद्रस्थान अर्जुनाच्या
समोर आहे. परमेश्वराची अगणित रूपे नानाविध आकार आणि रंग, ते सर्व कृष्णाच्या ठायी एकवटलेले
आहे. असे ते अंशात्मक रूप अर्जुनाने बघितले.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
पाण्डुपुत्राने देवांचा देव असलेल्या शरीरात समस्त जगाचे अंशात्मक रूप एकाच ठिकाणी
एकवटलेले असे पाहिले.
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा
धनञ्जयः।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत।।11.14।।
ततः सः विस्मय-आविष्टः हृष्ट-रोमा
धनञ्जयः, देवम् शिरसा प्रणम्य, कृत-अञ्जलिः अभाषत।
ततः नंतर
सः तो
विस्मय-आविष्टः आश्चर्यचकित
होऊन
विस्मयेन आविष्टः आ+विष् धातू
व्याप्त होणे
हृष्ट-रोमा आनंदाने हर्षित
होऊन हृषाणि रोमाणि हृष् धातू संतोष होणे
धनञ्जयः, धनं जयति
देवम् देव
शिरसा डोक्याने शिरस्
प्रणम्य, प्रणाम करून प्र +नम् धातू वंदन करणे
कृत-अञ्जलिः हात जोडून कृतः अन्जलिः
अभाषत म्हणाला भाष् धातू भाष्य करणे
एखाद्या गोष्टीमुळे खूप आनंद
झाला कि त्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. जसे जसे आवाक् होणे, कंपित
होणे, डोळे विस्फारणे, वाचा बसणे, अश्रुपात. त्या त्या वेळी जसे घडेल तसे.
अशा आठ सात्विक भावांचे वर्णन
खालील श्लोकात दिले आहे.
स्तंभवेदो थ रोमांचः स्वरभेदो
थ वेपतुः वेवर्नयामश्रु प्रलया इत्य्स्तु
सात्विकः स्मृतः
(भक्तिरसामृतसिंधु)
स्तंभित होणे, घाम फुटणे,
रोमांच, आवाजात कंपन, थरथरणे, पांढरेफटक पडणे, अश्रुधारा, मनात विचारांचे काहूर ह्या
आठ गोष्टींना सात्विक भाव असे म्हणतात.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
परमेश्वराच्या विश्वरूप दर्शनाने आश्चर्यचकित झालेला, रोमांचित झालेल्या अर्जुनाने
नतमस्तक होऊन, हात जोडून प्रणाम करून म्हणाला.
अर्जुन उवाच
पश्यामि देवांस्तव देव देहे
सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान्।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ
मृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्।।11.15।।
अर्जुन उवाच - हे देव ! तव
देहे सर्वान् देवान्, तथा भूत-विशेष-सङ्घान्, कमल-आसनस्थम् ईशम् ब्रह्माणम् च,
सर्वान् ऋषीन्, दिव्यान् उरगान् च पश्यामि।
अर्जुन उवाच - ब्रू धातू बोलणे
हे देव !
तव देहे
सर्वान् देवान्,
तथा
भूत-विशेष-सङ्घान्, विभूतिंचा
समूह भूत विशेषाणां संघः
कमल-आसनस्थम् कमळात स्थानापन्न
असलेले कमलस्य आसनम्
ईशम् ईश्
ब्रह्माणम् च, ब्रह्म
सर्वान् ऋषीन्, सर्व ऋषि
दिव्यान् दिव्य
उरगान् उरग सर्प
च
पश्यामि दृश् धातू पाहणे
ह्या पुढील काही श्लोकांमधे
छन्द बदल झालेला दिसून येतो. आता शब्द संख्या वाढली आहे.
आता अर्जुन स्वतःचे अनुभव
कथन करीत आहे.
ह्या श्लोकात ब्रह्मा, ईश,
ऋषि आणि उरग हे महत्वाचे उल्लेख आहेत.
ईश म्हणजे ईश्वर. महा+ईश
=महेश म्हणजे भगवान शंकर.
उरग म्हणजे सर्प ज्यावर भगवान
विष्णू विराजमान झालेले असतात.
म्हणजेच ह्या श्लोकात ब्रह्मा
विष्णू महेश ह्यांचा उल्लेख केला आहे असे म्हणायला हरकत नाही.
शिवाय पाताळ लोकांत सर्प निवास
करतात असे मानले तर, पृथ्वीवर राहणारे ऋषी व विभूति आणि स्वर्गात राहणारे देव असा अर्थ
लावला तर अर्जुनाला तिन्ही लोकांचे दर्शन घडले
असेही मानता येईल.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
अर्जुन म्हणाला मी आपल्या देहात सर्व देव आणि विभिन्न प्रकारचे जीव, कमळावर आसनस्थ
असलेले ब्रह्मा, महेश सर्व ऋषि आणि दिव्य सर्प पाहिले.
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं
पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं
पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप।।11.16।।
हे विश्वरूप विश्वेश्वर !
अनेक-बाहु-उदर-वक्त्र-नेत्रम् सर्वतः अनन्त-रूपम् त्वाम् पश्यामि । तव न अन्तम्
न मध्यम् न पुनः आदिम् पश्यामि।
हे विश्वरूप विश्वेश्वर !
अनेक-
बाहु-उदर-वक्त्र-नेत्रम् बाहु च उदरं च वक्त्रं च नेत्रे च
सर्वतः सगळीकडे सर्व +तासिल अव्यय
अनन्त-रूपम् अनन्ताणि रूपाणि
त्वाम् तुम्हाला
पश्यामि पाहतो
तव युष्मद् ष एव आपले
न
अन्तम् अन्त
न मध्यम्
न पुनः
आदिम् आदि
पश्यामि दृश् धातू पाहणे
आधीच्या श्लोकात त्रिलोकाचे
दर्शन आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचा उल्लेख करून झाल्यावर आता अर्जुन श्रीभगवानकृष्णांचे
वर्णन करत आहे. ह्या श्लोकात दोन विशेषणांचा वापर केला आहे. विश्वरूप आणि विश्वेश्वर.
ह्या ब्रह्मांडाचा ईश्वर ज्याच्या मध्ये ब्रह्मांडात अस्तित्वात असलेली सर्व रूपे सामावलेली
आहेत.
साक्षात महादेवांनी श्रीभगवानकृष्णांचे
ब्रह्मवैवर्तपुराणात असे वर्णन केले आहे
विश्वं विश्वेश्वरेशं च विश्वेशं
विश्वकारणम्। विश्वाधारं च विश्वस्तं विश्वकारणकारणम्।।
विश्वरक्षाकारणं च विश्वघ्नं
विश्वजं परम्। 1.3 25 ब्रह्मवैवर्तपुराणम्
अर्जुन श्रीकृष्णाला ह्या
श्लोकात असे म्हणत आहे की
हे ब्रह्मांडाचा स्वामी मला चोहोबाजूंना तुझी अगणित भुजा, उदर, मुख आणि डोळे दिसत
आहेत. आपल्या अमर्याद रूपांचा मला आरम्भ, मध्य आणि अन्त कुठेच दिसत नाही.
किरीटिनं गदिनं चक्रिणं च
तेजोराशिं सर्वतोदीप्तिमन्तम्।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं
समन्ता
द्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्।।11.17।।
त्वाम् किरीटिनम्, गदिनम्,
चक्रिणम्, तेजो-राशिम् सर्वतः दीप्तिमन्तम्, दीप्त-अनल-अर्क-द्युतिम् दुर्निरीक्ष्यम्
समन्तात् अप्रमेयम् च पश्यामि।
त्वाम् आपले
युष्मद् द्वि एव
किरीटिनम्, किरीट
गदिनम्, गदा
चक्रिणम्, चक्र
तेजो-राशिम्
तेजसः राशिः
सर्वतः
दीप्तिमन्तम्, दैदीप्यमान
दीप्तिमत् दीप्त-अनल-अर्क-द्युतिम्
तेज अग्नि सूर्य किरणे
दीप्तः अनलः अर्कः द्युतिः
दुर्निरीक्ष्यम् प्रखर डोळे
दिपवणारे दुः+निर +ईक्ष निरीक्ष नीट पाहणे
समन्तात् सर्व बाजूंनी समन्त अस्ताति
अप्रमेयम् मोजता न येण्याजोगा
न प्रमेयम्
च सुद्धा
पश्यामि पाहतो
ह्या श्लोकात विश्वरूपाचे
पुढे वर्णन करताना अर्जुनाने मुकुट, गदा, चक्र ह्यांचा उल्लेख केला आहे. अशा एकेक वस्तूंची
फक्त नावे वाचणे अपेक्षित आहे कि त्यामागे असलेल्या संकल्पना समजून घेणे?
जसे किरीट म्हणजे मुकुट जो
फक्त राजा परिधान करतो. राजा म्हणजेच राजधर्म. त्याचे वर्णन महाभारतातील शांतिपर्वात
विस्ताराने सांगितले आहे.
त्यातील एक महत्त्वाचा श्लोक.
भीष्म राज आणि युधिष्ठिर यांच्या मधला संवाद. भीष्म राजधर्म बददल युधिष्ठिराला सांगत
आहेत कि जेव्हा धर्माचे अनुशासन होते तेव्हा राजा ही कल्पना अस्तित्वात नव्हती. पण
जसे जसे लोकांच्या मनात लोभ आणि मत्सर निर्माण झाला तसे तसे त्यांच्या वर नियंत्रण
ठेवण्यासाठी राजाची गरज भासू लागली.. स्वतः ब्रह्मदेवांनी नीतिशास्त्र ची रचना करून
धर्म, अर्थ आणि काम ह्या तिन्हीचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे.
ततोऽध्यायसहस्राणां शतं चक्रे
स्वबुद्धिजम्।
यत्रधर्मस्तथैवार्थः कामष्चैवाभिवर्णितः॥
त्रिवर्ग इति विख्यातो गण
एव स्वयम्भुवा।
शांतिपर्व 59/29.
"राजते इति राजा"
जो लोकांमधे शोभून दिसतो तो राजा.
महाभारत (भीष्मपर्व
34/27) "नराणां च नराधिपः"अर्थात् मनुष्य जातीमधे तर मीच राजा आहे
असे स्वतः श्रीकृष्णाने म्हटले
आहे.
गदा हे शक्तिचे प्रतिक आहे.
म्हणजेच सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार.
चक्र हे सुद्धा एक शस्त्र
आहे जे अपेक्षित लक्ष्याचा वेध घेते. ह्या मधून दृढनिश्चय प्रतित होतो. चक्र म्हणजे
गती. चक्राच्या गोल आकारामुळे त्याला ना आरंभ आहे ना अंत म्हणजेच शाश्वततेचे प्रतिक.
ह्या श्लोकात अर्जुन असे म्हणतो
आहे की
आपल्या रूपाचे दैदीप्यमान तेज जे अग्नि समान किंवा सूर्याच्या किरणांप्रमाणे सर्वत्र
पसरलेले आहे, ज्यामध्ये मी मुकुट, गदा आणि चक्र पाहू शकलो त्यामुळे माझे डोळे दिपून
गेले आहेत.
त्वमक्षरं परमं वेदितव्यं
त्वमस्य विश्वस्य परं निधानम्।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता
सनातनस्त्वं पुरुषो मतो मे।।11.18।।
त्वम् परमम् अक्षरम् वेदितव्यम्,
त्वम् अस्य विश्वस्य परम् निधानम्, त्वम् अव्ययः शाश्वत-धर्म-गोप्ता, त्वम् सनातनः
पुरुषः मे मतः।
त्वम् आपण
युष्मद् प्र एव
परमम् परम श्रेष्ठ
अक्षरम् अक्षर अविनाशी
वेदितव्यम्, जाणण्याजोगा
विद् धातू जाणणे तव्यत
त्वम् आपण
अस्य ह्या
इदम ष एव
विश्वस्य विश्व
परम्
निधानम्, निधान आधार
धा धातू धारण करणे
त्वम् आपण
अव्ययः व्यय न होणारे
शाश्वत-धर्म-गोप्ता, सनातन
धर्माचे पालक
शाश्वतः धर्मः
गुप् धातू गोपनीय ठेवणे
त्वम्
सनातनः
पुरुषः
मे माझे
मतः मत आहे
मन् धातू समजणे क्त प्रत्यय
मानणे
वेदांना अपौरुषेय मानले जाते.
ते कोणी सांगितले ते निश्चित माहीत नाही. ऋषींनी ते ऐकून शिष्यांना पाठ करायला लावले.
सर्वे वेदा यत्पदमामनन्ति
(कठोपनिषद्-1.2.15)
यम नचिकेताला सांगत आहेत
सर्व वेदांचा उद्देश्य आपल्याला
मार्ग दाखवण्याचा आहे.
वासुदेवपरा वेदा वासुदेवपरा
मखाः
(श्रीमद्भागवतम्-1.2.28)
'वैदिक ज्ञान' चा उद्देश्य
परमेश्वराच्या जवळ नेण्याचा आहे.
अर्जुन ह्या श्लोकात असे म्हणत
आहे की
मी असे मानतो की आपणच परब्रह्म परमात्मा आहात, ह्या जगाचे आश्रय कर्ते, सनातन धर्माचे
रक्षक आणि अविनाशी सनातन पुरूष आहात.
अनादिमध्यान्तमनन्तवीर्य
मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम्
स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्।।11.19।।
अनादि-मध्य-अन्तम्, अनन्त-वीर्यम्,
अनन्त-बाहुम्, शशि-सूर्य-नेत्रम्, दीप्त-हुताश-वक्त्रम्, स्व-तेजसा इदम् विश्वम्
तपन्तम्, त्वाम् पश्यामि।
अनादि-मध्य-अन्तम्,
आदिः च मध्यं च अन्तः च
अनन्त-वीर्यम्, असीमित शक्ति
अनन्तं वीर्यम् यस्य सः
अनन्त-बाहुम्, अनेक बाहू
अनन्ताः बाहवः
शशि-सूर्य-नेत्रम्, चंद्र
सूर्य नेत्र दीप्त-हुताश-वक्त्रम्, प्रज्वलित मुख
हुतम् अश्नाति हु धातू देणे
स्व-तेजसा स्वतः चे तेज स्वस्य तेजः
इदम् हे
विश्वम् विश्व
तपन्तम्, जळणारे तप् धातू तापणे
त्वाम् आपले
पश्यामि।पाहतो दृश् धातू पाहणे
16 व्या श्लोकात सुद्धा अनन्त
मध्यं पुनः असे शब्द वापरले आहेत मग 16 आणि 19 ह्या दोन श्लोकांच्या अर्थात फरक कसा
करायचा?
16 व्या श्लोकात क्षेत्रफळाचा
उल्लेख केला आहे तर ह्या श्लोकात प्रत्यक्ष काळ. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने श्रीभगवानकृष्णांचे
अस्तित्व अर्जुनाच्या नजरेपलिकडचे आहेच पण काळाच्या दृष्टीने सुद्धा ते अमर्याद आहे.
विज्ञानाच्या भाषेत उर्जा
अनेक प्रकारची असते जसे सूर्याची शक्ति, त्यापासून निर्माण होणारी उष्णता, वार्यामुळे
निर्माण होणारी गती आणि पवनशक्ती, अग्नि व पाण्यापासून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या
मांसपेशीत असणारी शक्ती ज्यामुळे आपण काम करू शकतो.
पंचमहाभूते, पाच ज्ञानेन्द्रिय
आणि तन्मात्रा ह्यांचा उल्लेख आधीच्या अध्यायांमधे आलेला आहेच.
इच्छाशक्ती (मनाची शक्ति),
कार्यशक्ती, कामशक्ति, प्रजनन शक्ती. सर्व प्रकारच्या शक्ति. शक्ती शिवाय काहीच शक्य
नाही. ह्या शक्तींचे प्रतिक म्हणून आपण स्त्री देवतांना पुजतो. ह्या स्त्री शक्तीचे
रूप महादेवात सुद्धा सामावलेले आहे म्हणूनच अर्धनारीश्वर ह्या संकल्पनेला मान्यता आहे.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांच्या
ठायी असलेल्या उर्जेचे वर्णन करत आहे. सौरशक्ती शिवाय तर सजीवांना अस्तित्वच नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ
असा की
आपल्या अस्तित्वाचा आरंभ, मध्य आणि अंत सुद्धा नाही, अनेक सामर्थ्याने युक्त अशा
आपल्या भुजा, सूर्य आणि चंद्राप्रमाणे नेत्र, स्वतः च्या तेजाने तळपणारे आपले मुख,
ह्या सर्वांनी विश्वाला उर्जित केलेले मी पहात आहे.
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि
व्याप्तं त्वयैकेन दिशश्च
सर्वाः।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं
तवेदं
लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्।।11.20।।
हे महात्मन्! द्यावा-पृथिव्योः
इदम् अन्तरम् सर्वाः दिशः
च एकेन त्वया हि व्याप्तम्, तव इदम् अद्भुतम् उग्रम् रूपम् दृष्ट्वा लोक-त्रयम्
प्रव्यथितम् ।
हे महात्मन्!
द्यावा-पृथिव्योः स्वर्ग आणि
पृथ्वी द्यौ+आपृथिव्योः द्यौ च पृथिवी च
इदम् हे
अन्तरम् अन्तर
सर्वाः सर्व
दिशः दिक् दिशा
च
एकेन एक
त्वया आपल्यामुळे युष्मद् तृ एव
हि
व्याप्तम्, व्याप्त वि +आप् धातू व्यापणे
तव तुमचे
इदम् हे
अद्भुतम् अदभूत
उग्रम् उग्र
रूपम् रूप
दृष्ट्वा दृश् धातू पाहणे
लोक-त्रयम् तिन्ही लोक
प्रव्यथितम् व्यथित झाले
आहेत. प्र +व्यथ् धातू क्षुब्ध होणे दुःखी
होणे.
आतापर्यंत आपण अदभूत, दिव्य
अशी भगवंताची विशेषणे आपण वाचली आहेत. ह्या श्लोकात महात्मन् असे विशेषण वापरले आहे.
आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांचे वर्णन करताना विश्वम् तपन्तम् ह्या शब्दांचे भाषांतर
करताना त्याचे उग्र रूप असा अर्थ लावणे, टाळले होते पण आता मात्र ते शक्य नाही कारण
उग्रम् रूपम् दृष्ट्वा लोक त्रयम् प्रव्यथितं असे शब्द वापरले आहेत. श्रीभगवानकृष्णांचे
रूप पाहून लोक भयभीत झाले असे वाक्य प्रथमच वाचायला मिळाले.
भारतीय तत्त्वज्ञानातील सहा
प्रवाहांपैकी सांख्यवाद सोडल्यास सर्वांना ब्रह्माचे सृष्टीवर असणारे नियंत्रण मान्य
आहे. थोडे पुढे जाऊन पाप पुण्याच्या कल्पना आणि आपल्या कर्मानुसार मिळणारी फळे सुद्धा
मान्य आहेत. आपल्या सृष्टिला उत्पन्न करणारा तोच आणि विनाश करणारा सुद्धा तोच. म्हणजेच
परमेश्वराचे जसे सुखदायक रूप आपल्या मनात आहे तसेच आपल्यावर वचक ठेवणारे रूप सुद्धा
आहेच, जे अर्जुनाने पाहिले आहे.
कर्म प्रधान बिश्वकरी राखा
जो जस करइ सो तस फल चाखा
(रामचरितमानस)
ह्या जगाचे कार्य काही नियमांनुसार
चालते, आपण जसे कर्म करतो तसे त्याचे फळ मिळते.
आता ह्या श्लोकाचा थोडक्यात
अर्थ असा की
हे महात्मन् स्वर्ग आणि पृथ्वी च्या मधले अंतर, सर्व बाजूंनी आपणच व्यापले आहे,
आपले हे अद्भूत उग्र रूप पाहून तिन्ही लोक भयभीत झालेले मी पाहिले आहेत.
अमी हि त्वां सुरसङ्घाः विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः।।11.21।।
अमी हि सुर-सङ्घाः त्वाम् विशन्ति, केचित् भीताः प्राञ्जलयः गृणन्ति; महर्षि-सिद्ध-सङ्घाः स्वस्ति इति उक्त्वा पुष्कलाभिः स्तुतिभिः त्वाम् स्तुवन्ति।
अमी ते अदस् पु प्र बव
हि
सुर-सङ्घाः देवांचा समूह सुराणां सडःघाः
त्वाम् आपले
विशन्ति, प्रवेश करतात विश् धातू
केचित् काहिसे
भीताः भीत भी धातू भय वाटणे
प्राञ्जलयः प्रांजलि हाताची ओंजळ
गृणन्ति; आळवणी करत आहेत गॄ धातू बोलणे आवाज करणे जप करणे
महर्षि-सिद्ध-सङ्घाः सिद्ध महर्षि यांचा समूह महर्षिः च सिद्धः च
स्वस्ति मंगल होवो
इति असे
उक्त्वा म्हणून
ब्रू धातू क्त्वा
पुष्कलाभिः मुबलक पुष्कला स्त्री तृ बव
पुष् धातू पोषण करणे पुष्कम् पोषण
स्तुतिभिः स्तुति
त्वाम् आपले युष्मद् द्वि एव
स्तुवन्ति स्तुती करतात स्तु धातू
युद्धभूमीवर चालू असलेल्या श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुनाच्या संवादाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेणे इष्ट ठरेल. युद्धसदृश वातावरणात इतर श्रेष्ठ महर्षी, देवदेवता ह्यांच्या मनात काय चलबिचल चालू असावी ह्याची कल्पना करता येते.अर्जुन हे
सर्व प्रत्यक्ष बघू शकतो आहे.
ह्या श्लोकात सिद्ध पुरुषांचा उल्लेख आला आहे. सिद्धि प्राप्त होणे म्हणजे विशिष्ट शक्ति प्राप्त होणे. सिद्धि आठ
प्रकारच्या आहेत.
अणिमा महिमा चैव लघिमा गरिमा तथा ।
प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्ट सिद्धयः ।।
अणिमा , महिमा, लघिमा, गरिमा प्राप्ति प्राकाम्य इशित्व आणि वशित्व ह्या सिद्धिं ना "अष्टसिद्धि"
असे म्हणतात.
ह्या सिद्धिंचा थोडक्यात अर्थ असा
1. अणिमा, आपल्या शरीराला अणू सारखे करणे.
2. महिमा, शरीराचा खूप मोठा आकार वाढवणे
3. गरिमा, शरीराचे वजन प्रचंड वाढवणे
4. लघिमा, शरीर वजनरहीत करणे
5. प्राप्ति, कोणत्याही स्थानी पोहोचू शकण्याची क्षमता
6. प्राकाम्य, स्वतःची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता
7. ईशित्व, प्रत्येक वस्तू किंवा प्राण्यांवर वर्चस्व
8. वशित्व, वश करून घेण्याची क्षमता.
ह्या सर्वावरून सिद्धि प्राप्त करून घेण्यासाठी, कराव्या लागणाऱ्या तपस्येची कल्पना येते.
तर असे सर्व सिद्ध पुरुष, महर्षि आणि देवदेवता ह्यांचे काय चालू आहे त्याचे वर्णन करताना अर्जुन असे म्हणतो की
ते सर्व देवदेवता आपल्याला शरण आले आहेत (आपल्या मध्ये प्रवेश करत आहेत) काही भयभीत झालेले हात जोडून आपला जप
करत आहेत. महर्षी आणि सिद्ध पुरुष सर्वांचे कल्याण चिंतन मुक्तकंठाने आपले गुणगान करून स्तुती करत आहेत..
रुद्रादित्या वसवो ये च साध्या
विश्वेऽश्िवनौ मरुतश्चोष्मपाश्च।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे।।11.22।।
ये रुद्र-आदित्याः, वसवः, साध्याः, विश्वे अश्विनौ च, मरुतः च, उष्मपाः च, गन्धर्व-यक्ष-असुर-सिद्ध-सङ्घाः च सर्वे विस्मिताः एव त्वाम् वीक्षन्ते।
ये यद् पु प्र बव
रुद्र-आदित्याः, रुद्राः च आदित्याः च
वसवः, वसु पु प्र बव
साध्याः, साध्य
विश्वे
अश्विनौ च, अश्विन्
मरुतः च, मरुत्
उष्मपाः च, उष्मप पितर उष्म +पा धातू पिणे
गन्धर्व-यक्ष-असुर-सिद्ध-सङ्घाः च
गन्धर्वः च यक्षः च असुरः च सिद्धः च सडःघाः
सर्वे सर्व
विस्मिताः आश्चर्याने वि +स्मि धातू हास्य करणे
एव
त्वाम् युष्मद् द्वि एव
वीक्षन्ते पहात आहेत वि +ईक्ष धातू पाहणे
11 रुद्र, 12आदित्य, 8 वसु, 2 अश्विनीकुमार, 49 मरूतगण ह्या सर्वांची माहिती 10 व्या अध्यायात विस्ताराने लिहिली आहे.
वायु पुराणात, अनुमन्ता, प्राण, नर, वीर्य्य, यान, चित्ति, हय, नय, हंस, नारायण, प्रभव और
विभु असे 12 साध्य सांगितले आहेत. वायुपुराण
66 /15,16
क्रतु, दक्ष, वसु, सत्य, काम, काल, ध्वनि, रोचक, आर्द्रव, पुरूरवा असे 10 विश्वे देव आहेत ज्यांचे संदर्भ ऋग्वेदात, वेदसंहिता अग्निपुराणात, वायुपुराणात सापडतात.
उष्ण पदार्थ खाणारे पितर म्हणून त्यांना उष्मपा म्हणतात त्यांची नावे काव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, अग्रिष्वात्त आणि बहिर्षत असा उल्लेख शिवपुराणात सापडतो.
अर्जुन ह्या श्लोकात असे म्हणत आहे की 11रुद्र, 12आदित्य, 8 वसु, 2 अश्विनीकुमार, 12 साध्य, 10 विश्वे देव, 7 उष्मपा, गंधर्व, यक्ष, असुर सर्वजण आश्चर्यचकित होऊन आपल्याकडे पहात आहेत.
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं
महाबाहो बहुबाहूरुपादम्।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम्।।11.23।।
हे महा-बाहो ! ते बहु-वक्त्र-नेत्रम्,
बहु-बाहु-ऊरु-पादम्, बहु-उदरम्, बहु-दंष्ट्रा-करालम् महत् रूपम् दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः, तथा अहम् ।
हे महा-बाहो ! महान्तौ बाहू
ते
युष्मद् ष एव
बहु-वक्त्र-नेत्रम्,
अनेक मुख डोळे बहूनि वक्त्रं च नेत्रं च
बहु-बाहु-ऊरु-पादम्, विशाल बाहु, मांड्या, पाय
बहवः बाहुः च ऊरुः च पादः च
बहु-उदरम्, अनेक पोट बहुनि उदराणि
बहु-दंष्ट्रा- अनेक दाढा
करालम् भयंकर बहवः दंष्ट्राः करालाः
महत् विराट
रूपम् रूप
दृष्ट्वा दृश् धातू पाहणे
लोकाः लोक
प्रव्यथिताः, प्र +व्यथ् धातू दुःख होणे
तथा
अहम् मी
ह्या श्लोकाच्या अर्थावरून अर्जुन खरेच खूप घाबरला आहे असे लक्षात येते आहे.
असेच विराट रूपाचे वर्णन श्वेताश्वतरोपनिषदात पण वाचायला मिळते.
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्
स भूमिम् विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्
(श्वेताश्वतरोपनिषद्-3.14)
तो सनातन पुरुष हजारो डोकी, हजारो नेत्र, हजारो पाय असलेला सर्व ब्रह्मांडाला व्यापून टाकलेला त्याच्या दहा बोटांवर स्थिर आहे.
भयादस्याग्निस्तपति भयातत्त्पति सूर्यः।
भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चमः।।
(कठोपनिषद्-2.3.3)
परमेश्वराचा धाक सूचित करणारा आणखी एक
श्लोक,
शास्त्रीय नियम सांगणारा आहे म्हणून मुद्दाम इथे लिहित आहे.
परमेश्वराच्या भयाने अग्नी जळतो, सूर्य तळपतो. त्यांच्या भयाने वायू प्रवाहित होतो, इन्द्र घाबरून पर्जन्य देतो आणि यमराज सुद्धा घाबरून असतो.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की,
हे सर्व शक्तीमान अनेक मुख, डोळे, विशाल बाहु, मांड्या, पाय, अनेक पोट, भयंकर दाढा असे आपले विराट रूप पाहून लोक तर भयभीत झाले आहेतच आणि मी
सुद्धा..
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो।।11.24।।
हि हे विष्णो! नभः-स्पृशम्,
दीप्तम्,
अनेक-वर्णम्,
व्यात्त-आननम्, दीप्त-विशाल-नेत्रम्,
त्वाम्
दृष्ट्वा प्रव्यथित-अन्तर-आत्मा धृतिम् शमम् च न विन्दामि।
हि हे विष्णो!
नभः-स्पृशम्, आकाशाला स्पर्शणारा
नभः स्पृशति
दीप्तम्, दिपमान दीप द्वि एव
अनेक-वर्णम्, अनेक रंग
व्यात्त-आननम्, आ वासलेले मुख व्यात्तम् आननं वि +आत्त अत् धातू जाणे
अद् धातू खाणे
दीप्त-विशाल-नेत्रम्, चमकदार मोठ्ठे डोळे दिप्तं च विशालं च नेत्राणि
त्वाम् आपले युष्मद् द्वि एव
दृष्ट्वा दृश् धातू पाहणे
प्रव्यथितान्तरात्मन् प्रव्यथितं व्यथित होत आहे अन्तर-आत्मा
धृतिम् मनोबल दृढता धृति स्त्री द्वि एव
शमम् शमः शान्ति
च
न
विन्दामि प्राप्त होत नाही. विद् धातू जाणणे
थोडी मजेशीर रचना आहे जी नाट्य स्वरूपाच्या अंगाने समजून घ्यावी लागेल. अर्जुन आपल्या दिव्य दृष्टिने भगवंताचे विराट रूप पहात आहे आणि हे संजय पहात आहे. अर्जुन प्रचंड भयभीत झाला आहे पण संजय नाही. कारण संजयाला जी
श्रीकृष्णाची ओळख आहे ती
अर्जुनाला नाही.
अर्जुनाने आतापर्यंत श्रीकृष्णाचे असे रूप पाहिलेलेच नाही. श्रीकृष्णाची आतापर्यंत त्याचा नातेवाईक, मित्र, दौपदीच्या मदतीला धावून जाणारा आणि सारथी एवढीच रूपे माहीत होती.
आता ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाचे आकाशाला गवसणी घालणारे रूप पहात आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांची उंची दाखवली आहे असा ढोबळ अर्थ असला तरी त्याचा अध्यात्मिक अर्थ अध्यात्मिक उंची असाही घेता येईल. कारण ह्या श्लोकात विष्णू हे विशेषण वापरले आहे. विष्णू म्हणजे सर्वव्यापक.
सा काष्ठा। सा
परा गतिः ॥कठोपनिषद् 1.3
तोच सर्वोच्च लक्ष्य आहे.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की
हे विष्णू आपले आ वासलेले मुख, आकाशाला भिडणारे अनेक रंगी रूप, तेजस्वी डोळे असे सर्व रूप पाहून भीतीने माझे अवसान गळून गेले आहे आणि शांती पण ढळली आहे.
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास।।11.25।।
ते दंष्ट्रा-करालानि काल-अनल-सन्निभानि मुखानि च दृष्ट्वा दिशः न जाने, शर्म एव च न लभे, हे देवेश! हे जगत्-निवास! प्रसीद।
ते युष्मद् ष एव
दंष्ट्रा-करालानि भयंकर सूळे दाढा करालाः दंष्ट्राः
काल-अनल कालाग्नि कालः एव अनलः
सन्निभानि सदृश
कालानलम् सन्निभम् प्रलयकाळातील अग्नी प्रमाणे
मुखानि मुख नपु द्वि एव
च
दृष्ट्वा दृश् धातू पाहणे
दिशः. दिक् द्वि बव
न
जाने, ज्ञा धातू समजून घेणे
शर्म शर्मन् शांति
एव च
न लभे, लभ् धातू लाभ होणे
हे देवेश देवानां ईशः
हे जगत्-निवास जगति निवासः
प्रसीद प्रसन्न व्हा प्रसद सुखी होणे प्र +सद् धातू म्लान होणे
अर्जुन फारच भयभीत झाला आहे त्यानुसार त्याने वक्तव्य केले आहे. आपल्या शरीरात एखादी गोष्ट आत मध्ये घ्यायची असेल तर
आपले मुख हा सर्वात महत्त्वाचा अवयव. एखादा पदार्थ शरीरात जाण्यासाठी आपले तोंड हेच खरे प्रवेशद्वार. कानांनी आपण फक्त ध्वनी समजू शकतो आणि डोळ्यांनी आकार आणि रंग. श्रीभगवानकृष्णांच्या मध्ये तर सर्व ब्रह्मांड सामावलेले आहे. म्हणून त्यांच्या मुखाचे वर्णन परतपरत केलेले दिसते. गिळणे आणि गिळंकृत करणे दोन्ही क्रिया मुखानेच घडतात. ह्या श्लोकात प्रलयकालातील अग्नी चे वर्णन आहे. असा अग्नी जो
सर्व काही गिळंकृत करणार आहे. असा भयभीत करणार्या अग्नी मुळे दिशा सुद्धा समजेनाशा झाल्या आहेत म्हणजेच सूर्यापेक्षा सुद्धा हा अग्नी प्रखर आहे.
इतक्या भयावह परिस्थितीत अर्जुनाला विसर पडल्यासारखे झाले आहे की
श्रीभगवानकृष्ण खरे तर प्रसन्न होऊन त्याला आपले रूप दाखवत आहेत.
म्हणूनच ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो की, कालाग्नि प्रमाणे भयंकर ज्वाळा आणि अक्राळविक्राळ दाढा असे रूप पाहून मी दिशाहीन झालो आहे, माझी सुखशांती पूर्णपणे नष्ट झाली आहे म्हणून हे देवांचे ईश्वर जगन्निवास माझ्यावर ( कृपा करा) प्रसन्न व्हा.
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः।।11.26।।
अमी सर्वे एव
धृतराष्ट्रस्य पुत्राः अवनिपाल-सङ्घैः सह, त्वाम् भीष्मः द्रोणः तथा च असौ सूत-पुत्रः अस्मदीयैः योध-मुख्यैः।
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः।।11.27।।
त्वरमाणाः विशन्ति ते दंष्ट्रा-करालानि भयानकानि वक्त्राणि। केचित् चूर्णितैः उत्तम-अङ्गैः दशन-अन्तरेषु विलग्नाः सन्दृश्यन्ते।
अमी हे अदस् पु प्र बव
सर्वे सर्व पु
प्र बव
एव सुद्धा
धृतराष्ट्रस्य पुत्राः धृतराष्ट्राचे पुत्र अवनिपाल-सङ्घैः राजांचा समूह
अवनिं पालयन्ति ते
अवनिपालः अवनिपालानां सडःघाः
सह, बरोबर
त्वाम् आपले युष्मद् द्वि एव
भीष्मः द्रोणः तथा च भीष्माचार्य द्रोणाचार्य सुद्धा
असौ तो अदस् पु प्र एव
सूत-पुत्रः कर्ण सूतस्य पुत्रः
अस्मदीयैः आमच्या बाजूचे अस्मदीय पु तृ
बव
योध-मुख्यैः प्रमुख योद्धे
योधानां मुख्याः ष तत्पुरुष तृ बव
त्वरमाणाः वेगाने त्वर धातू घाई करणे शानच् प्रत्यय
विशन्ति प्रवेश करत आहेत विश् धातू लट प्र पु
बव
ते आपल्या युष्मद् षष्ठी एव
दंष्ट्रा-करालानि विक्राळ दाढा असलेल्या दंष्ट्राकराल नपु द्वि बव
भयानकानि भयानक नपु द्वि बव
वक्त्राणि मुखांमध्ये वक्त्र नपु द्वि बव
केचित् काहिजण
चूर्णितैः चूर्ण झालेल्या चूर्ण धातू क्त प्रत्यय तृ
बव
उत्तम-अङ्गैः मस्तकांसह उत्तमं अडःगं तृ बव
दशन-अन्तरेषु दातांमध्ये
दशनयोः अन्तरं तेषु स. बव
विलग्नाः अडकलेले वि +लग् धातू स्पर्श होणे क्त प्रत्यय प्र बव
सन्दृश्यन्ते दिसत आहेत सम+दृश् धातू पाहणे लटलकार प्रपु बव
अक्राळविक्राळ दाढा असलेल्या मुखात अर्जुनाला पुढे घडणाऱ्या घटना श्रीभगवानकृष्ण दाखवत आहेत म्हणून अर्जुनाला पांडवांच्या बाजूने लढणारे द्रौपद, विराट, धृष्टद्युम्न तसेच भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सूतपुत्र कर्ण सुद्धा ह्यांच्या बरोबर धृतराष्ट्राचे पुत्र आणि कौरवांच्या बाजूने लढणारे इतर राजे असे सर्वजण भगवंताच्या मुखात प्रवेश करताना दिसत आहेत त्यापैकी काही जण चूर्ण चूर्ण झाले आहेत तर काही जणांची मस्तके दाढांमध्ये अडकून पडलेली दिसत आहेत. थोडक्यात स्वतः अर्जुनासकट सर्व पांडव सोडून बर्याच योद्ध्यांचा नाश अटळ आहे हे आधीच स्पष्ट झाले आहे.
यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखाः द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति।।11.28।।
यथा नदीनाम् बहवः अम्बु-वेगाः समुद्रम् अभिमुखाः एव
द्रवन्ति,
तथा अमी नर-लोक-वीराः तव
अभिविज्वलन्ति वक्त्राणि विशन्ति।
यथा जसे
नदीनाम् नद्यांचे नदी ष बव
बहवः बरेच बहु विशेषण पु प्र बव
अम्बु-वेगाः जल-प्रवाह
अम्बूनाम् वेगाः प्र बव
समुद्रम् समुद्राच्या समुद्र द्वि एव
अभिमुखाः च्या दिशेने अभिमुख प्र बव
एव सुद्धा
द्रवन्ति वाहतात द्रु धातू जाणे
तथा तसे
अमी ते अदस् पु प्र बव
नर-लोक-वीराः भूतलावरचे वीर नरलोकानां वीराः प्र बव
तव आपल्या
युष्मद् ष एव
अभिविज्वलन्ति चहूबाजूंनी प्रज्वलित असलेल्या अभि +वि +ज्वल् क्त प्रत्यय द्वि ब व
वक्त्राणि मुखांत वक्त्र नपु द्वि बव
विशन्ति प्रवेश करत आहेत विश् धातू लट प्र पु बव
ह्या श्लोकात नदीच्या समुद्रात विलीन होण्याचे उदाहरण देऊन अद्वैत वादाचे स्पष्टीकरणच दिले आहे. निरनिराळ्या नद्या आपापल्या वैशिष्ट्यांसह उगम पावतात, प्रवाहीत राहतात आणि जेव्हा समुद्राला मिळतात तेव्हा त्यांचे कोणतेच अस्तित्व रहात नाही. त्यांचे अंतिम ध्येयच ते असते. परत समुद्राच्याच पाण्याची वाफ होऊन पावसामुळे नद्या वाहू लागतात. अद्वैतवादात सुद्धा हेच अपेक्षित आहे. अहम् ब्रह्मास्मि।
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की
ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह समुद्राच्या दिशेने वहात असतात त्याप्रमाणेच ह्या संसारातील वीर आपल्या मुखांत प्रवेश करत आहेत.
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति लोका
स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः।।11.29।।
यथा समृद्ध-वेगाः पतङ्गाः नाशाय प्रदीप्तम् ज्वलनम् विशन्ति, तथा एव
समृद्ध-वेगाः लोकाः अपि नाशाय तव वक्त्राणि विशन्ति।
यथा जसे
समृद्ध-वेगाः अतिशय वेगाने समृद्धाः वेगाः प्र बव
पतङ्गाः पतंग पतडःग पु प्र बव
नाशाय नाश करून घेण्यासाठी नाश पु च. एव
प्रदीप्तम् प्रज्वलित प्र+दीप धातू क्त प्रत्यय द्वि एव
ज्वलनम् आगीमध्ये ज्वलन पु
द्वि एव
विशन्ति प्रवेश करतात विश् धातू प्रवेश करणे
तथा एव तसेच
समृद्ध-वेगाः अतिशय वेगाने
लोकाः अपि लोक सुद्धा लोक प्र बव
नाशाय नाश करून घेण्यासाठी
तव आपल्या युष्मद् ष एव
वक्त्राणि मुखात वक्त्र नपु द्वि बव
विशन्ति प्रवेश करत आहेत.
पतंग, पाकोळी अशा नावाने ओळखली जाणारी ही
पाखरे निशाचर असतात आणि दिव्याच्या उजेडाकडे आकर्षित होतात. वेगाने दिव्याला जाऊन भिडतात आणि त्याच्या उष्णतेने जळून जातात.
युद्धात सहभागी झालेल्या वीरपुरूषांपैकी, काही धर्म म्हणून तर काही स्वतः स्वार्थ म्हणून लढण्यास तयार झाले होते. धर्म म्हणून लढण्यास तयार झालेल्या वीरपुरूषांची तुलना आधीच्या श्लोकात नद्यांशी केली आहे.
तर स्वार्थी योद्ध्यांची तुलना पतंगांशी केलेली दिसते आहे.
म्हणूनच अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की ज्याप्रमाणे पाखरे शीघ्र गतीने नाश करून घेण्यासाठी आगीत प्रवेश करतात त्याचप्रमाणे काही लोक नाश करून घेण्यासाठीच आपल्या मुखांत शीघ्र गतीने प्रवेश करत आहेत.
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ता
ल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं
भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो।।11.30।।
समग्रान् लोकान् ज्वलद्भिः वदनैः, ग्रसमानः समन्तात् लेलिह्यसे हे
विष्णो!
तव उग्राः भासः समग्रम् जगत् तेजोभिः आपूर्य प्रतपन्ति।
समग्रान् संपूर्ण समग्र द्वि बव
लोकान् लोकांना लोक द्वि बव
ज्वलद्भिः प्रज्वलित ज्वल् धातू ज्वलत् शतृ नपु तृ बव
वदनैः, मुखाने वदन नपु तृ बव
ग्रसमानः गिळून टाकत ग्रस् धातू ग्रहण करणे शानच प्र एव
समन्तात् सर्व बाजूंनी
लेलिह्यसे चाटत आहात लिह् धातू (चाटणे) +यडः लट लकार मपु एव
हे
विष्णो!
तव आपला युष्मद् ष एव
उग्राः उग्र प्र बव
भासः किरणे भास् स्त्री प्र बव
समग्रम् संपूर्ण समग्र द्वि एव
जगत् जगाला
तेजोभिः तेजाने तेजस् तृ बव
आपूर्य परीपूर्ण
आ+पूर् धातू तृप्त करणे ल्यप प्रत्यय
प्रतपन्ति तप्त करत आहेत प्र +तप धातू लट प्र पु बव
समग्र हा शब्द आधीच्या अध्यायांमधे पण
वापरला गेला आहे. 7व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्वतः च अर्जुनाला स्वतःचे समग्ररूप दाखवण्याचे कबूल केले आहे. 4 थ्या अध्यायातील 23 व्या श्लोकात समग्रम् कर्म असा उल्लेख आहे. आणि आता ह्या श्लोकात समग्र लोक असे म्हटले आहे.
लेलिह्यसे शब्दाचा अर्थ चाटणे अर्थात जिभेच्या साह्याने. विनाशाचे आणखी पुढे वर्णन करताना अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
हे विष्णू सर्व लोकांना प्रज्वलित मुखाने ग्रहण करण्यासाठी सर्व बाजूंनी चाटून पुसून घेत असताना कालाग्नि च्या प्रखर तेजाने सर्व जगाला परीपूर्ण करून तळपून काढत आहेत.
आख्याहि मे को
भवानुग्ररूपो
नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्।।11.31।।
मे आख्याहि उग्र-रूपः भवान् कः ? हे देववर ! ते नमः अस्तु, प्रसीद। आद्यम् भवन्तम् विज्ञातुम् इच्छामि। हि
तव प्रवृत्तिम् न प्रजानामि।
मे मला अस्मद् च एव
आख्याहि व्याख्यान द्यावे आ +ख्या कथन करणे लोट लकार म पु एव
उग्र-रूपः उग्रं रूपं यस्य सः प्र एव
भवान् आपण भवत् पु
प्र एव
कः ? कोण आहात? किम् पु प्र एव
हे देववर ! देवांतील श्रेष्ठ देवानां वरः
ते आपले युष्मद् च एव
नमः अस्तु, नमस्कार करतो अस् धातू लोट लकार प्र पु एव
प्रसीद कृपा करा प्र +सद् धातू लोट लकार म पु एव
आद्यम् आदी आद्य द्वि एव
भवन्तम् आपले भवत् द्वि एव
विज्ञातुम् जाणून घेण्यासाठी वि +ज्ञा धातू तुमुन् प्रत्यय
इच्छामि इच्छुक आहे इष् धातू लट उ पु
एव
हि कारण कि
तव आपले युष्मद् ष एव
प्रवृत्तिम् प्रवृत्ति स्त्री द्वि एव
न
प्रजानामि जाणतो प्र +ज्ञा लट लकार उ पु एव
श्रीभगवानकृष्णांचे उग्र रूप पाहून अर्जुन संभ्रमित अवस्थेत आहे. इतके वर्ष ज्याला सखा म्हणून ओळखत होतो तो देवांमधे श्रेष्ठ आहे हे कळून चुकले आहेच पण
अजून समजून उमजून घेण्याची इच्छा आहे.
ह्या श्लोकातील आद्य हा शब्द आपल्या परीचयाचा आहे. संत ज्ञानेश्वरांनी ओम नमोजी आद्या असे म्हटले आहे. आदी म्हणजे मूळ. 7व्या अध्यायातील 24 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहेच की बुद्धिहीन माणसे माझे फक्त बाह्यरूप जाणतात.
म्हणून ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की हे देववर कृपा करून मला सांगा की ह्या उग्र स्वरूपातील आपण कोण आहात? तुम्हाला माझा नमस्कार. आपले आदीरूप तत्वतः जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. आपल्या प्रवृत्ती, अर्थात प्रयोजन मला माहीत नाही.
श्री भगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।11.32।।
श्रीभगवानुवाच - लोक-क्षय-कृत् प्रवृद्धः कालः अस्मि, इह लोकान् समाहर्तुम् प्रवृत्तः। ये
सर्वे योधाः प्रत्यनीकेषु अवस्थिताः त्वाम् ऋते अपि, न भविष्यन्ति।
श्रीभगवानुवाच - उवाच वच् धातू बोलणे
लोक-क्षय-कृत् लोकांचा नाश करणारा लोकानां क्षयः कृत प्रत्यय प्र एव
प्रवृद्धः विशाल प्र +वृध् धातू वाढणे प्र एव
कालः काल पु
प्र एव
अस्मि आहे अस् धातू लट लकार उ. पु. एव
इह इथे, यावेळी
लोकान् लोकांचे लोक पु. द्वि बव
समाहर्तुम् संहार करण्यासाठी सम+आ +हृ धातू चोरी करणे तुमुन्
प्रवृत्तः कामाला लागलो आहे प्र +वृत् धातू काम करणे प्र एव क्त प्रत्यय
ये जे यद् पु. प्र बव
सर्वे सर्व पु
प्र बव
योधाः योध पु
प्र बव
प्रत्यनीकेषु प्रतिस्पर्धी प्रति +अनीक (सेना, समूह) =प्रत्यनीक स. बव
अवस्थिताः उभे आहेत अव +स्था स्थिर असणे क्त पु
प्र बव
त्वाम् तुझे युष्मद् द्वि एव
ऋते ऋत् धातू तिरस्कार करणे टिका करणे
अपि सुद्धा
न भविष्यन्ति असणार नाहीत भू
धातू लृट प्र पु
बव
आधीच्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता श्रीभगवानकृष्ण देत आहेत.
एखादी गोष्ट कधी घडणार, कशी घडणार हे
सर्व आधीच ठरलेले असते, ते घडवणारी व्यक्ति केवळ निमित्तमात्र ह्या उक्तीचा प्रत्यय ह्या श्लोकात येतो. खरे तर हे
वाक्य लिहीताना फार विषण्ण वाटते. जगात निरनिराळ्या ठिकाणी झालेले नरसंहार, युद्ध, दंगली सर्व काही डोळ्यासमोर येते.
आधीच्या श्लोकांमधे अर्जुनाला कोणाकोणाचा विनाश होणार आहे ते श्रीभगवानकृष्णांच्या मुखात जाताना दिसले.
ह्या श्लोकातील काळ हा शब्द महत्त्वाचा. गतकाळ, भावीकाळ आणि आताचा क्षण. हा काळ स्वतः, श्रीभगवानकृष्ण आहेत.
आता ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
लोकांचा विनाश करण्यासाठी, असा मी
सतत वाढत जाणारा (कधीच न संपणारा)
काळ आहे. ह्या लोकांचा संहार करण्यासाठी उभा ठाकलेलो आहे. हे सर्व योद्धे,( तुझे) प्रतिस्पर्धी युद्ध केले नाही तरी (अस्तित्वात) राहणार नाहीत.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्।।11.33।।
तस्मात् त्वम् उत्तिष्ठ, यशः लभस्व, शत्रून्
जित्वा समृद्धम् राज्यम् भुङ्क्ष्व। एते पूर्वम् एव मया निहताः, हे सव्य-साचिन् ! निमित्त-मात्रम् एव भव
।
तस्मात् म्हणूनच
त्वम् तू युष्मद् प्र ए. व.
उत्तिष्ठ, ऊठ उत्+स्था धातू लोट लकार म. पु. ए. व.
यशः यश यशस् नपु. द्वि. ए. व.
लभस्व, प्राप्त कर लभ् धातू लाभ होणे लोट लकार म. पु. ए. व.
शत्रून् शत्रूवर शत्रु पु. द्वि. ब. व.
जित्वा विजयी होवुन जि धातू उत्कर्ष होणे क्त्वा
समृद्धम् संपन्न समृद्ध नपु. द्वि. ए. व.
राज्यम् राज्याचा राज्य नपु. द्वि. ए. व.
भुङ्क्ष्व। उपभोग घे
भुज् धातू खाणे लोट लकार म. प. ए. व.
एते हे सर्व एतद् पु. प्र. ब. व.
पूर्वम् एव आधी च
मया माझ्या कडून
अस्मद् तृ. ए. व.
निहताः, मारले गेले आहेत नि+हन् धातू मारणे निहत् क्त प्रत्यय पु. प्र. ब. व.
हे सव्य-साचिन् !
निमित्त-मात्रम् निमित्तमात्र नपु द्वि. ए. व.
एव च
भव होवो भू धातू होणे लोट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकात सव्य-साचिन् हे विशेषण अर्जुनासाठी वापरले आहे. सव्य म्हणजे डावा हात. जो डाव्या हाताने सुद्धा धनुष्यबाण वापरू शकतो असा.
(आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) पुढे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
म्हणूनच तू आता ऊठ, शत्रू वर
विजय संपन्न करून यश
प्राप्त कर, समृद्ध राज्याचा उपभोग घे. हे सर्व आधीच माझ्या कडून मारले गेले आहेत. हे सव्य-साचिन् (माझ्या कार्याचा तू) निमित्तमात्र हो.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च
कर्णं तथाऽन्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्।।11.34।।
द्रोणम् च भीष्मम् च जयद्रथम् च कर्णम् तथा अन्यान् अपि मया हतान् योध-वीरान् त्वम् जहि, मा व्यथिष्ठाः, युध्यस्व, रणे सपत्नान् जेता असि।
द्रोणम् च द्रोणाचार्यांना आणि
भीष्मम् च भीष्माचार्यांना सुद्धा
जयद्रथम् च जयद्रथाला आणि
कर्णम् कर्णाला
तथा तसेच
अन्यान् अन्य सर्व पु. प्र. ब. व.
अपि सुद्धा
मया माझ्या कडून अस्मद् तृ. ए. व.
हतान् मारल्या गेलेल्या हन् धातू हत पु. द्वि. ब. व.
योध-वीरान् शूरवीरांना योधेषु वीराः द्वि. ब. व.
त्वम् तू युष्मद् सर्व प्र. ए. व.
जहि, मार हन् धातू लोट लकार म. पु. ए. व.
मा (मानू) नको
व्यथिष्ठाः व्यथा व्यथ् धातू लुडः लकार म. पु. ए. व.
युध्यस्व युद्ध कर युध् धातू लोट लकार म. पु. ए. व.
रणे युद्धात रण
नपु.
स.
ए.
व.
सपत्नान् शत्रूंवर सपत्न पु. द्वि. ब. व.
जेता असि जिंकशील जेतृ पु. प्र. ए. व.
असि अस् धातू लट लकार म. पु. ए. व.
अर्जुनाची सर्वात मोठी समस्या हीच की
प्रत्यक्ष गुरू द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांच्याशी युद्ध कसे करायचे? श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याचे कारणच मुळी ह्या द्विधा मनस्थितीमुळे निर्माण झाले.
म्हणूनच श्रीकृष्णाला आपले खरे रूप अर्जुनाला दाखवून द्यावे लागले. ह्या पृथ्वीवर घडणारी प्रत्येक गोष्ट ही
श्रीभगवानकृष्णांच्या संमतीने होते आणि आपण फक्त निमित्तमात्र आहोत हे सुद्धा श्रीकृष्णाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले. आता पुढे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की द्रोण, भीष्माचार्य,
जयद्रथ आणि कर्ण तसेच इतर अनेक माझ्याकडून मारल्या गेलेल्या योद्ध्यांना तू मार आणि त्याचा पश्चात्ताप करू नकोस. तू फक्त युद्ध कर तू शत्रूंवर विजय मिळवशील.
सञ्जय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य।।11.35।।
सञ्जय उवाच - केशवस्य एतत् वचनम् श्रुत्वा,
किरीटी कृत-अञ्जलिः वेपमानः नमस्कृत्वा भूयः एव भीत-भीतः, प्रणम्य कृष्णम् सगद्गदम् आह।
सञ्जय उवाच -संजय म्हणाले
केशवस्य केशवाचे केशव पु. ष. ए. व.
एतत् हे एतद् नपु. द्वि. ए. व.
वचनम् वचन नपु. द्वि. ए. व.
श्रुत्वा, ऐकून श्रु धातू ऐकणे क्त्वा
किरीटी किरीटधारी अर्जुनाने किरीटिन् पु. प्र. ए. व.
कृत-अञ्जलिः (हाताची) ओंजळ करून, हात जोडून कृतः अन्जलिः प्र. ए. व.
वेपमानः (भयाने) कंपित झालेल्या वेप् धातू शानच प्र. ए. व.
नमस्कृत्वा नमस्कार करून नमः कृत्वा कृ धातू करणे क्त्वा
भूयः एव
पुन्हा एकदा
भीत-भीतः,अत्यंत भयभीत भीत्या भीतः प्र ए. व.
प्रणम्य प्रणाम करून प्र +नम् धातू वंदन करणे ल्यप प्रत्यय
कृष्णम् कृष्णांना कृष्ण पु. द्वि. ए. व.
सगद्गदम् गदगदून गद्गदेन सह
आह म्हटले ब्रू धातू बोलणे लट
लकार प्र. पु. ए. व.
श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचे संवाद संजय पहात आहे आणि त्याचे वर्णन तो धृतराष्ट्राला सांगत आहे. धृतराष्ट्राशी बोलताना संजयाने अर्जुनाचा किरीटी असा सूचक उल्लेख केलेला दिसतो. किरीट म्हणजे मुकुट. इन्द्राने प्रसन्न होऊन अर्जुनाला मुकुट दिल्याने त्याचे नाव किरीटी असे पडले. संजय धृतराष्ट्राला असे सांगतो की (आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) केशवाचे असे वचन ऐकून अत्यंत भयभीत अशा
(भयाने) कंपित झालेल्या किरीटी ने
हात जोडून त्याने श्रीकृष्णाला पुन्हा नमस्कार केला आणि गदगदलेल्या वाणीने म्हणाला.
अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव
प्रकीर्त्या
जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः।।11.36।।
अर्जुन उवाच - हे हृषीकेश! स्थाने, तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यति, अनुरज्यते च, भीतानि रक्षांसि दिशः द्रवन्ति, सर्वे सिद्ध-सङ्घाः च नमस्यन्ति।
अर्जुन उवाच - अर्जुन म्हणाला
हे हृषीकेश! हृषीकाणामीशः इति हृषीकेशः इन्द्रियांचा स्वामी हृषीक इन्द्रिय
स्थाने ( सर्व)
यथोचित
तव आपले युष्मद् ष. ए. व.
प्रकीर्त्या यश
प्रकिर्ति स्त्री. तृ. ए. व.
जगत् सारे जग जगत् नपु. प्र. ए. व.
प्रहृष्यति हर्षित होणे प्र +हृष् धातू संतोष होणे लट
लकार प्र. पु. ए. व.
अनुरज्यते आकृष्ट होणे, अनुरक्त होणे अनु+रञ्ज् लट
लकार प्र. पु. ए. व.
च,
भीतानि भयभीत भी
धातू क्त नपु. प्र. ब. व.
रक्षांसि राक्षस लोक रक्षस् नपु. प्र. ए. व.
दिशः सर्व दिशा दिश् स्त्री. द्वि. ब. व.
द्रवन्ति द्रु धातू जाणे प्र. ब. व.
सर्वे सर्व प्र.ब.व.
सिद्ध-सङ्घाः सिद्ध पुरुष सिद्धानां सडःघाः प्र. ब. व.
च
नमस्यन्ति नमस्कार करतात नमस् धातू लट
लकार तृ. पु. ब. व.
अर्जुन म्हणाला
हे हृषीकेश हे अगदीच योग्य आहे की आपल्या किर्तीने सारे जग
उल्लासित होतात आपल्या कडे आकृष्ट होतात. आणि भयभीत राक्षसलोक सर्व दिशांना पळून जातात तर
सिद्धी प्राप्त झालेले लोक आपल्याला नमस्कार करतात.
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्।।11.37।।
हे महात्मन् ! आदि-कर्त्रे ब्रह्मणः अपि गरीयसे च, ते कस्मात् न नमेरन्, हे अनन्त ! देवेश ! जगत्-निवास ! यत् सत् असत् तत् परं अक्षरम् त्वम्।
हे महात्मन् ! हे महात्मा सं ए. व.
आदि-कर्त्रे मूळ कर्ता आदिकर्तृ ( वि) च. ए. व.
ब्रह्मणः ब्रह्मदेव
ब्रहमन् पु. पं. ए. व.
अपि सुद्धा
गरीयसे गुरूंचे गुरू गुरू गरीयस् पुं. च. ए. व.
च, सुद्धा
ते आपले युष्मद् ष एव
कस्मात् कसे
न
नमेरन् वंदन केले पाहिजे नम् धातू वंदन करणे विधीलिडःग प्र. पु. ब. व.
हे अनन्त अन्त नाही असे अनन्त सं. ए. व.
देवेश देवांचे ईश्वर देवानाम् ईशः सं. ए. व.
जगत्-निवास जगाचे आश्रयदाते जगतः निवासः सं
ए.
व.
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
सत् असत् तत् परं व्यक्त अव्यक्त च्या पलिकडे सत् च असत् च तस्य परम्
अक्षरम् अविनाशी न क्षरः अक्षर प्र. ए. व.
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
आधीच्या श्लोकापासून अर्जुन श्रीभगवानकृष्णांची स्तुती करत आहे. अनेक विशेषणांचा वापर करून आपल्याला श्रीभगवानकृष्णांची ओळख करून दिली आहे.
अनन्त म्हणजे ज्याचा अन्त नाही असा.
अक्षर म्हणजे ज्याचे परीवर्तन होत नाही असा.
सदसत्तत्परं म्हणजे सत्य आणि असत्य च्या पलिकडे असलेला.
गरीयसे म्हणजे गुरूंचाही गुरू.
जगन्निवास, देवेश, महात्मा आणि ब्रह्मदेवांचा सुद्धा कर्ता, ते आपल्याला नमस्कार कसे नाही करणार?
त्वमादिदेवः पुरुषः पुराण
स्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप।।11.38।।
त्वम् आदिदेवः, पुराणः च पुरुषः, त्वम् अस्य विश्वस्य परम् निधानम्, वेत्ता, वेद्यम्, परम् धाम च असि। हे अनन्त-रूप ! त्वया विश्वम् ततम्।
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
आदिदेवः, मूळ परमेश्वर आदिदेव पु. प्र. ए. व.
पुराणः प्राचीन पुराण पु. प्र. ए. व.
च सुद्धा
पुरुषः, पुरूष पु. प्र. ए. व.
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
अस्य ह्या इदं पु. ष. ए. व.
विश्वस्य विश्वाचे विश्व नपु. ष. ए. व.
परम् श्रेष्ठ पर नपु. प्र. ए. व.
निधानम्, आश्रय स्थळ निधान नपु. प्र. ए. व.
वेत्ता, जाणणारा वेतृ पु. प्र. ए. व.
वेद्यम्, जाणून घेण्या योग्य विद् धातू जाणणे वेद्य यत् नपु. प्र. ए. व.
परमधाम श्रेष्ठ वास पर नपु. प्र. ए. व. धाम धामन् नपु. प्र. ए. व.
च आणि
असि आहात अस् धातू असणे लट
लकार मपु. ए. व.
हे अनन्त-रूप ! अनन्तानि रूपाणि यस्य सः
त्वया आपल्यामुळे
युष्मद् तृ. ए. व.
विश्वम् विश्व नपु. प्र. ए. व.
ततम् व्यापले आहे
तन् धातू पसरणे क्त. नपु. प्र. ए. व.
अर्जुन ह्या श्लोकात सुद्धा श्रीभगवानकृष्णांचे गुणवैशिष्ट्ये सांगत आहे. त्यासाठी पुढील विशेषणे वापरली आहेत. ती अशी, आदी देव, पुराण पुरूष.
आधीच्या श्लोकात सत् आणि असत् ह्या शब्दांचा उल्लेख वाचायला मिळतो. म्हणजेच ह्या श्लोकातील विश्व ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा फक्त मूर्त स्वरूप असा घेऊन चालणार नाही.
सांख्य वादाच्या तत्वज्ञानानुसार पुरूष आणि प्रकृती पासून निर्माण झालेले हे जग, माणूस म्हणजे फक्त शरीर नसून मन, बुद्धी अहंकार ही
अंगे सुद्धा सारखीच महत्त्वाची.
अद्वैतवादाच्या अंगाने विचार केल्यास ह्या श्लोकातील वैद्यम् हा शब्द महत्त्वाचा. हा शब्द आत्म्यासाठी वापरला आहे.
स्वतः भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञानी आहेत तर आत्मा हा त्यांचाच अंश, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे.
ईश्वरः परमः कृष्णः सचिदानंद विग्रहः अनादिरादी गोविन्दः सर्वकारणकरणम् (ब्रह्मसंहिता-5.1)
श्रीकृष्ण परमात्म्याचे मूळ स्वरूप आहे. सर्वज्ञाता आणि परमानंद असे सर्व गोष्टींना कारणीभूत पण स्वतः कारणरहीत आहेत.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
आपणच आदीदेव आणि पुराण पुरूष आहात. आपणच अनन्त रूपी जगव्याप्त, ह्या सर्व संसाराचे आश्रयस्थान, परमधाम, सर्व काही जाणणारे आणि जाणण्या-योग्य असे आहात.
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते।।11.39।।
त्वम् वायुः यमः अग्निः वरुणः शशाङ्कः प्रजापतिः प्रपितामहः च ते सहस्र-कृत्वः, नमः नमः, अस्तु पुनः अपि भूयः नमः नमः ते।
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
वायुः वायु पु. प्र. ए. व.
यमः यम पु. प्र. ए. व.
अग्निः अग्नि पु. प्र. ए. व.
वरुणः वरूण पु. प्र. ए. व.
शशाङ्कः चंद्र शशांक पु. प्र. ए. व.
प्रजापतिः दक्ष प्रजानाम पतिः प्र. ए. व.
प्रपितामहः ब्रह्मदेवाचे पिता प्रपितामह पु. प्र. ए. व.
च
ते आपल्याला युष्मद् च. ए. व.
सहस्र-कृत्वः, सहस्रः कृत्वस्
नमः नमः,
अस्तु असो
पुनः
अपि सुद्धा
भूयः वारंवार
नमः नमः
ते आपल्याला युष्मद् च. ए. व.
ह्या श्लोकाचा अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की महर्षी व्यासांना आपल्या जन्म आणि मृत्यू शी
निगडित गोष्टींबद्दल सांगायचे आहे.
बहुतेक सर्व शब्दांचे अर्थ माहीत आहेतच. आपल्या आयुष्यातील अत्यावश्यक गोष्टी जसे प्राणवायू, पाणी आणि अग्नी. तसेच प्रजेला उत्पन्न करणारे दक्ष प्रजापती, ब्रह्मदेवांना प्रगट करणारे प्रपितामह आणि यमराज. ह्याशिवाय चन्द्राचा सुद्धा उल्लेख केला आहे. चन्द्र स्नान, चन्द्र नमस्कार शशांकासन, चन्द्रभेदी प्राणायाम ह्या सर्व गोष्टींचे फायदे वाचायला मिळतात. शिवाय औषधि वनस्पतींचे पोषक असा चन्द्र अशी मान्यता आहे.
श्रीभगवानकृष्णांची वैविध्यपूर्ण रूपे पाहिल्यावर जो
अपार आदरभाव अर्जुनाच्या मनात निर्माण झाला आहे तो दर्शविण्यासाठी सहस्त्र कृत्वः नमः असा शब्द वापरला आहे.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की
आपण वायू, यम अग्नी, जलदेवता, चंद्र, प्रजापति आणि ब्रह्मदेवाचे पिता आहात. आपल्याला हजारवेळा नमस्कार आणि वारंवार नमस्कार असो.
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं
सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः।।11.40।।
ते पुरस्तात् अथ पृष्ठतः नमः। हे सर्व ! ते सर्वतः एव नमः अस्तु। हे अनन्त-वीर्य ! त्वम् अमित-विक्रमः सर्वम् समाप्नोषि ततः सर्वः असि।
ते आपल्याला युष्मद् च. ए. व.
पुरस्तात् समोर पूर्व दिशेला पूर्व +अस्ताति
अथ आरंभ
पृष्ठतः मागून
नमः।
हे सर्व !
ते
सर्वतः
एव
नमः
अस्तु असो
हे अनन्त-वीर्य ! बलवान
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
अमित-विक्रमः अत्यंत पराक्रमी अ+मित मा
धातू मोजणे क्त प्रत्यय
सर्वम्
समाप्नोषि सर्वव्यापी सम +आप्नोषि आप
धातू व्यापणे म. पु. ए. व.
ततः म्हणून
सर्वः
असि अस् धातू असणे लट लकार म. पु. ए. व.
अजूनही अर्जुन भारावलेल्या अवस्थेतच आहे म्हणून तो पुढे असे म्हणतो की
हे अनन्त शक्तिंचे स्वामी, अपार पराक्रमी आपल्याला समोरून नमस्कार, पाठीमागून नमस्कार. आपण सर्वव्यापक आहात, सर्व काही आपणच.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे
यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि।।11.41।।
तव इदम् महिमानम् अजानता सखा इति मत्वा प्रणयेन प्रमादात् वा अपि मया 'हे कृष्ण! हे यादव, हे सखा !' इति यत् प्रसभम् उक्तम् च।
तव आपले युष्मद् षष्ठी ए. व.
इदम् हा इदम् द्वि. ए. व.
महिमानम् महिमा महिमन् पु. द्वि. ए. व.
अजानता न जाणता न+जानत् शतृ प्रत्यय ज्ञा धातू जाणणे
सखा मित्र सखि पु. प्र. ए. व.
इति म्हणून
मत्वा समजून मन् धातू समजणे क्त्वा प्रत्यय
प्रणयेन प्रेमाने प्रणय पु. तृ. ए. व.
प्रमादात् बेजबाबदारपणे प्रमाद पु. पं. ए. व.
वा अथवा
अपि सुद्धा
मया माझ्या अस्मद् तृ. ए. व.
'हे कृष्ण!
हे यादव,
हे सखा !'
इति
यत् जो यद् नपु. प्र. ए. व.
प्रसभम् अतिरेक अव्यय
उक्तम् म्हटले आहे ब्रू धातू बोलणे क्त प्रत्यय प्र. ए. व.
च।
उपलब्ध साहित्यानुसार कृष्ण आणि अर्जुनाची पहिली भेट कंस वधानंतर जेव्हा कृष्ण सांदीपनि ऋषींच्या आश्रमात जाण्याचे ठरवितो, त्यापूर्वी झालेल्या उपनयन विधी च्या वेळी झाली. काही मतप्रवाहाप्रमाणे त्या दोघांची प्रथम भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झाली. युद्धाच्या वेळी श्रीभगवानकृष्णांचे वय 90 च्या पुढे होते असे म्हणतात..
ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला
हे कृष्ण, हे यादव, हे सखा असे संबोधत आहे.
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा एखादा पैलू आपल्याला माहीत असतो, त्यानंतर अचानक त्या व्यक्तीचे आणखी पैलू समजल्यानंतर आपण मनोमन खजील होतो कारण इतके दिवस आपण त्या व्यक्तीस योग्य मान दिला नाही असे वाटत राहते. हीच मनःस्थिती अर्जुनाची झाली आहे.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
आपल्या विराट स्वरूपाबद्दल अनभिज्ञ असल्याने आपल्याला मित्र समजून कधी प्रेमाने तर कधी अनावधानाने, जास्त सलगी दाखवून मी
आपल्याला हे कृष्ण, हे यादव, हे सखा असे म्हटले
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्।।11.42।।
हे अच्युत ! यत् अवहासार्थम् विहार-शय्या-आसन-भोजनेषु एकः अथवा तत् समक्षम्
अपि असत्कृतः असि तत् अप्रमेयम्
त्वाम्
अहम्
क्षामये।
हे अच्युत !
यत् जे यद् नपु प्र ए. व.
अवहासार्थम् चेष्टा मस्करी उपहास हस् धातू हसणे अवहासाय इदं प्र. ए. व.
विहार-शय्या-आसन-भोजनेषु फिरता, झोपता, बसता, जेवता ना,
विहारः च शय्या च आसनं च भोजनं च स. ब. व.
एकः एकः प्र. ए. व.
अथवा अव्यय
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
समक्षम् अव्यय
अपि सुद्धा
असत्कृतः अवहेलना असत् कृतः प्र. ए. व.
असि आहे अस् धातू असणे लट
लकार मपु. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
अप्रमेयम् मोजता न येणारा अप्रमेय पु. द्वि. ए. व. प्र +मा धातू मोजणे
त्वाम् आपले युष्मद् द्वि. ए. व.
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
क्षामये (मला) क्षमा करावी क्षम् धातू णिच प्रत्यय लट लकार उ. पु. ए. व.
ह्या श्लोकात अच्युत असे संबोधन श्रीभगवानकृष्णांसाठी वापरले आहे. च्युत् धातू पडणे. अच्युत म्हणजे ज्याचे स्थान स्थिर आहे असा. पश्चाताप झालेला असा अर्जुन पुढे असे म्हणतो आहे की
हे अच्युत आपल्या बरोबर उठता बसता झोपता जेवताना फिरताना, चेष्टा मस्करी च्या नादात एकटे असताना आणि इतरांसमोर जे
काही अगणित अपमान झाले आहेत त्यासाठी आपल्याकडून माफी असावी..
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव।।11.43।।
त्वम् अस्य चर-अचरस्य लोकस्य पिता, गरीयान् गुरुः पूज्यः च असि, अप्रतिम-प्रभाव! लोक-त्रये त्वत् समः अपि न अस्ति, अन्यः अभ्यधिकः कुतः?
त्वम् आपण युष्मद् प्र. ए. व.
अस्य ह्या इदम् ष. ए. व.
चर-अचरस्य चराचर चरं च अचरं च ष. ए. व.
लोकस्य लोकांचे लोक पु. ष. ए. व.
पिता, पितृ पु. प्र. ए. व.
गरीयान् महान गुरु अतिशयेन गुरुः गुरु+इयसुन प्र. ए. व.
गुरुः गुरु पु. प्र. ए. व.
पूज्यः पूजा करण्यायोग्य पूज् धातू यत् प्र. ए. व.
च असि, आहात अस् धातू असणे लट
लकार मपु. ए. व.
अप्रतिम-प्रभाव! अतुल्य अप्रतिमः प्रभावः यस्य सः सं. ए. व.
लोक-त्रये तिन्ही लोकांत त्रयः लोकाः स. ए. व.
त्वत् समः आपल्यासारखे तव
समः प्र. ए. व.
अपि
न अस्ति, नाही आहे अस् धातू असणे लट लकार प्र.पु.ए.व.
अन्यः इतर अन्य प्र. ए. व.
अभ्यधिकः वरचढ अभ्यधिक वि. प्र. ए. व.
कुतः? कसे?
आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांची नव्याने ओळख झाल्याने खजिल झालेला अर्जुन आता त्यांची स्तुती करत आहे. सत् आणि असत्, तसेच विश्वस्य परं निधानम् असे उल्लेख आपण वाचले. आता चराचरस्य लोकस्य पिता असा उल्लेख ह्या श्लोकात केला आहे.
जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञः स्वराट्
तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः।
तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोऽमृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि।। श्रीमद्भागवतम् 1.1.1
न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते।
परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया। श्वेताश्वतरोपनिषद्-6.8
श्रीभगवानकृष्णांचे सार्थ वर्णन करणारे हे
श्लोक.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
आपण ह्या चराचर सृष्टिचे जन्मदाते आहात. महान गुरु, अतुलनीय असे सर्वोच्चपदस्थ आहात. तिनही लोकांत आपल्यासारखे कोणीही नाही मग आपल्यापेक्षा वरचढ कोणी कसे असू शकेल?
तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम्।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्।।11.44।।
तस्मात् अहम् प्रणम्य, कायम् प्रणिधाय, ईड्यम् ईशम् त्वाम् प्रसादये, हे देव ! पिता इव पुत्रस्य, सखा इव
सख्युः,
प्रियः प्रियायाः सोढुम् अर्हसि।।
तस्मात् अव्यय म्हणून
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
प्रणम्य, प्रणाम करून प्र +नम् धातू वंदन करणे ल्यप प्रत्यय
कायम् शरीर काय पु. द्वि. ए. व.
प्रणिधाय, खाली वाकून प्र +नि +धा धातू धारण करणे ल्यप प्रत्यय
नि+धा वरच्या स्तरावर धारण करणे
प्र म्हणजे मुख्य
ईड्यम् आळवणी करून ईड् धातू प्रार्थना करणे स्तुती करणे यत् पु. द्वि. ए. व.
ईशम् देव ईश
पु.
द्वि.
ए.
व.
त्वाम् आपण युष्मद् द्वि. ए. व.
प्रसादये, प्रसन्न करू इच्छितो प्र +सद् सुखी होणे सद् धातू शक्तिहीन होणे णिच् प्रत्यय उ. पु. ए. व.
हे देव ! देव पु. सं. ए. व.
पिता पितृ पु. ए. व.
इव
पुत्रस्य, पुत्र पु. ष. ए. व.
सखा सखि पु. प्र. ए. व.
इव
सख्युः, मित्राचा सखि पु. ष. ए. व.
प्रियः प्रिय व्यक्ती प्रिय पु. प्र. ए. व.
प्रियायाः प्रिय व्यक्तीचे प्रिय पु. च. ए. व.
सोढुम् माफ करून सह् धातू सहन करणे तुमुन्
अर्हसि केले पाहिजे अर्ह धातू योग्य असणे लट लकार मपु. ए. व.
हा श्लोक वाचला कि एका सुभाषिताची सहाजिकच आठवण होते.
‘‘अतिपरिचयात अवज्ञा संततगमनादनादरो भवति मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठमिन्धनं कुरुते’’.
नात्यात जवळीक जास्त असली की कधी चेष्टामस्करी म्हणून, कधी अनावधानाने, कधी आपली हतबलता व्यक्त करताना आपल्याकडून त्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो. जसे लहान मुलगा वडीलांच्या मांडीवर बसून दाढीमिशा ओढेल. कोणी आपल्या मित्रावर आपल्या मनात साठलेला राग काढून मोकळा होईल..अर्जुनाला सुद्धा कृष्णाबरोबर घालवलेले क्षण आठवत आहेत.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
म्हणूनच साष्टांग दंडवत करून, ईश्वराची स्तुती करून मी आपल्याला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, हे देवा जसे वडील आपल्या मुलाकडून झालेले, मित्र आपल्या मित्राकडून झालेले आणि प्रिय व्यक्तीकडून झालेले अपमान प्रिय व्यक्ती सहन करते तसेच आपणही मला माफ करून टाकावे.
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास।।11.45।।
अदृष्ट-पूर्वम् दृष्ट्वा हृषितः अस्मि भयेन च मे
मनः प्रव्यथितम् हे देव! तत् रूपम् एव मे दर्शय देवेश! जगत्-निवास! प्रसीद ।
अदृष्ट-पूर्वम् आधी न पाहिलेले अदृष्टपूर्वं नपु. द्वि. ए. व. दृष्ट्वा दृश् धातू पाहणे क्त्वा प्रत्यय
हृषितः हर्षित हृषितः हृष् धातू संतुष्ट होणे क्त प्र. ए. व.
अस्मि होत आहे अस् धातू असणे लट लकार उ. पु. ए. व.
भयेन भीतीने भय
नपु.
तृ.
ए.
व.
च सुद्धा
मे माझे अस्मद् ष. ए. व.
मनः मन मनस् नपु. प्र. ए. व.
प्रव्यथितम् व्यथित होत आहे प्र +व्यथ् धातू क्त प्र. ए. व.
देव!
तत् एव तेच
तद् नपु. प्र. ए. व.
रूपम् रुप नपु. द्वि. ए. व.
मे
मला अस्मद् ष. ए. व.
दर्शय दाखवावे दृश् धातू णिच प्रत्यय लोट लकार म. पु.ए.व.
देवेश! देवानां ईशः सं. ए. व.
जगत्-निवास! जगतः निवासः सं. ए. व.
प्रसीद कृपा करा प्र +सद् धातू लोट लकार म. पु. ए. व.
11 व्या अध्यायात श्रीभगवानकृष्णांची विविध रूपे आणि त्यातून निर्माण होणारे निरनिराळे भाव आणि रस
ह्यांची वर्णने वाचली. 20 व्या श्लोकात दाही दिशांना, स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत व्यापून टाकलेले अदभूत रूप.
23-25 व्या श्लोकात वर्णन केलेले बिभत्सरूप, 30 -
32 व्या श्लोकात वर्णन केलेले संहारक असे रौद्ररूप, आणि अर्जुनाला स्मरणात असलेले श्रीभगवानकृष्णांचे सौहार्दपूर्ण वर्तन, प्रेमळ सहवास, वेळप्रसंगी त्यांच्याशी केलेली चेष्टामस्करी.
भक्त प्रल्हादांनी भक्तिचे नवधा प्रकार सांगितले. प्रत्येक भक्ताच्या मनात परमेश्वराच्या प्रती निरनिराळे भाव असतात, ज्याचे सात्विक राजसि तामसि आणि निर्गुण असे वर्गीकरण करता येते.
अगदी तंत्र आणि अघोरी विद्या प्राप्त केलेले सुद्धा त्या त्या देवतांचे निस्सीम भक्त असतात.
भारतीय संस्कृती मध्ये आपापल्या आवडीनुसार देव निवडण्याची मुभा आहे.
अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांच्या सर्व रूपांचे दर्शन झाले. मुळात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाचे प्रिय सखा आहेत.
म्हणूनच ह्या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणतो आहे की
मी आपले आधी न पाहिलेले (विराट) रूप पाहून आनंदी झालो आहे आणि भयभीत सुद्धा. माझे मन व्यथित झाले आहे. म्हणूनच हे
देवेश,
हे जगन्नाथ आपले सात्विक रूप मला दाखवून माझ्यावर प्रसन्न व्हा.
किरीटिनं गदिनं चक्रहस्त
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते।।11.46।।
अहम् तथा एव किरीटिनम् गदिनम् चक्र-हस्तम् त्वाम् द्रष्टुम्
इच्छामि,
हे विश्व-मूर्ते! सहस्र-बाहो! तेन चतुः-भुजेन रूपेण एव भव।
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
तथा एव तसेच अव्यय
किरीटिनम् मुकुट किरीटिन् पु द्वि. ए. व.
गदिनम् गदाधारी गदिन् पु. द्वि. ए. व.
चक्र-हस्तम् हातात चक्र चक्रं हस्ते यस्य सः द्वि. ए. व.
त्वाम् आपले युष्मद् पु. द्वि. ए. व.
द्रष्टुम् पाहू दृश् धातू तुमुन्
इच्छामि, इच्छितो इष् धातू लट लकार उ. पु. ए. व.
विश्व-मूर्ते! विश्वस्वरूप विश्वस्य मूर्तिः सं ए. व.
सहस्र-बाहो! सहस्र-बाहू असणारे सहस्त्रः बाहवः यस्य सः
सं.
ए.
व.
तेन एव तेच
तद् नपु. तृ. ए. व.
चतुः-भुजेन चार भुजा असलेले चतस्त्रः भुजाः यस्य सः पु. तृ. ए. व.
रूपेण रूप नपु. तृ. ए. व.
भव होवो. भू धातू होणे लोट लकार म. पु. ए. व.
ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना, त्यांनी कोणते रूप धारण करावे ते सुचवत आहे. हिंदू धर्माची हिच तर
खासियत आहे. आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या स्वभावानुसार आपल्या देवांची निवड करून, भक्ती करू शकतो.
आपल्या मनात परमेश्वराच्या प्रती आदर असतो पण भीती वाटलीच पाहिजे असे काही नाही. भक्त देवापुढे साकडे घालू शकतो, हट्ट करू शकतो. हनुमान हे श्रीरामाचे दास तर अर्जुन श्रीकृष्णाचा सखा, संत मीराबाईंचे नाते वेगळेच.
आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन पुढे अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे म्हणतो आहे की
हे विश्वस्वरूप,
हे सहस्त्रबाहो मी आपले (डोक्यावर)
मुकुट धारण केलेली, हातात शंख चक्र धारण केलेले असेच रूप पाहू इच्छितो. तर आपण चारभुजा असलेल्या रूपात प्रकट व्हावे.
श्री भगवानुवाच
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात्।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्।।11.47।।
श्रीभगवानुवाच - हे अर्जुन! प्रसन्नेन मया आत्म-योगात् इदम् मे परम् तेजोमयम्
आद्यम्
अनन्तम्
विश्वम्
रूपम्
तव दर्शितम् यत् त्वत् अन्येन न दृष्ट-पूर्वम्
।
श्रीभगवानुवाच -
हे अर्जुन!
प्रसन्नेन प्रसन्न होऊन प्र +सद् धातू क्त पु. तृ. ए. व.
मया माझ्या कडून अस्मद् तृ. ए. व.
आत्म-योगात् स्वतः च्या सामर्थ्याने आत्मनः योगः आत्मयोगः पं. ए. व.
इदम् हे इदं प्र. ए. व.
मे माझे अस्मद् ष. ए. व.
परम् श्रेष्ठ पर नपु. प्र. ए. व.
तेजोमयम् तेजस्वी तेजोमय (वि) नपु. प्र. ए. व.
आद्यम् मूळ आद्य (वि) नपु. प्र. ए. व.
अनन्तम् अमर्याद अनन्त (वि) नपु. प्र. ए. व.
विश्वम् विश्व नपु. प्र. ए. व.
रूपम् रूप नपु. प्र. ए. व.
तव तुला युष्मद् (सर्व) ष. ए. व.
दर्शितम् दाखवले दृश् धातू क्त प्रत्यय प्र. ए. व.
यत् ते यद् नपु. प्र. ए. व.
त्वत् अन्येन तुझ्या शिवाय त्वत्तः अन्यः तृ. ए. व.
न दृष्ट-पूर्वम् आधी पाहिले नाही दृष्टपूर्व प्र. ए. व.
ह्या श्लोकात आत्मयोग असा शब्द वापरला आहे. योग शब्दाच्या व्याख्येनुसार आत्मयोग ह्या शब्दाचा अर्थ कसा लावायचा, तेही भगवंतांना उद्देशून? आधीच्या अध्यायांमधील काही श्लोकात अर्जुनाला दिव्यदृष्टी प्राप्त झाली असा उल्लेख आहे. जी श्रीभगवानकृष्णांच्या योग सामर्थ्याने मिळाली. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
हे अर्जुन तुझ्यावर प्रसन्न होऊन, माझ्या योगसामर्थ्याने माझे श्रेष्ठ,
तेजस्वी,
मूळ रूप, अमर्याद विश्वरूप दाखवले ते तुझ्या शिवाय इतर कोणीही पाहिलेले नाही.
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानै
र्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।
एवंरूपः शक्य अहं नृलोके
द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर।।11.48।।
हे कुरु-प्रवीर ! नृ-लोके न वेद-यज्ञ-अध्ययनैः,
न दानैः, न क्रियाभिः, न उग्रैः तपोभिः च न त्वत् अन्येन एवंरूपः अहम् द्रष्टुम् शक्यः।
हे कुरु-प्रवीर ! कुरूंमधील श्रेष्ठ वीर
कुरूणां प्रमुखः वीरः
प्रवीर कुशल योद्धा
वीर धातू पराक्रमी असणे
नृ-लोके मनुष्यलोकांत
नृणाम् लोकः स. ए. व.
न नाही
वेद-यज्ञ-अध्ययनैः, वेदांचे अध्ययन आणि यज्ञ अनुष्ठानाने वेदः च यज्ञः च अध्ययनं च तृ ब. व.
न दानैः, दान नपु. तृ. ब. व.
न
क्रियाभिः, कर्मकांडांनी
क्रिया स्त्री. तृ. ब. व.
न
उग्रैः कठोर उग्र (वि) नपु. तृ. ब. व.
तपोभिः तपस्या करून तपस् नपु. तृ. ब. व.
च
न त्वत् अन्येन तुझ्या शिवाय इतर कोणीही नाही त्वत् अन्यः तेन तृ. ए. व.
एवंरूपः अशा प्रकारे (विश्व) रूप धारण केलेला एवं रूपं यस्य सः
प्र.
ए.
व.
अहम् मी अस्मद् प्र ए. व.
द्रष्टुम् पाहिले जाणे दृश् धातू पाहणे तुमुन्
शक्यः समर्थ शक् धातू यत् पु. प्र. ए. व.
ह्या अध्यायात व्यास ऋषींना नेमके काय सुचवायचे आहे? महाभारताच्या आधी लोक कोणत्या देवांना पूजायचे? श्रीविष्णूंच्या दहा अवतारांपैकी श्रीभगवानकृष्णांच्या आधी झालेले अवतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम आणि राम. ह्या सर्वांची देवळे अस्तित्वात होती का? त्यांची पूजा केली जात होती का?
ऋग्वेदात अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा, द्यावापृथिवी,
मरुत,
मित्रावरुण,
पूषा,
ब्रह्मणस्पती,
वरुण,
सूर्य,
अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते. म्हणजेच पंचमहाभूतांचे वर्णन आहे असे म्हणायला हरकत नाही. हे सर्व आधीच्या अध्यायांमधे आपण वाचले आहे. व्यास महर्षींना असे श्रीभगवानकृष्णांचे रूप उलगडून का
सांगावेसे वाटले असावे? आधीच्या श्लोकात आत्मयोग शब्दाचा आधीच वापर केला आहे. आता कर्मकांडाचे महत्त्व फारसे नाही असे सांगत, अद्वैतवाद सांगत आहेत असे वाटते. हे सर्व विचार मनात ठेऊन ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे श्रेष्ठ योद्धा माझे असे विश्वरूप ह्या मनुष्यलोकांत ना वेदाभ्यास करून, ना यज्ञाचे अनुष्ठान करून, ना कर्मकांड, दानधर्म करून ना उग्र तप
करून इतर कोणी पाहिले आहे जे तू
पाहिले आहेस.
मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य।।11.49।।
मम ईदृक् इदम् घोरम् रूपम् दृष्ट्वा ते
व्यथा मा, विमूढ-भावः च मा
। त्वम् व्यपेत-भीः प्रीत-मनाः तत् एव मे इदम् रूपम् पुनः प्रपश्य।
मम माझे अस्मद् ष. ए. व.
ईदृक् अशा प्रकारचे ईदृश् (वि) द्वि ए. व.
इदम् हे इदम् नपु. द्वि. ए. व.
घोरम् घोर नपु. द्वि. ए. व.
रूपम् रूप नपु. द्वि. ए. व.
दृष्ट्वा पाहून दृश् धातू पाहणे क्त्वा
ते तू युष्मद् च. ए. व.
व्यथा व्यथित व्यथ् धातू क्षुब्ध होणे
मा, नको
विमूढ-भावः मोहित अवस्था विमूढाः भावाः यस्य सः वि +मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे क्त प्रत्यय प्र. ए. व.
च आणि
मा । नको
त्वम् तुझे युष्मद् प्र. ए. व.
व्यपेत-भीः भयमुक्त भी भीती वि +अप् +इ धातू जाणे, अप +इ=निघून जाणे
प्रीत-मनाः प्रसन्न चित्त प्रीतमनस् प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
एव सुद्धा
मे माझे अस्मद् च. ए. व.
इदम् हे नपु. द्वि. ए. व.
रूपम् रूप नपु. द्वि. ए. व.
पुनः
प्रपश्य पाहून घे प्र+दृश् धातू लोट लकार म.पु.ए.व.
(आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) पुढे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की माझे हे
असे अघोरी रूप पाहून तू व्यथित होऊ नकोस आणि दिडमूढ होऊ नकोस. तर भयमुक्त होऊन, प्रसन्न मनाने माझे पुन्हा (चतुर्भुज) रूप पाहून घे.
सञ्जय उवाच
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः।
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा।।11.50।।
सञ्जय उवाच - वासुदेवः अर्जुनम् इति उक्त्वा भूयः तथा स्वकम् रूपम् दर्शयामास । पुनः च महात्मा सौम्य-वपुः भूत्वा, भीतम् एनम् आश्वासयामास।
सञ्जय उवाच - संजय म्हणाला
ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र. पु. ए. व.
वासुदेवः
अर्जुनम्
इति अव्यय
उक्त्वा ब्रू धातू बोलणे क्त्वा
भूयः पुन्हा अव्यय
तथा त्याप्रमाणे अव्यय
स्वकम् स्वतःचे स्वक द्वि. ए. व.
रूपम् रूप द्वि. ए. व.
दर्शयामास दाखवले दृश् धातू पाहणे लिट लकार प्र. पु. ए. व.
पुनः पुन्हा
च
महात्मा महान आत्मा यस्य सः
सौम्य-वपुः सौम्य रूप सौम्यं वपुः नपु. प्र. ए. व.
भूत्वा, धारण करून भू
धातू क्त्वा प्रत्यय
भीतम् भयभीत भी धातू क्त द्वि. ए. व.
एनम् त्या इदम् पु. द्वि. ए. व.
आश्वासयामास आश्वासन दिले आ+श्वस् धातू समाधान करणे श्वस् धातू श्वास घेणे लिट लकार प्र. पु. ए. व.
आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुना मध्ये घडलेल्या प्रसंगाचे वर्णन संजय धृतराष्ट्राला कथन करत आहे.
संजय (धृतराष्ट्राला) म्हणाले की
भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे (आधीचा श्लोक) सांगून पुन्हा आपले स्वतःचे रूप दाखवले. सौम्यरूपातील महात्म्याने भयभीत असलेल्या त्याला अश्वस्त केले.
अर्जुन उवाच
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तवसौम्यं जनार्दन।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः।।11.51।।
अर्जुन उवाच - हे जनार्दन ! तव इदम् सौम्यम् मानुषम् रूपम् दृष्ट्वा इदानीम् सचेताः संवृत्तः प्रकृतिम् गतः अस्मि ।
अर्जुन उवाच - ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र. पु. ए. व.
हे जनार्दन ! लोकांना मुक्ती देणारा जनान् अर्दयति सं. ए. व. अर्द धातू मारणे
तव आपल्या युष्मद् (सर्व) ष. ए. व.
इदम् हे नपु. द्वि. ए. व.
सौम्यम् सौम्य (वि) नपु. द्वि. ए. व.
मानुषम् मनुष्य मानुष द्वि. ए. व.
रूपम् रूप नपु. द्वि. ए. व.
दृष्ट्वा पाहून दृश् धातू पाहणे क्त्वा
इदानीम् आता अव्यय
सचेताः चेतनायुक्त सचेतस् पु. प्र. ए. व.
संवृत्तः स्थिर होणे सं+वृत् धातू प्रवृत्त होणे क्त प्र. ए. व.
प्रकृतिम् प्रकृति स्त्री द्वि. ए. व.
गतः प्राप्त झाले गम् धातू जाणे क्त
अस्मि आहे अस् धातू लट लकार उ. पु. ए. व.
(आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) ( त्यावर) अर्जुन असे म्हणतो आहे की
हे जनार्दन,
आपले हे सौम्य मानवी रूप पाहून मला तरतरी आली, नैसर्गिक स्थिरता प्राप्त झाली आहे.
श्री भगवानुवाच
सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः।।11.52।।
श्रीभगवानुवाच - मम यत् रूपम् दृष्टवान्
असि इदम्, सुदुर्दर्शम् देवाः अपि नित्यम् अस्य रूपस्य दर्शन-काङ्क्षिणः ।
श्रीभगवानुवाच - श्रीभगवत् पु. प्र. ए. व. उवाच ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र.पु.ए.व.
मम माझे अस्मद् ष. ए. व.
यत् जे यद् नपु. द्वि. ए. व.
रूपम् रूप नपु. द्वि. ए. व.
दृष्टवान् पाहिलेले दृश् धातू पाहणे क्त प्रत्यय वत् प्रत्यय प्र. ए. व.
असि आहे अस् धातू असणे लट
लकार मपु. ए. व.
इदम्, हे इदं नपु. द्वि. ए. व.
सुदुर्दर्शम् दुर्लभ दर्शन सुदुर्दर्शः द्वि. ए. व. शोभनं च दुष्टं दर्शः यस्य सः
देवाः देवता देव पु. प्र. ब. व.
अपि सुद्धा
नित्यम् नेहमी
अस्य ह्या इदम् नपु. ष. ए. व.
रूपस्य रूप नपु. ष्. ए. व.
दर्शन-काङ्क्षिणः दर्शनाची अभिलाषा दर्शनकाङ्क्षिणः प्र. ब. व. काङ्क्ष् धातू इच्छा करणे
परमेश्वराचे दर्शन कोणाला होते ह्यावर बर्याच संतांनी भाष्य केले आहे. देव कसा दिसतो हे सुद्धा सांगितले आहेच.
हनायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेध्या न बहुना श्रुतेना।
(मुंडकोपनिषद्-3.2.3)
परमेश्वराला प्रवचन ऐकून, बुद्धि च्या साह्याने समजून घेता येत नाही.
श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला आपले विराट रूप दाखवले खरे पण
अर्जुनाला त्यांचे सौम्य रूप पाहून जीवात जीव आला त्यावर श्रीभगवानकृष्ण (अर्जुनाला)
म्हणाले की
(तू) जे माझे रूप पाहिलेस ते
अतिशय दुर्लभ आहे, देवतांना सुद्धा नेहमीच ते रूप पाहण्याची इच्छा असते.
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा।।11.53।।
यथा माम् दृष्टवान् असि, एवम्-विधः अहम् न वेदैः, न तपसा, न दानेन, न च इज्यया द्रष्टुम् शक्यः।
यथा जसे
माम् मला अस्मद् (सर्व) द्वि. ए. व.
दृष्टवान् पाहिले दृश् धातू पाहणे क्त प्रत्यय वत् प्रत्ययांत प्र. ए. व.
असि, आहे अस् धातू असणे लट लकार मपु. ए. व.
एवम्-विधः त्या प्रकारे एवं विधः यस्य सः प्र. ए. व. विध प्रकार
अहम् मी अस्मद् प्र ए. व.
न वेदैः, वेद पु. तृ. ब. व.
न तपसा, तपस् नपु. तृ. ए. व.
न दानेन, दान नपु. तृ. ए. व.
न च इज्यया इज्या स्त्री तृ. ए. व.
यज् धातू यज्ञ करणे (इज्यते)
द्रष्टुम् दृश् धातू पाहणे तुमुन् प्रत्यय
शक्यः शक् धातू यत् प्र. ए. व.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जसे माझे रूप तू
पाहिले आहेस तशा प्रकारचा मी न वेदाभ्यास, न तप, न दान, न यज्ञ करून (कोणाला) पाहता येणे शक्य नाही.
ह्याच अर्थाचा
48 वा श्लोक पण आहे, महर्षी व्यासांनी पुन्हा एकदा (ठासून) सांगायचे ठरविलेले दिसते. श्रीभगवानकृष्णांना आपल्याला हेच परत सांगायचे आहे असे म्हणूया.. 43 व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले आहेच की आपल्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. म्हणजेच वेदाभ्यास, तप, दान, यज्ञ ही
सर्व साधने आहेत परमेश्वराच्या जवळ पोहोचण्यासाठी, परमेश्वर नव्हे.
भक्त्या त्वनन्यया शक्यमहमेवंविधोऽर्जुन।
ज्ञातुं दृष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप।।11.54।।
हे परन्तप अर्जुन ! अनन्यया भक्त्या एवम्-विधः अहम् तु तत्त्वेन द्रष्टुम् ज्ञातुम् च प्रवेष्टुम् च शक्यः।
हे परन्तप अर्जुन ! परान् तापयति सं. ए. व.
अनन्यया केवळ न अन्या तृ. ए. व.
भक्त्या भक्ति स्त्री तृए. व.
एवम्-विधः अशा प्रकारे एवं विधः यस्मिन् सः प्र. ए. व.
अहम् मी अस्मद् प्र. ए. व.
तु
तत्त्वेन तत्त्व तृ
ए.
व.
द्रष्टुम् बघून दृश् धातू पाहणे तुमुन्
ज्ञातुम् च जाणून घेऊन सुद्धा
ज्ञा धातू समजून घेणे तुमुन् प्रत्यय
प्रवेष्टुम् च प्रवेश करून सुद्धा प्र +विश् प्रवेश करणे तुमुन् प्रत्यय
शक्यः शक्य आहे शक् धातू यत् पु. प्र. ए. व.
अशाच अर्थाचा अजून एक श्लोक
न साध्यति मां योगो न सांख्यं धर्म उद्धव।
न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ।।
(श्रीमदभागवत् 11.14.20)
उद्धवा, भक्त अष्टांग योग, सांख्य दर्शन किंवा इतर दर्शनाचे साधक असले पुण्य कर्म करणारे तपस्वी असले, तरीही जे
माझ्या भक्तीत लीन झालेले असतात त्यांनाच मी
वश करून घेतो.
ह्या श्लोकात प्रवेष्टुम् असा शब्द वापरला आहे त्याचा अर्थ परमेश्वराशी एकरूप होणे असा घेता येईल.
आधीच्या श्लोकात वेदाभ्यास, यज्ञ, तपश्चर्या,
दानधर्म केल्याने परमेश्वर प्राप्ती होणार नाही असे स्पष्ट करून सांगितल्यानंतर अनन्य भक्ती असा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ कसा लावायचा? पुढचा म्हणजेच 12 व्या अध्यायात हे सर्व समजेल असे वाटते कारण त्या अध्यायाचे नावच मुळी भक्तीयोग आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे परन्तप केवळ भक्तीच्या माध्यमातून मला तत्त्वतः जाणून घेणे, माझे रूप पाहणे आणि माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे.
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः।
निर्वैरः सर्वभूतेषु यः
स मामेति पाण्डव।।11.55।।
हे पाण्डव ! यः मत्-कर्म-कृत्, मत्-परमः, मत्-भक्तः, सङ्ग-वर्जितः,
सर्व-भूतेषु निर्वैरः, सः माम् एति ।
हे पाण्डव ! पण्डोः अपत्यं पुमान् तद्धित सं. ए.व.
यः जो यद् पु. प्र. ए. व.
मत्-कर्म-कृत्, माझ्या साठीच कर्म करतो मद् अर्थे कर्म कृत प्र. ए. व.
मत्-परमः, मला सर्वश्रेष्ठ मानणारा अहं परमः यस्य सः प्र. ए. व.
मत्-भक्तः, माझाच भक्त मम भक्तः प्र. ए. व.
सङ्ग-वर्जितः, आसक्तिरहित वर्जित सडःगः प्र. ए. व.
सर्व-भूतेषु सर्व सजीवांप्रती सर्वाणि भूतानि स. ए. व.
निर्वैरः, वैरभावविरहीत
निर्गतं वैरं प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
एति प्राप्त होतो इ धातू जाणे लट लकार प्र. पु. ए. व.
अनन्य भक्ति चा
पुसटसा उल्लेख 9व्या अध्यायातील 22 व्या श्लोकात आलेला आहेच.
ह्या अध्यायातील 54 व्या श्लोकात अनन्य भक्ति बद्दल वाचले. केवळ भक्तीच्या माध्यमातून मला तत्त्वतः जाणून घेणे, माझे रूप पाहणे आणि माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे असे श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहे. त्यांनी अर्जुनाला आपले सौम्य रूप आणि अघोरी रूप दोन्ही दाखवले. म्हणजेच श्रीभगवानकृष्णांचे प्रेमळ आणि विनाशकारी कार्य अर्जुनाने जाणून घेतले. आणि अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांपेक्षा सर्वश्रेष्ठ काहीही नाही हे पण समजले आहे. म्हणजे ज्ञान प्राप्त करून आणि भक्ती करून आपल्याला हेच शिकायचे आहे. त्यापुढे जाऊन ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे मत् कर्म कृत आहेत म्हणजेच प्रत्येक कार्य जे इदं न मम असा विचार करूनच करतात, त्यांना त्यांच्या कर्माचे श्रेय नको आहे, त्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला आहे. ते आसक्ती विरहित आहेत. ज्यांच्या मनात कोणाही बद्दल अजिबात वैर भावना नाही. जे मला सर्वश्रेष्ठ मानतात. जे
फक्त माझीच भक्ती करतात. ते माझ्याशी म्हणजे दैवत्वाशी एकरूप झाले आहेत ते मला प्राप्त होतात.
-------------------------🙏🙏🙏🙏-------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा